नवीन पेन्शन योजना ( NPS- New Pension System )

Submitted by केदार on 27 January, 2011 - 17:04

भारत सरकारने काही वर्षांपूर्वी Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) ह्या संस्थेअंतर्गत नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही नवीन का? तर पूर्वी पेन्शन मधील रक्कम ही PF अकाउंट मधेच असायची आणि PF मॅनेजर्स ह्या बॅंकाच असल्यामुळे त्यावर साधारण दराने व्याज मिळायचे. थोडक्यात ते रिकरिंग फिक्स डिपॉझिट्स ह्या स्वरुपात असायचे. पण नवीन योजनेत मात्र ह्यातील रक्कम शेअर मार्केट मध्ये गुंतवली जाईल. थोडक्यात हे आता म्युच्युअल फंड च्या SIP सारखे असेल पण म्युच्युअल फंडासारखे कधीही पैसे मात्र काढता येणार नाहीत. ही योजना सर्वांना खुली असून ह्यात भाग घेणे हे ऐच्छिक आहे. (voluntary). पण प्रत्येक सेन्ट्रल गव्हर्न्मेंट नौकराला मात्र ही योजना बंधनकारक आहे.
योजना अशी काम करेल.
१. PFRDA संस्था बँकांना व पोस्ट ऑफिसना ही योजना चालवायला उद्युक्त करेन.
२. बँकेत जाऊन कोणीही (सरकारी, निम सरकारी, प्रायव्हेट, दुकानदार, व्यावसायिक इ इ) दोन प्रकारचे अकाउंट उघडू शकते. ( टियर १ आणि टियर २)
३. अकाउंट उघडल्यावर प्रत्येकाला त्याचा PRAN Happy (Permanent Retirement Account Number) मिळेल. नौकरी बदलली /सोडली तरी हा नंबर कायम राहील.
४. अकाउंट उघडल्यावर दरमहा धारक पैसे जमा करेल. ( दरमहा कमीत कमी ५०० रू टियर १ मध्ये तर १००० रू टियर २ रु ते कितीही).
५. धारकाला अकाउंट उघडतानाच फंड मॅनेजर निवडावा लागेल. उदा आयसिआयसिआय, रिलायन्स, आयडिएफसी, स्टेट बॅन्क इत्यादी )
६. धारकाचे पैसे वरील फंड शेअर बाजारात गुंतवतात.
७. टियर १ ही योजना कधीही बंद करता येते पण खात्यात पैसे मात्र वयाच्या ६० व्या वर्षीच मिळतील. त्या आधी काढता येत नाहीत.
८ टियर २ ही योजना कधीही बंद करता येते व पैसे उचलता येतात.
९ आपली रक्कम दुसर्‍या फंड मॅनेजरकडे वळवता येते.
१० साधी आणि सोपी योजना. म्युचवल फंडाचे फायचे पण फंड निवडायची कटकट नाही.
११. टियर १ मध्ये ६० वर्षानंतर ४० टक्के रक्कम ही विमा कंपनीत परत गुंतवावी लागते व उरलेली रक्कम एकरकमी उचलता येते.
१२. गुंतवणूक करण्यासाठी अ‍ॅटो (म्हणजे लाईफसायकल फंड) व अ‍ॅक्टीव चॉईस ( म्हणजे इक्वीटी, बॉन्ड इ इ) फंड उपलब्ध आहेत.

थोडक्यात ही योजना अमेरिकेच्या ४०१ के सारखी आहे, पण ४०१ के मध्ये आपली कंपनी पण रक्कम गुंतवते, इथे मात्र तसे नाही.

उदाहरणासाठी तुम्ही जर ५००० रु प्रतिमहिना असे २० वर्षे ह्या योजनेत दिले आणि साधारण फक्त ६ टक्के परतावा घेतला तर तुमच्याकडे २० वर्षानंतर ३५ लाख रू जमा असतील!

आयडीएकसीच्या E योजनेने आत्तापर्यंत स्थापने पासून ४१% परतावा दिला आहे तर त्याच कालावधीत निफ्टीने ३६%. अर्थात हा दिर्घ कालावधी असल्यामुळे मधील उच्चांकाच्या वेळी निफ्टीचा परतावा जास्त असेल पण पेन्शन फंड असल्यामुळे पैसे काढता आले नसतेच.

पेन्शन फंड म्हणून ही योजना मला खूप चांगली वाटत आहे.

.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यशवंत, तुम्ही आ/च कसे काढले? मी खूप चौकशी केली पुण्यात, या योजनेची माहिती कुणालाच नाही. स्टेट बँकेत जाऊन आले, त्यांनी अलाहाबाद बँकेत जायला सांगितले. तिथे पण गेले, त्यांनी आमच्यकडे ही स्कीम नाही संगितले. वेब्साईट वरून मुंबईला फोन केला. त्यांनी अलाहाबद बँकेतच जायला सांगितले.

पुण्यात याची माहिती खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
इन्शुरन्स अ‍ॅकॅडमी हेल्प डेस्क डेक्कन जिमखाना बलभीम मंदिराजवळ , ऑफ भांडारकर रोड
फोन २५६६६६६० मो. ९६५७७०९६७८ ई मेल- pensionpran@gmail.com
प्रो क्षितिज पाटुकले हे हेल्प डेस्क चालवतात.
http://www.pfrda.org.in/index.asp इथे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार मला काही विसंगती वाटते. पुरेशी स्पष्टता योजनेत नाही तरी नाविन्यपुर्ण योजना वाटते.
१०००/- भरुन खाते सुरु करता येते त्यातील ५०० रु हा त्यांचा सर्विसचार्ज आहे व ५०० रु खात्यात जमा होतात. प्राण आल्यावरच खाते चालू होते म्हणजे नंतर उरलेले ५,५०० भरावे लागतात.

मी सुद्धा पोस्ट ऑफीसमधे आणि बँकेत चौकशी केली या स्किम्सची ! काही उपयोग नाही. Sad
प्रकाश घाटपांडेंनी दिलेल्या फोन नंबर वर फोन केला "वरच्या पत्त्यावर या म्हणतात"

जे एम रोड वर Axis Bank येथे a/c काढता येइल. अजुन याला subscribers कमी आहेत. जसे subscribers वाढतिल तसे charges कमी होतील.

आयसीआयसीआय डायरेक्ट वर ऑनलाईन अकाउन्ट काढता येते. मी तसेच काढले आहे युलिप शी तुलना केल्यास , सध्या आहे तेच चर्जेस बरेच कमी आहेत. !

मी आता भारतात गेले होते तेव्हा अकाउंट उघडायचा दोन वेळा अयशस्वी प्रयत्न केला! Sad
मी आयसिआय्सिआय बँकेत फॉर्म भरुन दिला होता.

मुळात फॉर्म मधे एक कम्युनिकेशन पत्ता आणि एक पर्मनंट पत्ता असे दोन पत्ते द्यावे लागतात. नियमानुसार पर्मनंट पत्त्याचे प्रुफ द्यावे लागते. ते माझ्याकडे होते. पण त्या पत्त्यावर कुणीच रहात नाही. म्हणुन कम्यु. पत्ता वेगळा देणे जरुरी होते. कम्युनिकेशन पत्ता फक्त भारतातलाच देता येतो. पण मी भारतात नसल्याने मी आधी सासरचा आणि नंतर आईचा पत्ता दिला. या पत्त्यावर मी रहात असल्याचे प्रुफ नसल्याने अप्लिकेशन रिजेक्ट झाले Sad
पण असे प्रुफ मी कसे देणार ते मला कळले नाही!!! कारण मी एन आर आय असल्याने रेशन कार्डवरही माझे नाव नाही. आणि इतर कुठल्या बिलात वगैरे असणेही शक्यच नाही!

असो तर एन आर आय असताना अप्लाय करताना हे लक्षात ठेवा.

योजनेबद्दल वाचुन साधारण तिशीच्या आत्/सुमारास असताना गुंतवणुक केल्यास फायदेशीर ठरेल असे वाटले. हे बरोबर आहे का? ४०-४५ नंतर यात आल्यास फारसा फायदा होणार नाही असे वाटतेय.

मी आयसी आयसी आय डायरेक्ट ह्या साइट वरून अकाउंट उघडले. अतिशय सोपी प्रोसीजर आहे सर्व कारभार इमेल ने आहे. त्यांचे आय पिन टी पिन फक्त पोस्टाने आले. आता आपण मॅनेज करायचे. अगदी वायफळ खर्च होणारे पैसे इथे टाकले तरी मदतच होइल.

नव्याने सज्ञान होणार्‍या मुलांना हे अकाउंट उघडून द्यावे. आता चाळीशीत असलेल्यांनी ही उघडावे कारण आता जीवन मान सुधारल्याने आपण जास्त दिवस जगू शकतो व मुले संभाळतीलच असे नाही. प्रायवेट सेक्टर मध्ये असल्यास पेन्शन मिळणार नाही. तेव्हा निदान १५ वर्षे तरी आपण सेव्ह करू शकतो. औषधांचा खर्च निघेल. उत्तम मोर्चेबांधणी केल्यास साठी पुढील जीवन आरामात घालविण्यास ह्याचा उपयोग नक्की होइल. पीपीएफ, पीएफ व एल आय सीच्या बरोबरीने. टायर टू उघड्ण्यासाठी पहिले टायर वन उघडणे जरूरीचे आहे.

मला युजर आय्डी व पासवर्ड कसे सेट करायचे ते कळत नव्हते मग मी इन्फो ला इमेल केली. त्यांनी उत्तर दिले त्याप्रमाणे केले. चट सुरू झाले. अगदी सोपे आहे. आता फक्त मॅनेज करायचे. एकूण सिस्टिम आवडली मला.
म्युच्युअल फंड मध्ये डायरेक्ट करण्यापेक्षा हे बरे. नॉमिनेशन सुविधा पण आहे. १८०० नंबर पण आहे त्यावर फोन केल्यास सर्व व्हॉइसमेल/ मशीन ने उत्तरे आहेत. ते टीपिन विचारतात. तो फीड केल्यावर सर्व स्कीम व स्टेटस कळते. पूर्ण प्रक्रियेत जिवंत माणसाशी बोलावे देखील लागले नाही. चार्जेस ते क्वार्टर एंडिंग ला कापून घेणार. एन एस डीएल साइटवर स्टेटमेन्ट्स व तुमचे सर्व डिटेल उपलब्ध आहेत. अकाउंट नंबर व पासवर्ड जपून ठेवा. व विल मध्ये घालायला विसरू नका. टीपिन संभाळा.

एक असे थिंकिंग आहे कि आपल्या हातात पैसा टिकत नाही. खर्चच होत राहतो. अश्या लोकांसाठी पहिले ही सर्व ऑटोमेटिक कॉण्ट्रिब्युशन्स करून झाली की मगच उरतील ते पैसे इतर वायफळ खर्च करता येतील. बाहेर जेवणे, कपडे खरेदी, पुस्तके व संगीत खरीदणे ह्यात माझा बराच डिस्पोजेबल पैसा जातो. त्यावर आपसूक बंधन येइल.

प्रत्येक फंड मॅनेजरचे आज पर्यंतचे returns (preferably annulaized) कुठे पहायला मिळतील? २०१०-११ पर्यंत दिसताहेत पण त्या नंतरचे दिसत नाहीयेत. आणि जे दिसताहेत ते प्रत्येक साईट वर वेगवेगळे आहेत.

>>>७. टियर १ ही योजना कधीही बंद करता येते पण खात्यात पैसे मात्र वयाच्या ६० व्या वर्षीच मिळतील. त्या आधी काढता येत नाहीत.<<<
यात बदल झालेला दिसतो. वयाच्या ६० अगोदरही पैसे काढता येतात. पण फक्त २० टक्के. उरलेले ८० % हे अ‍ॅन्युअटी स्किम मधे गुंतवावे लागतात. आता हे गुंतवणुकीचे मुल्याच्या कि भरलेले कॉन्ट्रिब्युशन च्या हे काही कळत नाही.त्यावेळचे एनएव्ही काय असेल हे आत्ता कसे काय सांगणार? कदाचित आमच्या समजण्यात काही तरी गफलत होत असावी.

https://www.npscra.nsdl.co.in/all-faq-withdrawal.php इथे माहिती उपलब्ध आहे.

प्रकाश घाटपांडे: >>> आता हे गुंतवणुकीचे मुल्याच्या कि भरलेले कॉन्ट्रिब्युशन च्या हे काही कळत नाही

your accumulated savings (pension wealth) to purchase a life annuity from any IRDA-regulated life insurance company.

टीयर २ मधिल पैसे काढले तर त्या प्रॉफिट (?) वर टॅक्स भरावा लागतो का? मला अजुन तितकिशी समजली नाही योजना पण प्रयत्न करतोय समजुन घेण्याचा. आपल्याला रोजचा बॅलन्स दिसतो का टीयर २ चा? म्हणजे फ्रिक्वेंट ट्रॅन्झा क्क्श्न करता येतात का? (टोटली कन्फ्युस्ड)

८० सि म्हणजे १००००० चे लिमिट असते तीच ना?

अमा, तुम्ही सगळे अ‍ॅनालिसिस केले असणार, जरा उलगुन सांगा बरं Happy

स र्व फंड्स्चे स्टे टमेंट आपल्याला मिळ ते. ते पोस्टाने पाठिवतात. महत्त्वाचे म्हण जे एक फॉर र्म आहे तो भरून पाठव ल्यास ते कार्ड देणार ते कार्ड घेणे योजना चालू ठेवण्यासाठी बंधन कारक आहे. माझ्याहातूनही ते राहिले आहे. आता केले पाहिजे.

दुस रे म्हणजे ईपी फ जास्त चांग ले रि ट र्न्स देते असे कालच्या इ को टाइम्स ला आहे लिंक देते हपिसातून.

भविष्यात 'पेन्शन फंड घोटाळा' असा होईल कि काय याची भीती वाटते. असो अनेक राष्ट्रीय घोटाळ्यात या आणखी एकाची भर

Only few bank branches are allowed to open NPS account. In Aundh, Pune, only one bank branch is operates NPS account.

समजा एखाद्याने वयाच्या ३० व्या वर्षी एनपीएस अकाउंट उघडले. दरवर्षी तो एक लाख टाकत गेला. तर ६० व्या वर्षी त्याने त्याची रक्कम पाहिली तर ती त्या वेळच्या एनएव्ही वर अवलंबून असणार आहे.३० वर्षात अर्थव्यवस्थेत होणारे बदल. शिवाय ही स्किम मधे मार्केट रिस्क आहेच. असेही होउ शकते की त्याने तीस वर्षात जमा केलेले ३० लाख वजा मेंटेनन्स / सर्विस चार्ज धरुन होणारी रक्कम समजा अगदी २९ लाख ५० हजार आहे. व ६० व्या वर्षी जर अर्थव्यस्थेत पडझड होउन एनएव्ही खाली घसरले. तर तुम्ही प्रत्यक्ष भरलेल्या रक्कमे पेक्षा लाईफ अन्युअटी साठी तयार होणारा पेन्शन फंड हा कमी देखील असू शकेल. मग भीक नको पण कुत्र आवर असे वाटेल. पेन्शन स्किम म्हटल्यावर पेन्शनची खात्री पहिजे ना? बर मधल्या काळात बाहेर पडण्याचे मार्ग देखील मर्यादित आहेत. स्किम गुंतागुंतीची वाटते. तज्ञांनी प्रकाश टाकावा.
आज अ‍ॅक्सेस बँकेत गेलो व बायकोच्या एनपीएस अकाउंटला पैसे कॅश भरायचे आहेत सांगितले तर त्यांनाही याबाबत विशेष माहित नव्हते. त्यांनी माहिती गोळा केली व शेवटी त्यांनी सांगितले कि चेक घेतो. कॅश घेण्याचा आमची पहिलीच वेळ आहे. वेबसाईटवरील माहिती व प्रत्यक्ष कामकाज यात तफावत दिसते.

प्रकाश घाटपांडे: आवडले की आपण माहिति करुन घेण्या करता प्रश्न विचारण्याची तरी तसदी घेत आहात. हल्ली तेवढे सुद्धा करणारी मंडळी नाहियेत. थोडक्यात सांगायचे झाले तर NPS बद्दल बरीच माहिति अजुन बाहेर आलेली नाहिये तेव्हा सध्या तरी थोडे थांबावे व घाई करु नये. बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत ब त्या बद्दल NPS scheme मधे गुंतव असे सांगणर्‍यांना सुद्धा धड माहिति नाहिये....

>>>> ३० वर्षात अर्थव्यवस्थेत होणारे बदल
पेन्शन scheme आहे म्हणुनच त्यात फक्त काही निवडलेलेच फंड असणार आहेत (५-१० निवडक फंड असतिल). Market risk ही तुम्ही निवडलेल्या फंड वर अवलंबून असेल. तुम्ही तुमच्या risk profile प्रमाणे allocations बदलू शकता. अगदीच काही कळत नसेल सरळ auto mode मधे ठेवायचे पण मग परतावा सुद्धा कमिच असेल.

Hope this helps...

अनेक महिने वाचन आणि (माझ्या एव्हड्याच ज्ञानी Wink ) लोकांशी चर्चा करून शेवटी एनपीएस अकाउंट उघडलं. एस्बीआय काउंटरवरची बाई अगदी तशीच पण चांगली स्कीम एसबीआयची आहे म्हणून गळ घालत होती. फक्त वर्षाला कमितकमी २६हजार भरायचे पण फक्त पहिली दहा वर्षेच भरायचे म्हणे. मी म्हणालो की मला या फिचरचा काही उपयोग नाहिये, पण साठीनंतर मिळणारी पेंशन जर करमुक्त असेल तर विचार करेन. पण कुठलीही पेंशन योजना करमुक्त नसते त्यामुळे शेवटी एकदाचं अकाउंट उघडलं.

जमीन-जुमला, सोनं, शेअर्स, बॉन्ड्स वगैरे प्रत्येकानं आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार ठरवावं पण पिपिएफ आणि एनपीएस खातं हे प्रत्येकाचं असावंच.

व्हीपीएफ आणि एन्पीएस यापैकी जास्त चांगलं कोणतं?
एन पीएस घेण्याऐवजी व्हिपीएफ मध्ये पैसे टाकले तर परतावा जास्त मिळेल ना व्हीपीएफ वर? फक्त एकच आहे रीटायर झाल्यावर ती रक्कम योग्य ठीकाणी गुंतवायला हवी.

https://www.npscra.nsdl.co.in/
इथे आता पैसे ऑन लाईन ही भरता येतात. नवीन माहिती देखील दिलेली आहे. अतिरिक्त ५००००/- टॅक्स सेव्हिंग बेनिफिट मिळतो.

HDFC pension या साइट वर मिळालेली माहिती
१.५ लाखाशिवाय ५०००० जास्तीचा tax benefit मिळतो

What does National Pension System offer you?
It reduces your tax liability by availing the deductions u/s (80CCD) which will be upto Rs.1,50,000/- under section 80 CDD(1) and an additional Rs.50,000/- under section 80CCD (1B) per assessment year (applicable from FY 2015-16/AY 2016-17).
Dual benefit of saving on tax and build a robust monthly retirement income.
Flexible investment options during accumulation stage
A user friendly online portal to provide you easy access to your pension account

<<<थोडक्यात ही योजना अमेरिकेच्या ४०१ के सारखी आहे, पण ४०१ के मध्ये आपली कंपनी पण रक्कम गुंतवते, इथे मात्र तसे नाही. >>>

ती ऑप्शन सुद्धा आहे. पण सध्या अनिवार्य नाही. माझ्या माहितीनुसार विप्रोसारख्या काही कंपन्या गुंतवणूक करतात. सरकारी कर्मचार्‍यांना मात्र अनिवार्य आहे. म्हणजे कर्मचार्‍याने पगाराच्या १०% (पगार म्हणजे बेसिक अधिक महागाई भत्ता) गुंतवणूक केली तर सरकारलासुद्धा तितकी गुंतवणूक करावी लागते. करनियोजनासाठी कर्मचार्‍याला दोन्हीचा फायदा होतो. मात्र कंपन्यांना आणि सरकारला ५० टक्के एक्विटी करता येत नाही. कर्मचार्‍याच्या वयानुसार एक्विटी कमी होते आणि कर्जरोख्यांमधील गुंतवणूक वाढते.

खूप सुंदर माहिती मिळाली.

केदार धन्यवाद.

माझे काही प्रश्न आहेतः
१) इथे कुणी NPS खाते जर काढले असेल तर सविस्तर हे खाते उघडण्याची पद्धत लिहाल का?
२) हे खाते जर ऑनलाईन काढता येत असेल तर त्यासाठी असलेल्या लिन्क्स मिळतील का?
३) कुठकुठले कागदपत्रक मागतात ते लिहाल का?
४) ऑनलाईन आपण जर पैसे भरु शकत असू आणि आपण जर टीअर २ घेतले असेल तर आपले पैसे आता किती झाले हे कळते का?
५) थेट टिअर २ घेता येते का?
६) भारताबाहेर एक दशकापासून जी लोक नोकरी करत आहेत पण अजून भारतीय नागरिक आहेत त्यांना NPS चे खाते काढता येते का?

ज्यांनी हे खाते घेतले आहे त्यांचा आजवरचा अनुभव सांगू शकाल का? प्लीज.

धन्यवाद.

Pages