भारतातील असुरक्षित शहरे आणि तेथील अनुभव

Submitted by हर्ट on 21 January, 2011 - 12:58

मी एक बातमी वाचली ज्यात लिहिले आहे की दिल्ली नंतर बंगलोर आणि मग मुंबई भारतातील असुरक्षित शहरे आहेत. भारतात तुम्हाला कुठल्या शहराचा कुठला वाईट अनुभव आला त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित आहे. चांगला अनुभव आला असेल तर तेही लिहा जेणेकरुन लोकांचे समज गैरसमज टळतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच वर्षांपूर्वी जोहन्सबर्ग मध्ये फिरताना, सुंदर सुंदर बंगल्यांना कंपाउंड्च्या मोठ्यामोठ्या भिंती आणि गेट्स बघितले होते. अगदी कडेकोट बंदोबस्त! ... विचारल्यावर कळले की तिथे क्राईम रेट आणि विशेषतः लहान मुलांना किडनॅप करण्याचे प्रकार सर्रास चालतात. एवढ्या मोठया शहरात हे चालते याचे त्यावेळी खुपच आश्चर्य वाटले होते कारण आपल्याकडे हे सगळे युपी-बिहार मध्ये असायचे. आता एक एक बातम्या वाचल्यावर वाटतं मुंबईसुध्दा तितकीशी सेफ राहीली नाहीये.

पण त्याचबरोबर हे ही आवर्जून सांगेन की सर्वसाधारण पणे टॅक्सीवाले वगैरे प्रोफेशनली कामं करतात. रात्री अपरात्री टॅक्सी करायला मला कधी भिती वाटली नाही. ऑफिसात असताना, उशीरा निघाले तर मी वरळी ते मुलुंड अशी टॅक्सी करायचे. त्याला पत्ता सांगून सरळ झोपून जायचे. कधीही काहीही वाईट प्रसंग आला नाही किंवा काही प्रसंग येईल असं मनातही आलं नाही.

अरे वा... गोव्याबद्दलचे रात्रीचे हिंडण्याचे अनुभवही आले की लगेच!

पुण्याच्या रेड लाईट एरियातून अनेकदा काही कामानिमित्ताने जायला यायला लागलेले आहे. खुद्द बुधवारातल्या पासोड्या विठोबापाशी आजोळचा वाडा होता, त्यामुळे त्या रस्त्याने येणे-जाणे असायचेच. पण कधीही वावगा अनुभव नाही. शिंदे आळीत असलेल्या एका मेंदी क्लासला मी काही दिवस जात होते. तिथेही गैर अनुभव नाही. मंडई, त्यामागचा परिसर इथेही हिंडले आहे रात्री बेरात्री. फक्त ज्या ठिकाणी गुत्ते, बार, जुगार इत्यादी खेळले जातात त्या जागा वगळून तिथेही कधी त्रास नाही झाला. दाणे आळी इत्यादी परिसरातून जाताना फक्त तिथे रेंगाळायचे नाही एवढे पथ्य पाळले की ठीक असायचे. माझे काही मित्र मात्र त्या एरियातून जाताना जाम टरकलेले असायचे!!

मुंबै बेस्ट दिल्ली पेक्षा प्रचंड अनुमोदन. चेन्नै, हैद्राबाद, कोइंबतूर, त्रिचि, भुवनेश्वर, कटक, बंगलोर अगदी फिकर नॉट शहरे. आपण संभाळूनच राहयचे फक्त. दिल्ली आजिबात आवड्त नाही. पण बरोबर कोणी असेल तर मस्त आहे. महत्त्वाचे म्हणजे आर्मी कँट सर्व ठिकाणी सुरक्षित असतात. मी नवीन शहरात गेले की पहिले आर्मी एरिआ दिसला की लक्षात ठेवते. काही त्रास झालाच तर दाराशी जाउन मदत मागितली तर ऑफिसर येउन मदत करेल असा विश्वास मला वाट्तो. बंगलोर मधील एक उच्च अनुभव.

२००७ डिसेंबर. पुन्नीला घेउन बंगलोर ऑनलाइन बुकीग जिंजर व्हाइट फील्ड मध्ये. ते जरा बाहेर आहे. दोन दिवस एकच रिक्षावाला होता. जरा ओळख झाली होती. रात्री नौ साडे नौ झालेले. पुन्नी तेव्हा आठ पूर्ण फक्त. पर्स मध्ये सर्व पैसे व चीजवस्तू. क्रेडिट कार्डॅ वगैरे. व्हाइट फील्ड ला आल्यावर त्याच्या रिक्षातला गॅस संपला. तो म्हणे घरी एक सिलींडर आहे आणतो त्या बस्तीत आम्हाला सोडून तो गेला.
पूर्ण अंधार पंधरा मिनिटे वाट पाहिली तेव्हा मला अगदी भीती ने देव आठविला होता. पैसे चोरून मला मारून मुलीला पळविले अस्ते कोणी तर आमची चौकशी कर्णारे पण कोणी नाही. तेव्हा माबो माहीत नव्हते. पुनी बालिश प्रशन विचारत होती. तिला भीती दाखवून चालले नसते. तो आला सिलिंडर बसविला व नीट सोडले हाटेल वर. मी जमेल तेवढ्या कन्नड मध्ये त्याचे आभार मानले. सिरीअसली.
आत आलो तर बेनझीर च्या खुनाची बातमी टीवीवर. अगदी सुन्न झाले एक स्त्री म्हणून मला ती फार आवड्त असे. पुन्नीला तिच्या खुनाचा संदर्भ लागेना व तिला मी अश्या बातम्या सांगत नसे तेव्हा!

गरीब कामकरी भारतीय माणसाचा मान राखला व फार मेमसाब गिरी केली नाही तर ते नीट वागतात.
मुंबैतही एकदा लोकल मधील पोलिसांना मदत मागितली होती. मुलगी कडेवर घेउन उतरते तुम्ही बॅग हातात द्या असे सांगितले त्यांनी दिली होती.

चेन्नई मधे रात्री रिक्षा वाले बरेचदा तर्र आढळल्यात
वेलिंग्डन आयलंड ला येकदा खुप उशिरा (म्हणजे रात्रीचे ९ Happy ) पर्यंत काम करत बसलो तर कोचि ला हॉटेल ला परत येताना पुर्ण भाग अगदी शुकशुकाट जाणवत होता मात्र अन्सेफ वाटत नव्हते, रात्री जेवणाचे मात्र वांधे झाले होते
बेंगलोर नेहमिच सेफ वाटत आलेय
दिल्ली कायमच्व्ह अन्सेफ वाटत आलेय मात्र हल्ली टॅक्सी ,रिक्षा फसवणुक कमी झालेय असे जाणवते.
कलकत्ता- बर्‍याच वर्षा पुर्वी येकदा चुकुन चारेक दिवस येका फ्री स्कुल स्ट्रीट वरच्या हॉटेलात राहिलो होतो, रात्री उशिरा परत येताना काही विचित्र घ्डतेय हे जानवत होते आणि आपण कोणत्या भागत उतरलोय हे लक्षात आल्यावर हॉटेल चेंज केले, मात्र कोलकता ही सेफच म्हणायला हवे मात्र लोकाना माहिती विचारली तर सरळ उत्तर मिळेल याची खात्री नाही, मी येकदा फुल्बागन येरिआ शोधताना बराच फिरलोय : ) नंतर कल्लले कि फुल बागान म्हणजे गार्डन आणि असे बरेच प्रसिध्द फुल्बागान एरिआ आहेत.

मला कोल्हापूर देखील सुरक्षित वाटत आलेय. पहाटे तीन पर्यंत मी एकटा भटकलोय तिथे. रस्त्यावर तूरळक माणसं असतातच. दूधकट्टा पहाटेच जागा असतो. अंबाबाईच्या देवळाजवळ तर पहाटे ४ वाजल्यापासून जाग असते. स्टँड चा परिसर तर रात्रभर जागता असतो. चहा, पोहे कधीही मिळतात.
त्या पूलाखाली मात्र वेश्या असतात, पण त्या आपणहून कुणाला हटकत नाहीत.

अहो बी,
तुम्ही ज्या भागात जाल त्या शहराची तुमच्यासाठी किती सुरक्षितता माहित करून घेणे ठिक आहे पण तुम्ही जिथे जाल अथवा गेलात कि तिथे रहाणार्‍या लोकांनी कुठे सुरक्षितता मागावी? कळले ना मी काय म्हणतेय ते?
त्यांनी इथेच बीबी उघडावा काय 'सुरक्षितता व तत्सम' मध्ये'? Wink

बरे हे घ्या आमचे अनुभवाचे बोल,

सगळीकडे वेळ ७ नंतरचीच घ्या व वय (५-२५ घ्या)

दिल्ली: रेटींग *फक्त. ७ नंतर माहिती असलेला भाग असो व नसो, टॅक्सीवाल्यांपासून सगळे बेकार. वरून खाली बघतील काय व नको ते प्रश्ण. बरोबर बाप्या असो वा नसो(बॉयफ्रेंड रूपात वा पतीदेव) काहि भाग अतिशय बेकार रात्री. सकाळचे रूप वेगळे असेल त्याच भागाचे. मुलींसाठी कधीही असुरक्षित रात्री तो मग कुठलाही भाग असो हे ठाम मत.

मद्रासः ** सकाळी बरे पण रात्री बेकार , साधारण गचाळ शहर व अन्फ्रेंडली लोकं. रिक्षावाले लूटमार करतात. लोकं बर्यापैकी मारक्या नजरेने बघणार. हिंदी येत नाहि दाखवून आणखी डोकं खाणार. वैतागून मध्येच रिक्षेतून उतरायला लागेल नाहितर तेच रिक्षावाले मध्येच सोडून देतील रस्त्यावर कुठेही. हा ७ वर्षापुर्वीचा अनुभव कामासाठी गेले असताना.

बँगलोर्/हैदराबादः *** ठिकठिक. बरोबर पोर्‍या घ्या व फिरा कुठे पण, तेच ते माहिती असलेल्या भागात फिरा.

पुणे: **** ठिक ठाक. अगदी अलिकडे झालेल्या भागात वगैरे अजुन तशी भितीच वाटते.

मुंबई: ***** ५ वर्षापासून एकटी फिरलेय(ती कशी हि एक गोष्ट आहे) हरवली नाहि कि पळवले नाही कोणी अजुनतरी. Proud टॅक्सीवाले मस्त गाणी एकवत आणतील.
फक्त ऑफीस भागात जावू नका खूप रात्री(फोर्ट, कुलाबा, साकिनाका वगैरे).

गोवा: पणजी *** सुरक्षित, डिचोलीम ** सुरक्षित तर मडगाव **ठिकठाक. २ वाजता भूतं दिसतात का म्हणून मडगाव स्टेशनावरून एकटी आलेय सायकलवरून. Proud

कुठे वाचली ही बातमी ? लिंक द्याल का ?
कुठलीही शहर पूर्णपणे असुरक्षित कसे असू शकेल ? प्रत्येक शहरात काही ना काही भात कुख्यात असू शकतात. न्यू यॉर्क मधे हार्लेम अन ब्रॉन्क्स, शिकागो मधे साउथसाइड, असे भाग नाहीत का ?
छोट्या गावात / शहरात दंगे , घरफोडी, मारामारी, चोरी असे प्रकार पण होतच असतात ना ? या बा फ चा नेमका उद्देश काय आहे ?
चार ( किंवा चाळीम वा चारशे ) लोकांचे अनुभव माहित पडल्याने परिस्थिती बदलणार आहे का ?

आपण फक्त क्राईम रेट ह्या अनुषंगाने चर्चा करत आहोत.
आतंकवादी हल्ल्यांपासुन पहिले फक्त मुंबई शहर लक्ष्य होतं, आता तसं नाहिए, पुणं, हैदराबाद, अहमदाबाद, वाराणसी , दिल्ली ईत्यादि शहरं सुध्दा आता त्यांच्या लिस्ट वर आहेत.

Pages