तुझ्याविना या जगात माझा.. या आठवड्याचा तरही...

Submitted by मी मुक्ता.. on 17 January, 2011 - 23:23

जाणकारांच्या सूचना/प्रतिक्रिया/बदल अपेक्षित...

http://merakuchhsaman.blogspot.com/

सातीच्या सुचना आणि प्रत्यक्ष मदत यामुळे इथे चांगले बदल करणं शक्य झाल मला.. Happy खूप आभार.. मोठ्या टायपातले तिचे बदल add करून गझल पुन्हा छापली आहे.. Happy

---------------------------------------------------------------------------------

सदैव दिसशी मला सभोती तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..

भिनून जावा नसानसांती ,मला नव्याने असा डसावा
नको म्हणाले किती तरीही, मनात त्याला रुकार आहे..

खुणावणारे क्षितीज आता, कथे मला हे असे तराणे,
तिथे नवे ने सुरेल जगणे जिथे जुना अंधकार आहे ..

झुलायला मी सुखा- दुखाचे अनेक झोके झुलून गेले
इथून पुढचा हरेक क्षण जीवना तुझ्यावर उधार आहे..

----------------------------------------------------------------------------

हुश्ह्ह.. कल्पना खूप होत्या पण वृत्तात बसवताना धाप लागली.. गझल पूर्ण करताना मी लाकडाला जोरजोरात रंधा मारून घामाघूम झालेय, आधी विचार करताना बाहेर आलेली जीभ नंतर घशाला कोरड पडून आत ओढली जातेय असं काहीतरी चित्र येत होतं माझ्या डोळ्यापुढे.. शेवटच्या ओळीत यतिभंग झाला का? (म्हणजे त्याला यतिभंगच म्हणतात ना?) इथल्या जुन्या जाणत्या मंडळींनी जरा सविस्तर मार्गदर्शन करावं ही विनंती...

गुलमोहर: 

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..>>
सुंदर...

हो, यतिभंग झाला आहे, पण माझ्या मते कल्पनाही नीट पोचली नाहीये.. (किंवा मला कळली नसेल)..
(दुसरीच गझल आहे त्यामुळे ठीकाय... सुधारणा होतीलच Happy )

जाता जाता - "जिथे तिथे का दिसशी मजला," इथे वृत्त भंगलंय, त्यामुळे गझल मात्रावृत्तामध्ये झाली आहे. अर्थात तरीही हरकत नाही.

शुभेच्छा! Happy

दिलेल्या तरहीनुसार लगालगागा | लगालगागा या वृत्तामध्ये दंडाच्या जागी यती येतो.
शेवटच्या मिसर्‍यामध्ये इथून पुढचा हरेक क्षण जी | वना तुझ्यावर उधार आहे इथे यती येतो.

(अवांतरः आपल्यासारख्या गझलपंडिताकडून ही शंका आलेली बघून आश्चर्य वाटले.)

मेकुसा,

बर्‍याच ठिकाणी वृत्त बिघडले आहे पण आपण लीलया ते दुरूस्त करू शकाल ह्याची खात्री आहे. Happy

उदा. दिसशी मजला,
नवी पल्लवी - ह्यात 'प' हा गुरू आणि 'ल्ल' हा लघु आहे म्हणून लगागालगा अशी लगावली होते आहे
नसानसातून - एक लघु जास्त आहे
दंश असा दे, दु:ख-सुखाचे - गाललगागा अशी लगावली होते आहे

आपण सुचना मागवल्या आहेत म्हणून एवढे विस्ताराने लिहीले. आपल्या चुका काढण्याचा किंवा आपणास नाउमेद करण्याचा उद्देश नाही ह्याची खात्री बाळगावीत Happy

धन्यवाद!!

@आनंदयात्री,
धन्यवाद.. Happy
कल्पना अशी होती की माझ्या वाटच सगळं मी भोगलंय.. आता इथून पुढे मी जे काही करेन ते आयुष्यावर उधार राहील.. कारण माझं सगळं देणं फेडलं मी..

@बेफिकीर,
शेवटच्या ओळीत.. "जीवना" मध्ये मागच्या part मधला गुरु आणि मग नवीन part चे लघु-गुरु असा क्रम आलाय...

असल्या यतींचा विचार करत बसू नये.

तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बे गुमान होते - सुरेश भट

उगीच माझ्या तुझ्या मिठीच्या अजूनही रं गतात चर्चा - सुरेश भट

कधीतरी मात्र चांदण्यांचा तसा इरादा जरूर होता - सुरेश भट

यतीचा विचार प्रामुख्याने आनंदकंदमध्ये केला जावा.

-'बेफिकीर'!

@विजय दिनकर पाटील
"क्षण" मध्ये दोन लघु चा एक गुरु घेतलाय
same is the case with "वर"
दु:ख-सुखाचे च्या लघु-गुरु क्रमावर कोणी प्रकाश टाकेल का?
माझा गोन्धळ होतोय...

जवळपास प्रत्येक शेरात वृत्तभंग आहे. पण आपल्या गझलेचा आशय सुंदर आहे अस मला वाटते. आनंदयात्री म्हणतात त्याप्रमाणे आशयाची स्पष्टता मात्र असायला हवी, जी येत जातेच आपोआप!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

असल्या यतींचा विचार करत बसू नये.>>

सहमत. कारण सादर करताना तो मिसरा flow मध्ये वाचला जातोच. पण "गझलप्रवासात जे दोन पावले पुढे गेलेले आहेत (आधी अभ्यास सुरू केल्यामुळे असो वा व्यासंगामुळे) त्यांनी नवीन प्रवासास लागलेल्यांना अधिक सुखकर वाट द्यावी असे आपले मला वाटते." असे कुठेतरी आपणच लिहीले असल्यामुळे लिहीणार्‍याला जर आपणहून शंका आली असेल तर त्याबद्दल उत्तर देणे हीही "गझलप्रवासात पुढे गेलेल्यांची" जबाबदारी असते असे मला वाटले. अर्थात म्हणूनच मी शेवटच्या शेरातील अर्थाबद्दल अधिक लक्ष वेधले आहे.

(अवांतरः मला वाटले बेफिकीरजींचा माझी परीक्षा घ्यायचा इरादा आहे की काय!! ;))


कल्पना अशी होती की माझ्या वाटच सगळं मी भोगलंय.. आता इथून पुढे मी जे काही करेन ते आयुष्यावर उधार राहील.. कारण माझं सगळं देणं फेडलं मी..

वेल, तसं म्हणायचं असेल तर "झुलायला" या शब्दाचं प्रयोजन काय? i mean त्या शद्बामुळे काहीशी अपरिहार्यता/जबरदस्ती दिसते. म्हणूनच मला अर्थ नीट कळला नव्हता... असो, श्वेता, गझलकार आपल्या प्रत्येक गझलेमधूनच शिकत जातो असं मला वाटतं! Happy

क्षण हा उच्चारामुळे लघु लघु आहे आणि वर हा गुरू आहे.

@बेफिकीर,
हम्म... पुढच्या वेळी अजून प्रयत्न करीन... Happy वाटलंच होतं चुका असतील म्हणून... लिहितानाच धाप लागत होती... Happy
प्रोत्साहनाबद्दल thanks.. Happy मनापासून...

@आनंदयात्री,
धन्यवाद.. Happy
इतक्या मनापासुन सगळे मदत करतायेत हे बघुन छान वाटतय खूप.. Happy
एक प्रश्न राहिलाय अजुन..
"दु:ख-सुखाचे" चा लघु-गुरु क्रम...

उच्चार करताना दुक्ख मधला क् दु वर येतो आणि दु गुरु होतो. त्यामुळे ख एकटाच (बिचारा) लघु होतो आणि त्याला सुखामधला "सु" जोडीदार म्हणून मिळाल्यामुळे ते 'गुरू'पदाला पोहोचतात!!! Happy Lol

फापटपसारा न घालता सहज समजावलंयत आनंदयात्री तुमच्या पोस्टस आवडल्या. धन्यवाद.

मेकुसा,माझ्यापरीने आणि तुझी संमती आहे असे समजून खालील बदल सुचवतेय.
बघ तुला आवडतात का ते!
अर्थात हे बदल फक्त वृत्तात गझल बसण्यासाठी आहेत,तुझ्या कल्पना मुळात सुंदर आहेत.

जिथे तिथे का दिसशी मजला, तुझाच कायम विचार आहे
सदैव दिसशी मला सभोती तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..

भिनून जावा नसानसातून, दंश असा दे, मला नव्याने
भिनून जावा नसानसांती ,मला नव्याने असा डसावा
नको म्हणाले किती तरीही, मनात त्याला रुकार आहे..

खुणावणारे क्षितीज आता, कथे मला हे असे तराणे,
तिथे नवे ने सुरेल जगणे, जिथे आता अंध:कार आहे.
तिथे नवे ने सुरेल जगणे जिथे जुना अंधकार आहे

झुलायला मी दु:ख-सुखाचे, अविरत येथे झुलले झोके,
झुलून गेले हजार झोके इथे निरंतर अधांतरी मी किंवा
झुलायला मी सुखा- दुखाचे अनेक झोके झुलून गेले
इथून पुढचा हरेक क्षण जीवना तुझ्यावर उधार आहे.

अंधःकार आणि दु:ख या वृत्तात बसणार नाहीत असे वाटल्याने अंधकार आणि सुखादुखाचे असे स्वातंत्र्य घेतले आहे.

hey.. thanks.. thanks you very much.. Happy
तू बदल तर सुचवलेस पण इतका विचार करून स्वत: नवीन लिहिलंस.. छान वाटलं.. Happy
हे बदल टाकीन आता.. तुझ्याच नावे.. Happy
खूप खूप आभार.. Happy