मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
1’

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.

मराठेशाही सन १६८८ ते १७००

प्रस्तुत लेखात आपण छत्रपती संभाजी नंतरच्या मराठा राज्याची वाटचाल पाहाणार आहोत. थोरल्या राजांनी जे कामावले ते राखन्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली ते त्यांनी राखले पण त्यांचा अकाली घरपकडी व नंतर हत्ये मुळे मराठेशाहीचा पार कणा मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणुन राजारामाला मंचकावर बसवीले. हा कालावधी या छोट्या हिंदु राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्य पाहीले व तो काळ गाजविला व राज्य (थोडेसे का होइना जिंवत ठेवले) त्या कालावधीस आपण थोडक्यात भेट देऊ.

छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडुन जन्मला म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले. (ही कथा) जरी राजारामाने पातशीही पालथी घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजारामास लिहीता वाचता येत होते. राजाराम हा शांत घिरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लक्ष्करी शिक्षन हे हंबीरराव मोहीत्यांकडे ( स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.

वतनदारीस प्रारंभ

१ फेब १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस शाहु त्यावेळी ७ वर्षाचा पण न्हवता. त्याला छत्रपती सारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसुबाई आणि मंत्रीमंडळाने राजारामला बसवायचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब रोजी राजाराम छत्रपती झाले.
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांचापुढील परिस्थीती खराब होती. महाराज संभाजी अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चारीकडुन स्वराज्यावर होनारा हल्ला, स्थानीक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागनारा पैश्याची चनचन, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठे शाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भिषन परिस्तिथी. औरंगजेबाचे सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामाच्या मागेच लागले, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दुर जिंजीस जाउन राज्य राखन्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना प्रतिनिधी पद ( जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरिल सर्व परिस्तिथी पाहाता राजाराम महाराजांनी जिंजीला जान्याचा निर्णय लगेच अमलांत आणला. मोगलांचा वेढा स्वराज्या भोवती घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडुन किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देन्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविन्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठा लोकांना एकत्र आणन्यास सुरु केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारुन ठेवली होती. संभाजीच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिनेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करन्यासाठी मोगलांनी वतने द्यायला सुरु केले. फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना निष्क्रीय (स्वराज्याचा बाबतीत) करायला सुरु केले होते आणि वतनदारीची पध्दत जी शिवाजी महाराजांनी मोडाली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला. लालुच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ हे तिन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, सरदार मोगलांना मिळाले.

छत्रपती संभाजीच्या वधानंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अमंलाखाली आला होता. स्वराज्य राहुन राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन्-पाच किल्ले ऐवढे मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महराजांवर संकटावर संकट येत होती. रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपन्हा" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करान्याचे ठरविले गेले. अंधार्या रात्री महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसर्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतिरी भिषण संग्राम झाला. महाराज स्वत लढत लढत नदित उडी मारुन पळुन गेले. बेदनुरला राणि चन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरुप रवानगी जिंजीला केली. जिंजीला महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते त्याच काळात वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांस मात देऊन राजांनी जिंजी हस्तगत केली.

वर मी जी परिस्तिथी मांडली त्यावरुन राजाराम महाराजांचे कार्य आपल्या लक्षात यावे. छत्रपती शिवाजी, संभाजी यांचा कार्यामुळे दिपलेले आपण राजाराम महाराजांच्या कार्यकडे दुर्लक्ष करतो. जिंजी सारख्या ८-९०० मैल दुर असलेल्या प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि ईथुनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फोज फाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत असे त्यामूळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली व वतनदारीस सुरुवात् झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाउन मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल व भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.

अशातच एका मर्द मराठ्याने औरंगजेबाच्या तुळापुर येथील छावनीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबुचे सोन्याचे कळस कापुन आणले. "हिमंते मर्दा तो मदते खुदा" या वेळेस ओरंगजेबाचा खुदा मराठ्यांकडुन होता. लगेच् पंधरा दिवसात घोरपडे बंधुनीं झुल्फीकारखाणावर हल्ला चढवुन त्याचे पाच हत्ती पळवुन आनले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना उगवत्या सुर्याची किरने लांबवर दिसायला सुरुवात झाली होती.

धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चिज बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन अकस्मात माघार घ्यायची. "स्वराज्य" ही कल्पना टिकवुन ठेवन्यासाठी ह्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.
पुढे जिंजीवरच झुल्फीकारखानाने हल्ला केला. त्याला सोबत होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचनीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीन. लढवायला मजबुत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी मोगलांचा ( शाहजादा कामबक्ष व झुल्फीकारखान) धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजुबाजुच्या परिसर जिंकुन घेतला. ह्यानंतर लगेच संताजी व राजारामचे काही कारनावरुन बिनसले. संताजी वापस महाराष्ट्रात निघुन आला. पण ईमान बघा या माणसाच, तो मोगलांना वा ईतरांना न मिळता स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होता. हे ईमान पैदा केल शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. संताजीला एक वैषम्य होते ते म्हणजे महराज जे नविन लोक येतात (मोगलांकडुन फुटून) त्यांना जास्त विचारतात व जे जुने आहेत त्यांची काळजी घेत नाहीत. महाराजांनी पत्र पाठवुन निर्धोक राहा असे सांगतीले पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नविन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही त्यामुळे संताजीस त्याची फौज खाली करन्याचा हुकुम पण महाराजांनी दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहीला पण स्वराज्याच्या बाजुनेच. स्वराज्यासाठी नामुष्कीची गोष्ट अशी की संताजी व धनाजी यात पण एक लढाई झाली. म्हणजे बघा आपण आपापसात पण लढतोय शिवाय मोगलांशीही लढतोय. ओरंगजेबाकडे १४३००० खडी फोज व ९६ मराठे सरदार होते यावरुन तुम्हाला राजाराम महाराजांचा लढा किती विचीत्र होता हे कळेल. ह्या लढ्याची तुलना जगातील ईतर ईतिहासाशी होऊ शकत नाही. मला स्वतःला मिर्झाराजा जयसिंगच्या स्वारी पेक्षाही हा काल जास्त महत्वाचा होता असे वाटते कारण मिर्झा राजाच्या वेळेस महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती पण गेल्या दशकात ती पुर्णपणे उखडली गेली. मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३० ते ५०००० पण भरत न्हवते. ऐकास साडेतिन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व तर आपले सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते.
१६७९ ते १७०० पर्यंत महाराष्टावर सतत स्वार्या होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचुन गेला. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, परेशी फौज नाही अशाकाळात वतनदारीशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर न्हवता असे वाटते. पण नंतर याचे भंयकर दुष्परीनाम महाराष्ट्राला भोगावे लागले. ते पुढे येतीलच.

सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती व (बहुतेक अफुचे व्यसन असे काही इतिहासकार लिहीतात) यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरा) आणि कर्ण. पैकी राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायसकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरा हा राजसबाई पासून झालेला तर राजा कर्ण नाटकशाळेपासुन.

राजाराम हा मूळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्तिथ घालन्याचा प्रयत्न केला व त्यात तो बर्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तीगत रित्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. आक्रस्ताळेपणा त्याचा अंगी न्हवता. धाडसी मनोवृत्तीचे उदा वर आपण पाहीलेच पण त्याने एका पत्रात दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिन गिळंकृत करत होता, पैसे न्हवते, पुरेसे सैन्य न्हवते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू हे त्याचा अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला. बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. ( इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली १७२८ ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण त्याला त्याचा वडिलांकडुन आले. ऐवढेच नाहीतर वडिलांसारखी त्याने सुरतेला तिसरेंदा हल्ला चढविन्याची तयारी केली होती पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला व ते झाले नाही. राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८ मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपल्या पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर ज्या झाल्या त्या आक्रमन करन्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असुनही टिकत न्हवते कारण त्यांचा राजा हाल सोसुन त्यांना लढन्यास भरीस पाडत होता. स्व:त स्वार्यावर जात होता. औरंगजेबाने त्याचा युध्दनितीत १६९८ ला परत बदल करुन मोठी चढाई केली त्याला घाबरुन जाऊन परत एकदा जिंजीला जान्याबद्दल बोलने चालले पण त्या बोलन्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतः अनेक स्वार्या चालु केल्या गदग, वर्‍हाड येथे जाउन संपती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारी बद्दल जास्त माहीती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्विकारले तसे राजारामाने शाहुचे (संभाजीचे) राज्य स्विकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह न्हवता. कित्येक कागदपत्रात हे दिसुन येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहीतो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य. त्यांनी नविन राष्ट्र उदयास आनले ही त्यांची कामगीरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नविन पुस्तकात मात्र त्याला जे श्रेय दिले पाहीजे ते दिले जात आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या घटना अनेक पुस्तकांवर आधारित आहेत. त्यातील मला आवडलेले तिन पुस्तक म्हणजे मराठी रियासत - लेखक गो.स.सरदेसाई, मराठ्यांचा इतिहास - सपांदक अ. रा. कुळकर्णी, ग. ह. खरे आणि केम्ब्रीज हिस्ट्री ऑफ ईंडीया ( ५ वा भाग), व काही माझी ऐतीहासीक पुस्तक वाचुन तयार झालेली स्मरणशक्ती त्यामुळे यात लिहीताना कमीजास्त झाले तर दोष लेखकाचा धरावा. बरेचदा ह्या मोठ्या माणसांचा उल्लेख एकेरीवर् झाला आहे पण तो तेव्हा, तिथे, योग्य वाटला म्हणुन ठेवला आहे. ह्यात त्यांच्या बद्दल अनादर नाही तर रामाला जसे आपण तो राम म्हणताना जी जवळीकता ठेवतो ती आहे.

विषय: 
प्रकार: 

केदार अनुमोदन !
सर्व प्रसिद्ध माणसे पुर्णपणे चांगलीच असली पाहिजेत असा अट्टाहास कशासाठी.
अर्थात म्हणुन दोष दाखवत फिरावे असे म्हणणे नाही,
इतिहास शिकायचा तो झालेल्या चुका टाळण्यासाठी आणि त्यातुन चांगले घेण्यासाठी.

केदार मी तुमच्याशी वाद घालत नाही आणि घालण्याची इच्छाही नाही !

<<<खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील कडेलोट सुनावला होता.>>>

इतिहासात असा कोणताही कडेलोट केल्याचा किंवा सुनाव्ल्याचा कागदोपत्री उल्लेख नाही.

<<<व छत्रपती संभाजी महाराज देखील मराठेशाही सोडून दिल्लीच्या मोगलांना सह्याद्री गिळायला मिळाले होते>>>

छत्रपति शंभूराजे दिलेरखानास का मिळाले....या गोष्टीची पार्श्वभूमी आधी जाणून घ्या,प्रचंड मोठा इतिहास आहे यामागे
त्यांचे दिलेरखानास मिळणे हा राजद्रोह नक्कीच नव्हता !

सरदेसाई यांनी समग्र मराठेशाहीचा इतिहास उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजेत.परंतु त्यांच्या 'मराठा रियासत' मध्ये बर्याच त्रुटी
होत्या ज्या नंतर सेतुमाधव पगडी यांनी मांडल्या.संभाजीराजांविषयी चे त्यांचे मत एकूणच पूर्वग्रहदुषित होते. (सभासद बखर आणि चिटणीस बखर संदर्भास घेतल्याने) . 'उग्रप्रकृती संभाजी, स्थिरबुद्धी राजाराम खंड आणि पुण्यश्लोक शाहू' या त्यांच्या खंडांच्या नावावरूनच ते दिसून येते. तसेच ते बडोदा संस्थानात गायकवाडांच्या कडे नोकरीला असल्याने जास्तीत जास्त लेखन हे तेथील उपलब्ध कागदपत्रानुसार त्यांनी केले.
बरेच मोडी आणि फारसी कागद त्यांच्या नजरेखालून गेले नाहीत जे पुणे आणि बिकानेर दफ्तरात होते.
त्यांच्या लेखनातील त्रुटी बाबत एक विशेष लेख होईल इतक्या त्रुटी आहेत....परंतु लेखनसीमा असल्याने थांबतो....ऐतिहासिक लेखन करताना कांदबरी पेक्षा
कागदपत्रांचा आधार घ्यावा हि विनंती. आपल्याशी कोणताही व्यक्तिगत क्लेश नाही आहे तो लेखातील उल्लेखाशी.

ऐतिहासिक लेखन करताना कांदबरी पेक्षा
कागदपत्रांचा आधार घ्यावा हि विनंती. आपल्याशी कोणताही व्यक्तिगत क्लेश नाही आहे तो लेखातील उल्लेखाशी. >>

मालोजीराव, हे मी देखील लोकांना सांगतो ! हा वरील लेख कुठल्या कादंबरीला वाचून लिहिलेला नाही कागदपत्रांवर आधारित अभ्यासू लेखनावर हा लेख आधरित आहे. ऐतीहासिक असे लिहिले असले तरी कांदबरी असे लिहिले नाही.

खरे तर, मागच्या प्रतिसादात मी स्वतःच तो नवीन शोध इथेच लिहणार होतो, आणि मग तुम्हाला विचारणार होतो की ह्यामुळे तसे म्हणत आहात का? पण मी लिहिले नाही, कारण त्यामुळे उगाच नवीन वाद फुटू शकतो.कारण हा नवीन शोध हा जावाई शोध पण असू शकतो. अजून ते नक्की ठरलेले नाही, ज्यांना संभाजीला मोठा करायचा ते म्हणत आहेत की दिलेरखानाला तो मिळालाच नाही.

समर्थांनी संभाजीला पत्र पाठवले, ते पत्र आज तुमच्या आमच्या सारखे लोक शिवाजी कसा होता हे सांगन्यासाठी, त्या पत्राला गीतेपेक्षा जवळचे मानतात, (जाणता राजा) ते पत्र कुठल्या पार्श्वभूमीवर पाठवले? (अर्थात समर्थांनी ते पत्र पाठवलेच नाही असे पण एखादा समुदाय म्हणू शकेल उद्या कदाचित. )

मालोजीराव, संभाजीराजे देखील ग्रेटच होते, ह्यात वाद नाही, पण त्यांनी चुका केल्याच नाहीत हा अट्टाहास का?

असो.

मालोजीराव... इथे स्वैराचारीचा अर्थ तुम्ही लावताय तसा नाहिये.

ज्यांचा इतिहास कच्चा आहे त्यांनी 'भुपाळगड'बद्दल अधिक माहिती शोधावी आणि समाधानी किंवा असमाधानी व्हावे... Proud

एखाद्या माणसाची योग्यता आणि अधिकार जर जाणूनबुजून डावलला जात असेल...आणि अश्या दुखावलेल्या माणसाला जर कोणी त्या योग्यतेच पद किंवा अधिकार देऊ केला तर तो का नाही स्वीकारणार ? (दिलेर्खानाकडून ७ हजारी मनसबदारी निशाणाचा हत्ती आणि राजा पदवी)
शंभूराजांची अपेक्षा होती कि त्यांना उत्तरेत बंड मोडण्यास पाठवले जाईल....परंतु भूपाळगड प्रसंगामुळे त्यांना त्यांची योग्यता कळून चुकली आणि स्वराज्यातील अधिकाऱ्यांच्या मनात असलेल त्यांचं अढळ स्थानही..."भूपालगड बले घेतला,कोणही भांडले नाही " हा उल्लेखच सर्व सांगून जातो.

केदारजी स्वैराचार ला प्रतिशब्द टाकता आला तर पहा !

मालोजीराव,
मायबोलीचे 'इतिहासकार' आहेत ते. तुमचं नाही ऐकणार. लेखनसीमा न घेता, पुनःपुन्हा सांगत रहा. मोल्सवर्थ चा अर्थ म्हणे. मराठीत किंवा हिंदीत स्वैराचारीचा अर्थ काय होतो याची रंगसफेदी का करावी लागतेय यांना?

http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%...
हे दाते-कर्वे.
http://196.1.113.18/Search?searchKeyword=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%...
हा मराठी विश्वकोश
http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0...
हा मोल्सवर्थ.

Digital Dictionaries of South Asia

A search of dictionary entry words for स्वैराचार did not locate any occurrences.
Back to the Search Page | Back to the DDSA Page

मोल्सवर्थ म्हणतो, अर्थ सापडला नाही. हे कसे???

उद्यापासून यांनी म्हटला तो अर्थ घेऊन यांना मायबोलीचे स्वैराचारी इतिहासकार अशी पदवी देऊ केली पाहिजे यांना.

महेश | 14 December, 2012 - 19:05

केदार अनुमोदन !
सर्व प्रसिद्ध माणसे पुर्णपणे चांगलीच असली पाहिजेत असा अट्टाहास कशासाठी.
अर्थात म्हणुन दोष दाखवत फिरावे असे म्हणणे नाही,
इतिहास शिकायचा तो झालेल्या चुका टाळण्यासाठी आणि त्यातुन चांगले घेण्यासाठी.
<<
इतर प्रसिद्ध व्यक्तींबद्दल बोलूयात का आपण?
ते पहिले दुसरे इ. नायक असतात ते?

तिथेही ही नि:पक्षापाती वृत्ती दिसली तर बरे! मायबोलीचा लिखित इतिहास बखरेत आहे. वर क्लिक केले तर कुणालाही दिसतात तुमचे अन त्यांचे जुने प्रतिसाद Happy

केदारजी स्वैराचार ला प्रतिशब्द टाकता आला तर पहा ! >> मालोजीराव, तुम्ही आपूलकीने केलेल्या विनंतीला मान देऊन ते वाक्य काढले. त्यामुळे लेखाचा आशय बदलत नाही. मात्र शब्दयोजनाचे लेखकाचे स्वातंत्र्य असावे, असे मला वाटते.

मायबोलीचे 'इतिहासकार' आहेत ते. तुमचं नाही ऐकणार >>> किती तो त्रास. इनो घ्या !

बाकी अनेक अतृप्त आत्म्यांना राजारामविषयीच्या लेखाबद्दल काहीही न बोलता "स्वैराचारी" बद्द्लच बोलायचे होते हे पाहून आनंद जाहला.

केदार, केवळ शब्दार्थाबद्दल लिहितो आहे.
तुम्ही दिलेला इंग्रजी अर्थ देऊन गुगलल्यावर
http://www.marathidictionary.org/meaning.php?id=60726&lang=Marathi
आणि http://www.marathi.indiandictionaries.com/meaning.php?id=60726&lang=Marathi
या दोन लिंक्स मिळाल्या. तिथे That goes whithersoever he will; that follows his own inelination; self-willed, unrestrained, uncontrolled. हा स्वैर या शब्दाचा अर्थ दिलेला दिसला. इथेही inelination च्या जागी inclination असायला हवे.
स्वैराचार अशा शब्दाचा अर्थ तिथे शोधून मिळाला नाही.

माझ्याकडे असलेल्या छापील शब्दकोशात 'स्वैर'साठी free, wild, wanton, reckeless हे प्रतिशब्द दिलेले आहेत. स्वैराचारी या शब्दासाठी wanton(अविचारी,लहरी, खेळकर) licentions( विषयी, व्यभिचारी) wayward(स्वच्छंदी) हे प्रतिशब्द मिळाले.
स्वैराचारी शब्द ऐकल्यावर मनात प्रथम व्यभिचारी हा अर्थ आला. तुम्हाला तो अर्थ अभिप्रेत नसेल, तर अन्य अनेक पर्यायी शब्द नोंदवले आहेत.

मायबोलीचे 'इतिहासकार' आहेत ते. तुमचं नाही ऐकणार >>> किती तो त्रास. इनो घ्या !
<<

अहो, उपहासाने इतिहासकार म्हटले आहे ते. जळजळ म्हणुन नाही.

तुम्ही मोल्सवर्थवर न सापडणारे शब्द-अर्थ मोल्सवर्थचे म्हणून खपवता,
कडेलोट दिलाच नसताना बिन्धास्त तसे म्हणता.
चुका दाखवल्या, तर ’वाद कशाला घालता’ असे वरून विचारता,

यातच तुमची "संशोधक वृत्ती" दिसली. मग बाकी लेखनातल्या चुका कशाला सांगत बसू?

असो. तो शब्द काढावा लागला इतकेच सध्या पुरे.

मयेकर,

स्वैर'साठी free, wild, wanton, reckeless हे प्रतिशब्द दिलेले आहेत. >> आणि ते संभाजी राजांच्या स्वभाव प्रकृतीला (जेंव्हा ते युवराज होते व राजे नव्हते तेंव्हाच्या) योग्य आहेत. (वाईल्ड सोडून) ते नक्कीच फ्री, आणि रेकलेस होते !
मोल्सवर्थ स्वैर साठी खालील अर्थ देते. आणि तुम्ही दिलेल्या अर्थात पण लहरी हा शब्द आहे. म्हणजे जो विचार न करता, त्याला जे वाटेल ते करतो तो, unrestrained, uncontrolled

ही लिंक

http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0...

स्वैराचार किंवा स्वैराचारी हे दोन्ही शब्द मलाही मोल्सवर्थवर दिसले नाहीत.

इथे स्वैर अन स्वैराचारी अशी बाल की खाल काढणे चालू दिसतेय.

ब्रह्म अन ब्रह्मचारी च्या अर्थात काही फरक असेल का बुवा?

(स्वैर-आचारी म्हणजे वाट्टेल तो स्वयंपाक करून पकवणारे, असा अर्थ घ्यावा का? Wink )

इथे स्वैर अन स्वैराचारी अशी बाल की खाल काढणे चालू दिसतेय >>> तुम्ही ही तापल्या तव्यावर पोळी टाकलीच की खाल काढायला.

ब्रह्म अन ब्रह्मचारी च्या अर्थात काही फरक असेल का बुवा? >>

ब्रह्म वागने अन ब्रह्मचारी वागणे असे असते का बुवा?

स्वैर वागणे अन स्वैराचारी वागणे म्हणजे ब्रह्माची तुलना करता येते का? थोडे तरी समजून लिहाल. उदाहरण तरी नीट द्या. वाद घालायाला माझी हरकत नाही, पण त्याला मयेकरांच्या पोस्ट सारखी निदान काही बैठक असावी.

थोडे सिरियसली. ...

स्वैराचारी असा शब्द मोल्सवर्थ ऑनलाईन डिक्शनरी मध्ये नाही, स्वैर आणि आचार असे दोन शब्द मिळून तो शब्द झालेला आहे. स्वैराचारी = व्यभिचारी असा जो अर्थ सरसकट लावतात तो तसा नसावा. कारण स्वैर वागणे म्हणजे अनकंट्रोल्ड वागने.

मी स्वैर शब्दाची लिंक वर दिली आहे.

केदारदादा,
वरचा प्रतिसाद गमतीत होता, खालच काढायची, तर भ्रष्ट अन भ्रष्टाचारी. अशा इतरही शब्द जोड्या शोधता येतील.
शब्द वापराचे स्वातंत्र्य तुमचे आहेच, माबो सारख्या ठिकाणी एकादा शब्द वापरणे व नंतर त्याचा प्रचलित सोडून इतरच अर्थ अभिप्रेत होता असे म्हणणे हे मला कोलांटउड्यांसारखे वाटते. सामान्य वाचक सामान्यत: सरसकट लावलेला अर्थच घेणार.

असो. तुमची बैठक किती स्ट्राँग आहे ती दिसतेच आहे. चष्मे लावून तुमचे चालू द्या.

<<<मालोजीराव, तुम्ही आपूलकीने केलेल्या विनंतीला मान देऊन ते वाक्य काढले>>>

केदारजी शतशः धन्यवाद तुमचा लेख चांगलाच झालाय....पण तो शब्द दुधात मिठाचा खडा पडावा तसा वाटत होता.असो ....धन्यवाद
...गजानन मेहेंदळे सर,विश्वासराव पाटील,सदाशिव शिवदे,जयसिंगराव पवार यांनी शिवचरित्र आणि शंभू चरित्रावर अफाट काम केलय...कधी पुण्याला आलात
आणि वेळ असेल तेव्हा संपर्क साधा....वरील व्यक्तींपैकी कोणाशीही तुमचा संवाद साधून देण्याची जबाबदारी माझी...तुमचे जे काही समज-गैरसमज शंभू छत्रपति यांच्याबद्दल असतील तर दूर होण्यास मदत होईल.

मालोजीराव, आवडलं तुमचं जेस्चर. आता एक नैतिक जबाबदारी समजुन, केदारयांनी या संधीचा फायदा घेउन, शंभुराजांवर एक स्वतंत्र लेख लिहावा हि विनंती.

एक विचारायचे होते......सम्भाजी महाराजान्चा वध???? कि, खून?????

थोरले महाराज हयात असतानाच आपल्या नंतर कोण हा प्रश्न त्यांना/ लोकांना पडे. दरबारी लोकांमध्ये संभाजी राजे आणि राजाराम ( महाराणी सोयरा बाई ) असे दोन गट होते. संभाजीराजे मागे एकदा मोगलांना जावून मिळाले आणि स्वराज्यावर चालून आले होते. भूपालगडावर कत्तल होताना तर दिलेरखानाबरोबर तेदेखील होते. ही घटना शिवाजी महाराजांना किती क्लेश देणारी असू शकेल याचा विचार करावा. त्यामुळे अनेक दरबारी त्यांच्याविरुद्ध होते.नंतर संभाजी राजे स्वराज्यात परतले तरी आपली गरोदर पत्नी, बहिण यांना सोडवू शकले नाहीत यावर वर लिहिले आहेच. यामुळे स्वराज्यातील बरेच लोक त्यांच्यावर नाराज होते. भरीस महाराणी सोयराबाईंचे राजकारण. शिवाजी महाराज हयात असतानाच भाऊ बंदकीची हि बीजे दिसू लागली होती. स्वराज्याच्या दोन गाद्या तेव्हाच झाल्या असत्या. थोरल्या महाराजा नंतर संभाजीराजांनी आपल्या पराक्रमाने आणि बलिदानाने इतिहास घडवला हे खरे आहे मात्र खरे तर त्यांच्या ऐवजी राजाराम आधीच छत्रपती झाले असते जास्त हितावह ठरले असते असे वाटते.तळकोकणातून अटक करवून देशावर आणे पर्यंत संभाजीला सोडवण्याचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत याचे एक कारण दरबारी लोक आणि सोयरा- राजाराम यांची अनिछ्छा हे तर नसावे ना अशी शंका येते.
याचाच दुसरा अध्याय म्हणजे महाराणी ताराबाई विरुद्ध शाहू गट. वास्तविक महाराणी ताराबाईने राज्य राखले होते. मात्र मातब्बर सरदार आणि बाळाजी विश्वनाथ (पेशवा) यामुळे ते शाहूला मिळाले.

स्वैराचारी ऐवजी रागामाध्ये/ भावनेच्या भरात सारासार विचार करण्यात कमी पडणारे ( अदूरदर्शी ?) हा शब्द योग्य ठरेल. आणि शेवटी स्वकीयांच्या फितुरीमुळे बेसावधपणे पकडले गेले तरी बेसावध राहण्याचा दोष त्यांच्या माथी येतोच.
संभाजी राजे महान पराक्रमी होते. १६८० ते ८९ अशी ९ वर्षे मोगल, पोर्तुगीज वगैरेंशी लढून त्यांनी स्वराज्य राखले हे खरे असले तरी ते अजिबातच चुकले नाहीत असे म्हणता येणार नाहि. काही इतिहासकारांनी त्याना चुकीच्या रंगात रंगवले आणि त्यांची शेवटची रोमांचकारी झुंज या दोन गोष्टीमुळे सहानुभूतीपोटी बरेच लोक त्यांच्या काही चुका मान्यच करत नाहित

Pages