हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया - रंगीत

Submitted by सांजसंध्या on 14 January, 2011 - 23:29

देव आनंद, साधना, नंदा चा हम दोनो हा सिनेमा आता रंगीत दिसणार. मुघल ए आझम आणि नया दौर नंतरचा हा तिसरा सिनेमा असेल जो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटमधून रंगीत होऊन येतोय. या सिनेमातली गाणी आजच्या तरूणाईला भुरळ घालू शकतील का ? तरूणपणीचा हॅण्डसम देव आनंद आज स्विकारला जाईल का ? एकेकाळी गाजलेल्या साधना ला (साधना कट फेम ) पहायला मुलं जातील का ?

या सिनेमाच्या निमित्ताने असे खूप प्रश्न उपस्थित होतील आणि जुन्या गोष्टींना उजाळा मिळणार आहे.

http://www.youtube.com/v/lv7DQ3f-5T8&rel=0&hl=en_US&feature=player_embed...

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्यागो.. धन्स..

तुम्हाला दिसतोय का हा धागा ? मी आता शोधला पण दिसत नाही. पाऊलखुणातून शोधला. असो.

मै जिंदगी का साथ निभाता चला गया या गाण्यामधे असलेली ती लायटरची धून आणि अभी न जाओ छोडकर ही गाणी ऐकली कि त्या वेळच्या प्रेक्षकांचा हेवा वाटतो. पब्लिक वेडं झालं असेल त्या वेळी या दोन गाण्यांवर..

आताही अभी न जाओ छोडकर मधला तो प्रणय गाणं ऐकतानाही डोळ्यासमोर उभा राहतो. रफीने इतका सुंदर आवाज दिलाय.. प्रेयसीला व्याकुळतेने मारलेली हाक, तो आर्जवी स्वर, रेशमी आवाज आणि जादूभरे शब्द.. दिवाळीच्या मिठाईचं ताटच !

अभी ना जाऑ छोडकर, के दिल अभी भरा नही
असं कुणाला गाणं म्हणून थांबवता आलं नाही.... वाईट वाटतं.

( सिग्नलला मात्र ट्रॅफिक पोलीस अडवतो तेव्हा तो हेच गाणं मनातल्या मनात गुणगुणतोय असा भास होतो नेहमी )

नया दौर तितकासा चालला नाही. आजच्या फास्ट जमान्यात हाही कितपत चालेल ही शंका. देव-साधना भाग ठिक आहे पण देव्-नंदा भाग त्या काळात पटत होता, आता कदाचित पटणार नाही.

अर्थात मी मात्र बघणार हा चित्रपट. ह्यातली गाणी........ लहानपणी टिवीवर पाहिलाय एकदा, पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला आवडेल.

सांजसंध्या , मला वाटलं या आशयाची एखादं सुंदर ललित किंवा गझल घेऊन आली असेल पण थेट हे गाणंच रंगवून आलीस. क्या बात है !

पुन्हा एकदा स्वप्नांना जाग आली एवढंच म्हणावं लागेल.

नादखुळा थँक्स.. खरंतर एक कविताच लिहीली होती त्यावर मी. पण इथं पोस्टायचं डेअरिंग नाही केलं.. :).
साधना
नया दौर चा विषय पूर्ण तत्कालिक होता. हम दोनो एव्हरग्रीन आहे असं वाटतं मला.

जुने कृष्णधवल चित्रपट रंगीत रूपात कितपत भावतील याबाबत साशंक आहे. जुने चित्रपट, त्यावेळचे वातावरण, संगीत या सर्वांबरोबर कृष्णधवल रंगसंगती मनात रूजली आहे. तरीही कसे दिसेल याबद्दल उत्सुकता आहे.

नया दौर चा विषय पूर्ण तत्कालिक होता??? माणूस विरुद्ध यंत्र यांच्यातला संघर्ष अजूनही चालूच आहे ना.
हम दोनो मधला नंदाबरोबरचा मेजर आवडेल का(मलाच?) आता पुन्हा पाहिला तर?
मी पण लहानपणी टीव्हीवर पाहिलेला.
आज हा चित्रपट जयदेव यांच्या संगीतरचनांसाठीच लक्षात आहे.
अभी न जाओ छोडकर, मैं जिंदगी का साथ..., जहां में ऐसा कौन है के जिसको गम मिला नही?....कभी खुद पे कभी हालात पे रोना आया आणि अर्थात अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम.

काही नायकांना चांगली गाणी मिळत गेली आणि त्यांचं करिअर घडलं. देव आनंदचं व्यक्तिमत्व हा भाग आहेच आणि त्याची जबरदस्त क्रेझ होती असंही वाचून / ऐकून आहे, पण या अभिनेत्याच्या कारकिर्दीत गाण्यांचं महत्व विसरून चालणार नाही. जितेंद्र नृत्यावर तगला, राजेंद्रकुमारही गाण्यांवरच तगला आणि शाहरूख खान बॅनरवर तगला ..त्या त्या जमान्यात ती ती क्रेझ चालून गेली.

आज निव्वळ उत्सुकतेपोटी हा सिनेमा नक्की पाहीला जाईल.. पण सिनेमागृहापर्यंत आजच्या प्रेक्षकाला यातली गाणीच खेचून आणतील. ही गाणी खरंच अवीट गोडीची आणि अजरामर आहेत. आजही फ्रेश वाटणारी आहेत.

देव आनंद ने ज्या काही मोजक्या सिनेमात अभिनय केला/करायचा प्रयत्न केला त्यापैकी हा एक सिनेमा.
दुहेरी रोल तसा त्याने बर्‍यापैकी निभावून नेला,
जयदेव यांचं संगीत मात्र सदाबहार.

ही दोन गाणी पुन्हा पुन्हा बघतोय. डोळ्यांचं पारणं फिटत नाहीये.

सांजसंध्या, तुला धन्यवाद आणि हे काम करणार्‍या टेकनिकल टीमचं अभिनंदन.

हर फिक्र को धुएं मे ....

मी मा़झ्या मस्तीत जगते
मी मा़झ्या रंगात रमते

उठते, बसते,
रडते, हसते,
न्हाते गाते
येते, जाते
पळते, दमते
आणि निजते..

मी मा़झ्या मस्तीत जगते
मी मा़झ्या रंगात रमते

गर्दीतदेखील मी माझी असते
मुठ्ठीमधे आकाश जपते
आकाश फाटत जाते तेव्हां
पाण्यामधे पाहत राहते ...

हम दोनोचा देव दिसतो
धुरामधे वर्तुळे काढतो
मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
हर फिक्र को धुएं मे उडाता चला गया
जगणे पुन्हा कवेत घेते
प्रतिबिंब पाहून खुदकन हसते

मी मा़झ्या मस्तीत जगते
मी मा़झ्या रंगात रमते

टीव्ही चॅनेल बदलत राहते
आणि .. थबकते
हम दोनोची गाणी आता
रंगांमधे पाहत असते..

अभी ना जाओ छोडकर
ऐकत ऐकत हरखून जाते
हर फिक्र को धुएं मे उडा...
मी....उडवित जाते

मी मा़झ्या मस्तीत जगते
मी मा़झ्या रंगात रमते

- संध्या
असंच आपलं काहीही लिहीलं होतं .. Happy इथं पोस्टायच धाडस झालं नाही

मंदार.. धन्स Happy

भरतजी
माफ करा.. मला नया दौर फारसा आठवत नाही. लहानपणी कधीतरी टीव्हीवर पाहीला होता. तेव्हा असे सिनेमे समजत नसत.

नया दौर मी टिवीवर चारपाचदा तरी पाहिलाय... मस्त चित्रपट आहे. गाणी तर एकदमच बेस्ट आणि विषय तात्कालिक नक्कीच नाही. माणुस विरुद्ध यंत्रे.. आज यंत्राच्या जागी काँप्युटर आलेत, संघर्ष कायम आहेच...

जुने चित्रपट आज केवळ गाण्यांमुळे लक्षात राहतात. मी कित्येकदा तेव्हा पाहिलेले चित्रपट परत पाहते तेव्हा कधीकधी खुप हिरमोड झाल्यासारखे वाटते. त्यावेळच्या भावना, तेव्हा ज्या गोष्टींना महत्व होते, त्या गोष्टी आज तितक्या महत्वाच्या वाटत नाहीत. चित्रपटातल्ल्या पात्रांचे १९६०-७-८० मधले निर्णय पाहताना आपण मात्र २०१० मध्ये असतो आणि ह्याच मानसिकतेने त्या निर्णयांकडे पाहतो. आणि मग ते काही पटेनासे होते.

नेटवर शोधाशोध करुन मुद्दाम किनारा पाहिला. नकळत्या वयात पाहिल्यामुळे नीट्सा कळला नव्हता आणि म्हणुन पाह्यलाच पाहिजे असे काहीतरी मनाने घेतलेले. पण पाहिल्यावर निराशा झाली. एकतर चित्रपट बराच कापलेला. शिवाय लहानपणी चित्रपट पाहताना कोण कसा अभिनय करतोय हे लक्षात येत नाही. आज पाहताना ठोकळेबाज अभिनय डोळ्यात खुपतो.. उगाच पाहिला असे वाटले Sad

भरत,
कभी खुद पे, हम दोनो मधले आहे का ? तसा प्रसंग आठवत नाही.
जहाँ में ऐसा कौन है, के जिसको गम मिला नही, हे आशाचे सुंदर गाणे आहे. त्यातही तीच लायटरची धून आहे. या गाण्यातल्या सर्वच ओळी छान आहेत ( ये जिस्म दो तो है मगर, दिलोंमे फासला नही..)

लताचे, अल्ला तेरो नाम , तसे खुप परिचित पण तिचेच, प्रभु तेरो नाम, हे पण खुप सुंदर आहे. याची चाल जरा अवघड आहे, म्हणून ते गुणगुणले जात नाहि>

दिनेशदा मला पण अगदी तसंच वाटतंय कभी खुद पे बद्दल. पण गुगललं तेव्हा हम दोनोच्या यादीत हे गाणं ३-४ ठिकाणी दिसलं. आता मला पण हा चित्रपट तेवढ्यासाठी पुन्हा पहावा लागेल.

लायटरची आयडियाच भन्नाट होती.
'अभी ना जाओ छोडकर' ऐकताना जितक सुंदर वाटतं तितकच बघताना.. रफी आणि आशा माझं आवडतं काँबिनेशन.
तेंव्हाच्या देवानंदला तर तोड नव्हती. Happy

आणि साहिरचे शब्द्...............त्यालापण दाद दिली पाहिजे

>>कभी खुद पे, हम दोनो मधले आहे का ? तसा प्रसंग आठवत नाही

हो ते त्याच चित्रपटातलं आहे, युट्युबवर मिळेल.