द्वैत - अद्वैत

Submitted by पुरंदरे शशांक on 14 January, 2011 - 00:43

द्वैत - अद्वैत

गोकुळी शोधून किती थकले रे
कान्हा तुजला शोधू कुठे रे

कालिंदीतट आज न रंगे
दिसशी ना तू गोपांसंगे

अवचित मुरलीसूर का घुमले
पाऊल जागेवरीच खिळले

कंप असा का या ह्रदयाला
मुरली सूर येथून उमटला ?

अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा

बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा

अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला

.............. श्रीमत् राधाकृष्णार्पणमस्तु ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा

अद्वैताचा सूरचि उरला
शोधावे कोणी कोणाला"

व्वा शशांक ...... छानच

पुरंदरे काकांच्या या कवितेला चाल लावायचा प्रयत्न केलाय.
बासरीवर वाजवलेली चाल इथे ऐकू शकाल.
रसिकांनी कृपया चालीबद्दल मते कळवावीत ही विनंती.

चैतन्या,
गाण्यापेक्षा तुझी बासरी जास्त गोड आहे रे.....
चाल तर फार सुंदर लावली आहेस, काय म्हणू तुला ...खराच "चैतन्यमय"
सर्व रसिकांना -मनापासून आभार.

शशांक, सुंदर कविता. किंबहुना चैतन्यं म्हणतोय तसं गीतच... उगीचच वाटतय की, गीत म्हणूनच (त्याच्या चालीसकट कदाचित), हे तुमच्या मनात उमटलं असणार...
अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा
बहोत खूब....

अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा

बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा

अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला>>> वाह.. अप्रतिम !!

दाद, चेतना, गिरीराज - मनापासून आभार,
दाद - या गीताला चाल लावण्याचे चैतन्यनेच मनावर घेतले म्हणून एवढी सुंदर चाल लावली गेली, त्यात माझे कर्तृत्व खरंच काही नाही - "चाल" ही चैतन्यचीच करामत - तो उत्तम बासरी वाजवतो.

गिरिशजी, मनापासून धन्यवाद.
खूप उशीरा पाह्यला तुमचा प्रतिसाद.

शशांक, मस्त कविता. आणि
चैतन्य, खुपच गोड बासरी. शब्द जितके जबरदस्त तेवढेच बासरीचे सुरही.

मनिमाऊ - मनापासून धन्यवाद..
कृष्णाष्टमीच्या निमित्ताने "मुरलीधरा" चे त्रिभुवनाला मोहिनी घालणारे बासरी सूर परत कानात गुंजन करु लागतात हे मात्र खरं......

बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा

अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला

सुंदरच

विभाग्रज, तायड्या........मनापासून आभार..

Pages