Submitted by पुरंदरे शशांक on 14 January, 2011 - 00:43
द्वैत - अद्वैत
गोकुळी शोधून किती थकले रे
कान्हा तुजला शोधू कुठे रे
कालिंदीतट आज न रंगे
दिसशी ना तू गोपांसंगे
अवचित मुरलीसूर का घुमले
पाऊल जागेवरीच खिळले
कंप असा का या ह्रदयाला
मुरली सूर येथून उमटला ?
अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा
बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा
अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला
.............. श्रीमत् राधाकृष्णार्पणमस्तु ||
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बासरी कान्हा, सूर ही
बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा >>>
खुप सुंदर शब्द आहेत हे आणि त्यातला भावही. परत परत वाचते मी ही कविता.
सही!
सही!
सुंदर.
सुंदर.
फारच सुंदर रचना व
फारच सुंदर रचना व प्रस्तुतीकरण! सूक्ष्मार्थांनी समृद्ध.याची,दाद म्हणतात तशी एक चाल तुमच्या मनात नक्की असणारच!
शशांकजी खुप सुंदर
शशांकजी खुप सुंदर
सुंदर! मलाही राधा-कृष्णाचं
सुंदर! मलाही राधा-कृष्णाचं नातं, त्यांचं असणं एकमेकांसाठी असंच काहीसं गूढरम्य आणि जबरदस्त मोहक वाटंत आलंय. निर्मम प्रेमाचं उदाहरण म्हणून कृष्णानंच हे द्वैत उभं केलं असणार... तो नि राधा वेगळे नाहीतंच मुळी! शशांकजी, या तुमच्या सुंदर ओळी तरी दुसरे काय सांगतायत?
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार........
Pages