Submitted by पुरंदरे शशांक on 14 January, 2011 - 00:43
द्वैत - अद्वैत
गोकुळी शोधून किती थकले रे
कान्हा तुजला शोधू कुठे रे
कालिंदीतट आज न रंगे
दिसशी ना तू गोपांसंगे
अवचित मुरलीसूर का घुमले
पाऊल जागेवरीच खिळले
कंप असा का या ह्रदयाला
मुरली सूर येथून उमटला ?
अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा
बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा
अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला
.............. श्रीमत् राधाकृष्णार्पणमस्तु ||
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"बासरी कान्हा, सूर ही
"बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा
अद्वैताचा सूरचि उरला
शोधावे कोणी कोणाला"
व्वा शशांक ...... छानच
सुंदर!
सुंदर!
क्या बात है! सुरेख
क्या बात है! सुरेख
उल्हासकाका, उमेश,
उल्हासकाका, उमेश, शुमा,
मनापासून धन्यवाद.
खंरच मस्त लिहिले आहे. उ.भि
खंरच मस्त लिहिले आहे. उ.भि -सहमत.
निनाव.........धन्स.
निनाव.........धन्स.
वा फारच छान !
वा फारच छान !
सुरेख.
सुरेख.
अवल, मुटेजी - धन्यवाद.
अवल, मुटेजी - धन्यवाद.
सुंदर!
सुंदर!
नमस्कार, क्रांतिजी - धन्य
नमस्कार, क्रांतिजी - धन्य झालो.
एकरुपतेची भावना सुरेख
एकरुपतेची भावना सुरेख उतरलीय...
छान!
एक तरल सुंदर कविता. खूप छान
एक तरल सुंदर कविता.
खूप छान गाणं होऊ शकेल या कवितेचं
चाऊ, चैतन्या....धन्यवाद.
चाऊ, चैतन्या....धन्यवाद.
सुंदर ! चैतन्यला अनुमोदन
सुंदर !
चैतन्यला अनुमोदन
पुरंदरे काकांच्या या कवितेला
पुरंदरे काकांच्या या कवितेला चाल लावायचा प्रयत्न केलाय.
बासरीवर वाजवलेली चाल इथे ऐकू शकाल.
रसिकांनी कृपया चालीबद्दल मते कळवावीत ही विनंती.
नितांत सुंदर! खूप छान, शशांक
नितांत सुंदर! खूप छान, शशांक
मस्त!
मस्त!
चैतन्या, गाण्यापेक्षा तुझी
चैतन्या,
गाण्यापेक्षा तुझी बासरी जास्त गोड आहे रे.....
चाल तर फार सुंदर लावली आहेस, काय म्हणू तुला ...खराच "चैतन्यमय"
सर्व रसिकांना -मनापासून आभार.
शशांक, सुंदर कविता. किंबहुना
शशांक, सुंदर कविता. किंबहुना चैतन्यं म्हणतोय तसं गीतच... उगीचच वाटतय की, गीत म्हणूनच (त्याच्या चालीसकट कदाचित), हे तुमच्या मनात उमटलं असणार...
अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा
बहोत खूब....
अंतरात मुरलीसूर घुमला सुरात
अंतरात मुरलीसूर घुमला
सुरात राधातनू हिंदोळा
बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा
अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला>>> वाह.. अप्रतिम !!
कविता... त्यातही राधा
कविता... त्यातही राधा कृष्णाची कविता! सुन्दर! आवडली!
दाद, चेतना, गिरीराज -
दाद, चेतना, गिरीराज - मनापासून आभार,
दाद - या गीताला चाल लावण्याचे चैतन्यनेच मनावर घेतले म्हणून एवढी सुंदर चाल लावली गेली, त्यात माझे कर्तृत्व खरंच काही नाही - "चाल" ही चैतन्यचीच करामत - तो उत्तम बासरी वाजवतो.
सुंदर, अप्रतिम
सुंदर, अप्रतिम
गिरिशजी, मनापासून
गिरिशजी, मनापासून धन्यवाद.
खूप उशीरा पाह्यला तुमचा प्रतिसाद.
शशांक, मस्त कविता.
शशांक, मस्त कविता. आणि
चैतन्य, खुपच गोड बासरी. शब्द जितके जबरदस्त तेवढेच बासरीचे सुरही.
मनिमाऊ - मनापासून
मनिमाऊ - मनापासून धन्यवाद..
कृष्णाष्टमीच्या निमित्ताने "मुरलीधरा" चे त्रिभुवनाला मोहिनी घालणारे बासरी सूर परत कानात गुंजन करु लागतात हे मात्र खरं......
जय हो बासुरीवालेकी.छान.
जय हो बासुरीवालेकी.छान.
बासरी कान्हा, सूर ही
बासरी कान्हा, सूर ही कान्हा
कान्हा राधा, राधा कान्हा
अद्वैताचा सूर आगळा
शोधावे कोणी कोणाला
सुंदरच
विभाग्रज,
विभाग्रज, तायड्या........मनापासून आभार..
Pages