भक्ती

Submitted by अश्विनी के on 6 June, 2008 - 01:40

viththal rakhumai.jpg

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर |
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर ||

भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणार्‍या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा.

saint tukaram.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुमिका, तू खूप छान लिहिते आहेस, मी देखिल प्रयास केले होते या बाबतीत. उदय ने कुठल्या संकटाला तोंड दिले आहे माहित नाही, देव त्याला हि शक्ती देवो. मी ही काही महिन्यांपुर्वी फार भयानक प्रसंगातुन गेले आहे व केवळ बापुंचे छत्र डोक्यावर आहे म्हणून मी आज almost नॉर्मलपणे किंवा नेहमीपेक्षा जास्त ताकदीने उभी आहे. (वाईट काळात सद्गुरुंचे बोट सुटू न देता, जास्त घट्ट धरुन ठेवायचे असते).
फक्त एकच, वेळ मिळेल तसे काही काही अक्षरे कशी टाईप करायची ते बघून
ठेव.
हरि ओम.

भुमिका ,तुमची 'भुमिका' समजली.असेच इथे लिहित जा. लिहिल्याबद्दल धन्यवाद्.तुम्हाला लिहिण्यास मदत व्हावी म्हणून जिथे तुम्ही लिहिता (प्रतिसाद मधे) तिथे सगळ्यात उजवीकडे प्रश्नचिन्ह आहे. ते क्लिक करा. म्हणजे कुठले अक्षर कसे लिहावे हे कळेल्.किंवा इथे भेट द्या- http://www.maayboli.com/node/1554
.व याप्रमाणे तुमच्या वरील पोस्ट संपादित करा म्हणजे यापुढे जे वाचतील त्यांना सगळ व्यवस्थित समजेल.

बाकी एकुणच सायन्सद्वारे चमत्कार एक्स्प्लेन होउ शकत नाही हे कळल.तुम्ही दिलेले विवचन हा त्याचा भावार्थ अथवा इंटरप्रीटेशन आहे.म्हणजे चमत्कारामागचा हेतु त्यातुन सांगितला आहे पण चमत्कार कसा केला जातो हे सांगितलेले नाही(मला वाटल होत की ते सांगितल जाईल).

उदय्,मी बापुंचा भक्त नाही पण तुमच्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.
प्रश्न हा आहे की बाँबस्फोटाने नक्की काय होते??बाँब्स्फोट ही एक समस्या आहे. जर बाँबस्फोट नसतील तर जगात आनंदी आनंद होईल का??उत्तर आहे नाही. या जगात कधीच आनंदीआनंद होणार नाही .कारण हे जग ऐहीक जग आहे. इथे फक्त समस्याच आहेत.भगवद्गीता ८.१५ मधे भगवान आपल्याला सांगतात की हे जग 'दु:खालयम अशाश्वतम' आहे. म्हणजे हे जग दु:खालय आहे आणि अशाश्वत आहे.या जगात सगळ्या गोष्टी आज आहेत आणि उद्या नसतील्.इथे काहीच शाश्वत नाही.बनलेली गोष्ट इथे मोडणारच आहे आणि जन्म घेतलेली गोष्ट इथे मरणारच आहे.त्यामुळे या ना त्या कारणाने इथे समस्या रहाणारच आहेत्.मुळात जगात भगवंताशी संबंधित गोष्टी सोडल्या तर चांगले काहीच नाही. सगळेच वाईट आहे. तुम्ही ज्याला चांगले म्हणता तेही एका दृष्टीने वाईट आहे.कारण ते conditioned आहे.आज नाही तर उद्या त्या चांगल्या गोष्टीचे वाईट स्वरुप पुढे येणारच आहे.तुम्हाला चांगल्या वाटणार्‍या गोष्टीही खराब आहेत कारण त्या अशाश्वत आहेत. कधी ना कधी त्या जाणार आहेत्.आणि जाताना तुम्हाला दु:खही देउन जाणार आहेत्.आणि बाँबब्लास्ट नसतील तर इतर समस्या येतीलच. कधी अन्नधान्याची मागणी वाढल्याने महागाई वाढेल व अन्नधान्य विकत घेणे अनेकांना शक्य होणार नाही.मग लोक एकमेकांना त्यासाठी मारु लागतील्.आपण करत असलेल्या पर्यावरणाच्या नाशाने कधी पाउस जास्त पडेल तर कधी दुष्काळ पडेल इत्यादी इत्यादी.त्यामुळे या जगात सुखी रहाण्यासाठी ,या जगातील ऐहीक गोष्टींकडे असलेली dettachment जरुरी आहे.आणि त्या dettachment साठी भगवंताकडे आणि भगवत्नामाकडे attachment असणे जरुरी आहे. भगवान भगवद्गीता ९.३३ मधे सांगतात की
अनित्यम् असुख्यं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्
म्हणजे या अनित्य्(क्षणिक) आणि असुख्य(दु:खी) जगातुन माझ्या भक्तीनीच सुटका होते.
संत नामदेव सांगतात -
आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ||
त्यामुळे रात्रंदिवस हरीचे ध्यान आणि त्याचे नाम ज्यांच्या तोंडी असेल त्याची या मायाजालातुन सुटका होईल.

|| हरि ओम ||
चिन्या :म्हणजे चमत्कारामागचा हेतु त्यातुन सांगितला आहे पण चमत्कार कसा केला जातो हे सांगितलेले नाही(मला वाटल होत की ते सांगितल जाईल).

भुमिका
चिन्या धन्यवाद मी यापुढे नीट लिहत जाइन. मला वरिल प्रश्न नीट विचाराल का? म्हणजे तुम्हाला नक्कि काय विचारायचय ते उदहरण देवुन विचारा. एखादा चमत्कार जो पटला नाहि . मला उत्तर देता आले तर नक्कि देइन. पण एक नमुद करावेसे वाटते कि साई ला कसे कळले , त्यानि हे कसे केले, रामाने अहिल्येला पायाच्या नखाने स्पर्श केला आनि ति शिळा पुन्हा अहिल्या कशि बनलि ? एत्यादि चे कारण शोधत राहण्यापेक्शा त्या त्या देवाने ते ते केले , कारण देवासाठि अशक्य असे काहिहि नाहि असे मानावे. कारन जे भुत्कालात घडले ते का कसे घडले यावर चर्चा करणे निश्फल आहे. त्यातुन काहिच निश्पन्न होनार नाहि. तथापि आपण त्यामागचा भावार्थ समजुन घ्यावा त्यातुन शिकावे आचरणात आणावे. कारण देव भावाचा भुकेला. याउपरहि मी असे म्हणेन कि आज आपन सर्वच जणे जे कार्तो ते चमत्कारच आहेत. तु मी सगळे श्वास घेतो, जिवन्त आहोत, शरीर चालु आहे , लिहतोय, वाचतोय, बोलतोय, झोपतोय पुन्हा जागे होतोय, घड्याळे, विमाने, विद्युत रथ ( ट्रेन) , विद्युत उद्वाहक ( लिफ्ट) हे सगले चमत्कार आपण रोजच करत आहोत.

आपल्याला त्यात वावगे वाटत नाहि कारण ते आज सहज शक्य आहे. विचार कर ५० वर्शानि समजा हे सर्व नश्त झाले आनि पुन्हा साधे अयुश्य माणुस जगु लागला आनि त्याने उत्खनन करुन गादले गेलेले विमान, लिफ्ट शोधुन काधले तर त्या वेलिहि असाच कोनितरि चिन्या विचारेलच कि हे चमत्कार हि लोके कसे करत होति ?

मह्नजेच ते चमत्कार आज तुल मला वाटत आहेत जे त्यन्च्या साठि सहज साध्य होते. सिधि होत्या त्या. म्हनुनच त्याना महासिद्ध म्हनत असत. ते पुर्न्पने एक शास्त्र आहे. जसे योगशास्त्र. तर्काने पटनार नाहित अशा अनेक गोश्टि आपले योगि करत असत जसे पाण्यावरुन चालत जाणे, १ सेकन्द मधे एका ठिकाणाहुन दुसरिकडे जाणे एत्यादि.

|| हरि ओम ||
चिन्या अनित्यम् असुख्यं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्
म्हणजे या अनित्य्(क्षणिक) आणि असुख्य(दु:खी) जगातुन माझ्या भक्तीनीच सुटका होते.

भुमिका
चिन्या तुम्हि लिहलेला हा एक अर्थ आहे. पन त्याचाच अजुनहि एक अर्थ आहे तो असा. अनित्य् म्हनजे जो नित्य नाहि असा तो ( यथा स्यात तथा - हा सन्स्क्रुत अर्थ.) जो नित्य नाहि असा तो म्हनजे पुरातन, शास्वत , आनादि ( ज्याला अन्त नाहि असा तो )

असुख्य ( अनेन सुख्यः यथा स्यात तथा ) सुख मिळायचि आवश्यकताच नाहि असा, तिथे सुखच सुख आहे कारण दुखा:चा लवलेश हि नसलेला असा तो. जिथे ज्याचा अभाव असतो त्यालाच वि लावला जातो. ज्या शब्दाला वि लावला जातो त्याचा अर्थ विरोधि होतो जसे विरस - विगतः रसः यस्मात तत ( ज्यातुन रस निघुन गेला आहे असा तो निरस ) इथे विसुख्य म्हटले नाहिये.

म्हनुन वरिल वाक्याचा अर्थ असाहि होतो कि " माझे हे पुरातन , अनादि सुखाने परिपुर्ण असे जे माझे विश्व आहे त्यासाठि हे लोकानो माझ्याकडे या ( इथे लोक महन्जे त्रि लोक - सर्व प्रकरचे स्रुश्टि - परमेश्वराच्जी लेकरे ) माझे भजन करा. ( इथे ताळ कुटत रिकामा वेळ काढणे हा अर्थ अभिप्रेत नाहि.) तर हे विश्व दुखाने भरलेले नसुन ते अनादि अश्या सुखाने परिपुर्ण आहे तर अशा विश्वाचे आस्वादन करायला तु मझ्याकडेच ये. बाह्य गोश्टित ते मिलणार नाहि असे म्हाणायचे आहे.

कारण सत्य, प्रेम , आनन्द असे विश्वरुप दाखवणारा भग्वन्त हे जग मिथ्या आहे असे म्हणणारच नाहि असे मला वाटते.

|| हरि ओम ||
चिन्या: आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ||
त्यामुळे रात्रंदिवस हरीचे ध्यान आणि त्याचे नाम ज्यांच्या तोंडी असेल त्याची या मायाजालातुन सुटका होईल.

भुमिका
चिन्या तुम्हि लिहलत ते अगदि बरोबर आहे. त्यालाच पुधे मला वाटते अजुन एक अर्थ जोडता येइल असा.

त्यां माझे नमन दंडवत - इथे हरिचे ध्यान , नाम मुखि असलेले लोक , त्या विठलाला मझे नमन असा एक अर्थ. पन भावर्थ असा कि न मन - न मनः - मन नसलेली अवस्था. म्हणजेच निर्गुन मन - म्हणजेच कुठलेहि विचार नसलेले निर्मळ मन. तर अशी समाधि अवस्था येन्यासाठि नामदेव महाराज इथे सिक्रेट सान्गत आहेत. कि तप करायचि आवश्यकता नाहि. बयकपोरे सोडुन , सन्सार उघड्यावर टकायाचि आवश्यकता नाहि कारन अशा प्रकारे भक्ति मधे रममाण झाले कि रात्र दिवस् त्या हरिचे ध्यान राहते.
म्हणुन नेहमी नाम स्मरण करत राहावे.

मायाजालातुन सुटन्यासाठी नाहि तर या मायेच्या स्वामिकडे अधिकच गुरफटुन जाण्यासाठी. त्याच्यात एकरुप व्हावे यासाठी

कारण देवासाठि अशक्य असे काहिहि नाहि असे मानावे.
ते तर मानतोच हो. फक्त इथे सायन्स वगैरे वाचले तर मला वाटले ते चमत्कार कसे केले जातात हे सांगितले जाईल.

पन त्याचाच अजुनहि एक अर्थ आहे तो असा.
मला वाटत की मी दिलेला अर्थ जास्त बरोबर आहे. त्यासाठी आधीची ओळही वाचायला हवी.भगवान म्हणतात की जे फार मोठे ज्ञानी नाहीत तेही माझ्याकडे येउ शकतात आणि मग म्हणतात मग त्या संतांना,भक्तांना माझ्याकडे येण काय अवघड आहे??त्यामुळे या temporary आणि दु:खी जगात आल्यावर माझे भजन करुन माझ्याकडे ये. या वाक्यात इमम् हा शब्द आलाय. म्हणजे लोकम् इमम् .इमम म्हणजे 'या'. लोकम् इमम् म्हणजे 'या जगात्'.त्यामुळे 'अनित्यं असुख्यं' भगवान या जगाबद्दल बोलत आहेत्.वि प्रमाणेच अ लावल्यानेही अर्थ विरुध्द होतो.दुसर म्हणजे या पुढील श्लोकात भगवान सांगतात की माझ्याकडे येण्याचा मार्ग कुठला.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु |
मामेवैष्यसि युक्तैवमात्मानं मत्परायणः ||

अर्थ-तुमची बुध्दी,मन नेहमी माझ्यावर केंद्रीत असु दे. नेहमी मला नमस्कार कर्,माझीच प्रार्थना,पुजा कर. अशा प्रकारे माझ्यावर पुर्ण केंद्रित झाल्यावर्(ध्यास लागल्यावर) तु नक्कीच माझ्याकडे येशील.

संत नामदेवांच्या लेखनाखालील मी लिहिलेली ओळ हा त्याचा अनुवाद नाही .

----ते तर मानतोच हो. फक्त इथे सायन्स वगैरे वाचले तर मला वाटले ते चमत्कार कसे केले जातात हे सांगितले जा-------

अरे सायन्सच्या सहाय्याने चमत्कार करणे म्हणजे निव्वळ जादूचे प्रयोग. साईंना जादूचे प्रयोग करुन लोकांना जमवायची हौस नव्हती. त्यांनी जे केले त्यावरून सद्गुरूंची पंचमहाभूतांवरची सत्ता दिसून येते. व त्यांनी काही भक्तांना दिलेली अनुभूती ही त्यांचा भक्तीमार्गात खूंटा बळकट करण्यासाठी होती, किंवा मुळच्या श्रध्दावानाचा जेव्हा मार्ग भरकटू लागतो तेव्हा त्याला आईच्या मायेने पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी होती.

अध्यात्म आम्हाला नीट समजण्यास मदत व्हावी म्हणून बापुंनी ते सामान्य माणसाला कळेल अशा सायन्सच्या प्रयोगांतून मांडले. सद्गुरू / परमात्मा आपल्या आयुष्यात केव्हा कार्यरत होतात व केव्हा फक्त साक्षीभावाने रहातात ते ही समजायला मदत होते.
अरे, आम्हाला क्लिष्ट भाषा समजत नाही म्हणून आम्हाला अशा सोप्या भाषेत समजून घ्यायची गरज आहे कारण साधन कुठले ही असो साध्य तेच आहे ना, परमात्म्याचे चरण!!!

भक्ती हा विषय वाचून बी बी उघडला... तर हे बापु पुराण वाचायला मिळाले.... विष्णू अवतार काय, विष्णु प्रमाणे वेषभुशेतले ते फोटो काय... आश्रमात म्हणे सर्व सेवेला ( !!) हाय फाय रेट लावलेत... या सगळ्या माहितीपुढे ही माहीती कुणीच कशी माण्डत नाही? उघडपणे बी बी चेच नाव बापू ठेवायला काय प्रॉब्लेम होता? नाव भक्ती आणि गुण्गान डॉ बापू ( एम डी मेडिसिन) यान्चे .. हा काय प्रकार?

--------------------------------------------------------------------------

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||

जागो मोहन, हा भक्तीचाच बी बी आहे. भक्ती समजण्याचे अनेक मार्ग आहेत, भक्तीमार्गावर अनेकजण वेगवेगळ्या सद्गुरू रुपांवर श्रध्दा ठेऊन असतात. चिन्या त्याच्या भक्तीमार्गाबद्दल पर्यायाने स्वामी प्रभूपाद यांच्या शिकवणी बद्दल बोलतो तर भुमिका तिच्या भक्तीमार्गा बद्दल बोलते आहे. भक्तीमार्गात प्रत्येकाला आपापल्या गुरुंकडून जे मिळाले ते ते प्रत्येकजण शेअर करत आहे त्यात गैर काय? तुम्ही देखिल तुमचे गुरु (असल्यास) किंवा तुम्हाला परमात्म्याच्या ज्या रुपाबद्दल प्रेम वाटते त्याबद्दल आणि तुम्ही भक्तीमार्गात कसे आलात किंवा बाळपणापासुनच ते संस्कार मिळाले असतील तर ते परिपक्व होण्यास काय काय कारणीभूत ठरले त्याबद्दल नक्कीच लिहा. त्यातूनही काही आम्हाला घेण्यासारखे असु शकते. उदाहरणार्थ, आम्हाला चिन्याच्या मार्गाबद्दल जर नीटपणे माहितनसेल तर आम्ही तो काय सांगतो हे पुर्वदुषीत ग्रह न ठेवता वाचले पाहिजे, त्यातून घेण्याजोगे काय आहे ते पाहिले पाहिजे, त्याच्या गुरुंच्या आश्रमात जर कुठल्या साहित्याची विक्री होत असेल तर ती राशी चांगल्या कामासाठीच जाते आहे हे देखिल ध्यानात घेतले पाहिजे, एखादे प्रचंड प्रमाणात सामाजिक कार्य होत असेल तर फंड्स लागतातच ना! कुणासमोर झोळी न पसरता कार्य होते त्या अर्थी जे लोक प्रेमाने खारीचा वाटा उचलू पहातात तो ही महत्वाचाच ठरतो नाहि का?

तुम्ही तुमच्या आवडत्या संतांबद्दल उदा. तुकाराम, एकनाथ, चोखा मेळा इ. यांच्या बद्दल लिहू शकता. अहो यांच्या कथा ऐकता ऐकता ही आपल्या मनातील पांडुरंगाची भक्ती आपल्याच नकळत वाढू लागते. बाकी काय सांगू.

|| हरि ओम ||
आश्रमात म्हणे सर्व सेवेला ( !!) हाय फाय रेट लावलेत... या सगळ्या माहितीपुढे ही माहीती कुणीच कशी माण्डत नाही? उघडपणे बी बी चेच नाव बापू ठेवायला काय प्रॉब्लेम होता?

भुमिका
जागो मोहन, हा भक्तीचाच बी बी आहे. आणि माहिति नसल्यास किवा माझा लेख नीट न वाचता आपण काहि बाहि बरळत असाल तर मी विनन्ति करेन कि नीट वाचा अथवा पुर्वदुषीत ग्रह न ठेवता तर्कट पणे विचार करा. प्रथमतः माझ्या बापुन्चा कुठलाहि आश्रम नाहि. त्यामुळे तुमचे वरिल जे काहि स्वमत आहे ते आम्हि इथे खोडुन काढत आहोत.

हाय फाय रेट लावलेत असे तुम्हि जे मह्नत आहात ते कशाच्या आधारे? तुम्हि एखादे उत्पादन विकत घेतेले आहे का? कि उगाचाच ?

जुन्या लिंक बघा. इथे ह्या व्यक्तीच्या नावानं बरंच लिहून झालं आहे. पुन्हा नवा बाफ उघडा हवं तर वादावादीला. इथे सध्यातरी बरं चाललंय ते राहू द्या.
आजवर फक्त अश्विनी ह्या आयडी ची आपल्या गुरुविषयी विचार मांडण्याची पध्द्त अतीशय समतोल वाटली. बा़कीच्यांचा आनंद आहे!
-मी देखिल 'माझ्या' अनिरुध्द बापुंची! Happy

|| हरि ओम ||
अगदि बरोबर म्हट्लेत म्रुन्मयी. जुन्या लिन्क बघुन झाल्यात माझ्या आणि मनस्वी चीड आलि. पण खोलात विचार केला आणि वाट्ले कि ज्या बद्दल माहित नसते त्या बद्दलच लोके नावे ठेवतात. म्हणुन मग इथेहि असेच वाचल्यावर मी लिहले पण ते सर्व भक्ति च्या अनुशन्गानेच. शमस्व जर मी कुणाच्याहि भावना नकळत दुखवल्या असतिल तर.

आणिक असे कि भक्ति म्हणजे एका यःकश्चित पामर माणसाने आपल्याला देव , सद्गुरु ज्या ज्या रुपात भावलाय त्या त्या रुपातने ज्याने त्त्याने आप्ल्या आयुश्यात सकारात्मक बदल घडवुन आणले आणि त्या त्या स्वरुपाचि आराधना केलि. मग मला वाटते कोनि कोणाच्याहि सद्गुरु बद्दल लिहले ( मग ते कोणाला पटो अथवा न पटो , तो ज्याच्या त्याच्या श्रधेचा भाग) तर त्यात आक्शेप घेण्यासारखे काहिहि असु नये.

उद्या कोणितरि हेच चान्गले विचार स्वतःचे म्हणुन सान्गितले तरिहि त्यातने जो बोध घ्यायचाय तोच घ्यावा. उगाच कुणाच्याहि भावना दुखावुन काहिहि हशील नाहि.

असो तर यापुढे इथे सद्गुरु चे नावहि घेता कामा नये असे कोनि सुचवु इछित आहे का? तसे असल्यास भक्ति यावर उहापोह कसा शक्य आहे ते हि सान्गावे जेणेकरुन मज अज्ञानि जीवाला कळेल आणि मी हि अतीशय समतोल लिहत जाइन.

'भक्ती' ह्या शब्दाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. आता इथे त्यावरूनही रणकंदन माजवायचं असेल तर ज्याचा त्याचा गुरु आपआपल्या भक्ताला सुबुध्दी देवो. (शेवटी भक्ती काय हो 'आई' पासून 'आईनस्टाइन' पर्यंत कुणाचीही करता येऊ शकते.)
.
तसे असल्यास .........मी हि अतीशय समतोल लिहत जाइन.<<<< असं लिहिण्याची आपला गुरू आपल्याला प्रेरणा देवो!

जागो मोहन प्यारे, इथे भुमिका उत्साहानि लिहित आहेत तर लिहु द्या ना. तुम्हाला तसा उत्साह असेल तर तुम्हीही भक्तीविषयी लिहा. तुमचे स्वागतच आहे. इथे तसेही फार कमी लोक लिहितात. तुम्हाला बापुंबद्दल वाचायच नसेल तर वाचु नका. तुम्ही लिहा आम्ही वाचतो. प्रसादच्या,प्रसन्नाच्या,माझ्या पोस्ट्सही बापुंबद्दल नसतात. त्याही वाचु शकता.

शेवटी भक्ती काय हो 'आई' पासून 'आईनस्टाइन' पर्यंत कुणाचीही करता येऊ शकते.

हो पण खरी भक्ती परमेश्वराचीच असते.इतर सगळ conditioned असत

साईंना जादूचे प्रयोग करुन लोकांना जमवायची हौस नव्हती.
बरोबर आहे.फक्त सायन्स वगैरे वाचल्याने मनात शंका उत्पन्न झाली.

अध्यात्म आम्हाला नीट समजण्यास मदत व्हावी म्हणून बापुंनी ते सामान्य माणसाला कळेल अशा सायन्सच्या प्रयोगांतून मांडले.
हे अजुनही समजल नाहीये. बहुतेक त्यांची पुस्तक वाचल्यावरच कळेल.

|| हरि ओम ||
या सगळ्या माहितीपुढे ही माहीती कुणीच कशी माण्डत नाही? उघडपणे बी बी चेच नाव बापू ठेवायला काय प्रॉब्लेम होता? नाव भक्ती आणि गुण्गान डॉ बापू ( एम डी मेडिसिन) यान्चे .. हा काय प्रकार?'भक्ती' ह्या शब्दाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. आता इथे त्यावरूनही रणकंदन माजवायचं असेल तर ज्याचा त्याचा गुरु आपआपल्या भक्ताला सुबुध्दी देवो. (शेवटी भक्ती काय हो 'आई' पासून 'आईनस्टाइन' पर्यंत कुणाचीही करता येऊ शकते.)तसे असल्यास .........मी हि अतीशय समतोल लिहत जाइन.<<<< असं लिहिण्याची आपला गुरू आपल्याला प्रेरणा देवो!

भुमिका
राहिले तर मग. बहुधा काहि जणाना एखाद्या " व्यक्ति " चे नाव सद्गुरु म्हणुन घेतल्याचे अजिर्ण होतय. असो.
एका ताइ ने मला चान्गला सल्ला दिलाय आणि तो शिरसावन्ध्य मानुन मी कोणाहि सद्गुरु चे नाव न घेता विचार मान्ड्ने सुरु करतेय. कारण कोणि काय म्हट्ले याला अर्थ नसुन " त्यातुन आपण काय ग्रहण केले हे महत्वाचे आहे. आणि मझे सद्गुरु कोण आहेत हे मी वर उध्रुक्त केलेल्या लेखन मालेत सगळ्याना कळलेच आहे. त्यामुळे यापुढे मी जे काहि लिहेन ते " माझ्या गुरुच्या प्रेरणेनेच असेल हे सुज्ञास न सान्गणे."

|| हरि ओम ||
-मी देखिल 'माझ्या' अनिरुध्द बापुंची!

भुमिका
क्रुपया इथे भान्डन नको. सात्विक अशा " भक्ति" विशयाचि अशी हेळ्सान्द नको.

काहि जणाना कदाचित " माझा" सद्गुरु असे म्हटल्याने खटकलेले दिसतेय. त्याचे काय आहे कि मी साधारण मनुष्य आहे. त्यामुळे " मी, माझे " असे स्वर्थि विचार करने ओघाने आलेच.

दुसरे असे कि मी काहि फार मोठि ज्ञानि वगैरे नाहिये त्यामुळे माझे माझ्या देवाशी सतत भान्डने , चर्चा, विचार मन्थन, मनन चालुच असते. ( अगदि वेगळ्या पातळीवर - भावनिक ) त्यामुळे लिहताना लक्शातच आले नाहि कि कोनला तरि हे खटकु शकते. ( त्याचे काय आहे कि रस साधना करताना आपण देवाला तो देव आहे हेच विसरुन जातो. माझे विचाराल तर मी माझ्या देवाशी बोलताना एखादि गोष्ट नाहि पटलि तर सरळ बोलते " काय रे हे देव बाप्पा , तु असा कसा, तुला काहिच कसे कळत नाहि. अगदि ढ आहेस तु पण माझ्या सारखा "

एखादा प्रसन्ग वाइट आला तर रागाने त्याच्याशी भान्ड्ते कि " तु न खुप दुश्ट आहेस, मी अजिबात नाहि तुझ्याशी बोलणार ... किवा कट्टि जा तुझ्यशी " असेहि बोलते. त्यामुळे होते काय कि कितिहि , कसाहि प्रसन्ग आला तरि आप्ला देव बापा आप्ल्या बरोबर आहे हि जाणिव आपल्या बरोबर असल्याने लढायला बळ मिळते.

ह साधा सरळ माझा हिशोब आहे. ( माफ करा कदाचित मी जास्तच माझे माझे कार्ते : ) )

असो तर आत भक्ति बद्दल नवीन विशय सुरु करुयात , कोणि नवविधा भक्ति चे प्रकार ( ९ ) आणि त्यातला एक एक प्रकार घेवुन चर्चा सुरु करेल का? एक एक भाग घेवुयात आणि आपापले विचार , काय वाटते , प्रश्न विचारुयात.

ठीक आहे सुरुवात करा.वर नवविधा बद्दल थोड्स लिहिलय.
आता भांडण नकोत.

|| हरि ओम ||
वर चिन्या ने नवविधा बह्क्ति चे खुप छान विवरण केलेय. चिन्या ९ प्रकार १>, २> ... असे लिहुन एक एक भाग सुरु कर ना. जसे जमेल तसे विव्रुत्त लिखाण करुयात. खुप छान परिपक्व विचार एकत्रा आले तर आपापल्या ज्ञान्कोशातहि भर पडेल ना.

टेस्ट

भुमि़का, मी ज्या विषयात मला गती नाही तीथे भांडायच्या वगैरे भानगडीत पडंत नाही. तेव्हा माझं कुणी कुठल्या गुरुला मानावं किंवा मानु नये ह्याबाबत काहिही मत नाही.
.
खरी भक्ती परमेश्वराचीच की आणि दुसर्‍या कुणाची वगैरे सगळं व्यक्तीसापेक्ष! ह्यात माझंच कसं खरं आणि बाकी सगळे खोटे आणि बिनडोक, अज्ञानी वगैरे आव आणून कसं चालणार? (तसंही अजून तिकडे, 'देव म्हणजे काय ह्या बाफवर' परमेश्वर म्हणजे काय ह्याचाच शोध लागायचाय. Happy
.
भक्ती ह्या विषयावर वर बर्‍याच जणांनी चांगलं लिहिलंय. ते वाचायला आवडलं!
.
शेवटी एक खुलासा.. माझ्या नवर्‍याचं नाव 'अनिरुध्द' आहे. म्हणून माझं ह्या नावावर प्रेम!

|| हरि ओम ||

चिन्या पाद्सवाहन भक्ति बद्दल कुतुहल आहे. लक्ष्मि ची भक्ति ( नारायणा वर) हे ष्रेष्ट उदाहरण आहे ना? पुन्ड्लिक, श्रावण बाळ इत्यादि उदहरणे आठवलि. पाय दाबणे आणि त्या देवावर प्रेम करणे ह्याचे नक्की कनेक्शन काय असावे?

भक्ती ची चर्चा चांगली सुरु आहे...

-----मी देखिल 'माझ्या' अनिरुध्द बापुंची------
---शेवटी एक खुलासा.. माझ्या नवर्‍याचं नाव 'अनिरुध्द' आहे. म्हणून माझं ह्या नावावर प्रेम!----

मृण्मयी, अगं इथे लाजरा स्मायली लावायला पाहिजे होतास (हा भक्तीचा BB असुनही तुला चिडवायची हुकी आवरता आली नाही बघ मला :-))

भुमिका, अश्विनी तुम्ही सुरुवात करा. माझ्या रुममध्ये सोमवारपर्यंत इंटरनेट नसणार आहे.त्यामुळे मोठ्या पोस्ट्स लिहिणे मला तेंव्हापर्यंत जमणार नाही. तुम्ही सुरुवात करा मी सोमवारनंतर येतोच आणि नवविधा बद्दल लिहितोच.

पादसेवनम हे श्रेष्ठ भक्तीचे उदाहरण आहे.पाय दाबण्यापेक्षा त्यामागील भाव महत्वाचा आहे. वास्तविक देवाला पाय दाबण्याची गरजच नाही. त्याचे पाय दुखतच नाहीत्.मुळात त्याला कशाचीच गरज नाही. पण प्रत्येक भक्ताला देवाची सेवा करण्याची वेगवेगळ्या पध्दतीने करण्याची इच्छा असते.देव ताच्या भक्तीप्रमाणे त्याला सेवा करण्याची संधी देतो. याबद्दल एक गोष्ट सांगतो. रामराज्यात एकदा सर्वांना कामे वाटुन दिली होती. कामे वाटुन दिल्यानंतर शेवटि हनुमान आला. कामे वाटुन देणार्‍याने सांगितले की सगळी कामे वाटुन दिलेली आहेत . तुझ्यासाठी कुठलेच काम उरलेले नाही.हनुमान म्हणाला असे कसे काय चालेल मला काहीतरी काम द्यावेच लावेल.तेंव्हा त्याला काम दिले गेले की जेंव्हा रामाला जांभयी येईल तेंव्हा भगवंताच्या तोंडासमोर टिचकी(बरोबर आहे का शब्द??) वाजव.हनुमान रामाचा मोठा भक्त होता. तो तत्परतेने कधी जांभयी येईल याची वाट पाहु लागला.पण राम भगवंत होते त्यांना थकवा येईच ना व झोपही अर्धवट होईना. जांभयी येईच ना. पण हनुमान दिवस रात्र टिचकी वाजवण्याच्या तयारीत होता.काही दिवस झाले पण जांभयीच येईना. मग रामाने सतत कसलीतरी वाट बघणार्‍या हनुमानाला विचारले की नक्की काय चालल आहे. हनुमान म्हणाला मला हे काम दिले आहे. त्याचा त्यामागील भाव बघुन रामाने जांभयी दिली व हनुमानानी मोठ्या आनंदाने टिचकी वाजवली.त्याला खुप आनंद झाला. ही भक्ती पाहुन रामाने अजुन एकदा जांभयी दिली परत हनुमानाने मोठ्या भक्तीभावाने तसेच केले. रामालाही ते आवडले व राम नंतर अनेक तास जांभयी देत होता. मग काही वेळानी इतरांनी रामाला सांगितले की हनुमानाची भक्ती बरोबर आहे पण आता हे बास करा. मग रामाने ते थांबवले.
यावरुन हे लक्षात येते की भक्ताला देवासाठी काम करताना कशातही कमीपणा वाटत नाही.आणि सच्च्या भावाने केलेल्या भक्तीने देवही आनंदीत होतो.

|| हरि ओम ||

वा वा. मस्तच. नक्कि लिहेन मी हि सोमवर पर्यन्त .

हजारो लोकांमधुन फक्त तुमच्याच मनातलं कसे कळते बरे जोशींना? आणि तुमच्याच कड बघुन कसे बरे बोलतात ते एवढ्या अफाट गर्दीत? सांगु शकाल काय?

-प्रिन्सेस...

|| हरि ओम ||

तर भक्तिचे नऊ प्रकार :
Prahlaad describes nine types of Bhakti to Hiranyakashyap -
(1) श्रवण भक्ति : Hearing Bhagvaan's attributes, Leelaa and names
(2) किर्तन भक्ति: Keertan " "
(3) स्मरण भक्ति : Remembering His forms, names etc
(4) पाद सन्वाहन भक्ति :serving His feet
(5) पुजन भक्ति : Poojaa Archaa
(6) वन्दन भक्ति :Vandan (prayer)
(7) दास्य भक्ति : Daasya (serving Him with the feeling of slavery)
(8) सख्य भक्ति : Sakhya (Knowing Him as one's friend)
(9) आत्मनिवेदन भक्ति : Aatm Nivedan (surrendering)

हे वरचं copy-paste केलेलं दिसतंय.

|| हरि ओम ||

सख्य भक्ति : ह्या प्रकारात माझा देव भगवन्त माझा सखा आहे. दोस्त आहे अशी कामना करुन त्याच्याशी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या जातात. तु जेवलास का ? आता बघितलेला चित्रपट तुला कसा वाटला? मला हा शर्ट कसा दिसतो? मी हे जेवण बनवले तुला आवडले का? असे आणि इतरहि बरेच बिन्धास्त बोलले जाते.

इथे देव रोज आपल्याबरोबर आहे आणि आपण त्याच्याशी एखाद्या सख्या सहोदरा सारखे वागत असतो.

अशा वेळि भक्ताचे मन आप्ल्या देवाशी जुळुन यायला कसलाहि आड बन्ध राहत नाहि. आणि देवाचे अस्तित्व नेहमीच जाणवत राहाते.

सख्य भक्तीचे उदाहरण "पेंद्या". जेव्हा श्रीकृष्ण कालिया मर्दनाच्या वेळी नदीच्या डोहात उडी टाकतात तेव्हा हा पेंद्या स्वतःच्या लंगडेपणाची, थोटेपणाची पर्वा न करता आपल्या मित्राच्या काळजीने कृष्णाच्या पाठोपाठ डोहात उडी टाकतो. हे ऋण त्या भगवंताने कधीही फेडून मोकळे न होता अभिमानाने स्वतःवर अलंकारासारखे मिरवले.
--
तसे बघायला गेले तर गोकुळातील सर्व गोप गोपी ही सख्य भक्तीचीच उदाहरणे आहेत. त्यांची मने त्या सावळ्याशी इतकी एकरुप झाली होती की त्या प्रत्येकाला कृष्ण आपल्याच बरोबर रास (इथे रास म्हणजे भक्तीची उत्कटता त्या परमात्म्याने आनंदाने स्विकारणे) खेळतो आहे असे वाटे.
--
सखा म्हणूनच त्यांचे प्रेमाचे रुसवे फुगवे ही होत, यशोदेकडे तक्रारीही जात पण पुन्हा "तो" लपुन बसला की त्यांचे जीव कावरे बावरे होत.
--
अर्जूनाची सख्य भक्ती तर त्या परमात्म्याला गीतोपदेश सांगायला लावून गेली. महाविष्णूंनी कृष्णावतार काही कुणा कौरव व पांडव नामक चुलत भावांमधील भांडणे सोडवायला नाही घेतला, तर जिथे जिथे अधर्म (म्हणजे परमेश्वरी सहजतेचा अभाव) माजला तिथे तिथे धर्माची बीजे पेरण्यासाठी भक्त कैवार घेऊन येणे हा "त्या"चा स्व-भाव आहे म्हणून घेतला.

Pages