पिरॅमिड व्हॅली - वन ऑफ दी सेव्हन वंडर्स ऑफ बेंगालूरू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सध्या रोज बँगलोर मिरर मध्ये ह्या पिरॅमिड्चे फोटो येत आहेत. त्यावरुन मला हे इथे लिहावंसं वाटलं. काही महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीकडून पिरॅमिड व्हॅली विषयी ऐकले आणि लगेचच्या विकेंड्ला तिथे जाउन आले. कनकपुरा रोडवरून साधारण ३५ किमी अंतरावर आहे ही पिरॅमिड व्हॅली. रविशंकर आश्रम सोडल्यावर अजून १५ किमी पुढे जावे लागते. ठिकठिकाणी साईन बोर्ड्स लावलेले आहेत. शेवटी डाविकडे वळावे लागते. तिथुन एक किलोमिटरचा जो प्रवास आहे तो एका छोट्याश्या खेड्यातून Happy रस्ता थोडा छोटा, वळणावळणाचा, दोन्ही बाजूंनी एकतर शेतं आहेत किंवा गावातली झोपडी वजा बैठी कौलारु घरं. इथे आल्यावर वाटलं की नक्की आपण बरोबर जातोय ना ? पण मग तिथे पोहोचल्यावर खूप छान वाटलं. सगळीकडे आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या आणि मध्ये हा १०४ फूट उंच पिरॅमिड बांधला आहे.

दूरून बघतानाही खूप छान वाटत होतं.

तळ्याजवळून

पिरॅमिडकडे जाणार्‍या मुख्य वाटेवर असलेला हा ध्यानस्थ बुद्ध

हिरव्या वनराईच्या मध्ये असलेला पिरॅमिड

हा पिरॅमिड म्हणजे जगातील सर्वात मोठ्ठं मेडीटेशन सेंटर आहे. १६० फुट बाय १६० फुट एवढा बेस एरिया असून ह्याची उंची साधारण दहा मजली इमारती एवढी आहे. ह्या मैत्रेय-बुद्धा पिरॅमिड मेडीटेशन सेंटर मध्ये साधारण ५००० लोक सहज मावतिल एवढी जागा आहे. पिरॅमिडच्या बाहेरच्या बाजूला सुंदर म्युरल्स आहेत.
ह्याचे ओरीएन्टेशन दक्षिणोत्तर असून Giza Pyramid च्या प्रिन्सिपल्स प्रमाणे ह्याचे बांधकाम केले आहे. ह्या पिरॅमिड्च्या कामामध्ये हिमालयामधले ६५० क्रिस्टल्स वापरले आहेत असे तिथे माहिती सांगणार्‍या एका काकांनी सांगितले.

पिरॅमिड म्हणजे ऊर्जेचं घर. पिरॅमीड मध्ये त्याच्या भौमितिक रचनेमुळे उर्जा एकत्रित करून साठवली जाते. पण असंही म्हणतात की पिरॅमिड मनावरचा ताण तणाव आणि थकवा घालवू शकतात. ह्या पिरॅमिड मध्ये जर ध्यानधारणा - मेडीटेशन केलं तर ते नेहमीच्या मेडीटेशन पेक्षा तिप्पट प्रभावी ठरतं. तसाच हा मेडीटेशन पिरॅमिड. ह्या ठिकाणी गेल्यावर तिथे असलेल्या लोकांचे अनुभव ऐकून असे समजले कि इथे आत वर किंग्ज्स चेंबर्स ला जाउन ध्यानधारणा केली तर संपूर्ण शरीराचा थकवा निघून जाउन, शरिराचे शिथीलीकरण होउन मनात कसलेही विचार येत नाही. खुप प्रसन्न शांत वाटतं. तर कुणी संगितलं की समाधी अवस्थेत थोड्या वेळाने एका साधकाला स्वतःला हातच नाहियेत असाही भास झाला होता.

आत जाण्यासाठी अतिव उत्सुकता होती. इजिप्तचे पिरॅमिड बघायचा योग कधी येतो ते माहीत नाही. मग इथे काय आहे ते जाणून घ्यायचे होते. आत प्रवेश करण्यापूर्वी अनेक सुचना लिहिलेला कागद आमच्या हाती दिला गेला. आणि सांगितले. की आत आवाज करायचा नाही अगदी पाउलंही वाजवायची नाहीत. तुम्ही मेडीटेशन करणार असाल तरच आणि अर्ध्या तासाहून अधीक काळ करणार असाल तरच तुम्हाला वर किंग्ज्स चेंबर्स वर जायला मिळेल. मी हो म्हण्टलं. मग त्यांनी मेडीटेशन साठी कश्या पोज मध्ये बसायला पाहिजे ते सांगितले. सर्व सुचना समजल्या वर मी आत गेले.

आत प्रवेश केल्यावर उजवीकडे आणि डावीकडे अशी दोन दालने दिसली. एकेक करून दोन्ही बघुन घेतली. दोन्ही दालनांमध्ये ध्यानधारणेच्या वेगवेगळ्या अवस्था दर्शवणार्‍या झोपलेल्या बुद्धाची, समाधीस्थ, ध्यानस्थ बुद्धाची अतिशय सुंदर मोठ्ठी वॉल म्युरल्स आहेत. Happy

इथे आत फोटूगिरीला मनाई होती. मग थोड्या पाहिर्‍या चढून गेल्यावर वर भरपूर मोकळी जागा होती. तुरळक ठिकठिकाणी काही लोक समाधी लाउन बसले होते. काही ठिकाणी खुर्च्याही दिसल्या. पण खरा लक्षवेधी होता तो मध्यभागी असलेला गोलाकार (स्पायरल )वर जाणारा जिना. हाच तो किंग्ज चेंबरचा भाग. पिरॅमिडच्या मध्यभागी साधारण १/३ पट उंचीच्या ह्या भागाला किंग्ज चेंबर म्हणतात. ३४ फुटांवर असलेल्या हा भाग पिरॅमिडमधील सर्वात जास्त उर्जा असणारा (मोस्ट एनर्जीटीक) भाग आहे. तिस चाळिस लोक एका वेळी बसू शकतिल इथे.

मी वर गेले तेव्हा आधीच १०-१२ जण ध्यान लाउन बसले होते. मग मीही आधी सुचना दिल्या प्रमाणे (डोळे मिटून पाय पसरून एका पायवर दुसरा पाय चढवून म्हणजे आपण ज्याला अढी घालणे म्हणतो तसे) थोडा वेळ बसले. खूप प्रसन्न ... रिलॅक्स.. शांत वगैरे वगैरे खरंच वाटत होतं !मग कदाचित विस एक मिनिटे झाली असतिल.. काय झाले माहीत नाही...नंतत मला बसणे अशक्य झाले.. नक्की काय होत होते माहित नाही.. मला दरदरून घाम फुटला होता... म्हणून मी उठून खाली आले आणि आश्चर्य म्हणजे खाली पिरॅमिड बाहेर तर मस्त गारवा होता आभाळ भरून आलं होतं.

इथे सनसेट नाही अनुभवता आला Sad नेक्स्ट टाईम !!!

इथे अधिक माहिती आहे आणि सुंदर फोटोज सुद्धा

हे पिरॅमिड व्हॅली नक्की बंगळूरूमध्ये कोठे आहे. रेल्वे स्टेशनवरून कीती लांब आहे. अचूक स्थळ मार्गदर्शन केल्यास बरे होईल. तसेच येथे वास्तव्याचे नियम काय आहेत. मी अश्याच जागेच्या शोधात आहे. १५-२० मिनिटंत घाम फुटला हे वाचून गंमत वाटली. सुरूवातीस असेच होते. घरी थोडावेळ रोज अभ्यास केल्यास एक वेगळा अवर्णनीय आंनद वाटेल. पुन्हा जा.

ईजिप्तच्या पिरॅमिडसभोवती वाळवंट आहे तर ह्या पिरॅमिडसभोवती असलेली हिरवाई डोळ्याला सुखावणारी आहे.

अरे वा सुरेख. Happy मस्त माहीती व फोटु.

इजिप्त व अंकोरवट येथे मरणापूर्वी एकदा जायचे हे ठरवले आहे. अजुन तरी जमले नाही. तोवर दुधाची तहान ताकावर भागवायला सुरेख दिसतोय हा पिरॅमीड. Happy

रॉहु याआधी बघीतले आहेच परत बघतो.. प्रत्यक्ष बघण्यात जास्ती मजा आहे.

हो ना शैलजा. विसरायला लागणार आहे. त्या अफगाणिस्तानाच्या बुध्दमुर्तींसारखे काही त्या स्पिंक्सच्या बाबतीत घडु नये ही ईश्वर, अल्ला, येशु व सर्वांच्या चरणी प्रार्थना.

सुंदरच!!!!!
नविन माहिती मिळाली.
डॅफो, बंगळुरचे एक एक पैलु आम्हाला उलगडुन दाखवत आहात त्याबद्दल मनापासुन आभार Happy

छान माहीती आणि प्रचि .. Happy
रच्याकने पिरॅमिड व्हॅली - वन ऑफ दी सेव्हन वंडर्स ऑफ बेंगालूरू -- बाकीची वंडर्स काय आहेत ?

धन्यवाद सगळ्यांना ! Happy

@विरू >>>
http://pyramidvalley.org ह्या संकेतस्थाळावर अधिक माहीती मिळेल. त्यांचे बरेच कार्यक्रम असतात. तिथे रहाण्याची वगैरे सोय आहे.

१५-२० मिनिटंत घाम फुटला हे वाचून गंमत वाटली. सुरूवातीस असेच होते. घरी थोडावेळ रोज अभ्यास केल्यास एक वेगळा अवर्णनीय आंनद वाटेल. पुन्हा जा.>>>
कदाचित त्यांनी सांगितल्याप्रमाणे पिर‍ॅमिड्मध्ये तिप्पट परिणाम साधतो तोच हा प्रकार असावा. नाहीतर काहीवर्षांपूर्वी मीही योगसाधना, षट्चक्रभेदन, योगनिद्रा वगैरे नियमित करत होते. सवय सुटली आता Happy

पण पुन्हा एकदा नक्कीच जाणरे इथे.

हो गं मिन्वा Happy
पाय पसरून अढी घालून. पायवर पाय चढवायचा आणि तळहातावर दुसरा हात.
पण पद्मासनात आपण बसतो तसे ध्यानस्थ बसले तरी चालते.

स.न्पदा छान ...... एकुण काय तु सत्याला एकाही सुट्टी च्या दिवशी आराम करु देत नाही तर......... Happy

प्रत्येक सुट्टी कारणी लावतेस.........

खरच छान फोटो आणि माहीती ...........

Pages