Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
अंदाज अपना अपना मधिल सलमान
अंदाज अपना अपना मधिल सलमान माळ्यावर ठेवलेल्या दोराच्या बिंडळातील दोराला लटकुन गुंडाला मरण्याकरिता झोका घ्यायला जातो. तर तो दोराला लटकतो पण दोर वर बांधलेला नसल्याने तो खाली न पडता दोर खाली सुटतो. आणि दोर संपल्या नंतर तो दोर संपला म्हणुन खाली पडतो.
अहो त्यात अ अ काय आहे ?
अहो त्यात अ अ काय आहे ? तुम्ही करून बघा असेच होते
तु करुन पाहिलयस वाट्ट??
तु करुन पाहिलयस वाट्ट??

प्रोफेसर प्यारेलालची हि क्लिप पाहिली.. http://www.youtube.com/watch?v=DnyXIUvJdjA नक्कि कशाकशाचा प्रोफेसर आहे देव जाणे
म्याव म्याव गाण पण शोधायला हव..
पण गाण नक्कि प्रोप्या मधच आहे का?/ शिल्पा अवढी जुनी नटी नाहिये.
तु करुन पाहिलयस वाट्ट?? >>मल
तु करुन पाहिलयस वाट्ट?? >>मल वाटलेच कोणीतरी पचकणार म्हणून. ऑमलेट चांगले झालय बघायला अंडी घालून बघायला लागते का ?
ऑम्लेट खायला तर लागते ना
ऑम्लेट खायला तर लागते ना चांगले झालेय की नाही पहायला?
आणि करायला पण लागत... मला
आणि करायला पण लागत... मला वाटलच तु काहीतरी असंबद्ध बोलणार
चला म्हणजे घालणारा महाभाग पण
चला म्हणजे घालणारा महाभाग पण निघेलच आता इथे तुमच्याबरोबर
(No subject)
घालणारा महाभाग पण निघेलच आता
घालणारा महाभाग पण निघेलच आता इथे तुमच्याबरोबर
>>
अंदाज अपना अपना न आवडणारा (की न कळणारा) महाभाग पण असतो तर असला तर नक्कीच सापडेल...
म्याव म्याव त्रिनेत्र मधे आहे
म्याव म्याव त्रिनेत्र मधे आहे प्रोप्यामधे नाय, आमच्या इथे तुनळीवर बंदी घातलीया त्यामूळे क्लिप नाही मिळत
अंदाज अपना अपना न आवडणारा (की न कळणारा) महाभाग पण असतो तर असला तर नक्कीच सापडेल..>>>
अंअअ न आवडणार्या हतभागी लोकांना तो न आवडणं हीच शिक्षा आहे.
अंअअ न आवडणार्या हतभागी
अंअअ न आवडणार्या हतभागी लोकांना तो न आवडणं हीच शिक्षा आहे.<<
आणि न कळणं पण!
परवा एका फ्लाईटमधे, संजीव
परवा एका फ्लाईटमधे, संजीव कुमार, जया भादुरीचा कोशिश दाखवत होते. त्यातल्या कॉलेजचे नाव होते, डीफ अँड ड्म्ब कॉलेज !!! (तशी पाटीच आहे )
शारुखच्या एका जाहिरातीत (बहुदा टाटा स्कायच्या ) ज्योति अडॉप्शन सेंटर अशी पाटी दिसली.
कूठे असतात अशा संस्था ?
आगाऊ, प्रयोग, आर्या माहित
आगाऊ, प्रयोग, आर्या
माहित नाही हे कुणी आधी पोस्ट केलंय का..
नसेल तर नक्की बघा..
http://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg
मी दरवेळेस हसून हसून वेडी होते..
synopsis:
This scene is from a true masterpiece called "CLERK" starring Manoj Kumar :):) It is supposed to be a tragedy movie but can be termed as the funniest movie of the decade.
दिनेशदा, हे अ.आ. मधे का
दिनेशदा, हे अ.आ. मधे का लिहिलयत तुम्ही?
आशिष, या पाट्या पण अतर्क्यच
आशिष, या पाट्या पण अतर्क्यच ना ? अशी नावं असतात का कूठे ?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=f5Pjo0WjBcs&NR=1&feature=fvwp
हा सीन पाहिल्यानंतर मी मॉनिटरजवळ दोन उदबत्या लावल्या आणि उजव्या हाताने घंटी वाजवत समग्र पूजा बांधली.. बघाच तुम्ही पण
समद्यास्नी ओपन चॅलेंज कुणी
समद्यास्नी ओपन चॅलेंज कुणी मिथूनचा 'क्लासिक-डान्स ऑफ लव्ह' पाहिलाय का?

मी त्याची फार तारिफ ऐकून होतो त्यामुळे शनिवारी गजर लाउन उठलो आणि रात्री १.३० वाजता युटिव्ही मुव्हीजवर (का सोनी?) पाहिला. असा सिनेमा पाहायचं भाग्य मला लाभलं याबद्दल मी इश्वराचा आभारी आहे. दुसर्या सीन बद्दल लिहीतो (कारण पहिल्या सीनचा अर्थ मी अजून लावतोय!)
मिथूनच्या हातापायाला,गळ्यात साखळदंड बांधलेत आणि तो एका बाजारात फिरतोय. एक माणूस त्याला 'गुड मॉर्निंग' म्हणतो तर मिथून त्याला 'व्हॉट इज सो गुड अबाऊट द मॉर्नींग' असा झाडून टाकतो. तिथे जमा झालेले लोक टूरिस्ट असतात आणि त्यांचा गाईड 'हा पहा एक वेडा,हा नाचतो' अशी त्याची ओळख करुन देतो.त्यावर ते त्याला 'नाचलास तर तूला मिठाई देउ' अशी लालूच दाखवतात.मग मिथून त्या साखळ्यांसहित नाचायला लागतो (मूजिक -बप्पीदा!). नाचाच्या शेवटी त्याच्या हातापायातून रक्त यायला लागते.ते पाहून एक पोलिस त्याला मदत करु पाहतो.त्यावर मिथून खेकसतो -'ये खून नही मेरे क्रोध का रंग है चाटेगा इसे,चाट!'
मला वाटतं एवढं पुरे!!!
आगाउ... धन्य आहेस
आगाउ... धन्य आहेस

गेल्या आठवड्यात सर्फ करता
गेल्या आठवड्यात सर्फ करता करता सेट मॅक्स वर काय दखवत आहेत म्हणून दोन मिनिटे थांबले. चिरंजीवी या नटाचा कुठला तरी डब केलेला चित्रपट दाखवत होते.
सीन असा होता कि मुकेश ॠषी हा व्हिलन असावा तो त्याच्या कुटुम्बासमवेत दिवाणखान्यात उभा आहे. इतक्यात त्याचा लहान मुलगा एका ज्युनियर गुंडासोबत शाळेतून येतो. मुलाला जखम झालेली आहे. ते पाहुन व्हिलन संतापाने वेडा होतो आणि विचारतो की माझ्या मुलाला कोणि मारले त्याचा मी जीव घेईन इ.इ.
तेव्हा ज्युनियर त्याला सांगतो की मुलगा गाडिखाली येणार होता पण चिरंजीवीने त्याला वाचवले, तेह्वा मुलाला थोडे लागले. त्यावर व्हि.ची बायको म्हणते की पहा तो आपला शत्रु असून त्याने आपल्या मुलाला वाचवले... तेव्हा व्ही म्हणतो की त्याने माझ्या मुलाला वाचवून माझ्यावर उपकार केले. आता मुलगा मोठा होईल आणि त्याला कळेल की त्याने ह्याचे प्राण वाचवले तेव्हा तो प्रल्हादासारखि त्याची भक्ती करेल आणि तो (चिरंजीवी) हिरण्यकश्यपूला जसे मारले तसा मला मारेल.. म्हणून त्याने वाचवलेला मुलगा मला नको... असे बोलून तो स्वतःच्या मुलाचा तलवारीने खुन करतो.
ते पाहून त्याच्या बायकोला चक्कर येते.
मलाही हे द्रूष्य पाहून चक्कर आल्यासारखे झाले ... झटकन चॅनल चेंज केले.
आगावा, हे तू १:३० वाजता गजर
आगावा,
हे तू १:३० वाजता गजर लावून उठून पाह्यलंस?
तू आता अचाट आणि अतर्क्य असा आयडी घ्यायला हरकत नाही!!
बापरे. खरेच आपण ते दक्षिणी
बापरे. खरेच आपण ते दक्षिणी सिनेमे पाहू शकत नाही.
किरण काय भारी आहे रे ते नाच? तो गोन्द्या आहे ना? तरीच.
कधी कधी गंभीर होऊन पाहिले
कधी कधी गंभीर होऊन पाहिले असता आपल्याला काही प्रेरणादायी दॄश्ये देखील नक्कीच सापडतील. अशाच माझ्या एका प्रेरणास्थानापासून मला मिळालेली ही उर्जा..
http://www.youtube.com/watch?v=JSiwvYLbymM
असे प्रेरणास्त्रोत आहेत म्हणूनच आपणही आहोत. या माझ्या प्रेरणास्त्रोताचा सत्कार झाला नसता तरच नवल..
या सत्कारसमारंभाचा हा हॄद्य सोहळा सर्वांनीच पहावा..
http://www.youtube.com/watch?v=OR3wtDvU3Ow
भारताला नॄत्याची एक परंपरा
भारताला नॄत्याची एक परंपरा लाभलेली आहे .. संगीताची जशी घराणी आहेत तशीच नॄत्याचीही... नॄत्यासाठी प्रसिद्ध असलेले असेच एक घराणे..ज्यांच्याबद्दल मध्यंतरी खूप छान माहितीपट प्रसारीत करण्यांत आला..
सर्वांना आवडेल अशी अपेक्षा !
http://www.youtube.com/watch?v=Z1oZgAjGjZ4&feature=related
एकदम असे नॄत्य करणे जमणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे....
घरच्या घरी करता येण्यासारखे काही :सुलभ" प्रकार..
http://www.youtube.com/watch?v=ZK8z2qQ1wbI&feature=related
नटरंग मधे गुणा पहिलवानाने अशी
नटरंग मधे गुणा पहिलवानाने अशी नृत्ये सादर केली असती तर सिनेमा आहे त्यापेक्षा कितीतरी चांगला झाला असता ..!!
किरण.. आपला उद्देश नक्कीच
किरण.. आपला उद्देश नक्कीच चांगला आहे.. पण बीबी चुकला..
इथे मला 'आवडलेल्या चित्रफिती' असा पण बीबी आहे.. http://www.maayboli.com/node/2694
तिथे ह्या लिंक्स द्याल का ?
किरन ते लोहा व गन बुलेट अशक्य
किरन ते लोहा व गन बुलेट अशक्य आहे. हेमामालिनीचे काय होत असेल? भा. प्र. ह्ह्ह्ह्ह तूअश्या क्लिप्स साठी सर्च काय टाकतो बावा?
सतत आचरटपणा करीत कुणाच्या
सतत आचरटपणा करीत कुणाच्या श्रद्धास्थानाला दुखावणे हे हल्लीचे एक नवीन fad होऊन बसलेय. काय बोलायचे ते बोला पण त्याआधी त्या प्रेरणास्थानाविषयी, श्रद्धास्थानाविषयी जाणून घेणे हे लॉजिकल नाही का ?
http://www.youtube.com/watch?v=xC1GPPhXoYw&feature=related
आता बोला..
तुम टाको मै देखता. फिर लिकता.
तुम टाको मै देखता. फिर लिकता.
केदारजी या क्लिप्स पहा आणि
केदारजी
या क्लिप्स पहा आणि नंतर ठरवा..
Pages