अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि समजा उंचावर नसेल पाणी साठा तर आपला जय आहेना इतका उंच. तो भरेल पाणी, डोक्यावर कळशा/हंडे ठेवुन Wink

टाकीत वरून पाईप आलेला दिसला नाही बुवा Happy
सिव्हिल इंजीनीयरींगचा अचाट नमुना दिसतोय. अद्रुष्य पाईप Happy

कदाचीत ती rainwater harvesting ची टाकी असेल. त्यात पावसाचे आभाळातुन थेट पडणारे पाणी साठवीले जात असेल.
Lol
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

अरे तिथे....आधिच सु़खा पड्लेला असतो...आणि मग लोकाना होली पण खेळायची असते...
म्हणुन ही योजना असावि...;)....

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

झकास ! ): ): ): ओफिस मधे पदायअचच राहिल फक्त!!!):

ओफिस मधे पदायअचच >> Lol
-----------------------------------------
सह्हीच !

लोकहो, अचाटपणा एक मिनीट बाजूला ठेउन एक प्रश्नः त्या टाकीपेक्षा दुसरीकडे आणखी उंचावर जर पाण्याचा साठा असेल तर खरोखरच जमिनीखालून सुद्धा वर नेलेल्या पाइपमधून पाणी चढेल ना? एक मजली घरांमधे (वरती टाकी नसली तरी) तसेच पाणी येते ना?

तुम्ही ऑफिस मधे ????????????? (ओफिस मधे पदायअचच ) Rofl

पदायअचच Rofl
वैशाली, पडायचच paDaayachacha असे लिहा म्हणजे अर्थाचा अनर्थ होणार नाही :). तुम्ही लिहीताय त्या बॉक्सच्या वर प्रश्नचिन्ह आहे त्यावर एकदा टीचकी मारा.

आमच्या राजापूरात गंगा अशीच कुठल्यातरी उंचावरच्या पाण्याच्या साठ्यामूळे येते म्हणे. मग रामगढातल्या त्या टाकीत क्का नाही येणार पाणी ?
पण मुळात टाकीत पाणी होते का ? कि निधीअभावी बंद पडलेली योजना होती ती ?

>>निधीअभावी बंद पडलेली योजना
सहि लॉजिक......... तर्क आवडला बुवा.... Rofl
कदाचित तोच निधी चित्रपट काढन्यात तरी वापरला नसावा.... (सहज शंका) ? Uhoh

आज इतरत्र झालेल्या 'करवा चौथ' वरील गहन चर्चे वरून हे आठवले. हा पाहा बिवी नं १ मधला तो जगप्रसिद्ध करवा चौथ सीन. किमान पहिली साधारण तीन मिनीटे जरूर बघा.

पहिले म्हणजे एवढ्या जवळ असून सुद्धा करिश्मा ला फोनवर तिकडून कोणी स्त्री बोलत आहे हे कळत नाही. कुत्र्यांना सुद्धा हा सण आणि लग्न झालेल्या स्त्रीसाठी त्याचे महत्त्व माहीत असते, एवढेच नाही तर सलमान त्या बाबतीत काही गडबड करायला चाल्लेला आहे हे ही त्याला कळते. इतक्या नॉलेजेबल कुत्र्यापुढे 'हम आपके...' मधले काहीच नाही.

चंद्र उगवण्याच्या सुमारास सर्वत्र गडद निळा प्रकाश पसरलेला असतो. आकाश मात्र त्या घरात सोडून इतरत्र नेहमी सारखे काळे, पण त्या गच्चीवर पूर्ण निळे, इतके ब्राईट की चंद्र दिसतो हेच आश्चर्य! 'चाँद हररोज छे बजे निकल आता है...' वरून सुश्मिता ला मिस यूनिव्हर्स वाल्यांनी खगोल शास्त्राबद्दल प्रश्न विचारले असते तर किती मजा आली असती असा विचार चमकून गेला Happy तिचा बहुधा भुकेमुळे आवाज येत नसतो.

चंद्र उगवतो ते डायरेक्ट ग्यालरीतून झाडाबिडांच्याही वर सहज दिसेल एवढा! तो ही चतुर्थी चा चंद्र चार दिवस झाले तरी पौर्णिमेचा पूर्ण गोल 'राखून' असतो (फक्त येथे आस्पेक्ट रेशो मुळे अंडाकृती दिसतो Happy ). इतक्या वर आलेला चंद्र सुद्धा सलमानने दाखवेपर्यंत सुश्मिता ला दिसत नाही. यापुढे जे काही होते ते फक्त बघण्यासारखे आहे, लिहीण्यासारखे नाही Happy

फक्त सुश्मिताने दोन्ही हातात जर ती चाळणी धरली होती तर खाली पडताना बरेच काय काय पडले ते कोठून? आणि दोघेही लगेच (बांद्रा ते जुहू) निघाल्यावर गाडीने येणार्‍या सलमान च्याही आधी चालत आलेली करिश्मा येउन उभी असते!

..प्रोफेसर पॅरेलाल' मधील सीन ! धर्मेंद्र एका छोट्या विमानात ( बहुतेक स्पिटफायर) आणी दुस-या विमानात खलनायक अमजद आणी बिचारी धर्मेंद्र ची आई 'निरुपा रॉय' ( का कुणास ठाऊक या निरुपा रॉय वर अन्याय झाल्यासारखा मला वाटतो...तिला एक तर आंधळी ..... (नहीSSSSs हा टिपिकल डायलॉग) तरी करतात नाही तर सतत खलनायकाच्या ताब्यात गेलेली नायकाची आई! ) एका विमानात, खलनायकाबरोबर! अमजद ने तिला ओलीस ठेवलेले! दोन्ही विमानांना दो-या बांधलेल्या आणी दोन्ही विमाने चक्क पॅरेलल चाललेली! एका दोरीवरुन धर्मेंद्र ब्रीफकेस पाठवतो... तर दुस-या दोरीवरुन अमजद त्याच्या 'निरुपा' ला पाठवतो.... हे सगळ आकाशातल्या आकाशात चाललय! विशेष म्हणजे दोन्हीही विमानातल्या लोकांनी डोक्याला/ कानाला काहीही लावलेले नाही! निरुपा रॉयचे केस उंचावरच्या हवेत उडत नाही की तिची साडी उडत नाही! ब्रीफकेस इकडे अमजद कडे पोचते...आई इकडे धरमपा कडे येत असते आणि अमजद ती दोरी चाकुने कापतो...! आई एकाच दोरीवर लटकू लागते...इतक्या हवेत धरमपा तिला वर विमानात ओढतो! नंतर त्याचे विमान अमजदच्या विमानाच्या एक्झॅक्टली वर घ्यायला सांगतो...आणी अमजदच्या विमानावर अलगद शिडीने उतरतो! सारच अचाट....! दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीला दाद द्याविशी वाटते!

थोडे विषयांतर केल्याबद्दल मला माफ करा.
चित्रपटातील हा मूर्खपणा वाचताना मला लेखकांच्या अतिशयोक्तीबाबतचाही कै. सुहास शिरवळकर यांनी सांगितलेला किस्सा आठवला. मी त्या संवादाला उपस्थित होतो. मराठीत अनेक रहस्यकथा अन साहसकथा लिहिणार्‍यांनी आपापले हिरो निर्माण केले आहेत (झुंजार, धनंजय, बॅरिस्टर अमर विश्वास, कॅप्टन दीप, तिरंदाज वगैरे) यात 'समशेर' म्हणून पण एक हिरो आहे. हा बाबा चपळाईने समशेर काढतो आणि समोरच्यांची क्षणार्धात डोकी छाटली जातात. बरं हा प्रसंग प्रत्येक कथेत कायम असतो. तर एका कथेत असे लिहिले होते, की समशेरने आपली समशेर फेकून मारली. हवेतून भिरभिरत गेलेल्या त्या समशेरीने समोर उभ्या असलेल्या १२ जणांचे पाय गुढघ्यापासून छाटले गेले. शिरवळकर म्हणाले, ' सगळ्यांचे पाय गुढग्यापासून कापायला ती सगळीजणं काय खांद्याला खांदा लावून उभी होती का? त्यांची उंची एकसारखी होती का? एक तलवार एका पायावर आदळून पाय कापला, असे मानले तरी ती तिथेच जमिनीवर पडणार नाही का? तलवार म्हणजे वूड कटर नाही. फेकून मारलेली तलवार १२ जणांचे २४ पाय क्षणार्धात कसे कापू शकेल. अहो पाय कापण्याच्या शस्त्रक्रियेलाही काही तास लागतात. अतिशयोक्ती करायची तरी तिलाही काही लिमिट हवे.'
गंमत म्हणजे वाचक असे लेखन टाईमपास म्हणून वाचतात. त्यात डोके बाजूलाच ठेवायचे असते. तेच चित्रपटांबाबत म्हणता येईल. जोवर प्रेक्षकांना चालते तोवर निर्माते आणि दिग्दर्शक असला आचरटपणा करणारच.
आता आपल्या विषयाकडे.
नुकताच सनी देओल आणि अमिषा पटेलचा एक चित्रपट बघत होतो (पटकन नाव आठवत नाही. कृपया सांगा) सनी हा जट आणि अमिषा मुस्लिम. फाळणीनंतर बिचारी इकडे अडकते. सनीच्या प्रेमात पडून त्याच्याशी संसार करू लागते. पाकिस्तानात आई-वडिलांना भेटायला जाते तर ते तिला तिथेच अडकवून ठेवतात. सनी तिला आणायला जातो तर तिथे एका प्रसंगात जमाव त्याच्या अंगावर येतो तेव्हा तो पाण्याचा हातपंप जमिनीतून उपसून काढतो आणि त्यानेच अंगावर आलेल्यांना तडाखे देतो. बापरे! काय अफाट ताकद आहे. आयला आपल्याच्याने त्या हातपंपाचा दांडा जिथे मोठ्या कष्टाने हलवावा लागतो तो अख्खा पंप सनी त्या कॉंक्रिटमधून एका सेकंदात उपसून काढतो. जय हो. Proud

<< तो अख्खा पंप सनी >>

सगळ्या अ आणि अ सीन्स चा बाप आहे तो.. गदर एक प्रेम कथा हे नाव त्याचे Proud ,
त्यात सनी ट्रक ड्रायव्हर आहे.. एवढेच कारण पुरेसे होते... त्या वरुन तो, रेल्वे इंजिन, हेलिकॉप्टर, फायटर प्लेन , रॉकेट, बोट (??) लीलया चालवेल हे गृहित धरलेले होते..

सनीचे चित्रपट म्हणजे अफाट ताकदीचा आणि अचाट संवादांचा आविष्कार (जब ये ढाई किलो का हाथ पड जाता है तो आदमी उठता नही, उठ जाता है इ.) तर दामिनी नामक चित्रपटात लोहपुरुष सनीचा एक अ‍ॅक्शन सीन बघा हं
सनी म्हणजे गोविंद हा वकील मीनाक्षी शेषाद्रिचे (दामिनी) वकीलपत्र घेतो म्हणून बॅरिस्टर चढ्ढा (अमरीश पुरी) त्याच्या घरावर हल्ला घडवतो. त्यावेळी गुंडांना दणादण हाणल्यावर हल्ला घडवणारे चार आरोपी अ‍ॅम्बॅसेडर कारमधून पळून जात असतात. त्यांची गाडी सुरू होत नसते. सनी रागाने गाडीच्या एका बाजूच्या दाराला लाथ मारतो तर त्याचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो, की पलिकडच्या बाजूची दोन्ही दारे तुटून ते चारहीजण रस्त्यावर पडतात.
मला आश्चर्य वाटते, की भंगार तोडण्यासाठी कारखान्यात यंत्रे का वापरतात लोक? Happy

आयला! तो प्रोफेसर प्यारेलाल म्या कालच पाह्यला टिविवर (असले सिनेमे मी आवर्जुन पाहतो) आख्खा सिनेमाच भारी आहे, आणि हा विमानवाला शीन तर झकास.
माझ्यासारखे जे कोणी 'दर्दी' अस्तील त्यांनी मिथूनचा 'त्रिनेत्र' जरुर पहावा. दिपा साही मिथूनची आई हाच त्यातला सगळ्यात अतर्क्य प्रकार आहे (आणि बाप धर्मेंद्र,काय पण काँबीनेशन!) .:-P ही आई सारखी नहीं म्हणुन ओरडत अस्ते आणि बॅकग्राऊंडला प्रत्येक वेळा विजांचा कडकडाट
त्यात 'म्यांव म्यांव' असं एक गाणं आहे ज्यात शिल्पा शिरोडकर मांजरासारखे चाळे करत अमरिष पुरीसमोर नाचते,आणि तो तिचे पेंटींग काढतो. आजूबाजूला अनेक फिशपाँड्स, का ते मला अजून कळलेले नाही.गाण्याच्या शेवटी शिल्पाताई पुरीआजोबांना त्यात बुडवून मारायचा असफल प्रयत्न करतात,हुश्श

गाण्याच्या शेवटी शिल्पाताई पुरीआजोबांना त्यात बुडवून मारायचा असफल प्रयत्न करतात,हुश्श
>>>> अगगगग Rofl मुळात शि.शि मांजर हेच अचाट आहे!!

त्या प्यारेलालच्या हेलिकॉप्टरची यूट्यूब लिंक सापडली तर द्या ना.

Pages