अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे....
(बहुतेक तुषार कपूर वगैरे माठ मंडळी याला benchmark समजून समाधान मानून घेत असावेत....)

अरे तो कमल सदाना अशा काही तरी नावाचा एक मख्ख माणूस होता ना हिरो कशात तरी...

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

नायकः रजनीकांत
चित्रपट: आठवत नाही.
मला दृष्य नीट आठवत नाही पण खलनायक नायिकेवर बळजबरी करण्याचा प्रसंग असावा. ती अबला "बचाओ! बचाओ!" असे ओरडत असते. दरवाजा खाड्कन उघडलो. रजनीसाहेब उभे असतात. त्याच्या हातात इस्पिकचा एक्का असतो. त्या एक्क्याचे पान रजनी तर्जनी आणि मध्यमामध्ये धरून फेकतो. पान सुदर्शन चक्राप्रमाणे गरागरा फिरत खलनायकाच्या बहुदा हाताला जखम करते. (रजनीने हात हलवला तरी background music वादळाचा आवाज काढते. त्याने कोणतीही वस्तू फेकली की ती सुदर्शन चक्रासारखी फिरत जाणे हे अपरिहार्यपणे आलेच. आता इतक्या वेगात एखादी गोष्ट फेकली तर helicoptor चा आवाज येणार हे सहाजिकच आहे). रजनीकडे खलनायक आणि त्याचे चिल्लेपिल्ले अवाक् होऊन पहातात. रजनी ड्वायलॉक मारतो "ये से यिक्का, ये से अकबर खान, अभी आता हूं मेरी जान". (त्यानंतर तो खास ष्टायलीत पंधरा वीस गुंडांची पिटाई करतो हे सांगण्याची गरज नाही)

कमल सदाना हे नावच मख्ख आहे, माणूस दूरच...

    ***
    The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

    तशी मख्ख परंपरा जुनी आहे आपल्याकडे.
    पार प्रदीपकुमार, भारतभूषण पासून
    ते तर आद्य 'Pillers of Bollywood'
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    पिल्लर्स सही Happy

    येथे टाकल्यापासून मीच ते १०-१५ वेळा बघितले असेल आणि प्रत्येक वेळी हसू आवरत नाही. So bad, it's good कॅटेगरी म्हणतात तसे आहे हे. चार पाच हायलाइट्स आहेत माझ्या दृष्टीने...

    १. धूसर गूढ आवाजात 'उलफत... उलफत...' असे ऐकू येते मधे
    २. मागे जाताना आपण खांबाला तर धडकत नाही ना अशी खबरदारी घेत केलेल्या स्टेप्स
    ३. तिचा फुलात ठेवलेला फोटो ("सुबोध" आठवतो)
    ४. ती फ्रेम मधून एकदम गायब झाल्यावर त्याचा घाबरलेला चेहरा.
    ५. शेवटी २-३ सेकंद राहिलेत कळाल्यावर उरकून घेतलेल्या स्टेप्स.

    पिक्चर काय असेल हा! Happy

    महाभिषण आहे हा विडियो. वेड लागल रे हसुन हसुन.........

    २ आणि ५ बद्दल फारच सहमत!! मला पहील्यांदा बघताना हेच लक्षात राहीले!! फारच कॉमेडी!!! पिक्चरचं नाव शोधून काढा की फारेंड भाऊ!

    पिक्चरचे नाव प्यासी रात..
    हीरोचे नाव अज्ञात.. Happy

    हो ना तिथे लिहीलच आहे सिनेमाचं नाव... आता घाबरायची पाळी श्रची आहे. नाव मिळताच फर्माईश येईल ... श्र होऊन जाऊ दे... Proud

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    ओह गॉड , हा खजिना आज बघतोय Happy
    फरेंडा Happy धन्य Happy

    पिक्चरचे नाव प्यासी रात..<< फारेंडच्या त्या लिंकबद्दल सांगतेयस का नंदिनी? हा नक्की भुताचा सिनेमा असावा!!! हिरो (?) झपाटलाय! Proud

    हो ना, ढगांचा गडगडाट, वीज कडाडते, कोणीतरी गूढ हसते आणि मग हा येतो Happy

    ह्या "हिरो"बद्दल एव्हढी चर्चा???? अर्थात, एकताच्या सिरीयलचा नविन हिरो होऊ शकेल. गुळगुळीत दाढी केलेला गुळगुळीत चेहरा जो एक इंचही हलत नाही आणि शरीर नको तेव्हढे + नको तेंव्हा हलते.

    >>ढगांचा गडगडाट, वीज कडाडते, कोणीतरी गूढ हसते आणि मग हा येतो
    Rofl

    अमोल, केवळ अशक्य!! हहपुवा अगदी!! rofl.gif
    .
    श्र, लिही की जरा डीटेलवार, एवढ संक्षिप्तात का ते? proud.gif

    बर्‍याच वर्षांपूर्वी या रजनीकांत साहेबांचा "फौलादी मुक्का" नामक (साऊदिंडियन dubbed) चित्रपट येऊन (सपाटून आपटून) गेला. याचं परिक्षण (??) पेपरात आलं होतं. त्याची पहिलीच ओळ अशी:
    "हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक, पाठीत जोरात बुक्का बसल्यागत कण्हत कुथत थेटरातून बाहेर येतो". पुढचं परिक्षण वाचलंच नाही.

    मित्रांनो. मी प्रथमच आलो हया धाग्यावर ! वा , त्या बहारदार नृत्याने
    फारच रंगत आणली!

    रजनीकांत !
    मा़झी ऍडमीन ला विनंती आहे की आहे की त्यांनी "अशक्य रजनीकांत" असा स्वतंत्र धागाच सुरु करावा. कारण तो "शिवाजी द बॉस" मध्ये जे काही धमाके करतो ते अक्षरश: अशक्य आहेत.

    रजनीकांतप्रमाणेच खालील अशक्यवीर चक्र मिळालेल्यांची यादी :
    शत्रुघ्न सिन्हा चे खामोश
    राजकुमार चे मख्ख जानी
    विश्वजीत चा साबणी चेहरा
    भारतभूषण चा धार्मिक रोमान्स
    समग्र तुषार कपूर
    सलमानखान चे दोन भाऊ

    पिक्चरचे नाव प्यासी रात..
    हीरोचे नाव अज्ञात..

    >>>>>
    असा कुठलाही पिक्चर नाही. हा कमल सदनाहही नाही. हा एक होम मेड व्हिडिओ आहे. हौशी.
    कमल सदनाहच्या वडलानी - ब्रिज- सदनाह यानी व्हिक्टोरिया नं.२०३ काढला होता. कमल सदनाह आणि जिमी शेरगिल चा पुन्हा त्याचा रिमेक येनार होता त्याचे काय झाले माहीत नाही. कमल हॅन्डसम आहे.
    हा व्हिडिओ ओरिजिनल नाही. त्यामुळे त्याला बॉलिवूड फिल्म म्हणून किती हसायचे हे ज्याने त्याने ठरवावे....

    नकली मालापासून सावधान!

    तशी शक्यता आहे. कोणत्यातरी बी ग्रेड च्या चित्रपटाच्या क्लिप्स मधे आपला डान्स घुसडून त्या शब्बीर च्या गाण्यावर हा डान्स 'बसवला' ही असेल. पण शूटिंग चा दर्जा (टेक्निकल) चित्रपटासारखाच वाटतो. आणि आपण हसतो ते त्या अफाट स्टेप्स ना. आणि अशा चित्रपटांत इतर गोष्टी (गाणी) वगैरे जरा गुंडाळलेलीच असतात म्हणून हे बेमालुम वाटते. तरीही त्यातील विनोद कमी होत नाही.

    पण नकली माल असेल तर दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

    टोणगा, तुम्हाला 'प्यासी रात' हा चित्रपट नाहीच हे खात्रीलायक माहिती आहे हे interesting आहे Happy तो रिमेक येऊन गेला - व्हिक्टोरिया नं. २०३ : डायमंड्स आर फॉरेव्हर... (बाँडचा काय संबंध ? तुषार कपूर असता तर सदाना ज्युनि. आणि बाँड ज्युनि. असं समजू शकलो असतो).

      ***
      The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

      टोणगा, प्यासी रात म्हणून रामसेचा पिक्चर आहे. थोडा नेटवर सर्च करा. वरील व्हीडी होम मेड नक्कीच नाही. (एडिटिंग बघितल्यावर लक्षात येतं. मात्र याचं शूटिंग नक्की डीजीबीटावर झालेले आहे. वरच्या हीरोला कुणीही कमल सदाना म्हटलेले नाही. त्याच्या मख्खपणाला सर्वजण हसत आहेत. आणि जरी हा व्हीडिओ ओरिजिनल नसला तरी त्यामुळे त्याची विनोदी व्हॅल्यु कमी होत नाही.. असो.

      कमल सदाना हा मख्ख अभिनेता होता. त्यात वाद नाही. व्हिक्टोरिआ नं २०३ चा अनंत महादेवनने रीमेक काढला आणि तो पडला सुद्धा...
      http://www.imdb.com/title/tt1095038/ इथे ती माहिती मिळेल.

      रामसेचे जवळ जवळ सगळे पिक्चर मला माहीत आहेत...दो गज जमीनके नीचे पासून.
      शाम रामसे, तुलसी रामसे,कुमार, अर्जुन,गंगू रामसे, केशू,
      टोणगा, प्यासी रात म्हणून रामसेचा पिक्चर आहे. थोडा नेटवर सर्च करा.
      रामसेनी माझ्या माहीतीनुसार पुढील पिक्चर काढले.
      दो गज जमीनके नीचे
      दरवाजा
      गेस्ट हाऊस
      सन्नाटा
      दहशत
      पुराना मन्दीर
      हवेली
      सामरी
      हॉटेल
      वीराना
      तहखाना
      डाकबंगला
      पुरानी हवेली
      शैतानी इलाका

      १९९० नन्तर रामसेनी पिक्चर काढल्याचे ऐकिवात नाही.प्यासी रात नावाचा पिक्चर त्यानी अथवा कोणीही काढल्याचा पुरावा नाही.
      (मात्र रामसेनी झी टीव्हीवर झी हॉरर शोचे काही इपिसोड केले होते. त्यात गाण्याचा काय प्रश्न येतो...?)

      रामसेनी पिक्चर काढायचेही १९९० नन्तर बन्द केले. आय एम डी बी वर सर्वत्र मी शोधले. नेटवर प्यासी रातबद्दल कुठे लिन्क असेल तर ती सांगितल्यास मी आभारी राहील.

      वरच्या हीरोला कुणीही कमल सदाना म्हटलेले नाही.

      हे बरोबर आहे. मीनूचे पोस्ट मी नीट न वाचल्याने मला असे वाटले की तिने तो कमल सदनाह आहे असे म्हटलेय.. त्याचा मख्खपणा गमतीशीरच आहे..
      पण प्यासी रात केवळ तिथे म्हटलय म्हणून सगळे म्हनताहेत
      हा फार एन्ड रॅग पिकरसारखे कचरा धुंडाळत फिरत असतो काय? Happy

      टोणगा,
      पुन्हा एकदा तुझ्या महितीसाठी...
      रामसे बंधूंचं चित्रपटनिर्मितीचं कार्य व्यवस्थित सुरु आहे..
      'फॅमिली', 'खाकी', 'इन्सान', 'धुंद - द फॉग', अक्षय कुमारचे 'द बाँड', 'पांडव', 'खिलाडी' सिरीज ('खिलाडी' वगळता) ही सारी रामसे बंधूंची अपत्ये..
      श्र, 'पांडव' आठवतोय का?

      हा फार एन्ड रॅग पिकरसारखे कचरा धुंडाळत फिरत असतो काय

      नाही. मग मला ती रामसे ची लिस्ट नसती का सापडली Proud
      हा व्हिडीओ कसा सापडला लक्षात नाही.

      Pages