सनराईज सूप

Submitted by मितान on 4 January, 2011 - 07:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल भोपळ्याच्या फोडी - १ वाटी
लाल भोपळी मिरची चिरून - १ वाटी
पिवळी भो.मिरची- १ वाटी
कांदा ( मध्यम आकाराचा ) - अर्धा
२-३ लवंगा
२-३ मिरी
मीठ
१ छो. चमचा लोणी
आवडत असल्यास क्रीम

क्रमवार पाककृती: 

एका पातेल्यात लोणी वितळायला ठेवा. त्यात कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात मिरच्या घाला. मिरचीचा कच्चा वास गेला की भोपळ्याच्या फोडी घाला. लगेच त्यात हे सर्व शिजेल इतपत पाणी घाला. त्यात लवंग नि मिरे घाला. ५ मिनिटात भोपळा शिजेल.मग गॅस बंद करा. आणि हे मिश्रण थोडे गार होऊ द्या. मग मिक्सरमधुन काढा. जसे दाट सूप हवे त्या प्रमाणात पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मीठ आणि मिरपूड घालून सर्व्ह करा. आवडत असल्यास क्रीमही घालता येईल. कोथिंबीर पेरता येईल.

वाढणी/प्रमाण: 
५-६ वाट्या
अधिक टिपा: 

सध्या कडाक्याच्या थंडीत रोज जेवणात सूप असले की जेवण पण उबदार वाटू लागतं. असंच एक उबदार सूप. कुठेतरी ऐकलेलं 'सनराईज सूप' हे नाव मी याला दिलं. माझाच प्रयोग आहे. अनेकदा यशस्वी झाला आहे. तुम्ही पण करून बघा.
हे सूप जरा दाटच चांगले लागते. मला भाज्यांमध्ये शिजलेली भोपळी मिर्ची आवडत नाही. उग्र वास येतो. या सूप मध्ये तो तितका उग्र येत नाही.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चातक, जागुला अर्जंट रेसिपि पाहिजे होती म्हणून फोटो देता आला नाही. आता पुढच्या वेळी सूप केले की नक्की फोटो टाकेन. Happy

वाल्या कोळी, मीठ आणि मिरपूड ऐनवेळी घालायचे. सूप ची चव बदलत नाही असे केल्याने. शिवाय क्रीम वगैरे घातलं तर ते फाटत नाही.

बरं झालं, मस्त रेसिपी मिळाली. नाहीतर मी आणलेल्या भोपळ्याला फक्त भरीत रुपात सद्गती दिली की माझे पेशन्स संपायचे....आता हे सूप करीन.