नववर्षाच्या शुभेच्छा !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ह्या वर्षी भारतात घेऊन जाण्यासाठी तसेच इथल्या काही मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी काहितरी वेगळी गोष्ट शोधत होतो. कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. त्यावरून आम्ही स्वतः काढलेल्या फोटोंची कॅलेंडर्स बनवून ज्यांना द्यायची त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इथले तसेच भारतातले सणवार त्यावर मार्क करून ती द्यायची अशी कल्पना सुचली. नंतर फोटो निवडताना एकच थीम निवडायच्या ऐवजी त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य दाखवणारे फोटो निवडले तर ते जास्त चांगलं वाटेल असं जाणवलं. मग आम्ही गेल्या वर्षभरात तसेच आधी काढलेल्या फोटोंपैकी १२ बरे फोटो निवडले. तारखांची जमवाजमव केली आणि कॅलेंडर बनवून घेतली. आत्तापर्यंत ज्यांना दिली त्यांनी गोड मानून घेतली आहेत. ज्यांना अजून द्यायची आहेत, त्यांना ती आवडतील अशी अपेक्षा आहे. Happy
तर तुम्हासगळ्यांना आमच्या तर्फे नववर्षाच्या ह्या रंगीबेरंगी शुभेच्छा !! येणारे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो !!

जानेवारी :
01 January.JPG

फेब्रुवारी :
02 February.JPG

मार्च :
03 March.jpg

एप्रिल :
04 April.JPG

मे :
05 May.JPG

जून :
06 june.JPG

जुलै :
07 July.jpg

ऑगस्ट :
08 August.jpg

सप्टेंबर :
09 September.JPG

ऑक्टोबर :
10 October.jpg

नोव्हेंबर :
11 November.jpg

डिसेंबर :
12 December.jpg

विषय: 

अ‍ॅडम तुम्हालापण नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
कॅलेंडर वर तुमचे पण वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस मोठ्या फॉन्ट मध्ये टाकले की नाही म्हणजे लोक गिफ्ट पाठवायला विसरणार नाहीत. Happy

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद ! पुढच्या वर्षी हॉलिडे सिझनला अटलांटाला या की कॅलेंडर नक्की.. Happy

टण्या... उत्तेजन मिळालं.. आता अजून फोटो काढणार.. Proud

Pages