Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
अनिर्वचनीय >. शब्दात सांगता
अनिर्वचनीय >. शब्दात सांगता येणार नाही, वर्णन जमणार नाही असा अनुभव. अवर्णनीय
भिषग्वर्य >>( बहुतेक) वैद्य,
>>'स्वयंप्रेरित'
>>'स्वयंप्रेरित' त्यातल्यात्यात बरा वाटतो आहे. <<
स्वयंप्रेरित = सेल्फ मोटिवेटेड
प्रोअॅक्टिव हा शब्द मराठी माणसाच्या शब्दकोषात नाहि... कारण तो नेहमीच रिअॅक्टिव मोड मध्ये असतो...
मेधा +१ तपःपूत (कला) = तपाने
मेधा +१
तपःपूत (कला) = तपाने परिपूर्ण - म्हणजे केवळ अंगभूत असण्यावर समाधान मानलेलं नाही तर कष्टाने (रियाज इ.) आत्मसात केलेली आहे.
Proactiveसाठी 'अग्रसक्रीय'प्रमाणे 'अग्रकर्मी' असाही एक पर्याय ऐकला.
प्रोअॅक्टिव = तत्पर हा शब्द
प्रोअॅक्टिव = तत्पर हा शब्द चालेल का ?
मख्खी टू मख्खी हवं असेल तर संस्कृतमधून आलेले शब्द येतील. पण ग्रामीण बोलीत देखील असे शब्द आहेत, जे वापरले नाहीत तर नाहीसे होतील. भावार्थासाठी कधी कधी असे शब्द फारच बोलके असतात. लक्षात राहीलं, वेळ आणि नेट मिळालं तर पाहूयात.
तत्पर पण नाही. खरं तर आगाऊ
तत्पर पण नाही. खरं तर आगाऊ हा शब्द चालवून घ्यावा
प्रोअॅक्टीव्हसाठी इतका वेळ
प्रोअॅक्टीव्हसाठी इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद लोकहो. कॉन्टेक्स्टनुसार मी दूरदर्शी शब्द नक्की केला आहे.
व्हिजनरीला काय शब्द मग ?
व्हिजनरीला काय शब्द मग ?
द्रष्टा
द्रष्टा
ओके. दूरदर्शी आणि
ओके.
दूरदर्शी आणि द्रष्टा
सहीच
ब्र आ, मी आगाऊ लिहिलंय
ब्र आ,
मी आगाऊ लिहिलंय की.
आणि इतके दिवस हा शब्दं वापरलाही जातो मराठीत.
पण हल्ली या शब्दाला वाईट अर्थं लाभलाय.
ओह साती... इतक्या गर्दीत उठून
ओह
साती... इतक्या गर्दीत उठून दिसली नाहीस.
पण हल्ली या शब्दाला वाईट अर्थं लाभलाय. >> आयडी मात्र भारी आहे तो
पुराव्याने शाबीत करेन. शासकीय
पुराव्याने शाबीत करेन.
शासकीय मराठी भाषेत प्रोअॅक्टिव्हसाठी उत्तरलक्षी हा शब्द वापरलेला मिळाला.
वातावरण बदल संवादात भारत उत्तरलक्षी भूमिका बजावेल- पर्यावरण मंत्र्यांचे फ्रेंच प्रतिनिधी मंडळाला आश्वासन
तीच प्रेस रिलीझ इंग्रजीत
India to play a proactive role on Climate Change and evolve consensus on COP-2015, assures Prakash Javadekar
सुधीर जी, वराहकुलोत्पन्न हा
सुधीर जी, वराहकुलोत्पन्न हा शब्द जिथे वाचलात तिथे अर्थ सांगायची हिंमत दिसत नाही. गर्दभकुलोत्पन्नांच्या नादी लागू नये हेच खरं.
वा भरत!
वा भरत!
शासकीय मराठीत पूर्वलक्षी
शासकीय मराठीत पूर्वलक्षी प्रभावाचा काय अर्थ होतो ?
भरत उत्तरलक्षी हा शब्द पोस्ट
भरत
उत्तरलक्षी हा शब्द पोस्ट फॅक्टो साठी तर नसेल ना ?
पूर्वलक्षी प्रभाव :
पूर्वलक्षी प्रभाव : retrospective effect
व्होडाफोन प्रकरणानंतर हा शब्द खूपच गाजला. इनक्म टॅक्समध्ये तसे पूप्र. कितीतरी असतात.
ब्र.आ. : इंग्रजी प्रेस रिलीज वाचा.
मराठी प्रेस रिलीज शीर्षकापलीकडे वाचायची आता हिंमत नाही. उद्या मराठी-इंग्रजी दोनी बाजूबाजूला ठेवून वाचेन. तेवढीच शब्दसंपत्तीत(!) भर पडली तर!
विजनरी = दूरदर्शी; भविष्य
विजनरी = दूरदर्शी; भविष्य किंवा भाकित सांगणारा नव्हे...
मला असे वाटते आहे की पोस्ट
मला असे वाटते आहे की पोस्ट फॅक्टो सँक्शन साठी नारायणपेठेतील राजभाषा कार्यालयाकडूनउत्तरलक्षी हा शब्द देण्यात आलेला आहे.
pibmumbai ने भाषांतरासाठी
pibmumbai ने भाषांतरासाठी खापरे/खांडबहाले वापरला असणार.
स्वाती, मेधा धन्यवाद!
स्वाती, मेधा धन्यवाद!
मस्त चर्चा! वाचून माहितीत भर
मस्त चर्चा! वाचून माहितीत भर पडली.
Proactive साठी राज यांना +१
एकदा जेव्हा हा शब्द वापरायचा होता तेव्हा संपादकांनी सक्रीय जिज्ञासू असे भाषांतर केले पण माझ्यामते ते १००% योग्य नाही. पुढाकाराने (proactively)/पुढाकारी (proactive) अशी नवीन शब्दरूपे coin (!?) करता येतील का?
पुढारी
पुढारी
आपल्या नम्र गापैंनी एक नविन
आपल्या नम्र गापैंनी एक नविन शब्दाला जन्म दिलाय-
वाक्परिचय!
कुणाला अर्थं कळला तर कळवा.
वर्षा, proactive = पूर्वसजग
वर्षा,
proactive = पूर्वसजग ...?
बरा वाटतोय?
आ.न.,
-गा.पै.
साती, SIM = Subscribers
साती,
SIM = Subscribers Identification Module
म्हणून, सिमकार्ड = वाक्परिचय
इथे वाक्जोडपरिचय अधिक समर्पक वाटतो. पण जरा जड शब्द आहे.
आ.न.,
-गा.पै.
जिज्ञासा धन्यवाद. proactiveचा
जिज्ञासा धन्यवाद.
proactiveचा अर्थ आम्हाला स्वतःहून पुढाकार घेउन काम करणारा/री असा सांगितलेला.हे समजण्यासाठी पुलंच्या 'नारायणा'ला समोर ठेवा.आता या मोठ्या फ्रेजसाठी एकच पूरक असा शब्द मिळेना.तो पुढाकाराने असाच असावा.
कदाचीत सिच्यूएशनल अर्थ बघता स्वयंप्रेरीत असा बरोबर अर्थ वाटत होता.पण,पुढाकार हा पटतोय. नुसत्या दूरदर्शी मध्ये अॅक्शनचा अभाव वाटतो.'दूरदर्शी सोबत कृतीचीही जोड स्वतःहून देणारा असा' म्हणजे पुढारी (ब्र.आ. ) पुढाकाराने/पुढाकार.
Proactive: क्रियाशील/कृतीशील?
Proactive: क्रियाशील/कृतीशील?
तपःपूत मधला 'पूत' चा अर्थ
तपःपूत मधला 'पूत' चा अर्थ 'पुनित झालेला, शुद्ध झालेला' असा घेतला जातो.
एक श्लोकही आहे -
दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् | (नीट पाहून पाय पुढे टाकावा, पाणी वस्त्राने गाळून शुद्ध केलेलं प्यावं)
सत्यपूतां वदेत्वाणीं मनःपूतं समाचरेत् || (खरे बोलावे आणि मनाचे ऐकावे (जनाचे नव्हे अशा अर्थाने) )
नुकत्याच झालेल्या
नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटामुळे आठवले. फरासखाना हे नाव कसे आले? फरास म्हणजे काय? हा शब्द मूळ कुठल्या भाषेतला?
अवांतरः पुण्यातील अनेक जागांची नावे अर्धी मराठी अर्धी इंग्रजी वा अन्य भाषा सरमिसळयुक्त असतात. स्वारगेट, पेरूगेट, डेक्कन जिमखाना, लकडी पूल
Pages