दादोजी भेटले उद्यानात ..

Submitted by vaiddya on 30 December, 2010 - 11:29

(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)

पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?

अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !

अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
तुम्हाला होती एक
ब्राह्मण जात
ती तेव्हा आम्हाला कळली ...

आमच्यासाठी तुम्ही
शूर मर्द मराठी मावळा !
महाराजांच्या स्वराज्यातला
नव्हेत डोमकावळा !

तुमचा वेष लढवय्याचा,
ढाल-तलवारीचा ..
बाजीप्रभूंसारखी
तुमची शेंडी नव्हती दिसत,
किंवा त्यात नव्हते जानवे
गागाभट्टाच्या चित्रासारखे,
पुढेपुढे मिरवत !

आमची होती बडबड गाणी
खोट्या घोड्यांवरची ..
शहाजीचा शिवाजी,
शिवाजीचा संभाजी ...

मधेच अचानक
या सगळ्यात
कुठून उपटलात दादोजी ?”
सुस्कार्‍याने हसत हलके
दादोजी मग म्हणाले ..
“आम्ही कुठले मधे यायला ?
आम्ही आमचे काम केले.
आमचे आमचे जीवन होते
कर्तव्याने निभावून नेले ..

आमच्यानंतर कोणी कोणी
कुठे कुठे काय लिहिले
कुठे कोणी काय भकले,
मार्ग काय कळायला ?

आम्ही कोणीच ओलांडली
नव्हती आमची रेखा !
नव्हत्या आम्हाला अडवत
आमच्या जानव्याच्याही रेघा !

शेंडीपेक्षा आमचा जोर
मनगटातच जास्त होता
खांदा आमचा कोणाच्याही
खांद्यापासून हटत नव्हता ..

अरे, जातीपाती पाहून शत्रू
आम्हाला मते थोडीच देणार होता ?

दादोजीला माहित नाही
पुढे कोण काय म्हणते,
इतकेच होते मह्त्वाचे
महाराज समोर घडत होते
डोळ्यांमधे माऊलीच्या
स्वराज्याचे स्वप्न होते !”

मी म्हटले,“दादोजी,
आता इथेच का मुक्काम ?
कसा आणि किती दिवस ..?”

तर मधेच अडवत दादोजी
पाठ फिरवून चालू लागले,
पुतळा म्हणून ते थिजता-थिजता
शब्द माझ्या कानी आले,

“रामराज्याचा आदर्श बेटा,
ध्यानात कायम असू दे,
धोब्यासाठी राणीसुद्धा
रानावनात हिंडते,

आम्ही साधे नोकरदार
आमची काय कथा ?
नको पुरवू पाठपुरावा
वेळ घालवू वृथा !

आमच्यासाठी नको
करायला कोणीच मिरासदारी !
नको कुठलीच दादागिरी ..

अरे, बिन-संकल्पी भंपक राजे
खूप माजले राज्यात,
अश्या महालात
राहणे नको
उद्यानाची सावली बरी !

लोकापवादाच्या
नजरांपेक्षा
दुपारीची
उन्हे बरी,
डोमकावळ्यांच्या
थुंकीपेक्षा
चिमण्या-कावळ्यांची
विष्टा बरी !”

प्रदीप वैद्य

गुलमोहर: 

लिंबूटिंबू... हिन्दू धर्माला हतोत्साहित करुन नाऊमेद करत करत व आपापसात झङडायला लावून नामशेष करण्यामागिल षडयन्त्राचा हा एक भाग आहे.....

हे वाचून शिवाजी राजांचे एक वाक्य आठवले...

पुन्हा एकदा तसेच एक वाक्य ३४४ वर्षांनी पुन्हा एकदा ऐकायला मिळते आहे... Happy

मिर्झा जयसिंग चालून आला तेंव्हा त्याला लिहिलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात... "हिंदू लोकांत कोणीही बलशाली राहू नये आणि सिन्हांनी आपापसात लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे अशी औरंगजेबाची इच्छा आहे."

हे पत्र खूप मोठे आहे.. लवकरच पूर्ण टायपून इथे टाकायचा प्रयत्न करतो... Happy

लिंबूटिंबूजी यांच्या पोस्टीत बरेच तथ्य आहे. मलापण हे मोठ्या कारस्थानाचा भाग आहे असे वाटायला लागले आहे.

श्री. राजे यांच्या सुरवातीच्या पोष्टीं बघितल्यावर केवळ ब्राह्मण द्वेष आहे असे वाटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलचे त्यांचे मौलिक विचार वाचल्यावर लिंबूजी यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याचा सज्जड पुरावाच समोर येतो. म्हणजे दादोजींना हलवण्यामागे शिवाजी वा जिजामाते बद्दल प्रेम वा आदर नाहीच आहे... ते तर वर वर दाखवण्याचे नाटक आहे असे समजायचे कां?

जात्यंध संघटनांचा हिंदुविरोधी कट आणि त्याचे सूत्रधार !
गेली ८-१० वर्षे महाराष्ट्रातील काही ‘मराठावादी’ घटक हिंदु समाजात दुफळी माजवण्याकरता निश्चित दिशेने आणि वाढत्या प्रमाणावर अन् अधिकाधिक तीव्रतेने काम करत आहेत. त्यांचे प्रयत्न बर्यापैकी सफल होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या या प्रयत्नांच्या किंवा त्यामागील हेतूंच्या गांभीर्याचे आकलन महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला झाले असल्याचे दिसत नाही.

याविषयी प्रबोधन करण्यासाठी आणि हिंदुऐक्याचा एक प्रयत्न म्हणून ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषद’ने २००२ साली ‘समाज जागृती पुस्तिका’ काढून अभिनंदनीय कार्य केले होते. या पुस्तिकेतील सारांश येथे देत आहोत.

१. हिंदूंमध्ये फूट पाडून त्यांचे धर्मांतर करण्याचा कट !
हिंदु समाजात दुफळी माजवणे, जातीजातींमध्ये वैमनस्य निर्माण करणे आणि अशा प्रकारे हिंदु धर्माचा पाया पोखरून हिंदूंचे मोठ्या संख्येने धर्मांतर करण्याकरिता अनुकूल वातावरण सिद्ध करणे, हा या कटामागील प्रमुख हेतू आहे.
२. हिंदूंमध्ये दुफळी माजवून हिंदुत्ववादी पक्षांकडे आकृष्ट झालेला मतदार तोडण्याचा राजकीय प्रयत्न !
हिंदूंच्या विरोधातील कटामागे एक दुय्यम हेतूही आहे आणि तो म्हणजे राजकारण. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांकडे विविध जातींमधील विशेषतः ब्राह्मण, मराठा, इतर मागासवर्गीय इत्यादी जातींमधील मतदार मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाले आहेत. प्रामुख्याने ब्राह्मण अन् मराठा या जातींमध्ये वैमनस्य निर्माण करून दुफळी माजवण्याचे कारस्थान आहे. त्याचाच एक भाग म्हणून तथाकथित उच्च जातीय मराठे अन् तथाकथित कनिष्ठ जातीय मराठे यांच्यातही तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामागे सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) आणि कदाचित ‘मिशनरी’ मंडळी असावीत, असे मानण्यास सबळ कारणे आहेत.
३. बामसेफसारख्या हिंदुविरोधी संघटनेच्या कटाला पाठिंबा देण्या करिता मराठा संघटनांचा वापर !
बामसेफ (बहुजन अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉइज फेडरेशन) ही या कटामधील प्रमुख संघटना आहे. ती दलित संघटना असल्यामुळे तिला मराठा समाजाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती, म्हणून आरंभीला ‘मराठा महासंघ’ या मराठा संघटनेचा वापर करून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले; पण त्या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नसल्याचे दिसून आल्यावर या कटाच्या सूत्रधारांनी ‘मराठा सेवासंघ’ नावाची वेगळी संघटना स्थापन केली. आता ‘मराठा सेवासंघा’ला त्यांच्या विविध कार्यक्रमांना अधिक प्रसिद्धी मिळू लागल्यावर ‘मराठा महासंघ’ही या चळवळीत सहभागी होऊ लागला आहे.
३ अ. कागदोपत्री अनेक उपसंघटना निर्माण करून हिंदुविरोधी चळवळीला पाठिंबा असल्याचा आभास निर्माण करणे, ही ‘मराठावादी’ संघटनांची युद्धनीती ! : ‘मराठा सेवासंघ’ आणि ‘मराठा महासंघ’ यांच्या छत्राखाली अनेक उपसंघटना आहेत. उदाहरणार्थ ‘संभाजी ब्रिगेड’ आणि ‘छावा’ या अनुक्रमे ‘मराठा सेवासंघ’ आणि ‘मराठा महासंघ’ यांच्या युवक संघटना आहेत. त्याशिवाय अनेक ‘प्रâंटस्’ म्हणजे आघाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ ‘छत्रपती युवा मंच’, ‘शिवसंग्राम’, ‘आंबेडकर युवा मंच’, ‘क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान’, ‘हिंदु युवा क्रांती मंच’, ‘मराठा विकास मंच’, ‘महाराष्ट्र सेना’, ‘फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच’ इत्यादी. यांपैकी बहुतेक संघटनांचे अस्तित्व केवळ कागदावरच आहे आणि त्यांचे बहुतेक पदाधिकारी ‘बामसेफ’, ‘मराठा महासंघ’ किंवा ‘मराठा सेवासंघ’ या संघटनांमधूनच घेण्यात आले आहेत; पण या चळवळीला अनेक संघटनांचा पाठिंबा आहे, असा आभास निर्माण करण्याकरता या संघटनांच्या नावांचा उपयोग केला जातो.
३ आ. ब्राह्मणांना वगळलेला हिंदु धर्म बनवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवधर्म ! : या विविध संघटनांच्या पाठिंब्याने ‘शिवधर्म’ नावाचा एक तथाकथित नवीन धर्म या कटाच्या सूत्रधारांनी स्थापन केला. या तथाकथित धर्माचा चेहरामोहरा निदान सध्यातरी हिंदु धर्माशी मिळताजुळता ठेवण्यात आला असल्याने किंबहुना ‘ब्राह्मणांना पूर्णपणे वगळून केला गेलेला हिंदु धर्म’, असे त्याचे स्वरूप असल्यामुळे बर्याच हिंदूंना या नवीन धर्माकडे आकृष्ट करणे सोपे जाईल, अशी या कटाच्या सूत्रधारांची समजूत आहे. हिंदु धर्मियाला मुसलमान किंवा खिश्चन हे धर्म जितके परके वाटतात, तितका हा तथाकथित ‘शिवधर्म’ परका वाटणार नाही. या नवीन धर्माचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून घेतले आहे, ही गोष्टही हिंदूंना त्या धर्माकडे आकृष्ट करण्यास उपयोगी पडू शकेल. हिंदु धर्मातून शिवधर्मात प्रवेश ही अर्थात धर्मांतराच्या प्रक्रियेतील पहिली पायरी असेल.
३ इ. शिवधर्मवाल्यांचा राजकीय चेहरा ‘शिवराज पार्टी’ ! : या कटाच्या सूत्रधारांनी ‘शिवराज पार्टी’ नावाचा एक नवीन राजकीय पक्षही स्थापन केला असून तो विधानसभेच्या पुढील निवडणुका लढवणार आहे. मराठा मतदार काही प्रमाणात या पक्षाला पाठिंबा देतील, अशी या कटाच्या सूत्रधारांची अपेक्षा आहे.
४. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांची प्रातिनिधिक उदाहरणे !
४ अ. वामन मेश्राम (नवबौद्ध), जेमिनी कडू (उघड किंवा छुपा खिश्चन) आणि रफीक कुरेशी : हे त्रिकूट या कटामागील संघटनांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. त्यांच्याशिवाय या कटाच्या सूत्रधारांपैकी काही प्रमुख व्यक्तींचे विवरण पुढे थोडक्यात दिले आहे.
४ आ. पुरुषोत्तम खेडेकर : सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता आहेत. बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते. सुमारे दोन वर्षापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आरक्षकांनी यांची चौकशी केली होती. यांच्या घरावर छापा टाकला होता आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर एकाएकी त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले आहेत, असे दिसते. त्यांना पुन्हा एकदा नोकरीत घेण्यात आले असून सध्या त्यांची नेमणूक पुण्यात आहे. त्यांची पत्नी सौ. रेखा खेडेकर भाजपच्या तिकिटावर चिखली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्या त्यांच्या पतीला त्यांच्या कामात साहाय्य करतात.
४ इ. मा.म. देशमुख आणि आ.ह. साळुंखे : या चळचवळीचे तत्त्वज्ञ. अनेक भडक अन् विद्रोही पुस्तिकांचे लेखक.
४ ई. ज्ञानेश महाराव : चित्रलेखा या मराठी साप्ताहिकाचे संपादक. भडक लेख लिहितात.
४ उ. श्रीमंत कोकाटे : मा.म. देशमुख, आ.ह. साळुंखे, पुरुषोत्तम खेडेकर यांचे हे चेले. अनेक भडक अन् विद्रोही पुस्तिकांचे लेखक.
(संदर्भ : अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने प्रकाशित केलेली समाज जागृती पुस्तिका)

वैद्य , छान आहे कविता! कारण द्वेष असण्यापेक्षा उद्विगन्ता जाणवते.

@इतर , क्रुपा करुन आता जातीवरुन धर्मद्वेषाकडे वळु नका.!

जातीद्वेष करणार्याना जसे महाराज कळले नाहित तसे धर्मद्वेष करणार्यानाहि कळले नाहित.

खुप कमी रयतेचे नेते होउन गेलेत. शिवाजी त्यातील होते. ना कोणत्या जातेचे वा धर्माचे! फक्त रयतेच्या कल्याण्याचे. हा माणुस हिंदु म्हणुन जन्माला आला तसा, मुसलमान, ख्रिश्नन वा अजुन कोणी म्हणुन जन्माला आला असता तरि त्याने जनतेचे राज्यच निर्माण केले असते.

असो. महारांजाना समजण्याएवढी प्रगल्भता आजतरि कोणात आहे असे वाटत नाहि

आलात का गणू...तरीच म्हणले एवढा वादग्रस्त विषय आणि तुमची उपस्थिती कशी नाही....
मंडळी सुरू होत आहे...बाकी लोक कसे मूर्ख, जात्यांध, धर्मांध...आणि मी कसा एकटा विचारवंत...हा एकपात्री प्रयोग...

एडमिन..मला असे वाटू लागले आहे की या बाफला टाळे लावण्याची वेळ आता आली आहे. गणू यांची मुक्ताफळे उधळून व्हायच्या आधी ती वेळ आली तर बरे....

रामदास स्वामी हे सर्मथ सत होते.
त्याच्या बद्दल वाइत लिहिताना लाज नाहि वात्तत.

उद्या मी बाबा आबेद्कराबद्दल लिहिल्यास. आनि मी ब्राम्ह्न नाहि पन महापुरुषाचा अपमान सहन करनार नाहि.
माझी लेखनि आनी इतर शस्रे उचल्ल्यास तुम्हाला रदायला जागा राहनार नाही.
मा बो कर मी या वेब वर नविन आहे .
मी व्य्क्तीगत बोललो असेल तर माफ करा.

शिवाजी महाराजानी देशातील लोकांच्या विकासासाठी एकही धोरणात्म काम केलेलं नाहिये. ते शुर विर होते व प्रबळ राजकिय ईच्छाशक्तिचे मुर्तिमंत उदाहरण होते. जबरदस्त लढवय्ये होते, पण त्यानी समाजहितासाठी एकही धोरणात्मक काम केलेलं नाहिये. >>>

Lol

तुम्हाला शिवाजी बद्दल इतकी माहिती आहे तर शिवकाठी हा प्रकार माहिती असेलच नाही का? ते समाजहित आणि धोरणात्मक नव्हते का? ते जाऊ दे शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक का केला ह्याचे कारण आपणास ज्ञात आहे का? ती एक दिर्ध खेळी होती, जी १८१८ पर्यंत चालली.

शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्था वाचलंत का? त्यातील दोन पत्रे लक्षपूर्वक वाचा. लेख मीच लिहिला आहे. शिवाजीच्या एका वेगळ्या पैलूला मांडण्यासाठी. आणि ती पत्रे खरी आहेत. भांडारकरमध्ये मिळतील, जर त्यातील काही उदाहरण, जसे नौका बांधने, करवसुली, लष्कराची बांधनी हे धोरणात्मक नसेल तर बाकी काहीच धोरणात्मक नसावे मग.) अजून अशी बरीच पत्रे देता येतील. बायदवे कृष्णाजी अनंत च्या बखरीला सगळेच इतिहासकार शुद्ध मानत नाहीत हे तुला माहिती असलेच असे गृहित धरू का?

मेरूस्वामी आणि दिनकर स्वामीची बखर पण प्रसिद्ध आहे. ती वाचली का? ती शिवाजीच्या समकालीन आहे. सभासदांसारखीच! कल्याण नावाचा गोसावी राज्याभिषेकास उपस्थित होता. त्याची पत्रे वाचली का? त्यावरून बराच अंदाज येऊ शकतो शिवाजी कसा राजा होता ते कळण्यासाठी.

असो विषय भरकटला आहेच, त्यात माझीही भर.

आजकी ताजी खबर,

पुणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी इतिहास तज्ञ श्री बलकवडे यांचा दावा निकाली काढावा असा अर्ज देताना जी कारणे दिली आहेत ती अशी.

१) दिवाणी न्यायालय हे अश्या प्रकारच्या दाव्यासांठी योग्य नाही.
( अयोध्या प्रकरणात हेच न्यायालय कसे काय चालते ? हायकोर्ट हा दर्जा सोडला तर दावा चालवण्याच्या पध्दतीत काय फरक असतो ? )

२) महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना दावा दाखल करताना नोटीस दिली गेली नाही.

३) श्री बलकवडे यांनी राज्यशासनाकडे का दाद मागितली नाही ?

माझ्या मते पुणे महानगरपालिका यांना जितकी घाई करता येईल तितकी घाई करून हा पुतळा हलवण्याचे श्रेय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पारड्यात घालायचे होते असे दिसते.

महानगर पालिकेने हा ठराव मंजुर करण्यापुर्वी राज्यशासनाचे मत विचारत घेतले होते तेव्हा श्री बलकवडे यांना तिसर्‍या पर्यायाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

काय बिघडले असते जर न्यायालयाने या विषयावर शिक्कामोर्तब केले असते तर ?

पण श्री बलकवडे यांच्यासारखा ( ब्राम्हण नसलेला ) इतिहासकार या विषयात रस दाखवतो तेव्हा सगळच मुसळ केरात जाणार या भितीने घाईघाईने हा निर्णय झाला असावा.

वरील तिनही मुद्दे एखाद्या खाजगी दाव्यात चालले असते पण जेव्हा दावा जनभावनेच्या संदर्भातला असतो तेव्हा हे तांत्रिक मुद्दे गौण असतात इतके भान ज्या स्थनिक स्वराज्य संस्थांना नाही ?

राजे | 3 January, 2011 - 02:05
रामदास स्वामी सुध्दा नको आहेत, >> कारण हा रामदास खोटारडा व शत्रुचा गुप्तहेर होता.

समर्थ रामदास हे खोटे व शत्रुचे गुप्तहेर असल्याचा पुरावा कोणत्या इतिहास तज्ञाने मान्य केलाय ?

ज्ञानेश्वर नको आहे.>> कारण हा भित्रा आत्महत्या करणारा एक कर्तुत्वशुन्य मुलगा. त्यानी आयुष्य एक ट्रान्स्लेशन सोडुन कवडीचं काम नाही केलं. मग याचा उगाच काय म्हणुन उदो उदो करायचा ?

संत तुकाराम महाराज या ब्राम्हण नसलेल्या संतांनी काय संत ज्ञानेश्वरांबाबत काय लिहल आहे ते वाचा.

" ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे.
मज पामरासी, काय थोर पण, पायीची वहाण पायी बरी
ब्रम्हाधीक जेथे तुम्हा वोळखणे, इतर कुळवे काय त्यांचे
तुका म्हणे येणे ( पुढेचे नेमके शब्द माहित नाहीत)
म्हणुनी ठेविली पाई डोई
ज्या जगदगुरु संत तुकारामांनी संत ज्ञानेश्वरांची या शब्दात महती गायली आहे ती पहावी.

राजे, आपण संत तुकारामांपेक्षा श्रेष्ठ आहात काय ?

बाबासाहेब पुरंदरे >> हा माणुस खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहे हे नविन इतिहासाच्या स्विकृतीने सिद्ध होते. आता अशा लोकाना का म्हणुन स्विकारावे.

ज्या बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्य फक्त छ. शिवाजीराजे यांचे चरित्र सांगाण्यात खर्च केल. जन्माने ब्राम्हण असुन पेशव्यांच्या इतिहासाकडे ढुंकुनही पाहिल नाही अश्या माणसाच्या हातुन समजा एखादी चुक झाली असेल तर हा बहुसंख्य समाज हेच फळ त्यांना म्हातारपणी देणार काय ?

वरिल सगळ्याना बाद ठरविण्याची कारण ब्राह्मण नसुन त्यांचा करंटेपणा आहे. आता ते जातिने ब्राह्मण आहेत हा केवळ योगायोग आहे.

राजे, आपण ब्राम्हण नाही हा सुध्दा योगायोगच आहे. एकाद्या ब्राम्हणाने तुमचे घोडे मारले असेल. श्रीमंत कोकाटे यांचा हत्ती मारला असेल म्हणुन काय आपण संपुर्ण ब्राम्हण समाजाविरुध्द लिहावे ?

२०१० सालामधे कोईमतुर ला तामिळ भाषातज्ञ, कवि, लेखक यांचे अधिवेशन झाले. यात काही युरोपियन तामिळ तज्ञ होते ज्यांनी तामिळ भाषेवर संशोधन करुन डॉक्टरेट मिळविली. इतका कडवट पणा आहे म्हणुन त्यांनी रजनिकांत या नटाला अद्याप निवडणुकीचे तिकिट मिळवु दिलेले नाही कारण तो मुळचा तमिळ नाही मराठी आहे.

मायबोलीचा उगंम मराठीच्या पुरस्काराकरता आहे. ज्या ज्ञानेश्वरीला आद्य मराठी ग्रंथ म्हणुन मान्यता आहे त्याचे वर्णन भाषांतर म्हणुन करावे ?

मायबोलीच्या प्रशासकांनी सुध्दा हे खपवुन घ्यावे याचे वैषम्य वाटते,

>>खरे आहे. याआधी दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते का आणखी काही होते हे हा वाद उफाळेपर्यंत मला माहितही नव्हते. तशी गरजही भासली नव्हती.

मलाही नव्हतं माहित. तरीही ते आदरस्थानी होतेच की.

राजे तोंड लपवुन बसु नका उत्तरे द्या पण तोंड सांभाळुन बोला, तटस्थ राहु नका, कळु द्या तुमचे अगाध ज्ञान

ज्या ज्ञानेश्वरीला आद्य मराठी ग्रंथ म्हणुन मान्यता आहे त्याचे वर्णन भाषांतर म्हणुन करावे ?
----नितीन आणि इतिहास प्रेमी - लाखो कोटी लोकांचे ज्ञानेश्वर, रामदास, तसेच पुरंदरे हि श्रद्धास्थाने आहेत एव्हढे कारण पुरेसे आहे त्यांना ठोकायला. पुढे कोट्यावधींचे श्रद्धास्थान असलेले शिवाजी महाराज पण सुटलेले नाहीत, सुटणार नाहीत.

यांचे उद्दिष्ट फक्त असलेली श्रद्धास्थाने कुचलणे, पायदळी तुडवणे. ह्या प्रवृत्तींचे वैर ज्ञानेश्वर वा रामदासांशी नाहीच आहे. ज्ञानेश्वर, रामदास यांचा अपराध एव्हढाच आहे त्यांना कोट्यावधींनी त्यांच्या श्रद्धा वाहिल्यात. आता तुम्ही श्री. बकवास (नाव महत्वाचे नाही- फक्त लोकांच्या श्रद्धा जडलेल्या असणारा हवा) यांच्या प्रती श्रद्धा वाहिल्यात तर त्यांना पण गुन्हेगारांच्या पिंजर्‍यात अडकवले जाईल.

ह्या प्रवृत्तींचे वेगवेगळ्या खांद्यांचा वापर करुन समाजात फुट पाडणे हेच एकमेव उद्दिष्ट... बाहेरचे आवरण (पांघरुण) मग काहीही असेल. प्रथमदर्शनी ब्रिगेडही वाटेल...

मूळात "राजे" ही आयडी घेतलीये ती देखिल तुम्हा लोकान्च्या तोन्डून प्रतिवाद करताना झाली तर बदनामी, "राजे" म्हणल्यावर ज्यान्चे चित्र नजरेसमोर तरळते त्यान्चीच व्हावी ही अपेक्षा अस्ताना, हे अस्ले परधार्जिणे राजे काय उत्तर देणार?
हल्ली तर काय फ्याशन निघालिये की टूव्हीलरच्या "मडगार्डवर" देखिल "राजे" लिहीलेले अस्ते, अगदी जे काढताना ज च्या वर तलवार वगैरे दाखवत! आता मला सान्गा, ही जळ्ळी प्रजा, कुठल्याही रस्त्याने, हगामुतातुन गटारीच्या पाण्यातुन जाणार, त्याचे घाण शिन्तोडे त्या "राजे" लिहिलेल्यावर उड्णार, त्यातुन कुणाची बिभत्स निर्भत्सना होणार? काय पावित्र्य रहाणार "राजे" या शब्दामागिल "मराठी" आदराचे?
साला कुणीही सोम्यागोम्या उठतोय अन वापरतोय "राजे" ही पदवी वहानान्च्या "पार्श्वभागावर"! भले नसे ना का विश्वास राजेशाहि वा लोकशाहीवर!
राजान्च्या चेहर्‍याचे "अर्धप्रकाशित" स्टीकरही असेच "मडगार्डवर" लावलेले अस्ते! यावर काय बोलावे?
तर सान्गायचा मुद्दा हाच की हे अशाप्रकारचे काहीही कसेही कुठेही वापरणे ही देखिल एकप्रकारची हिन्दूधर्मियान्ची उघड उघड निन्दानालस्तीच आहे!

>>>>>> म्हणजे दादोजींना हलवण्यामागे शिवाजी वा जिजामाते बद्दल प्रेम वा आदर नाहीच आहे... ते तर वर वर दाखवण्याचे नाटक आहे असे समजायचे कां? <<<
उदय, हो, देअर यू आर, बरोब्बर नि:ष्कर्ष काढलात !
अन ज्यावेळेस हे सत्य इये महाराष्ट्रदेशीचे क्षत्रिय व बहुजन समाजांस कळोन येईल, तेव्हा या फुटीरान्ना पळताभूई थोडी होईल यात शन्काच नाही!

बाबासाहेब म्ह्नतात मला हिन्दु धर्माचा विव्द्न्स करायचाय.
याला देशप्रेम म्हनायचे का ?
जर दुसर्या धर्मा बद्दल बोलले असते तर .............. हे वाक्य कानावरही आले नस्ते तिथेच सर्व सम्पले अस्ते.
असो याचा या थिकानि सन्बध नाहि पन सुरुवात हिच आहे.

मी म्ह्तले मुसलमानाला आतेरेकि प्रशिक्शन मिलत आहे .ते बन्द करा तर मी राष्त्र द्रोहि होतो.
मझ्या कदे सन्दभ्र आहेत.
(आम्हि बोध्द का झालो , पद्म्पानि प्रकाशन)

कविता वाचून भरून आले!

>>खरे आहे. याआधी दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते का आणखी काही होते हे हा वाद उफाळेपर्यंत मला माहितही नव्हते. तशी गरजही भासली नव्हती.

मलाही नव्हतं माहित. तरीही ते आदरस्थानी होतेच की.- अनुमोदन.

ज्या ज्ञानेश्वरीला आद्य मराठी ग्रंथ म्हणुन मान्यता आहे त्याचे वर्णन भाषांतर म्हणुन करावे ?>> अहो, नामदेव रचिला पाया, तुका झाला कळस. हे सत्य असुन सुद्धा तिथे नामदेवाला डावलुन ज्ञानदेवाला घुसडवलं. याला काय म्हणाव. नामदेव हे ज्ञानेश्वरांपेक्शा कितीतरि पटिने थोर असुन सुद्धा त्यांच्या पेक्षा वयाने लहा अशा ज्ञानेश्वराना उगीच प्रमोट करण्यात आलं.

जर दुसर्या धर्मा बद्दल बोलले असते तर .............. हे वाक्य कानावरही आले नस्ते तिथेच सर्व सम्पले अस्ते.>> ए हिंदु, बाबासाहेबानी मुस्लीम कसे देश द्रोही कारवाया करणारे आहेत याचा एक निवेदन सायमन कमिशनला दिलं होतं. ते भारतातिल पहिले असे महापुरुष होते ज्यानी साजमन कमिशनला सबमिट केलेल्या निवेदाना सिंध प्रांत मुस्लिमाना देऊ नका. मुस्लिम हे देशच्या हिताच्या विरुद्धा कारवाई करणारी जात जाहे असे स्पष्ट नमुद केले होते. या निवेदना नंतर कमिशननी सिंध प्रांत किंवा वायव्य प्रांतातिल मुस्लिमांची वेगळी संसदिय मागणी फेटाळ्ली.

उभ्या भारतात बाबासाहेब एकमेव असे व्यक्तिमत्व आहे, ज्यानी मुस्लिमांवर देशद्रोहाच्या वाटेनी जाणारा समाज म्हणुन टिका केली.

याचा परिणाम असा झाला की गोलमेज मधे मुस्लिम नेते बाबासाहेबांच्या विरुद्ध उभे ठाकले.

कविता चांगली पण बाकीचे प्रतिसाद म्हणजे एरंडाचे गुर्‍हाळ!!

विजयराव, असेल हो हे एरण्डाचे गुर्‍हाळ.... आयुर्वेदात एरण्डेल तेल (वैचारिक ? ) अतिसारावर औषध म्हणूनही वापरतात! Wink
पण इथे (कदाचित तुम्हाला हवी तशी) पहिल्या धारेची मिळणे अशक्य Proud तेव्हा सोडून द्या ना राव... काहून पिन्गा घालुन राहिले इथे? Biggrin

तुमचे सर्व नविन संशोधन केलेले खरे माना असा तुमचा आग्रह आणी जेम्स लेनला विरोध.

हा दुटप्पी पणा सोडा, स्वतःला तटस्थ समजता, तटस्थपणेच विचार मांडा.

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचा एकेरी उल्लेख तुमच्या सारख्या माणसाकडुनच होऊ शकतो.

लिंबूटिंबूराव काय हो तुमचे खरे नाव?

काहून पिन्गा घालुन राहिले इथे? >>> का? तुमचा मालकी हक्क प्रस्थापित झालाय का ह्या धाग्यावर किंवा मग माबोवर?

पहिल्या धारेची मिळणे अशक्य>>> खरी धार दाखवायला हवी का?

Pages