दादोजी भेटले उद्यानात ..

Submitted by vaiddya on 30 December, 2010 - 11:29

(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)

पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
“दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?

अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !

अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
तुम्हाला होती एक
ब्राह्मण जात
ती तेव्हा आम्हाला कळली ...

आमच्यासाठी तुम्ही
शूर मर्द मराठी मावळा !
महाराजांच्या स्वराज्यातला
नव्हेत डोमकावळा !

तुमचा वेष लढवय्याचा,
ढाल-तलवारीचा ..
बाजीप्रभूंसारखी
तुमची शेंडी नव्हती दिसत,
किंवा त्यात नव्हते जानवे
गागाभट्टाच्या चित्रासारखे,
पुढेपुढे मिरवत !

आमची होती बडबड गाणी
खोट्या घोड्यांवरची ..
शहाजीचा शिवाजी,
शिवाजीचा संभाजी ...

मधेच अचानक
या सगळ्यात
कुठून उपटलात दादोजी ?”
सुस्कार्‍याने हसत हलके
दादोजी मग म्हणाले ..
“आम्ही कुठले मधे यायला ?
आम्ही आमचे काम केले.
आमचे आमचे जीवन होते
कर्तव्याने निभावून नेले ..

आमच्यानंतर कोणी कोणी
कुठे कुठे काय लिहिले
कुठे कोणी काय भकले,
मार्ग काय कळायला ?

आम्ही कोणीच ओलांडली
नव्हती आमची रेखा !
नव्हत्या आम्हाला अडवत
आमच्या जानव्याच्याही रेघा !

शेंडीपेक्षा आमचा जोर
मनगटातच जास्त होता
खांदा आमचा कोणाच्याही
खांद्यापासून हटत नव्हता ..

अरे, जातीपाती पाहून शत्रू
आम्हाला मते थोडीच देणार होता ?

दादोजीला माहित नाही
पुढे कोण काय म्हणते,
इतकेच होते मह्त्वाचे
महाराज समोर घडत होते
डोळ्यांमधे माऊलीच्या
स्वराज्याचे स्वप्न होते !”

मी म्हटले,“दादोजी,
आता इथेच का मुक्काम ?
कसा आणि किती दिवस ..?”

तर मधेच अडवत दादोजी
पाठ फिरवून चालू लागले,
पुतळा म्हणून ते थिजता-थिजता
शब्द माझ्या कानी आले,

“रामराज्याचा आदर्श बेटा,
ध्यानात कायम असू दे,
धोब्यासाठी राणीसुद्धा
रानावनात हिंडते,

आम्ही साधे नोकरदार
आमची काय कथा ?
नको पुरवू पाठपुरावा
वेळ घालवू वृथा !

आमच्यासाठी नको
करायला कोणीच मिरासदारी !
नको कुठलीच दादागिरी ..

अरे, बिन-संकल्पी भंपक राजे
खूप माजले राज्यात,
अश्या महालात
राहणे नको
उद्यानाची सावली बरी !

लोकापवादाच्या
नजरांपेक्षा
दुपारीची
उन्हे बरी,
डोमकावळ्यांच्या
थुंकीपेक्षा
चिमण्या-कावळ्यांची
विष्टा बरी !”

प्रदीप वैद्य

गुलमोहर: 

उदय, बेफिकीर,

इथल्या बकवास पोस्टींना प्रतिक्रिया का देताय? त्या आय्डीने इतरही एक दोन लिखाणांवर घाण करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याच्या पोस्टींना माबोकरांनी अनुल्लेखाने मारलं होतं. तेच तुम्हीही का नाही करत? एवढा कोण तो मोठा लागून गेला?

अश्विनी,

मान्य! (म्हणजे रिस्पॉन्स देण्याची आवश्यकता नाही हे मान्य)!

त्या आयडीने आधी काय लिहीले होते हे माहीत नाही व त्यामुळे मी त्याबाबत मतप्रदर्शन करू शकत नाही.

आपल्यासाठी म्हणून लिहीतो - ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास ही श्रद्धास्थाने आहेत. मला व्यक्तीशः या थोर संतांबाबत काही खास श्रद्धा नसली तरीही इतके समजते की लक्षावधी लोकांसाठी ही नावे फार महत्वाची आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वर व रामदास यांच्याबाबत एकदम इतके वेगळे लिहीले गेलेले पाहून मी काहीसा अवाक झालो. मात्र त्या आधीचे माझे सर्व पोस्ट्स विषयाला धरूनच होते असे मला वाटते. आता मात्र मी थांबले पाहिजे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

तेथे गुंतगुंतीचे राजकीय गणिते महत्वाची असतांत.>> नाही हो. इतिहासात बदल करण्याची धमक खुर्चित नसते. ती संशोधनासारख्या दिर्गोद्योगानी करता येते.
-------------------------
रामदास शत्रूला मिळालेले गुप्तहेर होते याबाबतही काही ठोस लिखाण असल्यास कृपया नोंदवावेत. >>

बेफिकीर,
प्रतिइतिहास नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात रामदासांचे संदर्भ आहेत.

सभासदांची बखर भांडारकर प्राच्यविद्या भवनात होती. आत्ताही असावी.

संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, साळुंके, खेडेकर इ. निर्माण केलेली ब्राह्मणद्वेषाची कीड कशी पसरत आहे, याचे "राजे" हे उत्तम उदाहरण आहे. इतिहासातील थोर ब्राह्मणांची यथेच्छ बदनामी करणे, त्यांच्याविरूध्द खोटे आरोप करणे, त्यांच्याबद्दल गैरसमज व अफवा पसरवून समाजात विष कालविणे इ. उद्योगांना आता फळे येऊ लागली आहेत.

जर रामदास स्वामी आदिलशहाचे गुप्तहेर होते तर गेल्या ३०० हून अधिक वर्षांत इतर कोणालाही (अगदी शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना सुध्दा) का समजले नाही, ते जर गुप्तहेर होते तर त्यांनी शिवरायांच्या स्तुतीपर अनेक ओव्या का लिहिल्या आहेत, त्यांच्यासारख्या सर्वसंगपरित्याग केलेल्या संताला गुप्तहेर बनून काय मिळवायचे होते याविषयी हे खोटे आरोप करणारे अजिबात बोलत नाहीत. अखंड सावध असणार्‍या शिवरायांना ते गुप्तहेर असल्याचे शेवटपर्यंत समजले नाही हे एक गूढच आहे. रामदास स्वामींचे बराच काळ वास्तव्य चाफळला म्हणजे स्वराज्यातच होते. १६७६ ते १६८२ मध्ये निर्वाण होईपर्यंत शिवाजी महाराजांनी त्यांना सज्जनगडावर वास्तव्य करण्यास सांगितले होते. आदिलशहाच्या गुप्तहेराला शिवाजी महाराज व नंतर संभाजी महाराज कोणतीही शिक्षा न करता स्वराज्यात वास्तव्य कसे करून देतील? मुळात त्यांना हेरगिरी करून काय मिळवायचे होते? सत्ता, संपती की एखादी स्त्री? त्यांच्यासारख्या सर्वसंगपरित्याग केलेल्या संतावर असे शिंतोडे उडविणे हे नालायकपणाचे लक्षण आहे.

संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, साळुंके, खेडेकर इ. निर्माण केलेली ब्राह्मणद्वेषाची कीड कशी पसरत आहे, याचे "राजे" हे उत्तम उदाहरण आहे.

१००% अनुमोदन

मास्तुरे,
तुमच्या मताचा आदर आहे, पण समकालीन बखरी व पेशवे कालिन लिखित बखरी. या दोन दस्तावैजामधे जी काही तफावत आहे त्यावरुन हेच सिद्ध होते.

तुम्ही पेशवे कालिन बखरी वाचता जे महाराजांनंतर शे दिडशे वर्षानी लिहले गेलेत.

समकालिन लिखान वाचल्यास तुमचा हा गैरसमज दुर होऊ शकतो.

संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, साळुंके, खेडेकर इ. निर्माण केलेली ब्राह्मणद्वेषाची कीड कशी पसरत आहे, याचे "राजे" हे उत्तम उदाहरण आहे.>> नाही. नक्कीच नाही.

कालच मी प्रविणदादा गायकवाड याना संभाजी ब्रिगेड कशी डबल स्टंडर्ड वागते या विषयी प्रश्न विचारुन भंडावुन सोडले. ते निरुत्तर झालेत. नंतर केंव्हातरी उत्तर देऊया असं बोलुन वेळ मारुन नेली.

मी एक सच्चा वाचक आहे. कुणाचा फॉलोअर नाही. मला तटस्थ राहुन बघण्याची सवय आहे.

मी एक सच्चा वाचक आहे. कुणाचा फॉलोअर नाही. मला तटस्थ राहुन बघण्याची सवय आहे.
तटस्थ राहुन फक्त समाधीला आत्महत्या, समर्थांना गुप्तहेर, पुरंदरे ढोंगी हेच बरे दिसले
यावरुन आपण तटस्थ तर वाटत नाही, जातियवादी, दुटप्पी, वाटतात.

कविता, छान आहे. Happy

प्रतिसादात झाडलेल्या पवन फैरी पाहून वाटतयं कि पुतळ्यांची सभा भरते आहे. तेव्हा त्यांचीच एखादी समिती स्थापन करून पुन्हा एकदा या विषयावर निर्णय दिला जावा.

यावरुन आपण तटस्थ तर वाटत नाही, जातियवादी, दुटप्पी, वाटतात.>> मला शिवाजी महाराजांबद्द्ल पण बरच काही असच वाटत.

शिवाजी महाराजानी देशातील लोकांच्या विकासासाठी एकही धोरणात्म काम केलेलं नाहिये. ते शुर विर होते व प्रबळ राजकिय ईच्छाशक्तिचे मुर्तिमंत उदाहरण होते. जबरदस्त लढवय्ये होते, पण त्यानी समाजहितासाठी एकही धोरणात्मक काम केलेलं नाहिये. याही पुढे जाऊन बालायचे म्ह्टल्यास पेशव्यानी शिवाजींचे राज्य बुडविले असं म्ह्टल्या जातं जे मला मान्य नाहि. त्यांची धोरणात्मक कुवत जिथे कमी पडत होती तीचा परिणाम म्हणुन पुढे हे सगळं घडलं.

शिवाजी महाराजांचे कित्येक निर्णय जाजाऊने फिरविले, याचा इतिहास व प्रतिइतिहास दोन्हिकडे उल्लेख आहे.

या निर्णय फिरविण्यावर खालिल गोश्ट सिद्ध होते.

१) महाराजांचे निर्णय चुकिचे होते म्हणुन जिजाऊने ते फिरविले.
२) किंवा जिजाऊ कि ख-या सुत्रधार होत्या. (राज्यांच्या निर्णय नामधारी असे)

वरिल मुद्दा १ ला खरे मानले तर महाराजा निर्णय्क्षमतेवर बोट उठते.
जर मुदा २ ला खरे मानले तर जो आईच्या म्हणन्यानी चालतो तो खरा राजा नाहिच.

म्हणजे निर्णय फिरविण्याची घटणेवरुन महाराज सरळ दोषिच्या पिंज-यात जातात.

नादखुळा,
मुद्दा पुतळ्याचाच नाही आहे, ब्राम्हणद्वेश यांच्या प्रत्येक कृतीतुन दिसतो आहे. जाऊ द्या म्हणुन सोडले तर हे सोकावतात. याला विरोध झाला पाहिजे. आज हे संताना सुध्दा काहिही म्हणतात.

राजेश्वर, इथे बोलून काय होणार आहे का? Uhoh आणि चर्चा करून तुम्ही संघटन करणार असाल तर मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. पण त्या संघटनाची बोलती चलती असावी. कारण इथे बोलणारे अन तिथे बोलणारे खुप कमी दिसतात. कायदा, सुव्यवस्था अन राजकारण या सगळ्यांमधे जात भरडली नाही .. भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस. त्याची बाजू घेऊन किती ठार करायचे आहे ते करा. शहीद म्हणून तर मिरवता येईल.

.. भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस.
मान्य आहे, तुमचेच नाही सर्व ब्राम्हण समाजाचे असेच विचार आहे पण असा विचार ते पळपुटेपणा समजतात आणी ब्राम्हणद्वेशाची गरळ ओकतात प्रतिकार झालाच पाहिजे मग तो लेखणीद्वारे असो की अजुन कोणत्या प्रकारे.

<<म्हणजे निर्णय फिरविण्याची घटणेवरुन महाराज सरळ दोषिच्या पिंज-यात जातात. Lol
कठीण आहे सगळंच. समर्थ, ज्ञानेश्वर, बाबासाहेब पुरंदरे आणि आता खुद्द शिवाजीराजे......:रागः

@ राजे .... आता सुसाट सुटले आहेत...

<< शिवाजी महाराजानी देशातील लोकांच्या विकासासाठी एकही धोरणात्म काम केलेलं नाहिये >>

कॄपया जर आपण काहि उदाहरणं दिल्यास आपली योग्यता तपासण्यास मदत होइल..

बापरे .. बरीच चर्चा होते आहे इथे ... मला चर्चा होईल हे वाटलं होतं पण इतकी होईल असं वाटलं नव्हतं .. मला वाटतं .. आपण स्वतः इतिहास लिहिणं, तो शोधणं आणि त्याची सत्यासत्यता पाहण्याचं काम करत नसलो की आपली फक्त एक अनिवार कुतरओढ होत राहाते हा माझा कवितेमागचा मुद्दा आहे .. (अर्थात तो सर्वांनाच नीट दिसला आणि पटला आहे ..) इथे प्रश्न एखादी व्यक्ती ब्राह्मण असण्या-नसण्याचा नसून .. एखाद्या व्यक्तीला अमूक माना असं वर्षानुवर्षं शिकवल्यावर / शिकवल्यावर अचानक तीच व्यक्ती एखादा व्हिलन असल्याप्रमाणे एखादं आंदोलन त्या व्यक्तीच्या मागे लागते आणि हे सगळं आपण सत्य काय ते पडताळून घेऊ शकत नसल्याने आणखीनच बिकट होऊन बसतं .. एखादा मुद्दा पटवताना संशोधनातला पुरवा समोर आणला की तेव्हढं पुरेसं असतं .. पण कोर्टात बाजू मांडताना दावेदाराप्रमाणे समोरच्या माणसाला एकदम काळेच करून टाकावे हा आततायीपणा ''संशोधनात्मक किंवा शास्त्रीय अभ्यासाच्या'' चौकटीत न बसणारा वाटतो.

आपल्या संपूर्ण इतिहासालाच ''भाटसंस्कृतीचा'' शाप आहे हे मी वेगळं सांगायला नको. समकालीन म्हणून काही पुरावे पाहावे तर ते ही दिशभूल करणारे किंवा प्रेमांध नसण्याची काहीच खात्री नाही ... रामायण, महाभारत या ज्या प्रमाणात भाकडकथांच्या पातळीवर आपण नेऊन ठेवल्या त्याच प्रमाणात सर्व इतिहासाचं आपण करत आलो आहोत.

कवितेमधे बोलताना मला ही सगळी फरफट जाणवत आहेच .. पण .. मी कोणाचंच प्रातिनिधित्व करण्यासाठी कविता लिहिलेली आही हे ही तित्कंच खरं आहे .. ब्राह्मणांनी ज्ञानाची दारं वेळीच खुली केली असती तर इतिहास शोधण्याची जबाबदारी किंवा कामगिरी किंवा जोखीम इतर सर्व सामाजिक घटकांची झाली असती. आणि आत्ता ते सर्व जितक्या विखाराने माखलं जात आहे ते ही तसं झालं नसतं .. ब्राह्मण इतिहासकारानी इतिहास शोधण्याच्या कोणत्या पद्धती अवलंबल्या हे मला कोणतीही शंका घेण्या इतपत ठोस माहित नाही .. पण त्या पाश्चात्य पद्धतींशी मिळत्या-जुळत्या असतील असं वाटतं .. पण बरीचशी खरी दप्तरं (उदा. महाराजांच्या आयुष्यातील १९ वर्षांचा काळ सांगू शकतील अशी कागद्पत्र) तेव्हाच्या शत्रूंनी जाळून टाकली असं आपल्याला माहित आहेच की ..

असो .. भरकटण्यापूर्वी सर्व माबोकरांना निवेदन .. आपण इतिहासावर पुन्हा भांडत बसण्यापेक्षा एक धडा घेऊ या का ? माझ्या मते इतिहास हा नेहेमी रंगीतच असतो .. ज्याने लिहिला त्याचा रंग त्यात उतरणारच .. हे एक तत्व इतिहासाची पुस्तकं आपल्याला अजून काही पुस्तकंही बदलायला लावेलही कदाचित .. हाती पुरावे नाहीत अश्या स्थितीत, सगळंच धूसर असताना, त्या किंवा आपल्या आधीच्या दरम्यानच्या कोणत्याही काळी कोणीही घेतलेल्या कुठल्याही रंगाना आपणही नकळत आपल्या रंगाने आणखी ठाशीव न करण्याची जबाबदारी आपल्या सगळयांवरच आहे .. नाहीतर काही वर्षांनी जुनीच पुस्तकं बरोबर होती, तो पुतळा तिथेच हवा होता असे
काही शोध पुन्हा लागतील ..

प्रश्न त्या सामान्यांचा आहे जे यावर खूप वेळ आणि ऊर्जा खर्च करताहेत आणि ज्याच्या जिवावर अनेक स्वार्थी लोक आपली 'पोलि'टिकंल एव्हढंच या सगळ्यातून पाहाताहेत ..

तात्पर्य : श्रद्धा नि श्रद्धास्थानं बदलत जाण्याच्या एका संक्रमणावस्थेतल्या आपल्या समाजात अश्या अनेक कविता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बाजूंनी लिहिल्या जाण्याची शक्यता आहे ...

सर्वांना धन्यवाद .. चर्चेबद्दल आणि (सोबतच्या) कौतुकाबद्दल Happy

राजे... तुमचे ह्या पोस्टवरील सर्व प्रतिक्रिया वाचल्या... Happy विशेष आश्चर्य नाही वाटला कारण ते नेहमीचेच आपले.. फक्त शेवटची प्रतिक्रिया वाचून जरा विचारात पडलो.

एक विचारू का? आपण काय करता? काय वाचता? थोडक्यात सांगा प्लीज. सभासद बखर, आज्ञापत्रे वाचली आहेत ना? की नाही अजून? नसेल तर कृपया वाचा... अडचण असेल तर निसंकोचपणे इथे विचारा... मदत करायला अनेक जण हजर आहेत..

आपण म्हणताय...
"शिवाजी महाराजानी देशातील लोकांच्या विकासासाठी एकही धोरणात्म काम केलेलं नाहिये. ते शुर विर होते व प्रबळ राजकिय ईच्छाशक्तिचे मुर्तिमंत उदाहरण होते. जबरदस्त लढवय्ये होते, पण त्यानी समाजहितासाठी एकही धोरणात्मक काम केलेलं नाहिये."

मला मोठी गम्मतच वाटली... Lol तुम्ही इथे बसून आज निवांतपणे पोस्टा करत बडबड करताय ना हे त्याच 'शिवाजी'चे धोरणात्मक काम आहे... हे लक्ष्यात येतंय का? असो ... काळजी घ्या... Wink

काय हो "राजे", तुम्हाला आणि तुमच्या संभाजी ब्रिगेडला, दादोजींचा उल्लेख शिवरायांचे गुरू असा केलेला इतका झोंबला की तुम्ही त्यांचे चारित्र्यहनन करून, इतिहासाची मोडतोड करून आणि त्यांचे पुतळे हटवून त्यांना इतिहासातून पार हद्दपार करायला निघालात. दादोजी कदाचित नसतील शिवरायांचे गुरू, पण निदान ते त्यांचे शत्रू तर नव्हते ना? त्यांनी कधी शिवरायांना जिवानिशी मारण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? ते शेवटपर्यंत शिवरायांशी एकनिष्ठच राहिले ना?

पण जे शिवरायांचे शत्रू होते, ज्यांनी शिवरायांना जिवानीशी मारण्याचा विडा उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व संभाजी महाराजांना हालहाल करून जिवानिशी मारले त्या औरंगजेब,अफझलखान व सय्यद बंडाच्या कबरीची सरकारी बडदास्त ठेवली जाणे, "खडकी" (हे पुण्यातले खडकी नव्हे) असे नाव असलेल्या शहराला औरंगजेबाच्या सन्मानार्थ औरंगाबाद असे नाव दिले जाणे, दिल्लीमधल्या एका रस्त्याला औरंगजेब रोड असे नाव दिले जाणे, अफझलखान वधाचा धडा पुस्तकातून गाळून टाकणे . . . याबद्दल आपण, अनिल सोनवणी अथवा आपल्या संभाजी ब्रिगेडने कधी आवाज उठविला आहे का? का दादोजींचा प्रमाद (शिवरायांना शिक्षण देणे) हा महाराजांच्या शत्रूंच्या कृत्यांपेक्षाही भीषण होता?

दादोजींचे नाव शिवरायांबरोबर जोडले जाण्याचा तुम्हाला इतका अपमान वाटतो, पण शिवरायांच्या जीवावर उठलेल्यांचा गौरव होत असल्याबद्दल आपल्याला काहिही वाटत नाही? हाच का आपला तटस्थ दृष्टिकोन ! ! !

मास्तुरे, तुमच्या प्रश्नांचे हे कधीही उत्तर देणार नाही दिलीच तर, "आमचा अभ्यास चालु आहे" असे देतील
त्यांचा ब्राम्हणद्वेश हाच मुद्दा असतांना ते कशाला उत्तर देतील.

राजे : शिवाजी महाराजानी देशातील लोकांच्या विकासासाठी एकही धोरणात्म काम केलेलं नाहिये. ते शुर विर होते व प्रबळ राजकिय ईच्छाशक्तिचे मुर्तिमंत उदाहरण होते. जबरदस्त लढवय्ये होते, पण त्यानी समाजहितासाठी एकही धोरणात्मक काम केलेलं नाहिये.

पुरावा १.
प्रभानवलीचा सुभेदार रामजी अनंत यास राजांनी पाठवलेले पत्र अतिशय वेधक आहे. ५ सप्टेंबर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रात राजे म्हणतात,'येक भाजीच्या देठासहि मन नको' शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे.

जमले तर वाचून घ्या.. शिवकालीन पत्रसार संग्रह आता ३ खंडात उपलब्ध आहे ...

मला सवय नाही पण आता थोडे सरळच बोलतो... अशी अनेक पत्रे तुझ्या तोंडावर फेकू शकतो लक्ष्यात ठेव... आधी किमान अभ्यास करून ये आणि मग इथे तोंड उचकट. खबरदार आमच्या श्रद्धास्थानांना काही उलट सुलट बोललात तर...

हे घे अजून एक.. हे ऐकले सुद्धा नसशील...

पुरावा २

सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर विवेचन करणारे पत्र राजांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना धाडले. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते.

आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार हे निश्चित.

मास्तुरे, भटक्या, अरे यामागिल मुख्य सुत्र लक्षात घ्या, अन या वेड्या पीरान्ना उत्तर तरी द्यायचे की नाही ते ठरवा
हिन्दू धर्माला हतोत्साहित करुन नाऊमेद करत करत व आपापसात झङडायला लावून नामशेष करण्यामागिल षडयन्त्राचा हा एक भाग आहे की आधी तुमच्या श्रद्धास्थानान्ना धक्का पोहोचवा (जसे अफजलखानाने तुळजापूरला केले - हल्ली ते उघड शक्य नाही म्हणून) त्यातिल महत्वाचा भाग म्हणजे, देवब्राह्मणान्पैकी ब्राह्मणान्विरुद्ध रान उठवुन "ब्राह्मण्द्वेष्टेपणा" जाग्रुत करा. म्हणजे आपोआपच ब्राह्मण/ब्राह्म्हणेतर जुगलबन्द्या रन्गतील. (हेच नेमके घडू नये म्हणून ब्राह्मणान्नी संयम बाळगुन, आपला कोण परका कोण याचे भान "एकगठ्ठा कोणच्या जातीन्वरुन" न ठरविता, व्यक्तिसापेक्ष ठरवावे, अगदी तपासणीतून ब्राह्मणांस देखिल वगळू नये कारण जाती-धर्मभ्रष्ट ब्राह्मण देखिल सन्ख्येने कमी नाहीयेत, अस्तनीतले निखारे नीटपणे ओळखावेत)
तुमच्या देवदेवतान्ना काल्पनिक ठरवा किन्वा अन्य आदिवासी/वनवासीन्चेच देव कसे वोरिजनल ते उगाळा, फायदे दोन होतात, तुमची श्रद्धा तरी उडते किन्वा तुमच्यातच आपापसात जुम्पते. बर पुन्हा यान्ना कसल्याच देवाधर्माचे सोयरसुतक नस्ते कारण हे "हिन्दू" धर्म मानतच नाहीत.
हे करताना, तत्कालिकरित्या शिवाजीचे वा सम्भाजीचे प्रेम उतू आणा (म्हणजे क्षत्रिय समाज चवताळतो) किन्वा मग फुलेआम्बेडकरादिकान्ना वापरुन घ्या (म्हणजे बहुजन पिसाळतो)! कुणाविरुद्ध पिसाळवायचा, तर सगळ्यात अल्पसन्ख्य सन्ख्यात्मक कमजोर असा ब्राह्मणवर्ग! म्हणजे हिन्दू धर्मिय हिन्दू म्हणून जातीपातीनिशी गुण्यागोविदाने एकत्र न नान्दता गैरसमजातून एकमेकान्ची डोकी कशी फोडतील ते ते वीष पसरविण्याचे हे कारस्थान!
त्या दुसरीकडे बघना, सावित्रीबाईन्चे नाव घेऊन, तुमचे देव्-देवता काल्पनीक, व इथुन पुढे केवळ अमक्या तमक्या फोटोचीच पुजा बान्धा हा अप्रत्यक्ष सन्देश, व यावर युक्तिवाद करु पहाल तर बघा फुलेआम्बेडकरान्ना विरोध करताहेत असा कान्गावा.... साले धरले तर चावते सोडले तर पळते अशि तुमची परिस्थिती होते.
अन जमल्यास "मान्ढरदेवी जत्रेत" जसा गोन्धळ उडाला/काही उनाडटप्पून्नी जाणीवपूर्वक उडविला, तसाच गोन्धळ हिन्दू यात्रान्मधे उडवा! काय बिशाद आहे तुमची तुमच्या देवावर श्रद्धा राहील?

यासगळ्याला जोर चढला तो मराठवाडा विद्यापीठ नामान्तरानन्तर! आठवा जर आठवले तर, रिडल्स ऑफ रामायणाचा वाद! तेव्हा तो तितकासा रुजला/पेटला नाही, उलट नन्तर बाबरीपतन झाले, पण तो देखिल एक "ट्रायलचा" धक्का होता हे विसरू नका.
यावृत्तीला हिन्दूसमाजातील प्रत्येक जातीने एकत्र येऊन खान्द्यास खान्दा लावुन तोडीस तोड जवाब दिला पाहिजे, व तो दिला जाईलही यात मला तरी तीळमात्रही शन्का नाही!
बाकी सध्या एक जे बोलले जाते की लोकान्चे लक्ष उडविण्यास नेमके असे विषय काढले जातात, वगैरे, यावर मी तितकासा विश्वास ठेवत नाही, तसे असेलही, तर ते ते राजकीय नेते देखिल या षडयन्त्रात "वापरले" जात आहेत असे म्हणावे लागेल, इतकेच!. किम्बहुना, असा प्रवाद निर्माण करण्यामागे देखिल, जाता जाता ते ते राजकीय पुढारी बदनाम करायचेच, पण मूळ षडयन्त्रावरुन लक्ष उडवायचे/लक्ष जाऊ द्यायचे नाही, हाच कावा मला दिसतोय.
नो डाऊट की ब्रिगेड्ला राष्ट्रवादीचा सक्रिय पाठीम्बा आहे, पण हा तत्कालिक पाठिम्बा काय की ब्रिगेडला बिनीला पाठविणे असो, एका मोठ्या वैचारिक परकिय षडयन्त्राचाच भाग आहे असे मानण्यास प्रचण्ड वाव आहे.
लक्षात घ्या, त्यान्ना जिथे रुजविता आला, तिथे नक्षलवाद रुजवला, पण जिथे रुजवता येत नाहीये, तिथे ह्या ब्रिगेडीटाईप चळवळी/वळवळी रुजविल्यात! Happy

लिंबूटिंबूजी पोस्ट पटली....
पण याला पर्याय काय....संयम बाळगावा हे म्हणणे कुठपर्यंत शक्य आहे....
कुणीही यावे, आपली लायकी नसताना इतिहासातील महापुरुषांबद्दल वाट्टेल त्या घाणेरड्या भाषेत आरोप करावेत आणि आपण संयम बाळगावा. खरंच असह्य होत चाललं आहे हे सगळं...
याला कुठेतरी तोंड दिलेच पाहिजे...कारण आपले गप्प बसणे जेव्हा संयमाने नाही तर भेकड आणि भित्रे असल्याने, आपली बाजू कमकुवत असल्याने असा जेव्हा अर्थ काढला जातो तेव्हा हे गप्प बसणे जास्त हानीकारक ठरते.

पक्का भटक्या - अगदी उत्तम बोललास बघ...पण तुला सांगू का यांचे मेंदू सडले आहेत. कितीही काथ्याकुट केला तरी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढायला ते तयारच होणार नाहीत.
बाकी महाराजांनी धर्मांतर झालेल्यांना पुन्हा धर्मात घेतले, उर्दु आणि फारसी शब्दकोशातील शब्द बदलून स्थानिक शब्दांचा कोश करण्याची तयारी केली हे यांच्या गावीदेखील नसेल...
आणि ज्या बखरीचा हा माणूस वारंवार उल्लेख करतोय त्याची विश्वासहर्ता काय....
समकालीन होते याचा अर्थ तेच बरोबर होते असा काढायचा का

शिवाजी महाराजानी देशातील लोकांच्या विकासासाठी एकही धोरणात्म काम केलेलं नाहिये. .................... पण त्यानी समाजहितासाठी एकही धोरणात्मक काम केलेलं नाहिये.

राजे ... ह्या वाक्याचे नीट स्पष्टीकरण दया नाहीतर माफी मागून वाक्य मागे घ्या...

Pages