हराभरा कबाब आणि दाल फ्राय- फोटोसहित

Submitted by दिनेश. on 29 December, 2010 - 12:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अनू तेच. हम्मूस म्हणजे तेच चणे शिजवून, सोलून केलेली पेस्ट. भूमध्य समुद्राच्या काठावरील देशात, तिच्यात ऑलिव्ह ऑईल आणि लसून मिसळून, खातात.

ओहो दिनेशदा, काय झक्कास पदार्थ पेश केलाय! ती प्रचितली भरलेली प्लेट पाठवून द्यायची व्यवस्था आहे का? Proud

आई ग्गं ! सकाळी सकाळी तों.पा.सु. !
उद्या न्यू इयर सेलिब्रेशनला सगळ्यांना गिनीपीग बनवायचा प्लॅन शिजतोय माझ्या डोक्यात. Proud
पण दिनेशदा,इथे मेथी किंवा पालक काहीच मिळत नाही. Sad
काय करू ? दुसरं काय टाकता येईल हराभरा रंग येण्यासाठी ?

मनू उसगावात हमस म्हणतात इकडे देशात हमूस म्हणतात (सौ. कलर्स वरील शेफ ..नाव आठवत नाही) मी पण आधी तो शेफ हमूस म्हणाल्यावर कन्फ्यूज झाले पण पदार्थ केल्यावर कळले...ते हमस आहे....:)

मनस्विनी / स्वप्ना, मी पण दोन्ही उच्चार ऐकलेत. अरेबिक लिपित हमस असेच लिहितात पण वरती छोटासा यू काढतात.
रुणुझुणू, कुठलीही हिरवी पालेभाजी चालेल, किंवा रंग घातला तरी चालेल. चण्याबरोबर थोडे मूग पण घालता येतील.
मामी, ती प्लेट नाही, पण घरी आलात तर पेश करु शकेन.

भटक्या / सखी, एकट्याने खाल्ले असते तरी तूम्हाला वाईट वाटले असते. हा फोटो म्हणजे मायबोलीकरांना नेवैद्य आहे.

दिनेशदा मस्तच डिश आहे.
मला डाळीपेक्षा नुसते कबाब चटणी किंवा सॉस बरोबर खायला आवडतील. कारण डाळीला मी बरेचदा नाक मुरडते.

रेसिपीसाठी धन्यवाद दिनेशदा. Happy आज केले होते हरेभरे कबाब आणि दाल फ्राय - पर्फेक्ट चव येते तुमच्या पद्धतीने. थोड्या चुका केल्या, त्या पुढच्या वेळी दुरूस्त करून फोटो टाकीन. (तसेही फोटो काढण्याचा संयम नव्हता. दाल फ्राय पूर्ण होईतो आमचे अर्ध्याहून जास्त कबाब नुसतेच खाऊन संपले होते.)

wow.. ह.भ. कबाब असे करतात होय. चला भिजवलेले छोले पडलेत फ्रीजमधे तीन दिवस आणि कसुरि मेथी पण आहे. ते सत्कारणी लावावे.
दाल फ्राय मस्त दिसतोय पण इतकी सगळी डाळ म्हण्जे प्रोटीन्सचा ओवरडोस..

दिनेशदा यात भिजवलेले काबूली चणे हे कच्चेच ब्लेंड करायचे आहेत कि उकडुन ब्लेंड करायचे आहेत. आखाती देशात जे फिलाफिल/फलाफल?? सँडविच मिळते त्यात हेच कबाब वापरतात का?

इतके दिवस मी हराभरा कबाब उकडलेले हिरवे वाटाणे व बटाटा मॅश करुन,त्यात पालक,कोथिंबिर बारीक कापुन आणि बांधणीसाठी कॉर्नफ्लॉवर घालुन बनवायचे. आता असे ट्राय करुन बघेन

परिजाता, हे एक नुसते सजेशन. पालक + बटाटा असेच साधारणपणे हॉटेलमधे करतात. पण मला ते जरा मऊ वाटतात. ( चावावे लागत नाहीत Happy )

वर्षा, ते कच्चेच ब्लेंड करायचे म्हणजे कबाब कुरकुरीत होतात. उकडले तर मऊसर होतात. ( हम्मूस उकडून केलेले असते. ) तसेच कच्चे ब्लेंड केले कि कणीक वगैरे कमीच लागते.
फलाफलमधे हेच मिश्रण असते. पण त्यात खुपदा पार्सले वापरलेली असते.

चमकी, नक्की होतील. पण डाळ ओली आणि बटाटाही ओला, म्हणून एक कोरडा जिन्नस ( रवा / पावाचा चुरा ) घ्यावा लागेल.

Pages