उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, तो टि.व्ही.चा रिमोट उशिरा तुझ्या हातात आला तरी वेळेवर टि.व्ही. बंद करुन पुरेशी झोप काढ. काळी वर्तुळं जातील Happy

अश्विनी, मी चांगली आठ तास झोप झाल्याशिवाय उठत नाही ग. तरी पण थोडी काजळी दिसतेय आजकाल. लॅपटॉपवर जास्त काम होतंय म्हणून असेल कदाचित.

डोळ्याखाली काळी वर्तुळे म्हणजे ताणाचे लक्षण आहे. काळजी/चिंता सोड आणि मजेत राहा. डोळ्यावर थंडगार काकडीचे गोल काप ठेव म्हणजे अजुन मजा येईल. Happy

,मला पण पापण्यावर काळपट झाले आहे. ( आय लाईन ला, ....लायनर लावल्या सारखे )

जास्त नाही पण कशामुळे असेल? आणि काय करता येईल उपाय?

काल रात्री तळताना गरम तेल हातावर उडाले. आग होत होती म्हणून पाण्याखाली धरला हात. झोपताना ओला टॉवेल गुंडाळला हाताला ( खरच खुप फरक पडतो ) पण आज आग कमी झाली तरी डाग दिसत आहेत. हे डाग कमी करण्यासाठी काय करता येइल Uhoh

@अश्विनी के
इव्हिऑन क्रिम (व्हिटॅमिन इ) कोणत्या कंपनीचे आहे??
हे काखेतील काळेपणा घालवण्यासाठी पण आहे का??
@दक्षिणा
प्रकाश मेडिकल चा फोन नं. इथेच द्याल का? म्हणजे सर्वांनाच कळेल.
वरील सर्व प्रॉड्क्ट्स व लाझुर, अझार्डिअन साबण डोंबिवलीत मिळतील का?? कुठे??
उर्जीता जैनचे केवडा जल हे प्रॉडक्ट अजूनही मिळते का??
हे सर्व तेलकट त्वचेला चालते का??

रोचिन, इव्हिऑन क्रिमची कंपनी आठवत नाही. केमिस्टला नुस्तं सांगितलं तरी देईल.

वरील सर्व प्रॉड्क्ट्स व लाझुर, अझार्डिअन साबण डोंबिवलीत मिळतील का?? कुठे??>>>>> हो. लाझुर, अझार्डिअनसाठी वर लिंक दिलीय तिथे फोन करुन डोंबिवलीत कुठे मिळेल ते विचारा Happy

मला black head & pimple चा त्रास आहे, मी dr. urjita jainचे अलोवेरा जेल वापरले तर चालेल का?, काले दाग आले अहेत, हे सर्वे आधि नव्हते, dr. ने सन्गितले drandruff मुले जाले आहे, आता drandruff नाहि आहे, please मला उपाय सागा.

मी अश्विनीने दिलेल्या लिंक मधून नंबर घेऊन फोन केला होता लाझूर वाल्यांना. अपना बाजार मधे त्यांची सर्व उत्पादनं उपलब्ध आहेत.

वर्षा, Calendula नावाचे क्रीम मिळतं ते खूपच इफेक्टीव्ह आहे भाजलेल्या डागांवर. माझ्या दोन्ही पावलांवर उकळतं पाणी सांडलं होतं. अगदी पांढरे चट्टे आले होते. तेव्हा माझ्या एका होमिओपथीक डॉ मैत्रिणीने हे दिले होते. अजिबात एकही डाग राहिला नाही.

नीलम, अलोवेरा वापरायला काहीच हरकत नाही. पण काळे डाग असतील तर डॉक्टरला दाखवलेले बरे.

डिसेंबर २००८ मध्ये एका ट्रेकला गेले असताना मला बरेच किडे चावले, पाठीवर जरा जास्त होते आणि त्याचे रुपांतर काळ्या डागांमध्ये झाले. मला काही लागले/चावले वगैरे तर त्याचा डाग साधारण दोनेक महिन्यात नाहिसा होतो म्हणुन मी या डागांकडे दुर्लक्ष केले. पण ते बहुतेक इंफेक्शन वगैरे झाले आणि डाग वाढत वाढत पुर्ण पाठभर पसरले. गेले १५ दिवस डोक्टरने दिलेले मेलॅनॉर्म एमेस हे क्रिम लावतेय, त्यामुळे बराच फरक पडलाय. दोन महिन्यात सर्व डाग जातील असे डॉक्टर म्हणाले पण काळजीची गोष्ट ही की त्यातला hydroquinone हा घटक कदाचित कॅन्सरला पोषक होऊ शकतो म्हणुन अमेरिकेत त्याच्यावर बंदी आहे. अर्थात भारतात बंदी वगैरे काही नाही आणि मला डोक्टरने स्वतःच हे वापरायला सांगितले. मी वापरतेय पण मनात धाकधुक चालु आहे...... Sad
(प्रत्येक गोष्ट गुगलुन पाहायचा नाद लई वाईट... Happy )

थोडेजरी भाजले असेल तरी नंतर डाग उठतातच म्हणुन डाग पडुन नयेत याकरता कळजी घेतलेली बरी... मी कुठेतरी वाचलं होतं त्यानुसार २-३ वेळा थोडंसं भाजल्यावर मी लगेच त्याठिकाणी कोलगेट ची पेस्ट लावली होती, आग होनं खूपच कमी झालतं आणि नंतर फोड किंवा डागही आले नाहीत..

धन्यवाद साधना,

काले डाग pimple चे आहेत, आधि लाल होते आता कले पडले आहेत, म्हणुन मी अलोवेरा जेल बद्दल विचारले, Black Head बद्द्ल काहि उपाय आहे का?

मी Dr. ला दाखविले होते, त्यानि एक साबन दिला आहे, "Acne Aid", तो वापरत आहे, कोणि वापरला आहे का, please कळ्वा,

नीलम, मी नुकतेच उर्जिता जैनचे कुकुंबर जेल आणलेय. पिंपल, ब्लॅकहेड्ससाठी वापरा असे त्यावर लिहिलेय. रात्री चेहरा-मानेवर हलका मसाज करुन २० मिनिटांनी साध्या पाण्याने साबण न वापरता धुवावे व शांत झोपावे... Happy करुन बघ...

दिवसा बाहेर जाण्याआधी अलोवेरा जेल लाव चेह-यावर. सन्स्क्रिनसारखे काम होते आणि डागनिर्मुलनही होते.

मी परवा olay total effect आणलं महाग आहे पण खूप effective वाटल मला तरी.

इथे किंवा अजून कुठेतरी मागे घरच्या घरी करता येणार्‍या उटण्याबद्दल वाचल्यासारखं वाटतंय, पण आता सापडत नाहीये. घरी उटणं करायचं असेल तर त्यात काय काय घटक घालावेत? या सगळ्या लागणार्‍या घटकांची हिंदी नावं पण माहित असल्यास सांगा प्लिज.
जवळ २ -३ आयुर्वैदिक दुकानं आहेत, पण तिथे तयार उटणं मिळालं नाही. उटणं, उबटण अशी दोन्ही नावं सांगून झाली, त्याचा उपयोगही सांगून झाला पण त्या दुकानातल्या सरदारजीला काही कळालं नाही. (मी गेलेल्या दोन्ही दुकानातील वैद्य सरदारजीच होते. Happy )

मी परवा olay total effect आणलं महाग आहे पण खूप effective वाटल मला तरी.<<< स्वप्ना, काय इफेक्ट जाणवला तुम्हाला?

घरी उटणं असे करते आजी/आई,
नारळाचे दूध हा बेस आहे तेव्हा ज्यास्त लागतो, केसराच्या काड्या, जरासा सुगंधी कापूर(ह्याचे नाव विसरले), कच्च्या तीळाचे तेल(not roasted sesame),आयुर्वेदिक अत्तर(केमिकल्स टाकून न बनवलेले), दोन थेंब घरचे शुद्ध तूप + मुलताणी मिट्टी.

बाकी मुलतानी मिट्टी एच्छिक आहे (हि काही ट्रेडिशनल उटण्यात नसते पण आम्हीच आईला सांगायला लागलो इथे तिथे वाचून. :))
चोळून लावून १० मिनीटे ठेवायचे, खरेच स्किन मस्त होते(केसर, नारळाचे दूध एकदम बेस्ट रंग उजळवायला). कापूर antibacterial आहे.

नाहीतरी बाहेर मिळणार्‍या पाकिटात भेसळ असतेच. त्यापेक्षा घरीच बनवा.

उटणे:
१०० ग्रॅम मसुर डाळ..त्वचा कोरडी पडत नाही..
२० ग्रॅम प्रत्येकी--१]सुगंधी कचोरा.. २]वाळा/खस.. ३]गुलाब पाकळी...४]कडु लिंबाची वाळलेली पाने ---या सर्व घामाची दुर्गंधी नश्ट करतात..
५]मुलेटी पावडर..६]आमला पावडेर..७]अनंत -मूल पावडर..८]चंदन पावडर -९]संतरा पावडर-या स्निग्ध व सुगंधी असुन त्वचा मऊ ठेवतात..

मसुर डाळ मिक्सर वर दळुन मेदा- चाळणी ने चाळुन घ्यावी..१ ते ४ चे जिन्नस असेच अगदी बारीक दळुन घ्या.

सर्व जिन्नस एकत्र करा...दुधात कालवुन लावा.. फेस-मास्क सारखे ही लावु शकतो व उटण्या सारखे सर्वांगाला लावु शकतो..चेहर्‍याचे डाग कमी होतात...त्वचा उजळते..लहान मुले व टीन एज मुलींकरता उत्तम आहे..
मुलतानी माती मुळे त्वचा कोरडी पडते म्हणुन मी या उटण्यात घालत नाही..

Pages