उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत कडुलिंबाची भरपुर झाडे आहेत. जरा आजुबाजुला बघत जा. Happy

माझ्या आईच्या नाकावर काहि काळे डाग होते.आई बोलते की, लग्न झाल्यावर एखाद्या तिळा एतका डाग होता

वर नी ने लिहिलेय ते बरोबर आहे. यावर काहीही उपाय नाही. माझ्या आईलाही हा त्रास आहे. तिच्या बाबतीत ४५शी नंतर अचानक वाढले, दोन्ही गल भरुन गेले. बहुतेक हार्मोन्सचा काहीतरी इफेक्टही असावा.

मी वर लिहिलेले एको फेअरनेस जेल वापरुन बघा. माझ्या चेह-यावरचे तपकिरी डाग नाहिसे त्याने झाले. ते फ्रेकल्सच होते की काय हे मला माहित नाही, त्यामुळे फरक पडेलच असे मी नाही सांगु शकत. पण प्रयत्न करुन पाहायला हरकत नाही. Happy

<<माझ्या पायवर लहानपणाचे काहि पडल्याचे,भाजल्याचे डाग आहेत ते कसे जातिल? काहि क्रिम किंवा कुम्कुमादि तेलाने जातिल का?कोणाला काहि उपाय माहित असेल तर कृपया सांगा.>>
अविगा, 'जात्यादि तेल' म्हणून मिळते.माझ्या मैत्रिणीला खूप फरक जाणवला.त्याने बरेच कसले कसले डाग जातात..

मुलगा १२ वर्षांचा आहे म्हणजे भरपूर खेळ, मस्ती, उन्हातान्हात फिरणे आले. त्यामुळे काळे पडलेले गुड्घे रंग बदलायला थोडा वेळ घेतील.
मसूर डाळ बारीक वाटून ठेवायची. अंघोळीआधी साय व मसूरडाळीचे पीठ यांची पेस्ट हळूवारपणे गुढगे, कोपरे यांना चोळायची. कोमट पाण्याने धुवावी. रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलाने मालीश करावी. लिंबाची साल, बटाट्याचा रस हे ब्लिचिंग एजंट्स म्हणून वापरतात.

अंघोळीनंतर आयुर्वेदिक मॉईश्चरायझर क्रीमने वा ऑलिव्ह/ बदाम तेलाने मालिश करावी.

आंबेहळद, मुलतानी माती गुलाबजलात किंवा सायीत मिसळून पॅक लावावा.शक्य झाल्यास लांब पँट्स वापरल्या तर बरे.

अ‍ॅक्ने, तारुण्यपीटिका, मुरुम, पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स ह्या निरनिराळ्या संज्ञांचा कुणी अर्थ स्पष्ट करेल का? मला जाम गोंधळ आहे.

माझ्या मते पिंपल्स (इंग्रजी) = मुरुम वा तारुण्यपीटिका (मराठी). बरोबर का?

पण अ‍ॅक्ने, पिंपल्स , ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स ह्यांमध्ये काय फरक आहे?

पार्लर वाल्या बर्‍याचदा स्वतःच अनभिज्ञ असतात. पार्लर चालवणारी मुख्य स्त्री सोडली तर काम करणार्‍या मुली कामचलावूच असतात बर्‍याचदा. अगदी मोठ्या नावाच्या पार्लर मध्येही ही अनुभव घेतला आहे. Sad माझ्या वरील प्रश्नावरही थातुर मातुर उत्तरेच मिळाली.

पार्लर मध्ये वरील समस्यांसाठी बर्‍याच ट्रीटमेंट्स उपलब्ध असल्याचे मार्केटिंग करतात. विविध उत्पादने गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतात. पण वरील समस्या म्हणजे नक्की काय आणि मला सध्या आहे ती तीच समस्या का ह्या बाबतीत प्रत्येक जण आपापल्या मताप्रमाणे उत्तर देते. Sad

पार्लर वाल्या बर्‍याचदा स्वतःच अनभिज्ञ असतात. पार्लर चालवणारी मुख्य स्त्री सोडली तर काम करणार्‍या मुली कामचलावूच असतात बर्‍याचदा. अगदी मोठ्या नावाच्या पार्लर मध्येही ही अनुभव घेतला आहे>>>>> +१

ऑगस्ट/सप्टेंबरपासून चेहर्‍यावर पिंपल्सची मोठ्या प्रमाणात ये जा चालू होती. जागरणांचं निमित्त झालं आणि हा त्रास सुरु झाला होता. जागरणं थांबली तरी एकदा सुरु झालेली पिंपल्सावळ चालूच. त्या पुर्वी अगदी क्लिअर असलेला चेहरा कैच्याकै विचित्र झाला होता. काय काय आणून तोंडाला फासलं तरी ये जा काही थांबेना. गेल्या आठवड्यात ठाण्यातल्याच एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात जाऊन तिथल्या मुलीला म्हटलं "बाई गं, भरपूर पैसे घालवलेत पिंपल्स घालवण्याच्या पायी. आता अगदी खात्रीशीर काहितरी दे. माहित नसेल तर सरळ नाही सांग पण शेंड्या लावू नकोस." तर तिने मला शहनाज हुसेनचं "शाझिमा" नावाचं हर्बल क्लिन्सर फॉर ऑइली/प्रॉब्लेम स्किन आणि "शाक्लिअर" नावाचं स्किन क्लिअर अँटी पिंपल लोशन दिलं. ते ४ दिवस इमाने इतबारे रात्री झोपताना लावलंय. खरंच खूप फरक पडलाय Happy फरक पडतोय म्हणून दिसण्याबद्दल काहीही केअर न घेणारी मी अगदी हौसेने हे दोन्ही प्रॉडक्ट्स लावतेय. पिंपल्सचे डाग पण नाहिसे झाले तर वाह वाह! सोबत लाझुरे साबण पिंपल्समुळे काळवंडू लागलेली त्वचा मुळपदावर आणेलच.

अजून व्यवस्थित पुर्वीसारखी स्किन झाली की इथे येऊन रिपोर्ट देईनच. हा इंटरीम रिपोर्ट समजा Wink

अ‍ॅक्ने, पिंपल्स , ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स ह्यांमध्ये काय फरक आहे?

अ‍ॅक्ने = लालसरपणापासुन , व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स, पिंपल्स , पिकलेले फोड, ते खड्डे, व्रण ह्या सगळ्या spectrumला acne vulgaris म्हणतात.

पण बोलीभाषेत, अ‍ॅक्ने = पिंपल्स = मुरुम वा तारुण्यपीटिका (मराठी)

आपल्या त्वचेलाजी रंध्र (pores) असतात, ती hair follicle आणि तैल ग्रंथीशी जोडलेली असतात. जेव्हा ह्या ग्रंथी जास्त तेल(sebum) आणि keratin निर्माण करतात, तेव्हा रंध्र block होते. ----> व्हाईटहेड्स. ----> वरचे आवरण फुटलेकी
---> ब्लॅकहेड्स
----> लालसर फोड, पिकलेले फोड -- पिंपल्स

अ‍ॅक्ने = पिंपल्स = मुरुम वा तारुण्यपीटिका (मराठी)

यासाठी महामंजिष्ठादी/मंजिष्ठादी काढा हा उत्तम उपाय आहे.

अग पेरु मसुर चि दाल आन आनि ति मिक्सर ला लावुन बारिक करुन थेव आनि मग तुला जेव्हा लावाय्चि असेल तेव्ह त्यतिल थोदे पिथ घे आनि हलद दुधात एकत्र करुन लाव छान ग्लो येइल चेह्र्यला.

मी काल क्रोपर्ड मार्केट ब्युटि सेंटर मधुन नंदिनि या कंपनीचा "केसर आल्मंड गोटि" नामक साबण घेतला कोणि वापरला आहे का?

आता मला मदत करा मुलींनो. नवर्‍याच्या पाठीवरची आणी हातावरच्या स्किनची पोअर्समध्ये काहीतरी ब्लॅकहेड्स सारखं येतंय. पिळुन काढलं तर छोटासा गर बाहेर येतो. डॉक्टरने सांगितलं की ड्रायनेसमुळे होते असेल. असं झालंय का कुणाला?? आणि त्यावर उपाय काय??

नवर्‍याने बरीच कोको आणून ठेवलेली(त्याला प्यायला आवडते म्हणून..) पण अ‍ॅसीडीटी वाढली म्हणून बंद केले पिणे(कोको मिल्क).
तर कोकोचे करायचे काय.. तर गंमत म्हणून हे केले... अहाहा... अतिशय मस्त वाटते... तीन चार वेळा केले महिन्यातून.

१ चमचा कोको,
१ चमचा मध,
२ चमचे दूध(चेहरा मोठा असेल रुपयाएवढा तर प्रमाण वाढवा)
मिक्स करून स्वच्छ चेहर्‍यावर लावून १५ मिनीटे ठेवून धूवून मग गुलाबपाणी लावावे. चेहरा सॉफ्ट होतो, कोरडेपणा जातो.

(कधीचे इथे लिहिते असे झाले.(मला किती 'गती" आहे किती विषयात सांगायला धडपडत होते इतके दिवस... बस्के (आयडीला) तसाही माझ्याबद्दल असा प्रश्ण पडतोच मग त्या अश्या पोस्टी टाकण्यात स्वतःचा वेळ घालवतात.. आणि मग त्यांना पुस्तकं वाचायला मिळत नाही म्हणून एक लेख पाडतात इथे.) ) Wink
असो.

मी काल क्रोपर्ड मार्केट ब्युटि सेंटर मधुन नंदिनि या कंपनीचा "केसर आल्मंड गोटि" नामक साबण घेतला कोणि वापरला आहे का?

अविगा,जात्यादि तेल एका काकूंनी बनवले होते ओळखीच्या.त्याचा माझ्या मैत्रिणीला खूप फायदा झाला.नंतर तीच म्हणाली होती की ते बाजारातसुद्धा कुठेही मिळतं.
अगदी थोडंसं तेल घेऊन डागांवर फक्त चोळायचं.नियमित वापराने खूप फरक पडेल.

अगदी थोडंसं तेल घेऊन डागांवर फक्त चोळायचं.नियमित वापराने खूप फरक पडेल.

कसल्या डागांवरती? चेह-यावरच्या? की भाजल्यामुळे पडणा-या ? की इतर काही डागांवरती?

अविगा, चेहरा उजळ करण्यासाठी केशराचा उपयोग करतात, या साबणाचाही तो फायदा होऊ शकेल. मागच्या काही पानांवर उल्लेख झालेल्या या साबणाचा.

लाझुरमध्ये पण केशर असते बहुतेक आणि त्याच्या वापरामुळे कोरडी त्वचा असलेल्या लोकांना थोडाफार त्रास झाल्याचे इथे वाचलेले. त्यामुळे तुमचा त्वचाप्रकार काय आहे ते पाहुन, पॅच टेस्ट करुन, मगच हा साबण वापरा.

ऑपरेशनच्या व्रणांवर त्याचा फायदा होतो हे तर मी पाहिलंच आहे.
माझं नख निघालं होतं अख्खं..त्याला जात्यादि लावल्याने लवकर भरुन आलं ते. अजून एका मैत्रिणीच्या चेहर्‍यावर उन्हाने आलेला काळपटपणाही निघाला त्याने.
अजूनही अनेक वेगवेगळ्या डागांवर त्याचा फायदा होत असावा. भाजल्याच्या डागांवर फायदा होत असल्याचं मी ऐकलय,पाहिलेलं नाही..पण ते खरं असावं असं मला वाटतं.कारण तसं ते गुणी तेल आहे.
ट्राय करून बघावं.

हाताचे फोल्ड्स् आणि पायाचे घोटे काळे पड्तात, तसेच सुर्यप्रकाशाने त्वचा काळी पडली असेल तर त्यावर कमितकमी ७/८ दिवस सलग टोमॅटो चोळावा.
माझा मुलगा १२ वर्षा चा आहे. त्याचे गुड्घे काळे पड्ले आहेत. काही उपाय आहे का>> तुम्हाला ही करता येईल..

साधना,
लाझुर साबणाने ड्राय स्किन असेल तर त्रास होतो का?
मी गेले १ महिना झाले वापरते आहे...आणि स्किन जास्त कोरडी झाली आहे ,मी realize नाही केले की लाझुर मुळे होउ शकते.

अनुराधा, माझी स्कीन सेन्सेटिव्ह आहे. मी लाझुर आणलेला. २ मि. फेस ठेऊन नाकाभोवतालच्या भागावर जास्त चोळून लावलेला. २-३ दिवस चांगला फरक जाणवला. नंतर थोडी कोरडी खेचल्यासारखी वाटली त्वचा. विशेषतः हिवाळ्यात. नंतर इथेच वाचलं निशा हर्बलचं कूंकुमादी तैलं रात्री लावायचे सकाळी लाझूर लावायचा. रोज नाही करत, पण आठवण होइल तसे करते. बरा वाटतोय.

Pages