उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात कालवून जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो

दिवसातून ४-५ वेळा चेहरा फक्त पाण्याने धुणे. स्वच्छही होतो आणि एक नैसर्गिक चमक दिसते चेहर्यावर असं गेल्या काही दिवसात निदर्शनास आलं आहे Proud Happy

मला डॉ.नी मायक्रो नीडलींग ट्रीटमेंट साठी डर्मा रोलर घ्यायला सांगितला आहे, इथे कुणी तो वापरला आहे का? असल्यास त्याचे रिझल्टस कसे आहेत? आणि प्राइस रेंज काय असते?

माझ्या आईच्या नाकावर काहि काळे डाग होते.आई बोलते की, लग्न झाल्यावर एखाद्या तिळा एतका डाग होता.........
पण आता ते पुर्ण चेहर्यावर पसरले आहेत.
लाम्बुनच ते दिसुन येतात.खुपच खराब दिसत आहेत आता.....
प्लीज काहितरि उपाय सुचवा...

उगाळून लेप लावल्यानेही>>>>>>>>>>>>> मला ढ समजा .. पण उगाळुन लावायच म्हण्जे काय कराय्च नक्की... कोणीतरी प्रोसेस सांगा

एक पोलपाटा सारखे दगडाचे आसते त्याला काय म्हणतात ते आता लल्षात येत नाहि आल्यवर पोस्टेन
त्याच्या वर थोड्या दुधात किंवा पाण्यात गोल गोल फिरवावे

चेहर्यावरील खड्डे घालवण्यासाठी काही उपाय आहे का?
मी यु ट्युब वर पाहिलेले कि
१ cleansing milk
२ benzopl peroxide
३ moisturizer

लावावे पण या पे़क्षा सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे का?

आयुर्वेदिक उपाय तर खुप आहेत.....ते तर चान्गले आहेतच..........पण चेहरा धुण्यासाठी न्युट्रोजिना फेस वॉश वापरा.....महाग आहे पण ३५० रु ची १ बॉटल २ ते अडिच महीने पुरते.... ते रोज चेहेरा धुण्यासाठी वापरा.....फरक १ आठवड्यात दिसुन येइल...

चेहर्यावरील खड्डे घालवण्यासाठी काही उपाय आहे का?>>>>>>.

पुदिना आणि तुळशीची पाने यांची पेस्ट करुन फ़ेसला लावुन १५/२० मिनिटानी धुऊन टाकणे.

हा प्रश्न कुठे विचारु माहित नाहि, पण आता इथेच विचारते. सा.बा ना थंडित हाताला भेगा पडतात, आणि त्यातुन रक्त येते. अगदि सुरीने कापल्यासारखे. पाणयात अजिबात हात घालवत नाहि. अगदि जेवण त्या चमच्याने घेतात, पोळि, भाकरीचे तुकडे करुन देते. खुप औषध केली.

माझ्या friend चा चेहरा खूप काळा पडला आहे, आणि चेहऱ्यावर मधे मधे काळे डाग आहेत. सर्व skin specialist करुन झालेत. त्यावर काही आयुर्वेदीक औषधे आहेत का?

कोकम तेल खरेच गुणकारी , पण अंजलीच्या सा.बां. ना सोरायसिस असेल तर त्वचातज्ज्ञाकडे नेलेलेच बरे.. तो एक चिवट त्वचाविकार आहे.

माझ्या friend चा चेहरा खूप काळा पडला आहे, आणि चेहऱ्यावर मधे मधे काळे डाग आहेत. सर्व skin specialist करुन झालेत. त्यावर काही आयुर्वेदीक औषधे आहेत का?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

१.चेहर्‍यावर पडलेले डाग घालविण्यासाठी त्यावर डाळिंबाची साल ऊगाळून त्याचा लेप नियमितपणे लावावा. डाग सुकतात व नाहिसे होतात

२.कडुनिंबाची मोठाली पाने घेउन पाटयावर वाटुन घ्यावीत.त्यात चमचाभर हळद ,बेसन तसेच दोन चमचे दुध घालुन हे मिक्स करून हा लेप चेहर्‍यावर व्यवस्थितपणे लावावा.लेप सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर त्यावरील डाग हळूहळू नाहीसे होतात.जुनाट डाग़ही नियमित वापरामुळे नाहीसे होतात.

३.काळ्यामिरीचे काही दाणे पाण्यात वाटून घ्यावेत व त्यातच चंदन व जायफ़ळही उगाळुन घेऊन त्याचा लेप चेहर्‍यावरील मुरमे,पुटकुळ्या,फ़ोड यांवर लावावा. काही दिवसांतच मुरमे,पुटकुळ्या,फ़ोड सुकतात व डागही नाहीसे होतात

मयुरी जर चेहरा काळा पडला आहे आणि skin specialists चा उपयोग झाला नसेल तर तिला ब्लड टेस्त करायला सांग. कधीकधि काही internal problems मुळे पण चेहरा काळा पडतो.
or else तिला sun Tan होते आहे का बघ. माझ्या एका मैत्रिणीला असं झालं होतं.

मयुरी जर चेहरा काळा पडला आहे आणि skin specialists चा उपयोग झाला नसेल तर तिला ब्लड टेस्त करायला सांग. कधीकधि काही internal problems मुळे पण चेहरा काळा पडतो.
or else तिला sun Tan होते आहे का बघ. माझ्या एका मैत्रिणीला असं झालं होतं.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>...

मला ही तेच वाटत ब्लड टेस्त करायला पाहिजे.
आणि काय माहीत आहे मॅडमना टोमॅटो आजिबात नाही आवडत उल्टी येते म्हणे
सर्वानी सर्व सान्गुन झाल

Pages