एका पेक्षा एक

Submitted by दीपांजली on 3 June, 2008 - 00:44

'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत बहुतेक नंबर किशोरीचाच! बरं होईल..
येस!!! आता सा रे ग म प लहान मुलांचे सुरु होतंय... मी खूप एक्साईटेड आहे!!! मस्त असतं ... फालतू ड्रामा नसतो.. आणि पल्लवी पण खूप छान पुढे नेते कार्यक्रम..मु़ख्य म्हणजे परीक्षण पटण्याजोगे असते..क्वालिटी शो (मराठी सा रे ग म प )!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

फालतू ड्रामा नसतो??? जल्लां कालच्या कर्टन रेझर मध्येच केवढे ड्रामे दाखवले. दिव्य ते पालक आणि दिव्य त्यांची मुलं...

फालतू ड्रामा म्हणजे... एका पेक्षा अक मधल्या सारखा..आई बाबा...महागुरू..आदेश सगळ्यांची रडारड्..असा! ठरवून केल्या सारखा!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

आशु, धीरे धीरे देखो होता है क्या...... Happy

बरंsssss!! पण मला आवडतो तो कार्यक्रम! चला, दुसरा विषय काढा पाहू!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

मराठीमध्ये "ह" नंतर "ग" येतो अशा सगळ्या शब्दांवर सरसकट बंदी आणली पाहिजे

येडा का खुळा , अरे बाबा आम्हाला हा ग्लास किती सुन्दर असे कौतुक करायची देखील बन्दी होती....

आणि हा गाव नदीच्या काठी असे सांगायची सुद्धा चोरी हो!!!

काल पाहिले का कुणी १ पेक्षा १?? अत्याचार..कानांवर आणि डोळ्यांवरही! किती ती वटवट सुचित्रा"काकूंची"! वैताग!! कॉफीत मीठ ची गोष्ट संपेचना! Sad आणि काय तो ड्रेस.. काय ते नाटकी बोलणं ...शी :!! चिडचिडाट!!
.
त्यातल्या त्यात अमृता ने आधार दिला! खूप गोड दिसत होती आणि नाच ही छान केला! Happy
भैरवीने जरा निराशा केली! Sad
.
महागुरूंचा अजून एक बंपर!! "मी फार रोमँटीक आहे बरं का आदेश! कदाचित तुम्हाला ते माहित नसेल!" Proud
संबंध काय??? Uhoh
.
celebrety judge म्हणून यांना " नाच येतो" अशी माणसं मिळत नाही का काय?? मग काय उपयोग त्या "महागुरूंच्या" अनुभवाचा?? प्रसाद ओक, अमृता सुभाष, सुचित्रा बांदेकर यांचा आणि नाचाचा संबंध काय???? मधु कांबीकर, प्रिया अरूण, वर्षा उसगावकर, झालंच तर अनेक चित्रपटांतून थोडा का होईना पण नाच केलेले अशोक सराफ, महेश कोठारे, निवेदिता.. अशी कितीतरी कलाकार मंडळी आहेत..!! ते आले तर जरा तरी TRP वाढेल! का यात ही महागुरूंचे महाडोके चालत नाही>>?? Light 1
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

सुचित्राने बहुतेक शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवलेले आहेत प्रसिद्ध नृत्यांगना संध्या पुरेचा यांच्याकडून... ती बहुतेक नृत्य विशारद पण आहे पण चु. भु. दे. घे.
बाकी प्रसाद ओक, अमृता सुभाषबद्दल सहमत. पण सेलिब्रिटी जज बोलावण्यामागे कलेचं सादरीकरण, त्यातली सहजता, समर्पण, स्टेजवरच वावर वगैरे बघण्याचा हेतू असेल कदाचित.. कारण नृत्याचे बारकावे टिपायला बाकीचे जजेस असतातच.
.......
अमृता काल बॅले करताना आयटेम सॉंग करत असल्यासारखी ड्रेस अप होऊन आली होती. अभिजीत काल मस्त दिसत होता. काय छान हसत होता. अजुन ७-८ इंच उंच असता तर मला चालला असता SD ऐवजी.. पण जाऊ दे!! लग्न झालंय... त्याचं आणि माझंही. Proud
कालचा एपिसोड जरा सुसह्य वाटला कारण स्टार स्पोर्ट्स वर फेडररची मॅच चालू होती. डान्स संपला की मी तिकडे स्विच ओव्हर करत होते. त्यामुळे सचिन आणि आदेशची वटवट ऐकावी लागली नाही.
ह्यावेळी बहुतेक पॅडीचा नंबर......

खरे तर जज करायला महागुरू एकच पुरे! (ते सुध्दा का????? तर शो चे निर्माते आहेत म्हणून )
पण जसे मराठी सा रे ग म प (मी हिंदी पाहणे लिटिल चँप्स नंतर सोडून दिले! ) मधे जसे संगीताची जाण असलेले परीक्षक बोलावतात आणि त्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारामुळे आपल्यालाही त्यांची योग्यता कळते तशी इथे काही सोय नाही ब्वा! (का योग्यता नाही?? Lol )
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

पॅडी काही जात नाही कालच्या मार्कांमुळे..
आज भार्गवी जाणार बहुतेक.. आज जर फारच भारी नाचली तरच वाचेल नाहीतर टाटा बाय बाय...
==================
डिंग डाँग डिंग

अरे हे सेलेब्रिटी जज्ज म्हणजे त्यांच्याच चॅनेलवरच्या मालिकेतल्या कलाकारांचे प्रमोशन असते......

आजचा एपिसोड संपला.. (एकदाचा)! अजून एक बंपर बाय महागुरू : माझ्या कुत्र्याचे नाव गोगो आहे (तरी अजून तिथेच कसा?) आणि त्याचे माझ्यावर फार प्रेम आहे!! (ए पे ए चे हाल आता कुत्रे खाणार नाही असे दिसते!)हे बोलण्याची ही जागा आहे का? आणि प्रेम ही थीम आहे म्हणून असे ? १ तास कसा घालवायचा हा प्रश्न असेल म्हणून प्रेक्षकांचा इतका छळ ??
.
भार्गवीच्या नाचात थोडा ड्रामाच जास्त वाटला. अमृता आणि पॅडी छान नाचले.

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

आज सगळेच कसले फालतु नाचले !
आणि त्या भार्गवी चे काय कौतुक एवढे ?
हे सगळे लोक नुसतेच गेट अप वर भर देतात, डान्स हा प्रकार फक्त एकटी अमृताच करते असं वाटयला लागलय !
तो पॅडी तर नुसता हौशी गणपती डान्स करतो फक्त !

काल कोण आउट झाले?

अभिजीत!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

काल किशोरी पण चांगली नाचली.. अपेक्षेपेक्षा खूपच चांगली Happy
भार्गवी जाईल असे वाटले होते.. गेले काही भाग नाही जमत आहेत तिला परफॉरमन्स.. बहुदा पुढच्या वेळी.
पॅडीला 'फिनेस' बद्दल सांगण्यात आलेय काल.. तो 'नर्तक' नाहीये, पण प्रामाणिक प्रयत्न करतो.. btw तो एकच पुरुष स्पर्धक राहिला ना आता? मग तो काही इतक्यात जात नाही.. पुढची भार्गवीच जाईल.
अमृता वादातीत चांगलीच आहे. She is a package! Happy
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

नाही... आता किशोरीचा नंबर!! भार्गवी बहुतेक कधीच अजून last two मधे राहिली नाहिये! आणि आता पुढचा भाग कॉल बॅक चा आहे!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

काल सुचित्रा बांदेकर गळ्यात मंगळ्सुत्र वै. काही न घालता उघड्या कपाळाने आली होती. खुप भयानक दिसत होती. संपुर्ण महाराष्ट्राच्या 'होम मिनिस्टर' कालच्या एपिसोड मध्ये आदेश भावोजींच्या "होम मिनिस्टर" चे हे ध्यान बघुन धन्य झाल्या असणार.

प्रदीप पटवर्धन हा काय डान्सर आहे. ढेरपोट्या जागचा हलत पण नाही. त्याला dancer of the day म्हणे. सचिन तर काहीही बडबडत असतो. आता बहुतेक अंकुशला परत बोलवतील.

येस!! अंकुश काय हँडसम दिसत होता काल!!! ओ गॉड.... Happy !!! "मूठभर मांस" चढवल्यावर पूर्वीचा अंकुश परत आल्या सारखे वाटले. मला दीपा चा (दीपा परब : त्याची बायको.. Sad ) हेवा वाटतो. Wink
....
श्वेता च नशीबच खराब!! चांगली नाचते पण "गुरू" योग्य वाट दाखवत नसल्याने वाट लागली बिचारीची!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

मग काय कोन परत येनार असे वाट्तय !!! मला वाट्तय अंकुश च येनार Happy

कोण आले काल परत?

नेहमीप्रमाणे टाय!!
अंकुश आणि अनिकेत दोघेही.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

अर्ध्या मार्का वर भरपुर वेळ खाण

प्रदीप पटवर्धन काही नाटकातून बाहेर येणार नाही कधी! कालचा त्याचा तो नाच होता का? आणि परवा वाटलं ..आत पुन्हा आई वरून रडारड सुरू होतेय की काय्...पण हुश्श! वाचलो.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

काल चक्क महागुरुंनी मान्य केल की ते खुप बोलतात म्हणुन Proud
लोकांना यांनी गप्प बसावं अस वाटावं इतक बोलतात म्हणुन Happy

~ Do not Wish to be anything but what you are. ~

त्यांनी इथे चक्कर टाकली असावी बहुतेक! परवा तर असेही कबूल केले की.. मी माज करतो असे लोक म्हणतात आणि मी खरंच करतो! Proud
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

एका पेक्षा एक मधी डान्स असतो का... ??????
डान्सपेक्षा सचिन चे आत्मचरीत्र कथनच जास्ती चालु असते..

बर त्या दिवशी तर प्रदिपने त्याच्या चक्क पाया पडुन कहरच केला.. नि त्या महागुरु ने पण मोठ्या दिमाखाने एखाद्या राजाप्रमाणे त्याला पुर्णपणे पाया पडु दिले.. हे पाहुन विचित्रच वाटले.. भले सचिन वयाने नि अनुभवाने सिनीयर असेल.. पण शेवटी प्रदिपही त्याच काळातला सहकारी.. मग हे पाया पडणे वैगरे अतिच वाटले..

Pages