एका पेक्षा एक

Submitted by दीपांजली on 3 June, 2008 - 00:44

'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटत होतं मीच एकटी अशा भ्रष्ट मनाची आहे.."महागुरू.." हा हा हा ...:खोखो:

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

काल बासरी शिकलात ना सर्व?

काल किशोरी , अनिकेत चांगले वाट्ले.
भार्गवी चा डान्स ग्रेस्फुल होता पण तिच्या डान्स मधे ड्रामा पार्ट जास्त वाटला अक्चुअल डान्स पेक्षा, थीम चांगली होती.
अमृता च्या कोरीओग्राफर मुळे ती फार चमकली नाही काल.
त्या पॅडीला काल काय ९ मर्क्स दिले ??, महागुरुंच्या गाण्यावर डान्स केला म्हणून का, एवढा काही खास नाही झाला त्याचा डान्स !
आणि अभिजीत केळाकर मधे पण दम नाही , उगीच त्याला ८ मार्क्स मिळाले, सारखे सारखे ' मन उधाण वार्‍याचे' का घेतात डान्स करायला ??
केतकी चितळे, सुकन्या आणि बरेचदा आधी झालाय यावर डान्स !

काल ती हर्षदा खानविलकर येउन रडून गेली आणि आदेश नी लोकांना सांगितलं कि रडायला येणे हे कसे अपो आप आणि स्वाभाविक असते.
" एका पेक्षा एक हा दाट भावनांचा एक कलश आहे" :)))))))))))- इति आदेश

अमृताला नक्की कशाचं रडायला आलं??? आणि रडता रडता आदेशला म्हणते,' आदेश सर Uhoh तुम्ही आज खुप छान दिसताय....' Lol
.
काल एकूणच सगळ्यांनी रडण्याचा ड्रामा करायचा ठरवला होता.... महागुरुंच्या सांगण्यावरून की काय???
.
मराठीमध्ये "ह" नंतर "ग" येतो अशा सगळ्या शब्दांवर सरसकट बंदी आणली पाहिजे
येडे Rofl

अमृताला नक्की कशाचं रडायला आलं???
<<< प्रसाद ओक ला तिचा डान्स ' तेजोमय' नाही वाटला म्हणून :))))))

'छान' नाही गं, 'चिकणे' Proud
अमृताला प्रसादचा रीस्पॉन्स झेपला नाही बहुतेक!
हर्षदा आणि अमृता खनविलकरांमधे काही नातं आहे का?
.
ये.का.खु, सचिनचा कालचा पेहराव बरा म्हणायचा.. मधे तर वरचं शर्टचं बटण उघडं आणि त्याखाली सैल केलेला मॅचिंग टाय असायचा.. कशाला? शो सुरु व्हायच्या आधीच 'फार दमलो' दाखवायला का??? Uhoh Lol
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

ई टिव्हीवर पण एक डान्स प्रोग्राम लागतो 'धुमधडाका' नावाचा, त्याचा एक एपिसोड चुकून बघायला मिळाला... तिथेही सध्या सेलिब्रिटी स्पेशल चालू आहे. सेलिब्रिटीज् ना सामुदायिक सुट्टी मिळालीये बहुतेक असले कार्यक्रम करण्यासाठी..
त्यात ८ डान्सर्स पैकी मला फक्त ३ च लक्षात राहिल्यात, रेशम टिपणीस, दिपाली सय्यद आणि मधुरा वेलणकर. जजेस म्हणून वर्षा उसगावकर, शक्ती कपूर Uhoh आणि एक कोणीतरी होता त्या दिवशी.... अँकरींग स्वप्नील जोशी आणि समिरा गुजर करताहेत.
एपिसोडच्या शेवटी ठरवून ड्रामा केला, कोणाला एलिमिनेट करायचं ह्यावरून. मग शिकवल्याप्रमाणे वर्षा उसगावकर हताश वगैरे झाली तिचं कोणी ऐकत नाही म्हणून....... Lol

>> हे खरं कौतुक.' मग एक खास पॉज. आणि त्या पुढे एकदम जोरात, 'आणि हे फक्त महाराष्ट्रातच होतं!' <<
मला वाटतंय की तो "हिंदुस्तानात" म्हणाला.. अर्थात त्याचाही इथे काय संबंध हे तोच जाणे.. :p

.
==============

ई टिव्ही ला झी मराठी ची कॉपी करण्याशिवाय येतं का काही दुसरं??
इकडे होम मिनिस्टर की लगेच तिकडे हुकुमाची राणी
इकडे खवय्ये की लगेच तिकडे मेजवानी
हास्यसम्राट आणि सा रे ग म प सारखेच अजून पण काहीतरी चालू आहे तिथे!
पण त्यांच्या एकाच ओरिजिनल मास्टर पीस ला कोणीही स्पर्धा करू धजणार नाही...
चार दिवस सासूचे,,,,
ज्यात सासर्‍याचे फक्त "तू म्हणतेस ते बरोबर आहे आशा" यापुढे दुसरे वाक्य नाही!! Lol
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

ये है जलवा ची फायनल राखी सावन्त जिंकली हे पाहून बरं वाटल , एक से एक डान्सेस होते तिचे आणि तिच्या चिल्लर पार्टी चे Happy

धुमधडाका ची पण अखेर झालेली आहे..
दिपाली सय्यद जिंकली त्यात....
==================
फुकट ते पौष्टीक

दीपाली च चांगली होती त्या तिघीं मधे, 'आईये मेहेरबान ' चांगलं केलं होतं तिनी.
पण हा फार लो बजेट प्रोग्रॅम होता, कॉस्चुक अगदीच सामान्य असायचे स्पर्धकांचे आणि वर्षा उसगअवकर वेड्या सारखे निरनिराळे टॅटू स्टिकर ओळीने दंडा पासून बोटां प्रमाणे लहान मुलीं सारखे लावायची !
सेलीना जेठली परीक्षक म्हणून आली तेंव्हा तिने कॉस्चूम्स वर भरपूर टिका केली , " आप रामलीला के कपडे पहन के आये हो ऐसा लग रहा है" म्हंटले कोणाला तरी :))

हर्षदा अमृताची कोणी नसावी, ती ऋतुजा ला सपोर्ट करायला आली होती, आणि मैत्रीणीचे कौतुक म्हणून रडायचा नळ सोडला होता नुसता , आदेश नी काही विचारायच्या आधीच रडायला सुरवात झाली होती!

अश्विनी,

<<ई टिव्ही ला झी मराठी ची कॉपी करण्याशिवाय येतं का काही दुसरं?
इकडे होम मिनिस्टर की लगेच तिकडे हुकुमाची राणी
इकडे खवय्ये की लगेच तिकडे मेजवानी>>

अगदी बरोबर !!!
त्या चार दिवस सासुचे टायट्ल आता चार हजार वर्श असे ठेवावे लागेल!!

एकापे़क्षा एक - सुप्रीया सचिनला सांगत नसेल का की तु एवढ बोलत जाउ नकोस म्हणुन Proud
काय बोलतो तो ... हॅ ... त्यापेक्षा साराभाइ केंव्हाही चांगल . कालचा भाग खुप छान होता - तस सगळेच
भाग चांगलेच असतात , मला तर वाटत त्या एका सिरियल मुळ ते चॅनल चालु आहे , नाहीतर हॉरर शोज अन ती संजीवनी सारखी सिरियल सोडली तर काय असत त्या चॅनलवर ...
पण काल अम्रुता आली होती म्हणुन चुकवायचा नव्हता एपिसोड . सचिननी परत संदर्भासहीत स्पष्टिकरण देउन एक शेर मारला Proud
तोच निर्माता आहे म्हणुन सहन करतात बहुतेक सगळे त्याला . अन आदेशच तर खरच काय तर करायला पाहिजे

~Three grand essentials to happiness in this life are something to do, something to love,and something to hope for. ~

पॅडी कांबळे अजून किती दिवस 'भरत जाधव ची कॉपी आणि उड्या' मारणार आहे?
|
अमृता आणि भार्गवी चांगल्या नाचल्या...
|
आज अनिकेत उडणार बहुतेक... काल त्यातल्या त्यात तोच डल वाटला...
|
'महागुरु' आणि 'भाऊजी' आवरण्याच्या पलिकडे गेलेत...

<<एकापे़क्षा एक - सुप्रीया सचिनला सांगत नसेल का की तु एवढ बोलत जाउ नकोस म्हण<<
सुप्रियाने असे सांगितल्यावर सचिन तिचं अर्धा तास बौद्धिक घेईल (त्यात २५ मिनिटे पॉज असतील) आणि पटवून सांगेल की "मी काही जास्त बोलत नाही".

सुप्रियाने असे सांगितल्यावर सचिन तिचं अर्धा तास बौद्धिक घेईल जरा कमी वाटत नाही का??

बायको आहे म्हणून अर्धा तास हो! जरा जास्त वेळ पोपट्पंची केली तर सुप्रिया आमटीमध्ये तिखट जास्त घालेल आणि भाजी आळणी बनवेल. स्वतःच्या वाईफपुढे अर्धा तास बोलायचे म्हणजे गमजा नाहित मॅडम! आमच्या वाईफपुढे आम्हाला तोंड उघडायला चोरी असते.

हा नियम सर्वसामन्य लोकंसाठी ते महागुरु आहेत.

काल अभिजीत काय नाजूक नार दिसत होता ना!! हे मात्र त्याने त्याला शोभेल असेच केले Proud
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

आणखी एक टुकार जोक खरंतर वाक्यच.. आदेश चा अमॄता सुभाष सोबत मारलेला शालू पैठणीचा पी जे!
.
सचिन स्वतः मराठी असून एका मराठी वाहिनीवर एका मराठी कार्यक्रमात त्याला एक तरी पूर्ण मराठी वाक्य का बरे बोलता येत नसावे?? Uhoh
performace, dance, welcome back या साध्या शब्दांना त्याला आविष्कार, नाच असे सोपे सोपे मराठी शब्द सापडत नाहीत??

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

आदेशभाऊजी खरंच असह्य होऊ लागलेले आहेत. अगदी कंटाळा आणतो हा गडी (शेवटचे दोन शब्द एकाच दमात उचारू नये. उचारल्यावर असंसदीय शब्दनिर्मिती झाल्यास येडा जबाबदार नाही.) ह्याच्या विनोदामुळे हासू येण्याऐवजी "शी...काय बेकार विनोद आहे" अशा विचाराने जास्त हसू येते.

अगदी कंटाळा आणतो हा गडी (शेवटचे दोन शब्द एकाच दमात उचारू नये>>>>>>>>>
Rofl
मी हे शो बघायच बंदच केलय आता.
रिऍलिटी शोच पेव फुटल आहे आणि क्वालिटी मात्र टुकार. प्रत्येक वेळी नवीन आयडीया पाहिजे ना टीआरपी वाढवण्यासाठी. रोज उठुन रडल तर काय मजा. Happy
मी आता पाहिलच कधी तर बुगी वुगी पाहतो. तिथे हे असले ड्रामे फार नसतात.
जावेद, नावेद आणि रवि मजा आणतात अधुन मधुन. Happy
लाफ्टर चॅलेंज पाहतय का कोण??

.............................................................

कॉमेडि सर्कस मधे ती अर्चना काय हीडिस हासते बुवा, मला त्यात तो बा बहु मधला सुबोध आवडतो.

काल सचिन नी उल्लेख केलेला, अशी ही बनवाबनवी ची प्रेरणा असलेला, हृषिकेश मुखर्जींचा सिनेमा-
बीवी और मकान (सन १९६६)
विश्वजीत (सचिन) आणि मेहेमूद (लक्ष्या) यांनी त्यात स्त्री भूमिका केल्या होत्या...
|
अनिकेत जाणार हे अपेक्षितच होतं...
पुढचा कोण?

अनिकेत गेला का काल ?
पॅडी जायला हवा होता, कसलं फालतु केलं ते 'हे चिंचेचे झाड' !
अमृता चं ' पिया तू ' झक्कास झालं, दिसत पण काय सही होती !
अमृताला एकटीलाच ' परफोर्मर ऑफ द डे' द्यायला हवं होत!
भर्गावी ला विभागून उगीच दिलं , ती महागुरुंच्या फार च मर्जी मधे आहे!
अभिजीत चं 'लटपट' पण अम्स्तं झालं परवा:)

पॅडी कष्टाळू आहे, जरी त्याला नाच इतका जमत नसला तरी.. अनिकेत मला अवघडल्यासारखा वाटायचा.. मोकळेपणानी नाही नाचायचा..
भार्गवी बहुदा 'वहिनीसाहेब' मुळे बर्‍याच जणांना आवडत नाही Happy चांगली नाचते पण. दर वेळी व्हरायटी, आणि तिला जमतेही नाचायला.
किशोरीचं 'बाबा' मात्र डोक्यात जातं.. दर एपिसोडला काय!!!!!
आता सगळे चांगले लोक उरले.. मला वाटतं आता पुढचा पॅडीच असेल जाणारा.
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

अनिकेत गेला का? मला वाट्तं फायनल अमृता, किशोरी आणि भार्गवी मध्ये होईल.
.
पुढचा बकरा अभिजीत केळकर असू शकेल. अभिजीतचा काल काय डान्स होता का?
.
हो गं पूनम, किशोरीचं ते 'बाबा' प्रकरण महान आहे अगदी.
तो आदेश बांदेकर अमृताची कायम ठरवून खेचतो... आणि ती पण त्याला मस्त ढिल देते.. मी काल भार्गवीचा नाही पाहिला डान्स... कुठल्या गाण्यावर केला?

भार्गवी ने परवा ' दम मारो दम' वर केला.
मला वाटलं कि डान्स पेक्षा सगळं लक्ष गेट अप वर च दिलं होतं तिनी , मस्त जमला होता गेट अप पण डान्स अमृता पुढे नक्कीच कमी होता!
वर मेक अप अर्टिस्ट चं कोणी कौतुक पण नाही केलं:(
पॅडी नाही जाणार इतक्यात, सचिन ला फार आवडतो तो !
किशोरी च्या 'झुमका गिरा रे' चं पण जास्त च कौतुक केलं सचिन नी, कसली भक्कम दिसत होती त्या ड्रेस मधे !:)

Pages