एका पेक्षा एक

Submitted by दीपांजली on 3 June, 2008 - 00:44

'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक कुतुहल आहे.. एक सामान्य भारतीय (भारतात राहणारा किंवा भारताबाहेर) माणुस दिवसाचा किती वेळ ह्या मालिका आणि रिआलिटी शो बघतो?

भारतात तर मी निदान मराठी मालिका ७:३० ते जवळ जवळ १० सगळेच बघताना बघितले! हिन्दी चे माहीत नाही.

सारेगमप challenege'08 चे judges,
Himesh ( of course the show is incomplete without the drama king himself:))
Shanakr mahadevan
Pritam Chakraborty
Monty Sharma ( Sawariya music director)

I'll miss Vishal Shekhar but sooooooo excited for Shanakr mahadevan and Pritam's appearance :):):)

या वेळी आपल्या वैशाली भैसने माडे नी कोसंबी सारखी निराशा करु नये, फारच सही गाते ती, शंकर महादेवन नी तिची खूप स्तुति केली होती, त्याच्याच ग्रुप मधे गेली तर मजा येइल पहायला !

"भिकार्‍यांचा 'कुमार सानु ">>>>> हे हे हे हे ! मला पण अभिजित आणि देबोजित आवडतात. राहूल आणी प्राजक्ता कधी छान असतात आणी कधी ठिक.
"सामान्य भारतीय माणुस दिवसाचा किती वेळ ह्या मालिका आणि रिआलिटी शो बघतो?">>>> मी आणि माझ्या मैत्रिणी तरी आठवड्यातून ३ तास पहातो. फक्त गाण्याचा रिऍलिटी शो.
सारेगमप challenege'08 >>> कधी असतं हे ?
"I'll miss Vishal Shekha"" >>>>>> मी पण ! तेच जरा सेन्सिबल कॉमेंट्स देतात.

सामान्य भारतीय माणुस दिवसाचा किती वेळ ह्या मालिका आणि रिआलिटी शो बघतो
<<<<< आठवड्याल किमान ३ रिऍलिटी शोज :), किमान साडे चार तास Happy
सध्याचे ,
एका पेक्षा एक, जो जीता वही सुपर स्टार , ये है जलवा, नच ले विथ सरोज खान (अधुन मधुन)

'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे Happy

खुप छान नाचते अमृता. मला तरी तीच जिंकेल असे वाटते आहे. पण त्या आदेश बांदेकरला जरा आवरायला पाहिजे जाम डोक्यात जातो तो माझ्यातरी.

त्या वार परिवारमध्ये दरबारने त्यागराज खाडिलकरवर केवढं तोंड सोडल होत. दरबारला कधी अमेरिकेला जायचा चान्स मिळाल नाही का? स्वतःला फारच शहाणा समजतो. कोणीतरी त्याला जमिनीवर आणायला पाहिजे.

एकापक्षा एक मधे सचिन ला आवरा....

तीच तीच वाक्यं एकदा मराठीत आणि एकदा इंग्लिश मधे सांगतो तो...
ज्यूरी जे सांगतात तेच हा पण सांगतो...
त्याची बडबड एडिट केली तर शो जरा लवकर संपेल...
त्याचा शो म्हणून पकवायचा मक्ता त्याच्याकडे.. बांदेकर ही त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही...
|

अमृता खानविलकर ही उर्मिला, अंतरा च्या पावलावर पाऊल ठेवतेय...
खूप सार्‍या रा. गो. व. फॅक्टरी प्रॉडक्ट्स मधे दिसेल ती आता... सुरुवात 'काँट्रॅक्ट' नामक चित्रपटानी होतेय...
(तशी ती 'मुंबई साल्सा', 'हॅटट्रिक' मधे होती... आणि सुनीधी चौहान च्या 'हिप हॉपर' व्हिडीओ मधे ही नाचली होती...)

अर्च अगदी जळकुटपणा दिसला हं त्या दिवशी त्या दरबारचा, ललितने त्याला सेकंड हायस्ट मार्क दिले तर याने लोयेस्ट, काहिहि.
आणि किति मस्त गायलं होतं ते गाणं त्यांनी.

अरेरे, अमृता रामूच्या फॅक्टरीत? Sad गेली मग ती अंतराच्या वाटेवर..
काय सही नाचते पण.. मस्तच!
काल मी परफॉर्मन्स बघून बंद केलं, कोण गेलं? मधुरा का? तिलाच सर्वात कमी मार्क होते..
आज JJWS Happy

काल सचिन ने पुन्हा ड्रामा करून कोणालाच घालवलं नाही !
ती कोण ऋरुजा देशमुख आहे ती आणि प्रदिप पटवर्धन दोघां मधे lowest marks साठी tie झाली, मग कोणीच गेले नाही !
ती ऋतउजा देशमुख जायला हवी होती , dance जमत नाही, कसली काकु बाई दिसते आणि बोलते पण खूप टिपिकल SP स्टाईल मधे !:
रा.गो.व. ला मराठी मुली आवडतत असं दिसतय , उर्मिला-अंतरा-इशा कोपीकर आणि ही !
सचिन, आदेश आणि सगळेच परीक्षक ( फुलवा सोडून) डोक्यात जातात !
सॅड्रिक तर येडा नुसता सारखं 'दादा', 'ताई' करत असतो , अमृताला मात्र ताई म्हणत नाही, नशीब :))
बाकी मला अनिकेत अमृतावर फार फिदा आहे असं दिसतं Happy

काल पहिल्यांदा १ का पेक्श्या १ चा एपिसोड बगितला. पॅडी नंअतर महागुरु जे बोलायला लागले ते थांबायला तयारच नाही Sad शेवटी चॅनल बदल

ई! परत टाय! काहीच्याकाही!
सेड्रिकला बसवलाय कशाला तिकडे हेच कळलं नाही, तो बोलतही नाही फारसा! Uhoh
.
आज JJWS मधे काय फॉर्मॅट असेल? सगळेच champions आता! Happy
पाचवी पास पण बघते मी थोडं, मस्त टीपी Happy

मागच्या वेळेस JJWS मध्ये कोण आलं champions मध्ये? दोघंजणं यायचे होते ना? मी मिसला episode. आणि कोण champion गेला परत?

आज JJWS मधे शान येणार आहे. काल अभीजीत ला गुण कमी मिळाले Sad
पण त्याच गाण इतक खराब नव्हत.

एक से बढकर एक पाहिलं काल. पूनम, संचिता, राजा हसन, इव्हन तो अमिल पॉल सगळेच इतके ढोल का दिसत होते??!!माझा टीव्ही बिघडलाय की काय?!!
हरप्रीत ने निराशा केली. सुमेधाने बेकार मेकप केला होता त्यामुळे तीही चांगली दिसत नव्हती अजिबात.

सगळे लठ्ठ झालेत , फुगलेत :))

Friends आठवले यावरून. (तसे नेहमीच आठवते)
Monica: "The camera adds 10 punds"...
Chandler: "So how many cameras were on you"? Happy

अमोल Lol

मैत्रेयी.. सहमत.. सगळे फूगलेत.. (तिकडे ती माउली पण मस्त सुटलिये आणि तितकेच उग्र कपडे घालते रॉक्-रोल मधे). सुमेधा चा मेकअप भयंकर. गाणे पण भयंकर गायले तिने. नूसतेच मादक आवाज काढून गाणे चांगले होत नसते.
एक कळत नाही, हिंदीत लाखोनी गाणी असताना, हे गायक तिच तिच गाणी काय म्हणून गातात? वेगळी म्हणावीत की. अभीजीत जज म्हणजे आता काही खरे नाही.. तो खूप उणेदुणे काढतो.
पण काय शो असेल ह्या बद्दल कुतुहल मात्र आहे. मला आवडलेली जोडी, ऑनीक आणि नागीन..
आणि हो, मागच्या आठवड्यात कॉमेडी सर्कस मधे तोतरा-बोबडा अशी जोडी पाहिली, मस्त केले त्या माणसानी. बाई पण बरी होती, ती सांस भी मधली तुलसी ची सासू.
अजून एक मला आवडते म्हणजे बूगीवूगी मधले रवि बहल आणि नावेदची केमिस्ट्री.. आणि त्यांच्या स्पर्धकाबरोबरच्या गप्पा.. मजा येते ऐकायला. हा एकच शो असावा जिथे फक्त हश्या असतो. उगाच भांडणे वगैरे नसतात.

डीजे, एकापेक्षा एक ची जज फुलवा खामकर ही आधीची फुलवा बर्वे.... सुप्रसिद्ध लेखक कै. अनिल बर्वे ह्यांची कन्या.. जिम्नॅस्टिक्सची नॅशनल चॅम्पियन आणि महाराष्ट्र सरकारच्या 'शिवछत्रपती' पुरस्काराची विजेती.
पोद्दारची पाचही वर्ष अप्रतिम डान्स परफॉर्मन्स करून गाजवून सोडली होती हीने... ग्रॅज्युएशन नंतर नृत्याचं शास्त्रीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि त्याबरोबरच साल्सा, जॅझ, टॅप डान्स वगैरे पाश्चात्य नृत्यही शिकली. सोनीच्या 'बुगी वुगी' मध्येही विजेती होती ती आणि तिची आईही खुप सुंदर नाचते, त्यांचाही 'बुगी वुगी' च्या 'मदर्स स्पेशल' मध्ये सहभाग होता. एकूणच नृत्य आणि परफॉर्मन्स त्यांच्या रक्तातच आहे.

आज सकाळी कोणत्यातरी एका एफ एम चेनल वर ( जिथे मनिष्का असते ) ह्या मोउली च्या कपड्यांच्या भिषण चॉईस बद्दल तिला विचारल. तिने काय सांगीतल ते नीट ऐकल नाही, पण हे तिच्या हातात नाही अस काहीस बोलली वाटत! तसही टेलन्ट पेक्षा आजकाल शो करण्यालाच महत्त्व देतात. जिथे
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मंजु,
मस्त डान्स करते फुलवा आणि परीक्षक म्हणून ती एकटीच एकदम योग्य आहे तिथे, बोलते पण छान बोलते स्पर्धकांशी !

अरे ते १ पेक्षा १ काय ईमोशनल ड्रामा आहे रे!!
रोज कोण ना कोण रडतच असते! Sad
त्या अभिजीत केळकरला म्हणाव तुला काय तुझ्या कुटुम्बाला सान्गायचे ते घरी जाऊन सान्ग!! Angry
इथे उगाच रडारड नको !! Happy

एक विचारु का...अनुस्वार कसा द्यायचा ?? Uhoh

सांग saa.ng

ह्या सगळ्या चेनल्स वाल्यांनी एक स्पर्धा घ्यावी, कोण सगळ्यात जास्त इमोशनल ड्रामा करु शकतो ह्याची. वन बाय वन एकेकाला रडवतात. दर आठवड्यात एकेकाची हिस्ट्री घेत असावेत. किंवा जो जास्ती रडू शकतो तोच भाग घेऊ शकतो.
(btw, channel कस लिहायच?)
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मेघना, झकास कल्पना...
काल प्रदीप पटवर्धन एकापेक्षा एक मधून गेले तेव्हाही बरेच जण रडले..
अगदी कोरीऑग्राफर सुद्धा बॅकग्राऊंड ला रडताना पाहिले मी.. Proud

मन्जू, मस्त माहिती सांगितलीस फुलवाची. काल डोळ्याचं पारणं फिटलं अशी नाचली ती... Happy
.
ऋजुता ज्या लावणीवर नाचली ती किती अश्लील होती! आणि तिच्या नवर्‍याने तिला त्यावर नाच असे सांगितले होते! मी गारच झाले ते ऐकल्यावर! Uhoh
भार्गवी दर वेळेला काहीतरी वेगळा आणि मस्त डान्स करते. तिचं आणि तिच्या कोरीयोग्राफर्सचं कौतुक वाटतं.
आदेश दर वेळी का बोअर करतो? Angry
.
आज पुन्हा स्टारवर JJWS. अभिजीत सावंत मागचे शुक्र-शनि दोन्ही वेळा अगदी खराब गायला. ओव्हर काँफिडन्स? Sad

पूनम, कसली सही नाचली ना फुलवा..... मी फक्त तिचा आणि ऋजुताचा डान्स बघितला काल...... PP गेला का काल? नाहीतरी त्याचाच बकरा होणार हे गृहीतच धरलं होतं...... ऋजुताचा नाच एकदम चीप म्हणजे त्याही खालची पातळी काही असेल तर त्या लायकीचा... एकूणच कॉस्चूम, गाणं, मेकप, डान्स सगळंच ओंगळवाणं...
.
सॅड्रिक जिंकल्यावर फुलवाचं अभिनंदन करायला बहिणीने फोन केला तर म्हणते तुम्ही बघता तो कार्यक्रम? सचिनला कसं सहन करता??? आणि काल तिच्या परफॉर्मन्सनंतर सचिनने जी काही बडबड केली त्यावर येडी म्हणते best ever comliment I ever had..... Uhoh किती दिखाऊ आणि खोटं खोटं वागायला लागतं ना ह्या जगात.....

Pages