Submitted by दीपांजली on 3 June, 2008 - 00:44
'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे
अरेरे म्हणजे कालचा भाग मस्ट सी मधला होता तर... रिपिट कधी करतात?
परवा अमृता
परवा अमृता चं 'सलाम्-ए-इष्क मेरी जान' पण अगदीच बेकार झालं होतं, उगीच काय स्तुति केली परीक्षकांनी !
लटके झटके जमतात तिला पण कथ्थक च्या नावाखली चक्क दणदण उड्या मारत होती !
अशा मुजरा डान्स मधे 'अदा' जास्त लागते , त्या दिवशी तरी अमृताला मुळीच जमली नाही !
आणि तिच्या त्या लाल भडक प्लॅस्टिक च्या जरीच्या ड्रेस ची काय स्तुति केली एवढी, हैदराबाद च्या चार् मिनार च्या चौकात लावलेल्या कपड्यां सारखा ड्रेस होता तिचा :))
पॅडीच्या हिप हॉप ची पण मागच्या एपिसोड मधे उगीच च स्तुति केली , इतका काही ग्रेट नाही झाला तो डान्स !
काल चा भाग मी पाहिला नाही, पण एकंदरीत ऋतुजा मला अजिबात आवडत नाही !
एकन्दरीत फायनल ला अमृता , किशोरी आणि पॅडी रहाणार असं दिसतय !
अखि,
अखि, रविवारी ११ वाजल्यापासून झी २४ तासवर एकही ब्रेक न घेता हे दोन्ही एपिसोडस् दाखवतात. सलग सगळ्यांचे डान्स बघता येतात विदाऊट आदेशची पिरपिर, सचिनची बडबड आणि ते कमर्शियल ब्रेक्स.......
माझेही २
माझेही २ सेंट्स..
>> पॅडीच्या हिप हॉप ची पण मागच्या एपिसोड मधे उगीच च स्तुति केली , इतका काही ग्रेट नाही झाला तो डान्स !..
अगदी बरोबर..
तसा चांगला नाचतो तो मला वाटतं पण काल एवढ काहीच खास नाचला नाहि.. बांदेकरला स्क्रिप्ट देत नाहीत वाटते .. नुसता उत्स्फुर्तपणे बोअर मारत असतो.. महागुरु बोअर मारण्यात अगदी महगुरुच हं. अमृताला नंबर १ बनवण्याचे सगळे प्रयत्न चाललेत असे दिसतायत.
अखि, रविवारी संध्या.६ ला का कयतरी रिपीट करतात..
अखि,
अखि, रविवारी संध्या.६ ला का कायतरी झी मराठी वर १ एपिसोड - गुरुवारचा रिपीट करतात..
सगळ्याना
सगळ्याना धन्यवाद आता नक्की बघते
हो का
हो का मन्जू? चला, मग रविवारीच पाहिलं पाहिजे एकापेक्षा एक.
नाक टोचल्यामुळे ती दिसत मात्र ऑथेंटिक होती
चांगली फिगर असूनही ती बरेच sensible कपडे घालते अजूनतरी.. उगाच घट्ट वगैरे नाही.. RGV कडे गेली की तिचं काय होणार?????? 
डीजे अनुमोदन.. अमृताचं परवा तर अगदी बळंच कौतुक केलं.. मुजरा इतका फास्ट असतो का? चेहर्यावरची माशीही हलत नव्हती तिची, ती कसल्या अदा दाखवतेय?
मला पॅडीचं पण जास्त कौतुक करतात असं वाटतं. त्याच्यापेक्षा अभिजित केळकर चांगला नाचतो.
आणि काल
आणि काल काय तर अंकुश ला काढूनच टाकले!!
अरे...म्हणजे असल्या फडतूस स्पर्धेमधे राहण्यासाठी कुणी आजारीच पडू शकत नाही का? स्पर्धा..(?)
कदाचित त्यानेच अस विचार केला असेल्...या फालतूपणात वेळ घालवण्यापेक्षा आपले काम करुन दोन (?) पैसे मिळवलेले बरे!!
(तेव्हढे तरी मिळतात का? )
हे हे हे
हे हे हे
आणि सचिनने काल अंकुश शिवाय अजून एक एलिमिनेशन झालंच पाहिजे याचं स्पष्टीकरण काय दिलं ते ऐकलंत का?
काय तर म्हणे मागल्या वेळेस एकही एलिमिनेशन झालं नव्हतं म्हणून...
अरे मग मागल्या वेळेसच ही अक्कल सुचली नव्हती का??
अंकुश काय
अंकुश काय करीनाच्या पंथावर लागलाय का....
गेल्या ३-४ महिन्यात उपास काढतोय असा दिसतो....
आता 6 pack / 8 pack सारखं skeleton अशी नवी पद्धत सुरू करायची इच्छा आहे वाटतं त्याची....
अँकी , अरे
अँकी , अरे मला पण प्रोमो पाहुन ह्याला कुठ तरी बघीतलय अस वाटत होत ... खुप तब्येत कमी केलीय की कुठ्ला आजार झालाय त्याला ?
करीनाच्या पंथावर लागलाय का....>> काय काय फॅड निघतील सांगता नाय येत रे बाबा ...
LOl..हो , कसला
LOl..हो , कसला आजारी दिसतोय अंकुश , अगदीच खप्पड !
आहे त्यां मधे अमृता च deserving आहे , ती किशोरी पण कसले मोठे डोळे करते सारखी,
ती पण आवडते सचिन ला!
मी गेले
मी गेले दोन दिवस जे मिळतील ते एका पेक्षा एक चे भाग पहात होते.. महागुरूंचे कौतुक ऐकलंच होतं आधी जनतेकडून.. पण म्हटलं बघावं, किती बोअर करतो ते...
आईग.. माणसानी किती कृत्रिम बोलावं? उगीचच आपले पॉझ घ्यायचे, म्हणजे समोरच्याला वाटावं की किती विचार बिचार करून सांगतोय डान्सबद्दल.. तसंही डान्सबद्दल बोलतच नाही, आयुष्य,ऍडव्हेन्चर्,नि मृगजळ नि काय काय.. !!
आदेश बांदेकरने हा शो करून होती नव्हती ती सगळी प्रतिष्ठा घालवून टाकली आहे.. किती बोर मारावे रे माणसाने, किती बोर?? मला तर वाटतं, ती सगळी सेलेब्रिटी मंडळी भयंकर बोर होतात आदेश समोर आले की.. पटकन काय ते मार्क्स सांगा , मग मी जायला मोकळा/मोकळी असे भाव असतात अगदी !! हेहे करमणूक आहे पण !
डान्स करणार्यांमधे अमृताच जास्त चांगली आहे, पॅडी बरा नाचला,( त्या सॅड्रिकशी काय तुलना करत होते! सॅड्रिक फारच छान नाचतो.. ) अंकुश पण छान नाचू शकला असता, पण तो एकंदरीत या प्रकाराला कंटाळलेला वाटला.. गेला का तो? मी ४-५ जून चे एपिसोड्स पाहीलेत.. पुढचे नाहीत.. (फार बारीक झालाय..हे मात्र खरं!)
ती ऋजुता की ऋतुजा अगदी पथेटिक नाचते.. बरसो रे , काय रटाळ होता.. ती किशोरी सुद्धा नाही आवडत मला.. ग्रेसच नाही वाटत त्यांच्या नाचात.. भार्गवी चांगली वाटली त्यामानाने.. अनिकेत्,अभिजित चांगले वाटले..
टीपी प्रोग्रॅम आहे हा पण!! सगळे एपिसोड्स पाहणार आपण!!!

त्या
त्या अंकुशने लग्न केल्यापासुन खुपच बारिक झाला आहे तो.
ऋजुताचा परवाचा डन्स कसला चिप वाटला आणि तो तिला तिच्या नवर्याने करायला सांगितला धन्यच आहे, त्याला बहुदा आपल्या बायकोची या कार्यक्रमातुन लवकर सुटका करायची असावी
ती भार्गवी किती बोलते शेवटी त्या आदेशने पण तिला विचारले की आपण जुरींना बोलायला द्यायचे का? मला तर ती बिलकुल आवडत नाही.
तसं अमृता
तसं अमृता सोडून आवडण्या सारखं कोणीच नाहीये, अनिकेत विश्वासराव आवडतो मला पण डान्स मधे फारसा चमकला नाहीये अजुन तो !
काल 'थोडीसी जो पिली है' देबोजीत मस्त गायला आणि कसलं सही perform केलं !:)
अभिजीत ने पुन्हा निराशा केली, सध्या तरी मला देबोजीत जिंकावा असं वाटतय.
हो ग
हो ग दिपांजली अमृताच बरी आहे, बहुदा तिच जिंकणार.
काल देबुदा मस्तच गायला, अभिजीतच गाण मी ऐकले नाही पण मला असे वाटते की त्याला ओव्हर कॉन्फिडन्स आला असावा किंवा त्याला तसे करायला सांगितले असावे.
मन्जुड, तुल
मन्जुड,
तुला फुलवा बद्दल बरीच माहिति दिसते.
अणखी काय बोललि फुलवा
आदेश नि मागे म्ह्टल्या प्रमाणे ति हसते मात्र खुप
अरे त्या
अरे त्या आदेश बांदेकरला आवरा....
तो 'होम मिनिस्टर'च्या बेअरिंग मधन बाहेरच यायला तयार नाहिये....
फिल्मी वर
फिल्मी वर "बॉलिवुड का बाप कौन?" नावाचा एक क्विझ टाइप शो असतो... बोमन इराणी ऍकंरिंग करतो.....
मस्त असतो प्रोग्राम....
कुणी 'splitzvilla'
कुणी 'splitzvilla' बघतंय का एम टीव्हीवर? काय एकेक कन्सेप्ट आणतील रिऍलिटी शो चे. देव जाणे!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.
splitzvilla सारखा
splitzvilla सारखा भंगार रिऍलिटी शो मी अजून पाहिलेला नाही. कधी कधी वाटते आपण नव्या पिढीतून हद्दपार झाले आहोत. are we that old?
हो का? काय
हो का? काय आहे तरी काय या शो मधे?

’रोडीज’ पाहून मी फार वैतागले होते, आणि माझा भाचा जाम एक्सायटेड वगैरे होता.. एकाच वेळी एकच एपिसोड बघताना!!
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
हा काय आहे
हा काय आहे शो? कुठे असतो? केव्हा असतो? कसा असतो? किती वेळ असतो?
changlach pratikriya aahet
changlach pratikriya aahet aaplya!................
splitzvilla भंगार
splitzvilla भंगार कल्पना आहे. तरी त्यात यायला लोक तयार होतात.... पब्लिसिटीसाठी लोक काय करतील त्याचा भरोसा नाही राहिला आजकाल.
ह्या शो
ह्या शो मध्ये २ स्वतःला कूल समजणारी पोरे २० विम्झिकल (मला ह्या शब्दाला अनुरूप मराठी शब्द नाही सुचला) मुलिंमधून २ मुली निवडणार आहेत. हा romantic reality show आहे असे एम् टी. व्ही. चे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ही दोन पोरं स्वतःला जेम्स बाँड समजतात. कोणतीही पोरगी आपल्याकडे सहज आकृष्ट होईल असा एकूण त्यांचा आविर्भाव आहे. त्या पोरी ह्या गधड्यांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी कोणत्याही पातळीवर जात आहेत. अत्यंत तोकडे कपडे घालून उत्त्तान हावभाव करणे हा ह्या मालिकेचा स्थायीभाव आहे. मी कदाचित फार पुराणमतवादी वगैरे असेन, पण मला ही मालिका स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा अपमान करणारी वाटली. २० मुली २ मुलांचे लक्ष्या वेधून घेण्यासाठी तंग कपडे घालून उत्तान हावभाव करत आहेत आणि ते दोघे त्यातून दोन मुली "निवडणार" हा प्रकार मला घृणास्पद वाटतो. आर्थात मी माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलेच आहे की कदाचित मी म्हातारा झालो असेन आणि म्हणून नव्या पिढीचे हे मनोरंजनाचे समीकरण मला कदाचित समजले नसेल.
ई! अगदीच
ई! अगदीच हीन पातळी गाठली एम टीव्हीनी!


पण मुली कश्या काय तयार होतात असलं काही करायला? पैश्यापुढे कशाचच मोल राहिलेलं नाही?????????
.
असो, कालचं 'एकापेक्षा एक' पाहिलं? मी अमृता, अनिकेत, भार्गवी आणि अभिजीतचे नाच पाहिले आणि चारही मला आवडले.. सचिननी एक 'महान' टाकला.. अगदी out of context हां- म्हणाला, 'सगळ्यांचे आई-वडील, भाऊ-बहिणी येतात, आज माझेही सासू-सासरे आले आहेत मला बघायला, मी कसा कार्यक्रम करतो ते बघायला. हे खरं कौतुक.' मग एक खास पॉज. आणि त्या पुढे एकदम जोरात, 'आणि हे फक्त महाराष्ट्रातच होतं!'
आम्ही अवाकच झालो.. या सगळ्यात महाराष्ट्र कुठून आला मधेच????
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
राज यांची
राज यांची हवा लागली असेल.
जय महाराष्ट्र!!!
काहीही
काहीही म्हणजे काहीही बरळत असतो तो महागुरू!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...
महागुरु
महागुरु (हा शब्द उच्चारताना मला हसू येते. मराठीमध्ये "ह" नंतर "ग" येतो अशा सगळ्या शब्दांवर सरसकट बंदी आणली पाहिजे) सचिन ह्यांबद्दल आधी बरेच लिहून झाले आहे. त्यामुळे अजून लिहित नाही. पण तो जो पहिराव करून येतो त्याबद्दल काही प्रतिक्रिया? तो जे कपडे घालतो त्याला काय म्हणतात? रंगसंगतीमध्ये मात्र तो गोविंदाशी स्पर्धा करतो आहे.
Pages