दुधी कोफ्ता करी

Submitted by जयु on 24 December, 2010 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोफ्त्यासाठी :- दुधी भोपळा , बेसन २ चमचे, तांदूळाची पिठी १ चमचा, तीळ्, जीरे, ओवा, हिंग, मीठ, तिखट, कोथींबिर.
करीसाठी :- १ मोठा कांदा,१ मोठा टोमॅटो, थोडे सुके खोबरे, कोल्हापुरी तिखट (नसेल तर लाल तिखट + गरम मसाला + आलंलसूण पेस्ट )

क्रमवार पाककृती: 

प्रथम दुधी साल काढून किसून घ्यावा.शक्यतो बियांचा भाग घेउ नये.२ वाटी किसात बेसन २ चमचे, तांदूळाची पिठी १ चमचा, तीळ्, जीरे, ओवा, थोडे तिखट,मीठ, कोथींबिर चिरुन घालवी.बेसन फक्त binding पुरतेच घालवे.सर्व चांगले एकत्र करावे ,पाणी अजिबात वापरु नये. हे मिश्रण भज्याच्या पिठापेक्शा थोडे घट्ट होते.याचे चमच्याने छोटे गोल कोफ्ते तळून घ्यावेत.

करिसाठी :- १ मोठा कांदा,१ मोठा टोमॅटो, थोडे सुके खोबरे थोडे पाणी घालून कुकरमध्ये वाफवुन घ्यावे.त्याची पेस्ट करावी.
पातेल्यात फोडणीसाठी तेल तापवून त्यात वरील पेस्ट घालावी.चांगली परतून घ्यावी.तेल सुटू लागलेकी
त्यात कोल्हापुरी तिखट (नसेल तर लाल तिखट + गरम मसाला + आलंलसूण पेस्ट ) घालावे.पाणी घालून एक उकळी आणावी.चवीपुरते मीठ घालून करीमध्ये कोफ्ते सोडावेत व आणखी एक उकळी आणावी.
गरमागरम कोफ्ता करी पोळी,भाताबरोबर सर्व्ह करावी.

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेल.
अधिक टिपा: 

कोफ्ते थोडे जास्तच करवेत.(करीत जाण्याआधी त्यातील निम्मे पोटात जातात.) Happy
एरवी दुधीच्या भाजीकडे तिरका डोळा करुनही पाहत नाहित असे लोकही कोफ्ता करी फस्त करतात.(स्वानुभव.) Happy
तेव्हा करुन बघा आणी अभिप्राय कळवा.

माहितीचा स्रोत: 
पाकसिध्दी व माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा अनुभव आहे की किसातील पाणी पिळून काढले नाही तर कोफ्ते बनवणे कठीण होते.कदाचित माझे काही चुकत असेल Happy

धन्स स्वप्ना_तुषार.
स्नेहा त्या पाण्यातच पिठ भिजवायचे.दुधीचा बियांचा मधला भाग घेउ नये.म्हणजे जास्त पाणी सुटणार नाहि.

जयू.. नाहीतर काय..

तू कोफ्ता बरोबर छानपैकी चीज नान नाहीतर कुलचा वगैरे बनवायला घेतलास की मी इकडे ठार... Happy

जयू.. आता कोणी मला त्या नाताळच्या ऐवजी आपला कोफ्ता करी विथ नान दिला.. तर काय........... हे हे हे Lol