Submitted by चैतन्य दीक्षित on 16 December, 2010 - 09:02
सैरभैर माझं मन, कुठे मिळेना आधार,
आणि श्वासांत तुझ्या गं, कसा रंगला गंधार?
माझे काट्यातले गीत,आणि जखमी अंतरा,
व्यथा मुकीच ही माझी, तुझा जुळे तानपुरा ।
दोन स्वरांच्या मधली फक्त पोकळीच माझी,
तुला ओतप्रोत स्वर, झोळी मोकळीच माझी ।
सखे मैफिलीत गासी गीती प्राण तू ओतून,
'पिया बिरह न आवे कभी' अशा बोलांतून ।
सूर खिळविती लोकां, शब्द भेदती अंतर,
त्यांना काय ठावे, अर्थ तुझे शोधती अंतर !
तुला मैफिलीत टाळ्या आणि वाहवाची दाद,
मला एकलेपणाची एक काळी छाया गर्द ।
तरी उरते आयुष्य, भोग टळले न कोणा,
किती क्षणांची सोबत? कधी कळले न कोणा ।
माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार ।
- चैतन्य दीक्षित
गुलमोहर:
शेअर करा
चैतन्य....
चैतन्य.... क्लासच......!!!!!
प्रसादकडून ऐकले होतं... आता तुझ्या कवितेतून तू दिसतोयस....... !!!!
शुभेच्छा...!
ultimate कविता आहे... माझी
ultimate कविता आहे...
माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार ।
१ नंबर्...
अजून येऊद्यात्..
आवडली!
आवडली!
सुंदर आहे, आवडली!
सुंदर आहे, आवडली!
चैतन्य.. खूप सुरेख कविता.
चैतन्य.. खूप सुरेख कविता.
वाह.. संपुर्ण कविता सुंदर..
वाह.. संपुर्ण कविता सुंदर.. भिडली !!
सुन्दरच...
सुन्दरच...
http://merakuchhsaman.blogspot.com/
सुंदर.....
सुंदर.....
सुंदर
सुंदर
शेवटचे ३ आरपार!!! अभिनंदन!
शेवटचे ३ आरपार!!!
अभिनंदन!
अतिशय सुंदर कविता!! अभिनंदन!
अतिशय सुंदर कविता!!
अभिनंदन!
वणक्कम बंधु
वणक्कम बंधु
मस्तय मित्रा !!!
मस्तय मित्रा !!!
"माझी मुकी ही व्यथाच मला देईल
"माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार ।"
.... छान
सुंदर!(मनमेघ?)
सुंदर!(मनमेघ?)
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
@उमेश,
होय, मनमेघच.
- चैतन्य दीक्षित.
व्वा! चैतन्य, बघायची राहिली
व्वा! चैतन्य, बघायची राहिली होती ही कविता! मस्तच!
दोन स्वरांच्या मधली फक्त पोकळीच माझी,
तुला ओतप्रोत स्वर, झोळी मोकळीच माझी
तरी उरते आयुष्य, भोग टळले न कोणा,
किती क्षणांची सोबत? कधी कळले न कोणा ।
माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार
वा वा! सुंदरच!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
छान, खूप आवडली.
छान, खूप आवडली.
अप्रतिम!
अप्रतिम!
खुप छान...... सावरी
खुप छान......
सावरी
मस्त.
मस्त.
अप्रतिम ! केवळ अप्रतिम
अप्रतिम ! केवळ अप्रतिम !!
नकळत मी वादळवाटच्या टायटल साँगच्या चालीतच वाचली
सुंदर
सुंदर
माझी मुकी ही व्यथाच मला देईल
माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार ।"
>>>>
जियो !!!
मस्त अप्रतिम सुंदर कविता !!
(अवांतरःबाकी मनमेघ हा काय प्रकार आहे ?
)
चैतन्य.. खूप सुरेख कविता.
चैतन्य.. खूप सुरेख कविता.
खूप छान आहे कविता
खूप छान आहे कविता
छान आहे, मस्त...
छान आहे, मस्त...