माझे इम्प्रॉव्ह खतखते

Submitted by नीधप on 16 December, 2010 - 02:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

खतखत्याच्या विविध रेसिपी आहेत. सिंधुदुर्ग आणि गोवा, भट आणि सारस्वत आणि मराठा अश्या प्रमाणे फरक होतात. मी आपला माझ्यापुरता सुवर्णमध्य इम्प्रॉव्ह केलाय.

साहित्य
सर्व प्रकारचे कंद - सुरण, रताळी, अर्वी, करांद (वेलावरची आणि जमिनीतली दोन्ही),
चिना आणि माडी (हे दोन्ही कंद मी गोव्यात आणि वाडीत पाह्यलेत. त्याला मराठी नाव आहे का माहित नाही.)
अजून आठवतील ते कंद.
मक्याचं कणीस तुकडे करून (दाणे काढायचे नाहीत), कच्ची पपई, कच्चं केळं, दुधीभोपळा, थोडा कच्चट तांबडा भोपळा, नीर / विलायती फणस (याचे अक्षरशः बटाट्यासारखे तुकडे होतात.)
भरपूर ओला नारळ.
थोडासा गुळ.
आमसुल
मसाल्याचे पदार्थ - हळद, धणे, तिरफळं, हिरवी मिरची नसल्यास. लाल सुकी मिरची.
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. सर्व कंद पाण्यात घालून माती काढण्यासाठी ठेवावेत. वेलीवरची करांदं छोटी असतील तर अजिबात चिरू नयेत. तशीच राहू द्यावीत. बाकी वस्तूंचे तुकडे करावेत. आपण कुकरमधून शिजवून काढणार असल्याने अगदी बारीक चिरू नये. कच्ची पपई, कच्चं केळं आणि कच्चट भोपळ्याची साले काढून तुकडे करावे. मक्याच्या कणसाचे एक-दीड इंच जाडीच्या चकत्या करायच्या. दाणे काढत बसायचे नाही. बेबी कॉर्न वापरणार असलो तर आख्खेच.

२. तिरफळं घ्यायची आणि एका वाटीत भिजवत ठेवायची,

३. ओला नारळ, हळद, धणे आणि लाल सुकी मिरची वापरणार असल्यास ती असं सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हिरवी मिरची वापरणार असाल तर ती या वाटणात घालायची नाही.
कोरडं खोबरं जे वापरतात ते हे सगळं मिक्सरमधून काढून मग किंचित परतून घेतात. त्याने एक वेगळा खमंगपणा येतो. कोरडं खोबरं वापरायचं असेल तर लाल सुकी मिरचीच बरी.

४. हे वाटण प्रेशर पॅनमधे ओतायचं. थोडं पाणी, गूळ, आमसुल आणि हिरव्या मिरच्या आख्ख्या टाकून जरा उकळी येऊ द्यायची. मग सगळे चिरलेले कंद बिंद, भाज्या बिज्या सोडायच्या त्यात. पाणी घालायचं. पॅन बंद

५. एक शिट्टी-गॅस लहान-दोन शिट्ट्या-गॅस बंद- वाफ गेली की उघडून त्यावर तिरफळाचं पाणी ओतायचं. मीठ घालायचं आणि सारखं करत एक उकळी आणायची. (कुकर कंपनीप्रमाणे शिट्या बदलतील पण बेसिक डाळ-तांदूळ-बटाटा शिजायला जे सेटिंग लागतं ते वापरावे.)

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

khatakhate.jpg

वाढणी/प्रमाण: 
हा प्रकार १-२ लोकांसाठी होतच नाही कधी.
अधिक टिपा: 

ताजं असताना मस्तच लागतं पण शिळं अजून मुरलेलंही छान लागतं.

भाताबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरही मस्त लागतं.
तांदळाच्या भाकरीबरोबरही चांगलं लागत असावं असा अंदाज आहे.

माहितीचा स्रोत: 
ओळखीपाळखीचे लोक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, मला प्रामाणिकपणे वाटतय कि हातात सापडेल ती भाजी टाकतात बहुत्येक ह्यात. पूर्वी नाही का, नवर्‍याशी भांडण झालं की बायका हाताला लागेल ते पोर बडवत सुटायच्या, तसच काहिसं. हल्लीच्या नवर्‍यालाच बडवतात एव्हढाच फरक...

वाचून झाल की सांग, पोस्ट उडवतो मग.

>>हल्लीच्या नवर्‍यालाच बडवतात एव्हढाच फरक...<<

कारण आजकाल तेवढी पोरं नसतात नी असेलच एखादच कारटं तर ते बिलंदरपणे बाहेर पळते आईचा पारा पाहून.

बरे, खतंखतं वर संशोधन केले आज. आई भारतात गेली असल्याने मिळाली फोनवर एह्च नशीब.

तिचा खुलासा हा की ऋषीपंचमीची भाजी वेगळी (त्यातही कंदमुळेच घालतात) व हे़ खतंखत वेगळे.

रात्री टाकते रेसीपी.

मी सुद्धा डाळ टाकलेले नाही खाल्लय.

इथे बर्‍याच वेरीएशन मिळाल्या.

गोव्याकडे कान्दा नाहि वापरत पण इथे पुण्यात माझ्या सासुबाइ अ़णि आजेसासुबाई मात्र कान्दा खोबरे smoke effect देउन वापरतात. ते solid danger lagate (चान्गल्या अर्थाने) आणि हो....उसाचे कर्वे पण सहि लागतात. ते दर वेळेस मिळत नाहित म्हणुन विसरलेच होते.

सही!
प्राची, नी आणि सर्वांनी लिहीलेल्या सार्‍या भाज्या मी वर्षातून एकेकदा एकेकट्या जरी शोधून, ओळखून,आणून, करुन, खाल्या तरी खतखत्याचं पुण्य क्रेडिट होईल अकाऊंटला. Proud

आम्च्या घरि हि भाजि भाताबरोबर किन्वा नुस्ति खातात. गोव्यात तशिहि ति भाताबरोबरच ओरपतात. त्यामुळे हि सर्सरित करायचि अस्ते. परन्तु थोडि पळिवाढि केलि तरि मस्त लागते. आपालि काळि मिरि अस्ते ना तशि दिसते साधारण. त्याच्या दुप्पट असते size मधे. थोडि तपकिरि रन्गाचि असतात.

मुडल्याला आम्ही अळुची मुंडली म्हणतो. कच्चा फणस एकदम लहान असतो, अजुन मोठे गरे बनलेले नसतात त्याला फणसाच्या कुय-या म्हणतो.

डाळ घालुन खतखते मी ऐकलेले फक्त. खाल्ले मात्र नाही. मी हल्ली स्वयंपाक करताना नी सारखेच बरेच शॉर्टकट, तेल/तुप वगळुन इ.इ.करते. पण ऑथेटींक प्रकारही मधुन मधुन करणे आवश्यक आहे. ज्यांना ऑथेंटिक माहित आहेत त्या त्यांनी इथे टाका. सोबत फतफत्याच्याही टाकल्या तर मस्तच एकदम..

नीरजा, धाग्याचे नाव खफॅक्ल कर Proud

आरे बापरे कित्ती हा गोंधळ.
निधप ने दिलेला हा पदर्थाला "खतखत" अस म्हणतात. हा पदर्थ मालवण सावंतवाडी गोव्याला पण बर्‍याच ठिकाणी केला जातो. यात तिरफळ घालतात. आणी मिरचिच्या रंगाप्रमाणे लाल किंवा हिरव असत. ह्या मध्ये अळुची पने घतली जात नाहीत. ह्यात खोबर भरपुर वापरतात. काही ठिकाणी भाजाण बनवुन पण बनवतात.

इथे खुपजणांनि जि ऋशिची भजी म्हटली आहे ति वेगळी असते. ते साधारण "फतफत्या" सारख असत. ह्यात हिरविच मिरची घालतात आणि अळु खुप प्रमाणात वापरल जात. त्यामुळे हे हिरवच असत. शिवाय "खतखत्या" पेक्षा खोबर फार कमी प्रमाणात वापरतात. हे नैवेद्य म्हणुन गणपतिला ऋशिपंचमिला बनवल जात.

आमच्या कडे "फतफत" गणपतिलाच बनत पण "खतखत" कधिही बनत.

आणि तिरफळाची फक्त साल वापरायची असते. त्यतली बि नाही.

लोकांनो, विनयदेसायांनी एक लय भारी पापलेट आमटीचा व्हिडियो दिला होता २००९च्या दिवाळी अंकात, त्यात तिरफळं पाहून घ्या, तिसर्‍या मिनिटाला एन्ट्री आहे Proud
लिंक ही घ्या- http://vishesh.maayboli.com/node/694

यातील खुप पदार्थ नवीन आहे. तिरफळं/करांद (वेलावरची आणि जमिनीतली ) /
चिना आणि माडी यांचा फोटो टाका प्लीज

रेस्पी टाकल्यापासून बरोब्बर दोन वर्ष लागली वस्तू करायला. आज सुमेधाच्या पद्धतीने कांदा अक्षरशः जाळून आणि मग धणे, जिरे, खोबरं, सुक्या मिरच्या भाजून केलेय.
तर फोटो टाकलेला आहे.
आता स्कोर ३/७ Happy

सह्ही दिसतंय. पुढच्या वेळी मुंबापुरीला आले की (आगाऊ सूचना देऊन) मला खायला घातलंस तर कित्येक कोटी मेट्रिक टन पुण्य लाभेल बयो तुला! Wink

आगामी पंचवार्षिक योजनेत आहे Proud
मी एकदा घटक पदार्थांची यादी पाहिली. त्यातले निम्मेअधिक मीच कधी पाहिले नाहीयेत तेव्हा त्यांची इथली असलीनसलेली अस्तित्वं, बंगाली नावं वगैरे शोधण्याची हिम्मत नाही. त्यापेक्षा जेव्हा कधी येईन तेव्हा खाऊनच बघेन

आम्हाला लहानपणी एक कविता होती गोव्याच्या इयत्ता दुसरी किंवा तिसरीच्या क्रमिक पुस्तकात.
'सभा सभा रे भाज्यांची,भरली सभा रे भाज्यांची' अशी..त्यात शेवटी आजी विळी घेऊन बसलेय असं चित्र होतं. भाज्या भांड्तात म्हणून ती त्यांचं खतखतं बनवायचं ठरवते असं होतं त्यात.. Happy

खतखतं म्हणजे गोवेकरांचा जीव कि प्राण.. मी आणि माझ्या मैत्रिणींनी होस्टेलवर खतखतं party केली होती..

इथे बघून खूपच मस्त वाट्लं.. आणि खतखत्यात इतक्या भाज्या वापरलेल्या असतात्,की आमच्या घरी गंमतीने म्हणतात की स्वयंपाकघरातील 'जातं' आणि 'मुसळ' सोडून त्यात काहीही ढकलता येऊ शकतं..

anytime ready for खतखतें.. Happy Lol

Pages