मज्जाखेळ [३-५]: रंगाची जादू

Submitted by सावली on 15 December, 2010 - 21:47

वेगवेगळे रंग एकत्रकरून नवीन रंग बनवण्याचा खेळ. लहान मुलांना ही जादुच वाटते.

साहित्य:
सात आठ प्लास्टिकचे पारदर्शक ग्लास. वॉटरकलर्स, पाणी,
किंवा
लाल , निळा आणि पिवळ्या रंगाचे प्लास्टिकचे पारदर्शक तुकडे/कागद

कृती:
ग्लास मध्ये अर्धा ग्लास पाण्यात थोडा लाल रंग मिसळून लाल पाणी करून घ्या.
तसेच वेगवेगळया ग्लास मध्ये पिवळे आणि निळे पाणी करून घ्या.
आता रिकाम्या ग्लास मध्ये वरच्या तीन पैकी कुठलेही दोन रंगांच पाणी अगदी थोडं एकत्र करा आणि कुठला रंग होतो ते बघा.

किंवा
प्लास्टिकचे कागद एका पुढे एका धरून प्रकाशात बघा. कुठला रंग दिसतोय ते बघा.

हे निरीक्षण मुलांसमोरच लिहून ठेवा.
असे सगळे कोम्बिनेशन करून रंग करून बघा.
उदा.
लाल + पिवळा = केशरी
लाल + नीळा = जांभळा
हिरवा +निळा = पिवळा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान खेळ.
याचेच एक व्हर्जन. ग्लासातील पाण्यात थोडा पांढरा रंग टाकायचा. मग एका बाजूने शक्यतो पांढर्‍या प्रकाशाच्या बॅटरीचा झोत सोडायचा. तो समोरून नारिंगी आणि बाजूने निळा दिसतो, ते दाखवायचे.

दिनेशदा मस्त आहे तुम्ही सांगितलेला प्रकार. उद्या परवा लेकीला करुन दाखवेन. तिला कुठला रंग मिसळला की कुठला तयार होतो हे कळत पण तुम्ही सांगितलेल तिला खुप आवडेल. Happy