गुलाब, ग्लॅडीओलस, कार्नेशन अशा फुलदाणीत दिमाखाने मिरवणार्या अथवा जास्वंद, मोगरा, झेंडू, शेवंती अशा देवघर प्रसन्न करणार्या फुलांपेक्षाही वेगळी अशी एक फुलांची दुनीया असते - रानफुलांची किंवा गवतफुलांची! पण ह्या फुलांचे सौंदर्य बघायचे असेल तर आपली दृष्टी बदलावी लागते. नाहीतर त्या फुलांचे सौंदर्य तर सोडाच पण ती फुले नजरेस पडणे पण अवघड असते. ह्यातली बरीचशी फुले नखाहूनही लहानशा आकाराची असतात. ह्या फुलराणीला पहायची खरी मजा हिरव्यागार मखमालीवर खेळतानाच येते. एखाद्या लहान बाळाशी खेळताना जसे आपण आपले सगळे व्याप बाजूला ठेवतो, निवांतपणे जमिनीवर फत्कल मारून त्यांच्याशी खेळतो तोच निवांतपणा ही फुले बघतानाच हवा. आणखी एक म्हणजे आपला माणूस असण्याचा तोरा विसरून, त्यांच्याएवढे लहान होऊन, त्यांच्या पानळीवरून त्यांना पाहिलेत तर ती तुम्हाला खरेखुरे दर्शन देतील.
ही आहेत कासच्या पठाराची निसटती ओळख--
तेरड्याचा रंग
तेरडा, सफेद गेंद आणि सितेची आसवे
कास सादर करत आहे मिकी माऊस (स्मिथीआ)
सोनकी
सफेद गेंद आणि सितेची आसवे
जांभळी मंजिरी
सब्जा
भारंगी (हिच्या पानांची भाजी करतात)
हत्तीची सोंड (Vigna Vexillata) हे एक खास फूल आहे. किटक मधाच्या लालसेने सोंडेसारख्या भागावर बसतो आणि केंद्राकडे जायला लागतो. जसा तो आत जातो तसे त्याच्या वजनाने फुलाचे पुकेसर नळीसारख्या भागातून बाहेर येतात आणि किटकाच्या अंगाला चिकटतात.
टोपली कारवी - ही ८ वर्षांनी बहरते. इतर वर्षी चुकार फुलेच दिसतात. हिची झुडपे उलट्या टाकलेल्या टोपलीसारखी दिसतात म्हणून टोपली कारवी.
आभाळी
निलवंती
आभाळी आणि निलवंती ही दोन्ही सायनोटीस कुळाटील आहेत. याच कुळातील नभाळी पण कासला दिसते.
अबोलिमा - शांत शालीन सौंदर्य
दुधाळी - फाद्यांच्या खास रचनेमुळॅ वर्गमूळ असेही म्हणतात.
मराठी नाव माहित नाही पण शास्त्रीय नाव Pinda Concanensis.
आरारुट
तेरड्याचा एक प्रकार - किटक उतरण्याकरता एक आदर्श धावपट्टी
कॉमेलीना
वाह! छानच आहेत
वाह!
छानच आहेत
माधव महान आहेत फोटो
माधव महान आहेत फोटो केवळ....कितीवेळा पाहीले तरी मन भरत नाही.
कासला जायला यंदा तर नाहीये जमणार. पण पुढच्या भादव्याला नक्की !
फारच छान ,व्हाली ऑफ फ्लावर
फारच छान ,व्हाली ऑफ फ्लावर च्या ट्रेकची आठ्वन आली. मस्तच!
जबरी ... भन्नाट ... एकदम
जबरी ... भन्नाट ... एकदम रापचिक फोटो
केवळ अप्रतिम.... एकदा बघुन मन
केवळ अप्रतिम....
एकदा बघुन मन भरलं नाही म्हणुन पुन्हा पुन्हा बघितले...
भन्नाट!!!!
भन्नाट!!!!
मनिमाऊ गेला होतात का कासला?
मनिमाऊ गेला होतात का कासला? किती फुलं बघितली?
Pages