सामर्थ्याचे बदलते परिमाण...
अन् संस्कृतीचे षंढ संदर्भ...
कसाब, अफजल...
तथाकथित उदात्त संस्कृती...(?)
सत्ता, सामर्थ्य ....
दहशतवादाचे राजकारण...
अन् सहिष्णुतेच्या ओझ्याखाली दबलेले...
कोवळ्या मानवतेचे निरागस, निष्प्राण गर्भ !
हम्म्म्म....
सांत्वनाच्या अगतिक.., क्षीण मेणबत्त्या....
आणि गंगातीरावर उसळलेले आगीचे कल्लोळ...
एके ५६, आर. डी.एक्स. अन् बरबटलेली मने..,
निषेधाचे खलिते, संयमाचे (?) नियम अन सौहार्दाचे थोतांड....
कुठलाच हिशोब लागत नाहीये....
समाजकारणाची समीकरणे...
सोयिस्कररित्या बदलेली....!
स्वार्थासाठी सगळीच गणिते चुकवलेली...
आपण दुसरे करणार तरी काय....
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू...
तुम्ही अगतिकता म्हणा आम्ही षंढपणा म्हणु ...!
संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7062535.cms
विशाल.
कुठलाच हिशोब लागत
कुठलाच हिशोब लागत नाहीये....
समाजकारणाची समीकरणे...
सोयिस्कररित्या बदलेली....!
स्वार्थासाठी सगळीच गणिते चुकवलेली...
आपण दुसरे करणार तरी काय....
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू...
तुम्ही अगतिकता म्हणा आम्ही षंढपणा म्हणु .........
>>>>>>>>>>
अगतिक्,असहाय.....आणि........... षंढच.
खूप छान लिहिलय....
खूप छान लिहिलय....
(No subject)
अतिशय खरे......विशेषकरुन
अतिशय खरे......विशेषकरुन शेवटचे कडवे
चला दोन मिनीटे मौन
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू... >> अगदी अगदी
सडेतोड बा
सडेतोड बा
जळजळीत सत्य ... मांडलयसं
जळजळीत सत्य ... मांडलयसं मित्रा
ह्म्म जळजळीत सत्य
ह्म्म जळजळीत सत्य
जळजळीत सत्य अगदी योग्य
जळजळीत सत्य अगदी योग्य शब्दांत...!
चला दोन मिनीटे मौन
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू... >>
हेच करू शकतो सामान्य माणूस अजून काय?
चला दोन मिनीटे मौन
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू...>>> चपखल लिहीलंय्स अगदी
कठीण आहे सगळं
मित्रा , आता बोल ...त्या
मित्रा ,
आता बोल ...त्या धाग्यावर मी सुचवलेल्या उपायात काही चुक होते का ???
अरे.............. बचेंगे तो और भी लडेंगे
मस्त एकदम आवडली !
मस्त एकदम आवडली !
सुंदर !! बस्स एवढंच.
सुंदर !! बस्स एवढंच.
षंढ !......अगदी योग्य शब्द.
षंढ !......अगदी योग्य शब्द.
अगदी अगदी .............
अगदी अगदी .............
तुम्ही अगतिकता म्हणा आम्ही
तुम्ही अगतिकता म्हणा आम्ही षंढपणा म्हणु ...!
तुम्ही काहीहि म्हणा हो, आम्ही बदलणार नाही!
आपल्याच पुतण्याशी लढायला परकीयांची, अगदी शत्रूची सुद्धा मदत घ्यायची, जमेल तिथे लाचलुचपत करायची आणि देश खुशाल परकीयांना विकायचा हे करणारे षंढ नाही, हरामखोर लोकांचे लक्षण आहे. आम्ही तसेच रहाणार!!
झक्की काका १००% अनुमोदन (हे
झक्की काका १००% अनुमोदन (हे अनुमोदन देताना मनाला प्रचंड यातना होताहेत पण कटु असले तरी तेच सत्य आहे. )
प्रसाद, अरे तुझा विचार पटतो मला, माझा विरोध तुझ्या विचाराला नाही. पण सामान्य माणसाकडे खरोखर तेवढी इच्छाशक्ती शिल्लक उरलीय का? हे षंढपण लादले गेलेले आहे. मग ते लादणारे राज्यकर्ते तर आहेतच, पण याला आपण स्वतः तसेच ही परिस्थितीदेखील तेवढीच जबाबदार आहे.
'बचेंगे तो और भी लडेंगे' या तुझ्या वाक्यातच सगळं आलय मित्रा. लढायचं असेल तर आत्ता बचावणं जरुरी आहे. प्रसंगी थोडीशी माघार घेवुन शत्रुचा अंदाज घेवून पुनः आक्रमण करणे हा वाघाचा स्वभाव असतो. भारतीयांनी ते वेळोवेळी सिद्धही केलेले आहे. फक्त ती वेळ साधणं प्रत्येकाच्या हातात नसतं हे आपलं दुर्दैव आहे.
सगळ्यांचे आभार!
“चला दोन मिनीटे मौन
“चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू...”
….. वस्तुस्थिती ......
हे षंढपण लादले गेलेले आहे.
हे षंढपण लादले गेलेले आहे. >>>>> अनुमोदन.
जळजळीत सत्य - खरं आहे
जळजळीत सत्य - खरं आहे
वा विशु वा जे आम्हाला वाटतं
वा विशु वा जे आम्हाला वाटतं ते तुझ्या शब्दात उतरलयं.
!!!
!!!
(No subject)
विशाल, सत्यवचन मित्रा
विशाल,
सत्यवचन मित्रा !
मनातला संतापही बाहेर पडलाय ...!
आपण दुसरे करणार तरी काय....
चला दोन मिनीटे मौन पाळू...
तिसर्या मिनीटाला कामाला लागू...
तुम्ही अगतिकता म्हणा आम्ही षंढपणा म्हणु ...!
पण या शेवटी फक्त या 'दोन' मिनिटे वेळ काढण्याच्या आणि या तिसर्या मिनिटाला कामाला लागण्याच्या वृतीमुळे, स्वार्थामुळेच देशाची वाट लागली आहे, लागत आहे अस मला वाटतं.
जर खरेच देशावर प्रेम असेल, अशा एकापेक्षा एक दशहतवादी हल्ल्यांमुळे खरच चीड निर्माण होत असेल,हे पुन्हा होऊ नये अस मनापासुन वाटत असेल तर,पुढच्या हल्ल्यात आपलाही बळी जाऊ नये अस वाटत असेल तर २-४ तास काढुन जनआंदोलनातुन एखादा विराट मोर्चा (१ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईतुन फक्त १५-२० लाख जनता या विषयावर एकत्र येऊ शकत नाही ?) या डरपोक,स्वार्थी, भ्रष्ट राजकारण्यांच्या घरावर, सरकारवर का निघत नाही ? हा खरा सवाल आहे !
अशा एखाद्या विराट मोर्चामुळे या मंत्र्याच्या उरात धडकी तरी नक्कीच भरेल आणि एकदातरी खालुन वरपर्यंत सगळं एकदा हलवलं तर जाईल ना !
कारण गाव करील ते राव करील नाही करणार हे खरचं आहे ...
आणि मग जशी प्रजा तसा राजा ! काही वेगळं घडेल का ? त्यामुळे नेते,मंत्री यांच्यावर नुसती टिका करुन,त्यांना दोष देण्यात,शिव्या घालण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही.
इथे जनताच दिवसेंदिवस षंढ बनत चालली आहे मग तिथलं नेते, सरकार, कायदा, सुव्यवस्था काय तशीच बनणार !
<<<(१ कोटीपेक्षा जास्त
<<<(१ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईतुन फक्त १५-२० लाख जनता या विषयावर एकत्र येऊ शकत नाही ?) >>>>
खंत अशी आहे अनिलजी की आपल्या लोकांना "महाआरत्या" किंवा "जुलूस" काढण्यातच जास्त रस आहे. दिड कोटी लोकांनी एकत्रीत येवुन सरकारच्या / सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी १०००-२००० लोकांनी एकत्र येवुन घंटानाद करणे किंवा नमाज पढणे यात लोकांना जास्त रस आहे.
आपण कायम १०० आणि ५ च असतो, १०५ कधीच होवु शकत नाही ही आपली मोठी शोकांतिका आहे.
आपण कायम १०० आणि ५ च असतो,
आपण कायम १०० आणि ५ च असतो, १०५ कधीच होवु शकत नाही ही आपली मोठी शोकांतिका आहे.
एकदम बरोबर
धन्यवाद मुक्तेश्वरजी
धन्यवाद मुक्तेश्वरजी
उत्तम कविता. अगतिकता वगैरे
उत्तम कविता.
अगतिकता वगैरे काही नाही.
हे मानसिक षंढतेचेच लक्षण आहे.
नाही गंगाधरदादा ! हळुहळु
नाही गंगाधरदादा ! हळुहळु माणुस कोडगा होत जातो, इच्छा असो वा नसो.....
आंदोलन, चळवळी, क्रांती हे शब्द तेव्हा काहीतरी अर्थ घेवुन येतात जेव्हा पोट भरलेले असते. आणि बहुतांशी जनता ही पोटापुढे इतर कशालाही महत्व देत नाही
Pages