किन्वा/Quinoa. च्या काही रेसिपीज..

Submitted by सुलेखा on 3 December, 2010 - 01:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

किन्वा.
कोणत्याही /आवडणार्‍या भा़ज्या../पालेभाज्या. /मटर,शेगदाणे कुट
हिरवी मिरची,लिंबु रस.साखर्,मिठ
असतील ती किंवा आवडणारी पिठे..

क्रमवार पाककृती: 

किनोवा ला तांदुळा प्रमाणे धुवुन घेणे..जिरे घालुन तेलाची फोडणी करायची..किनोवा परतुन घ्यायचा [खिचडी साठी परतुन घेतो तसा]मिरच्याचे मोठे तुकडे,कढिलिंबाची पाने..गाजर्/कोबी/पानकोबी/मटर.भोपळी मिरची/बिन्स /कांदाआवडेल त्या भाज्या घालुन थोडेसे परतायचे..किनोवा च्या अडीच पट गरम पाणी घालुन पुन्हा परतावे..चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन झाकण ठेवुन मंद आचेवर शिजवावे..वरुन टोमॅटो च्या फोडी,लिंबुरस .कोथींबीर घालावी..
किनोवा मायक्रो / पॅन मधे हाताला गरम लागेल इतपत भाजुन घ्यावा..मिक्सर मधे बारीक दळुन घ्यावा..लगेच दळला जातो..
हे किनोवाचे पिठ १ भाग व क्रॅक ओट्स २ भाग घ्यायचे..दही/ताकात किंवा पाण्यात सरसरीत भिजवायचे..आवडतील त्या भाज्या /कांदा घालुन जाडसर धिरडे करावे..
किनोवा पिठ्+बेसन्+गहु पिठ+ओवा +भाज्या घालुन धिरडी करावी
किनोवा पिठ व मकापिठ ची नेहमीसारखी हिंग घालुन उकरपेंडी करावी..
किनोवा गरम पाण्यात शिजवुन त्यात भरपुर दही+दाण्याचे कुट + हिरवी मिरची + मीठ्+साखर +ब्लु बेरीज घालुन खाता येइल..यात चाट-मसाला घातला तर खुपच छान लागतो...
किनोवा पिठ व इतर कोणतीही पिठे [सम प्रमाण]घेवुन त्यात कांदा,पालक ,मेथी ,ओवा,तिखट,मिठ घालुन अगदी कमी तेलावर फ्राय पॅन मधे थालीपिठं करावी..
किनोवा हे पचायला हलके धान्य आहे..चव ही आहे..वजन कमी करणार्‍यांनी अवश्य खावे..

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचीन्,सुमेधा
किनोवा मोठ्या शहरांत नक्की मिळेल..मला म.प्र मधे नाही मिळालं..ओटस ची पावडर [दुधात मिक्स करुन खायची--कोर्न फ्लेक्स सारखी] दिसली एका दुकानात..

किन्वा (Quinoa) आपल्याकडच्या राजगीर्‍या सारखा आहे का?
वर दिलेल्या रेसीपीज छानच आहेत, Quinoa ऐवजी "कण्या" (तांदूळ, ज्वारी यांचे तुकडे) वापरुनही या सगळ्या रेसीपीज छान होतिल असा अंदाज आहे.
किन्वा --- कण्या फोनेटिकल वाटतय ना? Happy

किनोवा राजगीरा./वर्‍याचे तांदुळ पेक्षा किंचीत मोठा दाणा असतो..शिजल्यावर या दाण्याला मोड आल्यासारखे दिसतात..तांदुळ-कणी वापरुन हे सगळे पदार्थ करता येतील..ज्वारीच्या कण्या शिजायला थोडा जास्त वेळ लागेल..पण कुकर मधे एक शिटी देवुन नक्किच करता येईल. आपल्याकडे गहु/तांदुळाचे फाडे करायची पध्द्त आहे ना...भारतीय-टच देवुन केल्याने किनोवा जास्त छान लागतो अमेरिकन पध्दती पेक्षा ..असा माझा अनुभव आहे..

सुलेखा, हा धागा वर आण्ल्या बद्दअल आभारी आहे. मला quinoa च्या आप्ल्या style च्या रेसिपी हव्या होत्या. मी गुगल ल पण काही खास हाती नव्हत आल. मी आणलेला quinoa आप्ल्या नागली सारखा दिसतो. तोच ना?

सुलेखा, एक प्रश्ण आहे. मी आणलेल्या किनोआ मधे जरा कचकच लागली. तुला असा काही अनुभव आहे का?
पुढच्यावेळेस काय कळजी घेउ? तु कोणत्या brand चा आण्ते? कुठे मिळतो आणि कोणत्या section मधे?

मी कोस्ट्को -[जास्त प्रमाणात्[मोठे पॅकेट] असते]व ट्रेजरजोस मधुन आणला होता..दोन्ही मधे कचकच नव्हती. तू रोळुन पहा.कचकच निघुन जाईल्.मला आता ब्रँड नेम आठवत नाही.पण भाताऐवजी वेगवेगळे प्रकार केले .भाजुन मिक्सरमधे सहज पुड करता आली.त्याचे तिखट्-मीठ्-हळद्-ओवा आणि भाज्या-पालक,/मेथी,/गाजर्,/माइनमुळा /.किसलेला /कोबी ,-कांदा व थोडेसे तांदुळ पिठ्/बेसन/कोर्न्फ्लोअर घालुन थालीपिठासारखे लहान्-लहान चांदके ही केले .तव्यावर भाजुन झाल्यावर खाली काढुन वरुन तेलाचा चमचा[अगदी थोडे तेल] फिरवला.

आर्चना,कॉस्टको मधे "Organic Earth Delight" brand चा किनवा आहे.तिथे जास्त प्रमाणात मिळतो पण क्वालिटी छान आहे . वेगवेगळे प्रकार केल्याने सहज खपणारा/संपणारा आहे.

माझ्या आवडत्या कॅफेमध्ये एक किनोवा सॅलड मिळतं...
शिजवलेला किनोवा + वाईनमध्ये बुडवलेली पेअर्स + अक्रोड + अ‍ॅर्युग्ला पानं (स्प्रिंग मिक्सही चालेल) + कोबी + फेटा चीझ + अ‍ॅपल विनेगारेट ड्रेसिंग... मस्त लागतं..