मौनाचं वादळ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 2 December, 2010 - 09:34

काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज

उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

जयश्री अंबासकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सहज मराठि कवितान्साठी सर्फिंग करताना मायबोली मिळाली...अरेच्चा ईथे तर खजीना आहे, मला आधी पुर्वी कशी नाही भेट्ली मायबोली? Thank you Admin, for giving me entry on this Maayboli site! My hearty compliments to all participants of Maayboli.

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

मस्तच कविता फार आवडली.

Pages