प्रवास !!!

Submitted by MallinathK on 29 November, 2010 - 01:23

नकळत झालेल्या स्पर्शाचा तो भास माझा होता,
तुझ्या काळजाचा चुकलेला तो श्वास माझा होता.

बांधले किनार्‍यावरी घरटे माझे, माझा काय दोष ?
लाटांवर जडलेला तो विश्वास माझा होता.

हसुनच सारे तुझे नकार सोसलेले,
मुखवट्यातला चेहरा तो उदास माझा होता.

तु माझी... मी तुझा... अन आपल्या स्वप्नांचा पसारा,
क्षणात मोडलेला तो मिजास माझा होता.

तुझ्याच हातावर एक रेष मोठी होती,
तरी मरणाला भेटण्याचा तो कयास माझा होता.

आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.

-- मल्लिनाथ

गुलमोहर: 

वा मल्ल्या....प्रवास एस.टीने केला की ट्रेन ने पण ? Proud

सुरेख झालीये कविता...अगदी मनापासुन उतरलीये. मस्त Happy

मल्ल्या मस्त. याची गझल होऊ शकते. फक्त 'मिजास' गडबडतेय.
प्रयत्न तसाच होत, पण जमलं नाही.
म्हणुन मी मात्रा कॅलक्युलेशन नाही केलं... Sad मार्गदर्शन कर थोडं.

कविता ठिक ठाक वाटली मला...
आणि मराठीपेक्षा कानडीतच कविता बर्‍या जमतील तुला... Proud

काळजाचा श्वास नाही चुकत आणि ठेका चुकतो..

कौतुक ला अनुमोदन, मिजास चांगलीच गडबड करतेय.

सगळ्यांचे आभार !!! Happy

कौतुकशी सहमत, मिजासच्या जागी रुबाब केले तर कसे वाटेल
विश्ल्या, पण यमक (काफिया का कै ते) नै जुळत तिथे.. Uhoh नुस्ते मग स्वर यमक होईल ना ?

Wink
मग एक काम कर, खालच्या कडव्यातला ’कयास’ वर घे, त्याच्या जागी खाली ’प्रयास’ करुन बघ Happy
(अवांतर : ’प्र’ हे जोडाक्षर झाले, मग ते लघु मानायचे की गुरू Proud आणि गुरू बरोबर कि गूरु Uhoh च्यायला यासाठी गझलेच्या भानगडीत पडत नाय मी Wink )

बांधले किनार्‍यावरी घरटे माझे, माझा काय दोष ?
लाटांवर जडलेला तो विश्वास माझा होता.

हसुनच सारे तुझे नकार सोसलेले,
मुखवट्यातला चेहरा तो उदास माझा होता

वरील दोन्ही द्विपदी अतिशय आवडल्या........ आपल्या या रचनेची गझल होवू शकते.. निर्विवाद.

तुझ्याच हातावर एक रेष मोठी होती,
तरी मरणाला भेटण्याचा तो कयास माझा होता .... इथे नुसती रेष लिहीण्याऐवजी ''जीवनरेषा'' लिहून द्विपदी अजून ठाशीव करता येईल.

एकंदर फार छान कविता. अभिनंदन आणि पुलेशु. Happy

मल्ल्या, मी मार्गदर्शन करत नाही तरी फक्त मार्गातल्या चुकांच दर्शन घडवतो. दिग्गजांचा सल्ला घे. नाहीतर मग बाराखडीसह काही गझला वाच. मात्रा कळतील. विशल्याच काही ऐकू नकोस. तो आळशी आहे लेकाचा. त्याला अभ्यास करायला नकोच. कॉपी करून पास झाला असावा. (माझ्यासारखा )

सुरेख!!!! Happy

आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.>>>>>>छानच Happy

सर्वांचे आभार !!! Happy
डॉ., कौतुक. मात्रांबद्दल माझाच आळशीपणा असतो नेहमी. जमल्यास यावेळेस बदल करुन पोस्टेन Happy

<<आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.>>........हे जास्त आवडले !:)