Submitted by MallinathK on 29 November, 2010 - 01:23
नकळत झालेल्या स्पर्शाचा तो भास माझा होता,
तुझ्या काळजाचा चुकलेला तो श्वास माझा होता.
बांधले किनार्यावरी घरटे माझे, माझा काय दोष ?
लाटांवर जडलेला तो विश्वास माझा होता.
हसुनच सारे तुझे नकार सोसलेले,
मुखवट्यातला चेहरा तो उदास माझा होता.
तु माझी... मी तुझा... अन आपल्या स्वप्नांचा पसारा,
क्षणात मोडलेला तो मिजास माझा होता.
तुझ्याच हातावर एक रेष मोठी होती,
तरी मरणाला भेटण्याचा तो कयास माझा होता.
आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.
-- मल्लिनाथ
गुलमोहर:
शेअर करा
मल्लि, अतिशय हृदयस्पर्शी आहे
मल्लि, अतिशय हृदयस्पर्शी आहे कविता ! खूप छान!
सुंदर
सुंदर
जबरी..!
जबरी..!
वा मल्ल्या....प्रवास एस.टीने
वा मल्ल्या....प्रवास एस.टीने केला की ट्रेन ने पण ?
सुरेख झालीये कविता...अगदी मनापासुन उतरलीये. मस्त
मल्ल्या मस्त. याची गझल होऊ
मल्ल्या मस्त. याची गझल होऊ शकते. फक्त 'मिजास' गडबडतेय.
मल्ल्या मस्त. याची गझल होऊ
मल्ल्या मस्त. याची गझल होऊ शकते. फक्त 'मिजास' गडबडतेय.
मार्गदर्शन कर थोडं.
प्रयत्न तसाच होत, पण जमलं नाही.
म्हणुन मी मात्रा कॅलक्युलेशन नाही केलं...
मल्ल्या, सही आहे कविता.
मल्ल्या, सही आहे कविता. लाटांच्या ओळी खासच. अनुभवलय रे सारं
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
कौतुकशी सहमत, मिजासच्या जागी
कौतुकशी सहमत, मिजासच्या जागी रुबाब केले तर कसे वाटेल
कविता ठिक ठाक वाटली
कविता ठिक ठाक वाटली मला...
आणि मराठीपेक्षा कानडीतच कविता बर्या जमतील तुला...
काळजाचा श्वास नाही चुकत आणि ठेका चुकतो..
कौतुक ला अनुमोदन, मिजास चांगलीच गडबड करतेय.
काळजाचा श्वास नाही चुकत आणि
काळजाचा श्वास नाही चुकत आणि ठेका चुकतो.. >>>>>>>>>
दक्स तुला काळजाचा ठोका म्हणायचय का??
सगळ्यांचे आभार !!! कौतुकशी
सगळ्यांचे आभार !!!
कौतुकशी सहमत, मिजासच्या जागी रुबाब केले तर कसे वाटेल
नुस्ते मग स्वर यमक होईल ना ?
विश्ल्या, पण यमक (काफिया का कै ते) नै जुळत तिथे..
मग एक काम कर, खालच्या
मग एक काम कर, खालच्या कडव्यातला ’कयास’ वर घे, त्याच्या जागी खाली ’प्रयास’ करुन बघ
(अवांतर : ’प्र’ हे जोडाक्षर झाले, मग ते लघु मानायचे की गुरू
पारिजातक
पारिजातक
बांधले किनार्यावरी घरटे
बांधले किनार्यावरी घरटे माझे, माझा काय दोष ?
लाटांवर जडलेला तो विश्वास माझा होता.
हसुनच सारे तुझे नकार सोसलेले,
मुखवट्यातला चेहरा तो उदास माझा होता
वरील दोन्ही द्विपदी अतिशय आवडल्या........ आपल्या या रचनेची गझल होवू शकते.. निर्विवाद.
तुझ्याच हातावर एक रेष मोठी होती,
तरी मरणाला भेटण्याचा तो कयास माझा होता .... इथे नुसती रेष लिहीण्याऐवजी ''जीवनरेषा'' लिहून द्विपदी अजून ठाशीव करता येईल.
एकंदर फार छान कविता. अभिनंदन आणि पुलेशु.
मस्त आहे .. खुपच छान वाटली.
मस्त आहे .. खुपच छान वाटली.
खूपच सुंदर कविता !
खूपच सुंदर कविता !
मल्ल्या, मी मार्गदर्शन करत
मल्ल्या, मी मार्गदर्शन करत नाही तरी फक्त मार्गातल्या चुकांच दर्शन घडवतो. दिग्गजांचा सल्ला घे. नाहीतर मग बाराखडीसह काही गझला वाच. मात्रा कळतील. विशल्याच काही ऐकू नकोस. तो आळशी आहे लेकाचा. त्याला अभ्यास करायला नकोच. कॉपी करून पास झाला असावा. (माझ्यासारखा )
कविता चांगली जमल्ये रे
कविता चांगली जमल्ये रे मल्ल्या तुला..

तरीही दक्षीला अनुमोदन..
सुरेख!!!! आयुष्य संपले
सुरेख!!!!
आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.>>>>>>छानच
सर्वांचे आभार !!! डॉ.,
सर्वांचे आभार !!!

डॉ., कौतुक. मात्रांबद्दल माझाच आळशीपणा असतो नेहमी. जमल्यास यावेळेस बदल करुन पोस्टेन
<<आयुष्य संपले तुझ्या
<<आयुष्य संपले तुझ्या सोबतीवीनाच सखे,
तुजपासुन-तुजपर्यंतचा तो प्रवास माझा होता.>>........हे जास्त आवडले !:)