......... वाटे हवेहवेसे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

(आयुष्यातल्या वळणांवर काही क्षण असे असतात जे कायम प्रफुल्लित असतात. कोणतीच एक्सपायरी डेट नसलेले. ही रचना त्या क्षणांना आणि त्या क्षणाला स्मरणीय बनवणार्‍या सखीला.)

आभास चांदण्यांचे, वाटे हवेहवेसे
गंधाळल्या फुलांचे, काटे हवेहवेसे

तू लाजतेस तेव्हा, मौनास रंग नवखे
अर्थास लाभणारे, फाटे हवेहवेसे

सारे ऋतू निमाले, उरला वसंत देही
शृंगार श्रावणी जो, थाटे हवेहवेसे

स्पर्शातल्या लयीने, श्वासात ताल धरता
रोमांच रोमरोमी, दाटे हवेहवेसे

माझाच मी न उरतो, विरतो तुझ्या कलाने
जिंकून हारण्याचे, घाटे हवेहवेसे

प्रकार: 

अर्पणपत्रिका प्रचंड आवडली.

मतला आणि

तू लाजतेस तेव्हा, मौनास रंग नवखे
अर्थास लाभणारे, फाटे हवेहवेसे

हे दोन्ही शेर लाजवाब. Happy

मस्त कविता आवडली...
आयुष्यातल्या वळणांवर काही क्षण असे असतात जे कायम प्रफुल्लित असतात. कोणतीच एक्सपायरी डेट नसलेले.>>हे ही आवडलं.

तू लाजतेस तेव्हा, मौनास रंग नवखे
अर्थास लाभणारे, फाटे हवेहवेसे

सारे ऋतू निमाले, उरला वसंत देही
शृंगार श्रावणी जो, थाटे हवेहवेसे

हे दोन्ही शेर सुंदर!

तू लाजतेस तेव्हा, मौनास रंग नवखे
अर्थास लाभणारे, फाटे हवेहवेसे

सारे ऋतू निमाले, उरला वसंत देही
शृंगार श्रावणी जो, थाटे हवेहवेसे

>>> कौतूक, बर्‍याद दिवसानंतर मस्त लिहिलस रे.. आवडली. Happy

कातिल Happy

गझल खूप आवडली... Happy

प्रेमात पडल्यावर अगदी काटे सुद्धा फुलासारखे भासायला लागतात
आणि हवेहवेसे वाटतात ना? Happy
>>माझाच मी न उरतो, विरतो तुझ्या कलाने
जिंकून हारण्याचे, घाटे हवेहवेसे >> हा शेर प्रचंड म्हणजे प्रचंड आवडला..

आणि शेवटून दुसरा शेर अज्जिबात आवडला नाही... नसता तरी चाललं असतं.