शेवयांच्या इडल्या

Submitted by मृण्मयी on 18 November, 2010 - 15:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दीड कप शेवया.
अर्धा कप बारिक रवा
२ कप दही
चणा डाळ (ऐच्छिक) १ लहान चमचा
उडीद डाळ -१ लहान चमचा
२-३ लाल मिरच्या
पाव वाटी नारळ -खवून.
मीठ,
साखर
एक लहान चमचा इनो फ्रूट सॉल्ट
कढिलिंबाची ७-८ पानं
चिमुटभर हिंग
मोहरी

क्रमवार पाककृती: 

* किंचित तेलात किंवा तुपात शेवया आणि रवा (वेगवेगळा) भाजून घ्यायचा.
* दह्यात मीठ आणि साखर घालून फेटून घेऊन, रवा आणि शेवया यात मिसळून घ्यायच्या. हे मिश्रण अर्धा तास तरी मुरू द्यायचं.
* तेलाची/तुपाची फोडणी करून त्यात डाळी, मोहरी, हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीलिंबाची पानं असं सगळं घालायचं. ही फोडणी आता मिश्रणात ओतायची.
* इडल्या लावण्याआधी या मिश्रणात ओला नारळ आणि इनो घालून ढवळायचं.
* इडली पात्राला तेलाचा हात लावून लागलीच इडल्या वाफवायला घ्यायच्या. साधारण २० मिनिटं वाफवायच्या.

वाढणी/प्रमाण: 
इडलीपात्राच्या खोलगटपणानुसार साधारण १२-१६ इडल्या होतात..
अधिक टिपा: 

*दक्षिणभारतात इडल्यांच्या मिश्रणात गाजर किसून घालतात.
*नारळ नसला तरी चालतं.
*मिश्रण पळीवाढं असावं. घट्ट वाटलं तर किंचित कोमट पाणी घालून पातळ करायचं.
*मुख्य म्हणजे आंबवणे प्रकार नसल्यामुळे भिजवण्यापासून तासाभरात इडल्या पोटात. स्मित
*कुठल्याही चटणीशी छान लागतात.

दीपांजलीने केलेल्या इडल्यांचे फोटो इथे आहेत.

माहितीचा स्रोत: 
बंगलोरात घरी स्वयंपाक करणारी अम्मा. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय गं डीजे माझा पहिला नंबर घालवलास ?
फोटो टाकलास म्हणून तुला माफ करते. Proud
मस्त रेसिपी. शेवया न घेता फक्त रव्याच्या रवा इडल्या करते मी. आता ह्या पद्धतीने करुन बघेन Happy

हाय मृण्मयी आणि दीपांजली,

शेवयांच्या ऐवजी बॅम्बीनो (व्हर्मीसेली) वापरली तर अजुन छान होतात ईडल्या,
फक्त बॅम्बीनो (व्हर्मीसेली) आधी थोडी तेलावर परतून घ्यायची.
(मध्येच चोम्ब्डे पणा केल्या बद्द्ल क्षमस्व !)

.

केल्या, मस्त झाल्या, खाल्ल्या, प्रचंड आवडल्या.

रवा आणि शेवया तुपात भाजून घेतल्यामुळे येणारा मस्त खमंगपणा आवडला आणि शिवाय पिठात घातलेली फोडणी.. झक्कास!!
दही घट्ट होतं त्यामुळे जवळजवळ दह्याएवढं पाणी घालावं लागलं.. मऊ लुसलुशीत इडल्या झाल्या.

ह्या ईडल्या छान होत असतील पण मेहनतीने केलेल्या शेवयांच्या ईडल्या का करायच्या ते मला समजले नाही

शेवया कुठ करतो आपण? त्या तर पाकिटात असतात.

@मृण्मयी,

ही रेसिपी इथ टाकल्याबद्दल खरच थँक यू. कालच केल्या आणि अप्रतिम झाल्या होत्या. मंजूडी च्या प्रतिसादाला अनुमोदन देत सांगते कि शेवया आणि रव्याच मिश्रण खूप दही शोषून घेत. तेव्हा ते सरसरीत होण्याकरता मी बरच ताक घातल. त्याच प्रमाणे दही आणि ताक बेताच आंबट होत म्हणून पाव चमचा लिंबूफुल (सायट्रिक अ‍ॅसिड) टाकल.

सिंडे Happy कबूल आहे पण जेवढी मेहनत रवा काढताना आहे तेवढीच शेवया घालताना नाही का? रवा मशिनवर काढला जातो तश्याच ब्रँडेड शेवया मशीनवरच काढतात, पण घरगुती शेवयांना कष्ट आहेत खरेच.

इडल्या जीव की प्राण - त्यामुळे नक्की करणार. चांगल्या झाल्या तर फोटो पण टाकणार. Happy

जबरी होतात ह्या इडल्या. मृण्मयी, थॅन्क्स.
अनेकदा शनिवारी सकाळी नाश्त्याला किंवा कुणी आयत्यावेळचे पाहुणे वगैरे असतिल तर... हमखास छान होणारा पदार्थ.

छान होतात पण चव ओरिजनल ईडल्यासारखी नाहि येत..पण जी चव येते ती सुद्धा आवडली मुख्य म्हणजे या ईडल्या गारही चा.न्गल्या लागतात.
९माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या म्हणून हिरव्या घातल्यात)

shevai idali.jpg