तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2010 - 02:32

आईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली
मी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

त्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा
ज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली

वाटायचे की खूप काही साधले आहे इथे
चाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली

अक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे
का 'बेफिकिर' झाली, तुझी आई कशाने त्रासली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारेच घाव नसतात सोसण्यासारखे
काही व्रण देऊन जातात दिसण्यासारखे
टाळायचे म्हटले तरी सारेच थोडे टळते?
घडते तेच नियतीला मंजूर, असण्यासारखे
निश्चयाने झेलत जावा येणारा प्रत्येक क्षण
हाती असतेच काय आणिक, असण्यासारखे?

भगवंत तुम्हाला खूप बळ देवो
हेच शब्द माझे प्रार्थनेसारखे.

..... __/\__ .....

बेफिकीरजी, भावना मनात दडपून ठेवण्या़पेक्षा त्याना व्यक्त करणेच योग्य आहे, आणि आवश्यक आहे.
शक्य असेल तर त्यांना Internet वर ज्या ठिकाणी त्यांना जाता आलं नसेल (उदा. काशी-रामेश्वर, काश्मीर
कोकण वगैरेचे ) त्याचे फोटो-व्हिडिओ दाखवा. तेव्हढ्च त्यांना समाधान मिळेल, व विचार करत बसायला
वेळही मिळणार नाही. हे सर्व तुम्ही करत असालच. तरी राग मानू नये.

बेफिकिरजी,
तुमच्या दु;खात मी सहभागी आहे.
तुमच्या आईच्या आत्म्यास देव शांती प्रदान करो, हीच श्रीचरणी प्रार्थना.

Sad

भावना कितीही योग्य असली तरी प्लीज लाइव्ह टेलिकास्ट असल्यासारखं सांगू नका. हे नंतर वाचल्यावर त्यांनाही खूप त्रास होईल. परत परत तेच क्षण जगायला लागणं भयाण असतं.

Sad Sad

Sad नाहि हो.... प्लिज...
मि हे कस पाहिल/वाचल नाहि काल???. खुप वाईट वाटतय.
भुषणराव स्वःतला सांभाळा, आणि ईतरांना धिर द्या.

.

बेफिकिरजी,
तुमच्या दु;खात मी सहभागी आहे.
तुमच्या आईच्या आत्म्यास देव शांती प्रदान करो, हीच श्रीचरणी प्रार्थना

तुमच्या दु;खात सहभागी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, हीच प्रार्थना.

बेफिकिरजी, काळजी घ्या....
तुमच्या आईच्या आत्म्यास देव शांती प्रदान करो, हीच श्रीचरणी प्रार्थना

बेफिकीरजी, तुमच्या दु:खात सहभागी आहे.स्वतःची व घरच्यांची काळजी घ्या.
ईश्वर तुमच्या मातोश्रिंच्या आत्म्यांस शांती देवो हीच प्रार्थना.

Pages