तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी

Submitted by बेफ़िकीर on 17 November, 2010 - 02:32

आईसमोरी थांबुनी मी शेवटी अभ्यासली
मी पोरका होणार ही जाणीव हृदयापासली

तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

त्यांच्या कुशीमध्येच मी आक्रंदलो बिलगूनसा
ज्या माणसांना मी कधी समजायचो मागासली

वाटायचे की खूप काही साधले आहे इथे
चाळीस वर्षे राहिलो, चाळीस वर्षे नासली

अक्षर तुझ्याशी बोलण्यासाठी सदा जी धडपडे
का 'बेफिकिर' झाली, तुझी आई कशाने त्रासली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय Sad

याच्यापुढे पाठीवरी फिरणार नाही हात तो
मी काल त्या हातावरी ही पाठ माझी घासली

जी घ्यायची अंगावरी, हातास जेव्हा लागली
आश्चर्य की ती शालही आईप्रमाणे भासली

Sad

खुप विचित्र फेज आहे ही..मी अगदी यातूनच गेलीए ३ वर्षांपूर्वी..आई ज्यांच्याकडे आहे ते लोक नशीबवान वाटतात मला..
हे ही दिवस जातील..पण तोवर खुप काही बदललेलं असेल...तुम्हाला देव शक्ती देवो सगळं सहन करण्याची..

नकाहो अस न्हणू, Sad
काहिहि सुचत नाहिये, काय म्हणावे.... आणि मि एतका लहान आहे कि काय करावे/म्हणावे/बोलावे हेच सुचत नाहि.

सर्वांचे आभार!

परेश,

आईचे आयुष्य किती असेल याचा खरच अंदाज दिलेला आहे डॉक्टरांनी! आपल्य हातात काहीही नसते!

-'बेफिकीर'!

स्पीचलेस होणे म्हणजे काय ते ही गझल वाचून परत एकदा अनुभवले.

ईश्वर तुम्हाला प्रचंड मानसिक सामर्थ्य देवो!!

Sad Sad Sad बापरे.... Sad बेफिकीरजी... काळजी घ्या, इतकेच म्हणेन... Sad सगळ्यांना अनुमोदन माझेही...

ईतक होऊनहि तुम्हास सुचलेल्या ह्या ओळि मझ्या काळजाच्या अगदि जवळ असतिल, सदैव.
तुम्हि काळजि घ्या स्वताचि आणि तुमच्या घरच्यांचि, Sad

परत परत वाचतोय..
तारीख मृत्यूची कळाली काल चौघांना जशी
आम्हा तिघांना स्पर्शुनी आई कशीशी हासली >>> माझ्या स्वर्गिय 'आजि' चि आठवण झालि, आणि तो प्रसंग डोळ्यासमोर ऊभा राहिला.

Sad अगदी नि:शब्द झालीये....काटा आणला प्रत्येक शेराने अंगावर!! काळजी घ्या..देव तुम्हाला सगळ्यातुन सावरण्याचं बळ देवो!

मरे एक त्याचा दूजा शोक वाहे..
अकस्मात तोही पुढे जात आहे !

अजून काय बोलू?

बाकी सगळ्यान्ना अनुमोदन आहेच !

- परीक्षित

बेफिकीर: कवितेत तुमच्या भावना स्पष्ट होत आहेत्...पण

बेफिकर होउन जगा आयुष्य आणखी वाढेल आईचंही आणि तुमचंही टेंशन घ्याल तर अजून टेंशनच होईल ना..? नाव दीलं आहे त्या प्रमाणे जगण्याची आताची हीच ति वेळ आहे....
आईची काळजि घ्या...आता थोडी जास्तच
आण्खि काय बोलु...

मी वेगळा माणूस हे मानून मी मिरवायचो
ही निर्मिती आई तुझी जी आजवर जोपासली

>>>>>>> बेफिकीरजी, रडवलंत हो ..... खरचं फारच कठीण काळ. तुमच्या मनात किती कल्लोळ होत असेल. Sad

पण तरीही 'जे आधी उगवले, ते आधी चालले' हा सृष्टीचा नियमच आहे ना! विचार करा जर हा क्रम उलट झाला तर अधिकच बिकट परिस्थिती होते .......

काळजी घ्या आईची आणि घरातल्या सगळ्याची.....
आई बरोबर जास्त वेळ घालवा आणि तिला आवडणारी प्रत्येक गोष्ट करयाचा प्रामणिक प्रयत्न तुम्ही नक्क्की कराल ही खात्री आहे.
खूप रडवल् आज तूंम्ही.......

Pages