
तळण्यासाठी
मांदेली हवी तेवढी.
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी
प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.)
आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा. तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.
हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश. ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.
अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते.
काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).
ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.
भाऊ, लाखोंमें एक बात!
भाऊ, लाखोंमें एक बात!
भाऊकाका ज्जे बात सही (y)
भाऊकाका ज्जे बात
सही (y)
(No subject)
भाऊ :हाहा:
भाऊ

भाऊ, एकदम जबरदस्त!
भाऊ, एकदम जबरदस्त!
भाऊ
भाऊ
भाऊकाका, मासे बघुन बाबु जागा
भाऊकाका,
मासे बघुन बाबु जागा झाला काय?
<< मासे बघुन बाबु जागा झाला
<< मासे बघुन बाबु जागा झाला काय? >> बिरबलाची गोष्ट आहे ना, झोपलेल्याला पाण्याचा फवारा मारून जागं केलं तर तो मातृभाषेतच ओरडतो ! माझ्यासारख्या सगळ्याच मासेखाऊंची मातृभाषाच मासे हीच असते ! आणि म्हणून दैवतही जागूच असतं, इथलं अगदीं जागृत दैवत !!
भाऊ भाऊ अगदी खरे. वाटणानेही
भाऊ
भाऊ अगदी खरे. वाटणानेही माश्याची खरी चव जाते.
सुरमईची रेसिपी माझ्या लेखनात सापडेल.
अतुल ह्याचे उत्तर मासे पकडणारे देऊ शकतात.
१००
१००
सुरमय ताजी नसेल म्हणून वास
सुरमय ताजी नसेल म्हणून वास मारत असेल...
बांगडा, सुरमय, तार्ली हे बर्यापैकी ताजे असावेत. अगदी समुद्रातून ताटात नसेल तरी वास मारणारे नसावेत.
मग कितीही मसाले चोपडा, खराबच लागते. खरे तर इतके मसाले लागतच नाहीत.
भाउ, चित्र +१
जल्ला! कुठे उघडायच ते
जल्ला! कुठे उघडायच ते उघडा(हाटेल) पण ताजे मासे ठेवा.
प्लीज रोज रोज हा धागा वर नका
प्लीज रोज रोज हा धागा वर नका आणू रे. फार त्रास होतो.
जागू, जरा कुपा माश्याचा
जागू,
जरा कुपा माश्याचा फोटो टाकतेस़ का?
ंमला सुरमय व कुपात गोंधळ उडयो.
झंपी कुप्यावर काळे डॉट नसतात.
झंपी कुप्यावर काळे डॉट नसतात. सुरमईवर थोडे असतात. फोटो शोधते.
आर्.एम्.डी
मी नेहमी गोंधळते. फोटो
मी नेहमी गोंधळते. फोटो टाकलास तर मदत होइल.
मी तुझी अख्खी माश्याची सिरिज
मी तुझी अख्खी माश्याची सिरिज पालथी घातली कुपा शोधायला. बरेच वर्षात मी सुरमय इथ आणायला गेली नाहे त्यामुळे जरा गोंधळ झालाय.
तु माश्याची सिरीज का नाही बनव्ली? शोधायला बरी. थँक्स.
सुरमई आणि कुपा दिसायला
सुरमई आणि कुपा दिसायला थोडेफार सारखेच असतात, पण कुपा कापल्यावर आतमध्ये लालसर असतो.
वाटणानेही माश्याची खरी चव
वाटणानेही माश्याची खरी चव जाते. >>>> असेलही ग जागू! पण आम्हा कोकण्यांकडे नारळाशिवाय पदार्थाला सद्गती नाही. रच्याकने, एकीने बोंबलाचे सार आणले होते .नो वाटण .फक्त तांदळाचे पीठ लावले होते.पण रस्सा बर्यापैकी झाला होता.
इथे मांदेली बर्याच लोकांनी
इथे मांदेली बर्याच लोकांनी काट्यासकट आख्खी फस्त करतात असं लिहिलं आहे. खरंच अशी आख्खीच्या आख्खी काता येते का ? काटा अडकत नाही घशात ? काटे काढून खायची तर कशी खायची मांदेली ? मार्गदर्शनाची गरज आहे जागू
मागच्या पानावर सिंडीने काटे काढून मासे कसे खायचे ह्यावर पोस्ट लिहा अशी विनंती केली आहे, त्याला अनुमोदन.
मांदेली मस्त खरपूस तळली की
मांदेली मस्त खरपूस तळली की त्याचे काटे टोचत नाहीत. रस्स्यातली मांदेलीचे काटे मात्र टोचतात.
जो मधला काटा असतो तो खायचा
जो मधला काटा असतो तो खायचा नाही बाकीचे काटे मऊ/ नाजूक हलके असतात.
आख्खी मांदेली तोंडात भरुन
आख्खी मांदेली तोंडात भरुन मांस खाउन फक्त काटा आला पाहिजे बाहेर. स्कील आहे तेही. अनेक वर्षे मांदेली खाल्ली की जमते.
अगो मांदेली तळून कुरकुरीत
अगो मांदेली तळून कुरकुरीत झाली की काटे टोचत नाहीत. कडक असतात पण खाता येतात जसे सुपमधे तळलेले नुडल्स असतात त्याप्रमाणे. पण नवख्यांनी खाउ नका असाच सल्ला देईन मी. उगाच अडकला काटा तर पंचाईत. हे बघ मांस वरून काढल ना की मधे काटा आपोआप रहातो. मग उलट करुन परत खालच्या बाजूचे मास काढायचे. काट्याला काही मास अगदी चिकटून राहीलेले नसते. ते सहज निघते.
ओ फोटो टाका ना प्लिज.
ओ फोटो टाका ना प्लिज.
आदिती पहिल्यापानावरच्या
आदिती पहिल्यापानावरच्या प्रतिसादात फोटो टाकले आहेत.
हम्म, ओके. काट्यासकट खाणे
हम्म, ओके. काट्यासकट खाणे नाही जमणार असे वाटतेय सगळ्यांच्या पोस्ट्स वाचून. जागूने सांगितलेय तशा पद्धतीने खाऊन बघितली पाहिजे मांदेली एकदा.
धन्यवाद सर्वांना.
जागू ताई- मी इंडोनेशियात
जागू ताई- मी इंडोनेशियात असताना एक माशाचा पदार्थ खाला होता. दिसायला उपासाच्या बटाटा चिवड्यासारखा. तसाच कोरडा आणि बरणीत ठेउन कधिही खाता येणारा. त्याच्यात एक कुठलातरी बारीक मासा, शेंगदाणे आणि नेहमीचा मसाला सगळे डीप फ्राय असल्या सारखे. मी ते काय आहे हे शोधायचा नंतर खूप प्रयत्न केला पण सापडले नाही. तुम्हाला असा काही मासा व पदार्थ माहित आहे का?.
यू ट्यूब वर " Ikan teri kacang lama " असे टाकले तर दिसते *. तुम्हाला काय वाटत . तो मासा मांदेली आहे काय?. तसे असेल तर ती रेसिपी मस्त होइल. मांदेली मिळाली तर मी ट्राय करणार आहे. माझी शंका कारण मी खाल्लेला अजून बारीक होता. अगदी किसलेल्या बटाट्या सारखा.
* - Ikan (मासा) Teri (माशाचे नाव- बहुतेक Anchovy - बहुतेक मांदेली ) kacang ( शेंगदाणे) tahan lama (खूप दिवस टिकणारा)
विक्रमसिंह, रेसिपी पाहिली.
विक्रमसिंह, रेसिपी पाहिली. गोल्डन anchovy म्हणजे मांदेली असे म्हणत असले तरी रेसिपीत जो मासा आहे तो मांदेली नक्कीच नाही.
मोदकं नावाचा एक मासा मिळतो, मांदेलीपेक्षा लहान व पांढरा. हा सुका पण मिळतो. तो वापरून बघा. व्हिडिओत जे दिसते ते याच्या जास्त जवळ जाते.
जागु ताई ची च रेसिपी आहे
जागु ताई ची च रेसिपी आहे टेंगळी सूकट
तुम्ही म्हणताय ते ते असु शकेल
Pages