मासे १६) मांदेली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2010 - 02:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तळण्यासाठी
मांदेली हवी तेवढी.
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.)
आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा. तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर आहे.
अधिक टिपा: 

हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश. ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.
अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते.
काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).

ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कश्वे, निवट्या ही खाडीतली मासळी. त्याच्या जुड्या किंवा गाथनी करुन ठेवतात विकायला. हे मासे टणाटण उड्या मारत असतात. कदाचित त्यांची ऑक्सीजन साठवुन ठेवण्याची क्षमता जास्त असेल. (त्यांचा पण कोणी रामदेव बाबा असेल की). कॉलेजात असताना कोणी मित्र एखाद्या मुलीला बघुन जास्तच फुदकायला लागला की त्याचं निवट्या असं नामाभिमान व्हायचं.

भ्रमर गाथनी कशा असतात ? मी पहिलांदाज ऐकते.
अश्विनी, भ्रमर निवट्या ह्या चिखलात म्हणजे खाडीच्या बाजुला जो चिखल असतो त्यात सापडतात. ह्यामध्ये कॅल्शियम भरपुर असते अस म्हणतात. निवट्या काळ्या आणि त्यावर पांढरट किंवा काळे ठिपके असतात. मार्केटमध्ये ह्या जिवंतच मिळतात. चिंबोरी सारखेच ह्यांना पण जाळीच्या टोपलीत ठेवतात. मिळाल्यावर फोटो टाकतेच.

निलु अश्विनी ही माझी ती माझ्या प्रत्येक लिखाणावर येउन सिद्ध करते. विशेष म्हणजे माश्यांच्याही. आणी ती नाही आली की मलाच चुकल्यासारख वाटत. ह्याला म्हणतात मैत्री. अश्विनीबरोबर अजुनही काही नाव जोडता येतील.
चिंबोर्‍यांची रेसिपी टाकायची आहे अजुन.

चंपी मला मसाल्याबद्दल कधीपासुन लिहायच आहे ग. मी लिहेन थोड्या दिवसांनी मला आईकडे मागायला वेळच नाही मिळत मसाल्याची रेसिपी.

भ्रमर ह्या निवट्या घरी आणल्यावरही खुप वेळ जिवंत असतात. काही जण ह्यावर मिठ मारुन झाकुन ठेवतात मग साफ करतात मिठाने मरतात म्हणतात. पण मी हा प्रयोग करुन पाहीला तेव्हा अयशस्वि झाला. मी फ्रिजरमध्ये टाकुनच मारते त्यांना.

अखि खुप खुप धन्यवाद ग.

भ्रमर गाथनी कशा असतात ? मी पहिलांदाज ऐकते.

भ्रमराची माहिती जास्त ऑथेंटिक असणार, पण तरीही माझी लुडबुड सोडत नाही.

मी पाहिलेली गाथणी अशी होती - एक लांब मजबुत दोरा (दोरखंड वगैरे नाही हा.. साधा दोराच पण मजबुत) त्याच्या खालच्या टोकाला गाठ मारायची आणि मग दुसरे टोक माशाच्या गिलामधुन घालुन तोंडातुन बाहेर काढायचे. असे मासे एकावर एक ओवत जायचे. माझ्या लहानपणी वाडीला जेव्हा रुपयाला शेकडा बांगडे किंवा पेडवे मिळायचे ते असेच गाथणीत ओवलेले मिळायचे. गावी पण नदीत कधी मोठे मासे मिळाले तर लोक लगेच गाथणीत ओवायचे आणि घरी आणायचे.

खेकडे घरी आणले की गार पाणी ( इथे नळाचंच मस्त गार येतं ) एका मोठ्या पातेल्यात भरायचं. त्यात खेकडे टाकायचे अन वरुन घट्ट झाकण ठेवायचं . १०-१५ मिनिटात ते खेकडे ' गो टु द ग्रेट ब्लू ओशन इन द स्काय ' . मग साफ करणे एकदम सोप्प. ४-६ तास फ्रीजरमधे ठेवण्याइतका पेशंस कोणाला आहे Wink

मेधा चांगली आयडीया सांगितलीस.
साधना मला वाटल गाथनी म्हणजे कुठला मासा असेल.

सोनू ची पोस्ट आणि खाली अनिश्का मांदेलीला सोनूला म्हणायची. Lol

अग सोनेरी कलर असतो म्हणून असेल.

मी विचार करत आहे ....... हॉटेल उघडण्याचा .......

ज्यात व्हेज डिपार्टमेंट दिनेशदा यांना द्यायचे आणि मत्स्य डिपार्टमेंट हे जागु यांना द्यायचे... चिकन मटण चे डिपार्टमेंट साठी जागा त्वरीत भरणे आहे कृपया संपर्क साधावा Wink

वॉव्व! चांगल्यावेळी आणि चांगल्या दिवशी वर आला हा धागा. उद्या मांदेलीचाच बेत आहे, मांदेली तव्यावर तळलेलीच मस्त आणि तिखल्यात तर बेस्टच. उदयन हॉटेल कधी उघडताय? आम्ही वाट पाहतोय..........

अनिश्का कोथिंबीरचे जुडे साफ करणे, वाटण करणे ही कामे पण करावी लागतील. लसुणही निवडावा लागेल. Lol

उदयन जोपर्यंत चिकन-मटणाच्या जागेवर कोणी येत नाही तोपर्यंत मी चालवायला तयार आहे. Lol

नरेश आता मस्त मांदेली आणि बोंबील बाजारात येत आहेत.

कविता Happy

अनिश्का कोथिंबीरचे जुडे साफ करणे, वाटण करणे ही कामे पण करावी लागतील. लसुणही निवडावा लागेल.>>>>>>>> आर्रे धत्त.....वुमनीया....उ तोह हमार दाये हाथ का खेल हय....यु कर देंगे चुटकी बजाके.....बस खानेको रोज मिलना चाही

जागूजी, प्रथम सलाम.
तळलेलीं मांदेली व सोलकढी [कोकम] - भात, ब्येष्ट काँबिनेशन !
<< ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते.>> गरम भाकरी व असं कालवण हा खास मेन्यू !

अरे किती अन्याय कराल! जागूताई, इकडे पण या बरं तुम्ही. आणि येताना हे सगळे प्रकार घेऊन या. इथे मांदेल्या मिळतात की नाही इथपासून सुरूवात आहे.

उदयन डब्बे भरुन न्यायचे का? Lol

नमस्कार भाऊ. नुसत्या चिंचेच्या कोळातली मांदेली एकदम ब्येश्त.

आर्.एम्.डी. हॉटेलात या उदयनच्या सगळे मिळेल. एक शाखा ह्यांच्या इथे पण काढा हो उदयन.

तुपशी Happy

हो घरात जितके मेंबर असतील ( ज्या घरात तुम्ही राहतात त्या घरातले मेंबर फक्त Wink ) त्यांच्यासाठी डब्बा भरुन दिला जाईल ....... Happy ते ही हॉटेलात जेवन बनवल्याबरोबर सर्वात आधी. फ्रेश.. Happy

जागुताई

माझा एक प्रश्न आहे. मुर्खासारखा वाटल्यास दुर्लक्ष करा.

हा माझा अत्यंत आवडता मासा आहे. हा पाण्यात रात्री चमकतो असे ऐकले होते. ते खरे आहे काय?

सुरमईच्या प्रतिक्षेत.

बायकोची कोकणातली मैत्रीण घरी आलेली. खास मासे बनवून खायला घालायला. सतराशे साठ मसाले चिंच तांदुळ पिठ वगैरे आणायला लावले आणि शेवटी माश्याचा वास तसाच राहिलेले मासे खाल्ले त्या सर्वांनी. शेवटी कोल्हापूरच्या हॉटेल सायबावाल्याना सोडता उत्तम सुरमई कुणालाच करता येत नाही हे बायकोने मान्य केले.

ह.बा.,
दोनच शक्यता-
१] बायकोची मैत्रीण कोकणातील असली तरीही अट्टल मासेकरू/मासेखाऊ नसावी, किंवा
२] सुरमई ताजी नसावी .
कोकणात सतराशे साठ मसाले वापरून माशांच्या चवीचा अपमान केला जात नाही ! Wink

उदयदा , म्या पन !

पण मी वेज किचनमध्ये - लसूण - कांदे सोलणे , मटार सोलणे , पीठ मळणे , शेंगदाण्याचे कूट मिक्सर वर करून देणे , कोथिंबीर-कढीपता निवडणे ई ई कामे मी नक्की करीन . Happy

कोकणात सतराशे साठ मसाले वापरून माशांच्या चवीचा अपमान केला जात नाही !<< टिपिकल कोकणी माणूस बोलू शकणारं महान वाक्य आहे!!! Proud

Pages