जुन्नरच्या आठवणी

Submitted by झकासराव on 23 May, 2008 - 01:22

सुट्ट्यामधली गमती जमती.--
पोहणे
मी एका दिवसात ६-६ वेळा अंघोळ केली असेल ह्या पोहण्याच्या नादात.
म्हशी चरायला नेणे. (इथे म्हशी ४ असायच्या आणि चारायला नेणारे ६ जण )
त्यावेळी सगळ्या म्हशीना चरायला सोडून तल्लीन होउन पत्त्यांचा डाव मांडणे (वक्कय, पाच तीन दोन, मेंढीकोट ई. ई.)
पत्ते नसतील तर (घरातले एक काका आमचे पत्ते चुलीत टाकुन देत सापडले तर म्हणून ते लपवण्याची खास जागा असे. पण तरिदेखील सापडले आणि त्याची राख झाली तरच अशी स्थिती) क्वचित क्रिकेटचा खेळ मांडायचा.
नाहितर मग आंबे, करवंद, जांभळ असा रानमेवा लुटायला जायच. प्रत्येक झाडावर पहारा नसायचाच. त्यामुळे मजा असायची. हे झाड कोणाच ह्याचा फार विचार आम्ही करत नसु.
ते नसेल तर मग तांबड्या मातीच्या जमिनीत मोठी मोठी ढेकळ असत. त्यात बर्‍यापैकी सपाट दगडांची गाडी करुन रस्ता बनवणे व गाडी गाडी खेळणे. हे करताना आम्हे रस्ता फारच सिस्टीमॅटिक पद्धतीत करत असु. आम्हाला जेवढ ज्ञान होत गावांच आणि रस्त्यांच्या दिशेच ते सगळ पणाला लावत होतो. आजुबाजुच्या सगळ्या गावची नाव आणि गाव असायचीत रस्त्यावर
अधे मधे लावलेल्या कांद्याच्या वरच्या पाती काढुन त्याचा पाइप लाइन हा खेळ असायचा. त्यात त्या पाती अलगद कांद्याला धक्का न लावता तोडून घेवुन त्या एकमेकात घुसवुन त्याची पाइपलाइन. आणि आमच्या डोहाच्या जवळच एक छोटा "पाट" (शेताला पाणी वाहुन नेण्यासाठी असलेला रस्ता) होता. त्याला दोन ठिकाणी उमाळे होते, त्यामुळे त्यात नेहमी थोड थोड पाणी असायचच. ते आमच धरण. मग त्याच नाव राधानगरी धरण असायच आणि नदीच नाव वारणा
काय मजा होती राव.
एकदा पत्त्यांच्या नादात म्हशींच्या धाराची वेळ होउन गेली तरी आम्ही लक्षच दिल नव्हतं. आणि तशी सगळी गुर शहाणी होती फार लांब जायची नाहीत. पण त्यावेळी ती सगळी नजरेच्या टप्प्याच्याच काय तर हाकेच्या देखील बाहेर होती. आणि आमची एक मावशी वरुन आम्हाला शिव्या देत येत होती धारची येळ झाली तरी कुठ बसलायसा अस म्हणत. आणि मग काय म्हशी शोधण्यात अजुन अर्धा तास गेला होता. धारेची वेळ टळुन गेली. त्यामुळे त्या दिवशी दुध डेअरीला गेले नाही. आम्ही मग सगळ्या मोठ्यांची नजर चुकवत गुपचुप शांतपणे घरी गेलो. इमानदारीत हातपाय धुवुन चहा पिउन हळुच घराबाहेर सटकलो आणि समोरच्या घराच्या बाजुच्या आमच्या अड्ड्यावर जावुन बसलो होतो.
काय आयुष्य होत राव मस्त.
त्यावेळी टीव्ही खेडोपाडी पोचले नव्हतेच. एखादाच असायचा. पण आम्हाला त्याची कधीच गरज वाटली नाही.
क्वचित आईसक्रीम वाला यायचा. कोन मधुन किंवा मग लाल रंगाच बर्फाच
ते घ्यायला गेल कि पैसे किंवा एक वाटी भात त्याला घालायचे.
मग आरामात आइसक्रीम खात बसायच. त्या आइसक्रीमवाल्याच मात्र आम्हाला फार आकर्षण होत. तो आला की न चुकता खायच म्हणजे खायचच/ काय करणार तो यायचा १५-२० दिवसातुन एकदाच.
अजुन काही धमाल होत ते म्हणजे काजु.
काजु छोटा असतानाच त्यावर हा माझा हा तुझा असा मालकी हक्क सांगुन ठेवायचा. थोडा मोठा झाला अस वाटल की लग्गेच त्याची बी गायब करायची.
मग यथावकाश काजु पिकला की खायचा.
काजुच्या बियांचा कधी कधी प्रोग्राम होत असे. आम्ही चुलीसमोर बसुन त्या भाजुन फोडून खात असे. हे भाजण्याच काम मात्र फार सावधानतेन कराव लागे नायतर तो गरम चिक उडाला की फार त्रास व्हायचा.
तिकडे गोट्या (कंची) चा खेळ फारसा नव्हता. आमचा काजुच्या बियांचा खेळ असायचा त्याऐवजी. ज्या दिवशी जास्त बिया जिंकणार त्या दिवशी तर काजुच्या बिया भाजण्याचा कार्यक्रम १००%
रात्रीच्या वेळी अजुन एक हमखास असणार काम म्हणजे यष्टी आली (त्या गावात एकच यष्टी रात्रीची मुक्कामाची) कि त्यातन गावात कोण कोण आल हे बघणे. मग ते झाल की जेवण करुन बाहेर हवेला झोपणे. (अर्थात हे बिबटे रावांवर अवलंबुन असायच. तो फिरतोय अशी वंदता असली कि गुपचुप घरात नायतर बाहेर पिंजर टाकुन त्यावर "वाकळ" अंथरुन झोपणे. अर्थात झोपताना दिवसभरात काय काय धमाल केली त्याच्या गप्पा किंवा उद्या कुठे डल्ला मारायचा आहे का किंवा उद्याच खेळ काय हे चर्चा. )
अजुन एक खेळ होता तो म्हणजे रिंगण. एक लोखंडी रिंगण घ्यायच. त्याला फिरवायला एक "सळा" असायचा ज्याच्या पुढच्या टोकाला "U" शेप असायचा. आणि ते रिंगण त्या सळ्याने फिरवायच न पाडता. खुप मजा येत होती. आता ते रिंगण गावी देखील पहायला नाही मिळत.
बरच काही होत यार. लिहित गेलो तस एक एक आठवत राहिल बघ.

कीरखाती हा शब्द प्रथमच ऐकला.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील दोन पोस्ट्स ही इतर बीबीवर केलेली आहेत . जुन्नर कराना ती रिलेव्हन्ट वाटतील म्हणून टाकली आहेत. कदाचित तुम्ही आण्खी अ‍ॅड करू शकाल. यात

धन्यवाद रॉबिन! बर्‍याच वर्षांपूर्वी मंचरच्या बाजारात रू. २ डझन ने मिळालेले रायवळ आंबे इतके मस्त होते की त्याची चव अजून आठवत आहे. ते कसे पिकवले होते माहीत नाही. एरव्ही तेथेच एवढे चांगले क्वचितच मिळाले.

माझा नवरा कोरक्यांच अगदि कौतुक सांगत असतो. शिळि भाकर चुलीवर / कि चुलीजवळ ? ठेऊन कडक होईपर्यंत भाजुन लसणाच्या मिरची (दगडि पाट्यावर वाटलेल्या आणि सोबत थोड तेल टाकुन)बरोबर खायची. मी नाहि खाल्ल कधी. Sad

कोरके बाजरीच्या भाकरीचे असतात्.म्हणजे शिळ्या बाजरीच्या भाकरीचे शिल्लक राहिलेले तुकडे. ते मातीच्या चुलीवर तव्याच्या मागच्या बाजूला नुसते ठेवून द्यायचे. इतर स्वयम्पाक होईपर्यन्त अथवा दोनेक दिवसांच्या उष्णतेने हे तुकडे खरपूस भाजले जायचे आणि किंचित ब्राऊन व्हायचे. मग त्याची गोडी काय वर्णावी? शाळेतून आले की खाकी हाप चड्डीच्या खिशात दोन तीन मुठी कोरके भरले की चालले उधळ्या मारायला. तेव्हाची बाजरी गावरान असल्याने तीत अंगभूत गोडवा असे. शेळीच्या दाट गरम दुधात कोरके म्हनजे काय सांगावे महाराज! कैलासलाच विचारावे. त्या काळची बिस्कीटेच ती.(भेसकुट). गिरगावाकडल्या लोकाना काय सांगावे ते. त्यानी आपल्या पावाच्याच गोष्टी कराव्यात्.ज्वारी हे पाणचट धान्य असल्याने त्याचे कोरके होत नाहीत /(नसत).
बरोबर खायची. मी नाहि खाल्ल कधी.
लुत्फ्-ए- मयखाना तुम्हे क्या समझाये जाहिद,
हाय कम्बख्त तूने पी ही नहीं..................

हाय ! रॉबिनहुड,(एक दिर्घ सुस्कारा सोडुन)
जले पे और नमक मत छिडका.:स्मित:
मेरी किस्मत मे कोरके नहि शायद, रात दिन पाव खारी खाती हू, मै उसे कल भी मीस करती थी, मै उसे आज भी मीस करती हू....... Proud

तस बटर/पावाच्याहि काहि छान आठवणी आहेत गावाकडच्या.
उन्हाळ्यात सुट्टिला गावी म्हणजे मामाच्या गावी गेलो कि सकाळि उठुन तोंड धुवुन सायकलवर घेऊन येणार्‍या पाव/ बटर वाल्याची वाट बघायची. लांबुनच त्याची आरोळि ऐकु यायची "ये पाव बटर......"
तेहि अगदि वेगळ्या ढंगात. आम्हि पोर धावत सुटायचो त्याच्यामागे. सगळि मिळुन १२/१५ जण असायचो.
आमचा आरडाओरडा ऐकुन तो थांबायचा आणि खुप खुश व्हायचा, कारण त्याचा ताजा माल बराचसा संपणार असायचा. रोज पाव बटर खायला परवानगी नसायची. त्याला तसेच घराकडे घेऊन यायचो एखादा मामा रीकामाच असायचा आमच्या साठि तोच खरेदी करुन वाटण्या करुन द्यायचा. दहा पैशांना मिळणारी गोल मोठी बटर आजहि डोळ्यासमोर येतात. गुळाच्या चहाच मोठ पितळेच पातेल आजीने आधीच चुल्हिवर चढवलेल असायच. मग पितळि, पेला , ग्लास जे काहि हाताला लागेल ते घेऊन गोलाकार बसायच, आजीने सगळ्यांकडे कौतुकाने पहात चहा द्यायचा. Happy
गरम गरम गुळाच्या चहात मोठाली बटर बुडवुन खाताना अशी मजा यायची सांगु.
खाऊन झाल कि मोठाल्या पोरांनी तांब्याच्या बंबाजवळ जाऊन सरपण/ गोवर्‍या घालायची जबाबदारी घ्यायची, तोपर्यंत ती जागा एखाद्या मामीने चालवलेली असायची. अंगणातला तो मोठा बंब पेटवण आणि नंतर पेटत ठेवण म्हणजे कौशल्याच काम असायच. विशेषतः पावसाळ्यात. कारण सरपण/ गोवर्‍याहि थोड्याफार भिजलेल्या असायच्या. भल्या पहाटेच आजी तो बंब पेटवायची. माडिवर आम्हि सगळे बच्चे कंपनी झोपलेलो असायचो, बंबातुन येणारा धुर थेट आमच्याकडे माडिवर यायचा. झोपेतहि डोळे चुरचुर करायचे, त्रासलेला चेहरा करुन डोक्यावरुन गोधडि ओढुन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करायचो. अगदिच मुड आला तर चार दोन पोर गोळा होऊन थेट शेतातला रस्ता धरायचो, पाड गोळा करायला. आमराईत पहिला धडक मोर्चा आमचाच असायचा, तोंडहि न धुता, भल्या पहाटे पाड शोधत हिंडायचो. ज्याला मिळायचे तो खायलाच सुरु करायचा. मग बाकिच्यांनाहि स्फुरण चढायचे आणखी जोमाने शोध सुरु व्हायचा. कुठुनतरी एखाद्याचा शेत राखणीचा कुत्रा भुंकायला लागायचा. अशी भिती वाटायची आपल्याकडेच धावत येतोय कि काय चावायला, पण कुत्रीहि शक्यतो त्यांच्या एरीयात गेल्या शिवाय अंगावर यायची नाहित. सितेचा लक्ष्मणरेषेचा इतिहास त्यांना कसा ठाऊक होता कुणास ठाऊक. Happy

जुन्नरी खादाडी
१) नारायणगावला पुलाच्या पलीकडे 'राजमहल'
२) पुण्याकडे जाताना नदी ओलन्डली की पुढे कॉलेजच्या रेषेत सुपर श्रीराज नावाचे हॉटेल आहे. पार्किन्ग असलेले ढाब्याटाइप साधे. मला वाटते नीलायम का काय त्याचे शेजारे ३२के व्ही सब स्टेशनच्या जवळ. भुजबळ म्हणून मालक . एक्स सर्विस्मन. नॉन व्हेज एकदम टेस्टी व खूप स्वस्त. मासवड्याही उत्तम. चुलीवर भाजलेल्या खमंग ज्वारी बा़जरीच्या भाकरी.
३) एकदम घरगुती जेवण व शाकाहारी जेवण पाहीजे असेल तर आळेफाट्यापासुन पुढे तिन -चार किमी अंतरावर 'सरोज" म्हणुन हॉटेल आहे एकदातरी अवश्य भेट द्या, तुमची पावले पुन्हा जेवनासाठी वळलीच म्हणुन समजा.
४) तुम्हाला अस्सल व झणझणीत मिसळ हवी असेल तर आळेफाट्यापासुन एक किमी वर पुणे-नाशिक हायवेवर 'दळवीची मिसळ" प्रसिध्द आहे. मासवड्या हव्या असतील तर पिंपरी-आळेफाटा या दरम्यान 'आस्वाद' म्हणुन हॉटेल आहे.

--- सौजन्य
रॉबिनहुड, झंकार.

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

लोप पावत चाललेली मराठी ग्रामीण संस्कृती, परंपरा, खाद्य, सण, उत्सव पुन्हा एका नव्या जोमाने आपल्या आणि परदेशातल्या लोकांसमोर घेऊन आला आहे एक आपल्याच मराठी मातीचा मराठी तरुण. आपल्या मराठी संस्कृतीची ओळख परदेशातील लोकांना करुन देण्यासाठी जुन्नर मधील राजुरी गावातील कु. मनोज हाडवळे ह्या तरुणाने ’ऍग्रोटुरिझम’ ह्या संकल्पनेला मराठी संस्कृतीशी जुळवुन ’पराशर ऍग्रोटुरिझम’ ची स्थापना राजुरीमधे केली. पराशर मार्फ़त निरागस ग्रामीण संस्कृतीला नवा रंग देऊन तिचा प्रसार महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या शहरांतील आणि परदेशातील लोकांमधे केला जातो.

एक दिवस असाच राजुरीच्या पराशर ला भेट दिल्यास तुम्हाला पुन्हा गावाकडं आल्याचा खरा आनंद नक्किच मिळतो. गाईचं ताजं दुध, शेतातील ताजी फ़ळं, चुलिवरची भाकर-कालवन, गरम गरम मासवडी, गोडगोड पोळ्या, झनझनीत मिसळ, चविष्ठ वडापाव, बैलगाडीचा फ़ेरफ़टका, डाळिंबाची-द्राक्षाची-सिताफ़ळाची डौलदार बाग, समोर डोंगरावर उतरलेले ढग, पाऊस आणि उन्हाची लपाछपी, आकाशात उंच जाणारा झोका, रात्री मनाला शांत करणारं संगीत, माथ्यावरुन दिसणारं गाव असं किती आणि काय काय... जो ग्रामीण आनंद आपण शहरात राहुन विसरुन गेलोय तोच...

पराशर ला आजवर हजारो देशातील आणि परदेशातील पाहुण्यांनी भेटी देऊन आपल्या संस्कृतीच, खाद्यपदार्थांचं आणि सणांचं कौतुक केलं आहे असं मनोज सांगतो. आपली संस्कृती जगभरात पोहचवण्यासाठी सदैव कटिबध्द मनोज जुन्नर मधील पर्यटनासाठी देखील काम करत आहे. "सातवाहन काळापासुन महत्व प्राप्त झालेल्या आणि स्वत: शिवाजी महाराजांनी जन्म घेतलेल्या ह्या जुन्नर तालुक्यात असंख्य पर्यटन क्षेत्र आहेत ज्यांनादेखील मला जगासमोर ठेवायची आहेत. शिवकालीन आणि प्राचिन महत्व प्राप्त जुन्नर अनेक परदेशी पाहुण्यांना आवडला आहे व त्यांनी तोंडभरुन शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, नानेघाट चं कौतुक केलं आहे. छ. शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशी पर्यटकांना सांगताना छाती भरुन येते. आपली मराठी संस्कृती टिकवण्याचं आणि वाढवण्याचं काम आम्हा मराठी तरुणांचं आहे आणि मी ते चोख करतोय." असं मनोज सांगतो.

पराशर चं यश पाहुन महाराष्ट्र सरकारच्या ’महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने’ पराशरची दखल घेतली. तसेच बॉलीवुड व मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांसाठी पराशर आवडतं ठिकाण झालं आहे. मनोज ला सकाळ ऍग्रोने सन्मानित केलं तसेच पराशरला जागतिक कृषी पर्यटन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

पराशर बद्दल अधिक माहिती साठी : http://www.hachikotourism.in/

Pages