माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या

Submitted by साधना on 4 November, 2010 - 10:14

दिवाळीनिमित्त माझ्या ऑफिसातल्या विविध ब्लॉक्स मधल्या कलाकार मंडळींनी आपापली हस्तकला सादर केली, त्याची ही एक झलक...

१. तांदुळ रांगोळीच्या रंगात रंगवुन ही रांगोळी घातलीय -

२. मिठ रांगोळीच्या रंगात रंगवुन ही रांगोळी घातलीय -

३. ह्या सगळ्या फुलांच्या रांगोळ्या

४. ह्या आपल्या नेहमीच्या. काही साध्या, काही संस्कारभारती डिजाईन्स

५. आणि यात बाजी मारुन गेला हा मोर. आणि सोबत बक्षिस घेऊन त्याच्या निर्मात्या.

मोबाईलवरुन फोटो काढल्याने काही फोटो नीट आले नाहीत. तरीही मुळ रांगोळी इथे देण्याचा मोह आवरला नाही म्हणुन टाकलेत.

गुलमोहर: 

सगळ्याच सुंदर. फुलांची जी पहिली रांगोळी आहे, ती एखाद्या गालिच्यासारखी दिसतेय अगदी.
रांगोळी कलावंतांच्या कलेबरोबरच चिकाटीला (किती तास मान मोडून बसावे लागले असेल?) मुजरा.

ह्यातली एखादी रांगोळीची कल्पना घेतली तर चालेल का?

चालेल की.. सगळे कलाकार हौशी आणि इतर सगळेजण फोटु काढत होते, त्यामुळे कॉपीराईट व. काही नाही... Happy

ह्यातली एकही रांगोळी मी घातलेली नाही.

सहीच....

फारच अप्रतिम...

साधना, शेअर केल्याबद्दल धन्स.

पहीली आणि मोराची रांगोळी अप्रतिम....
मी ही रांगोळी काढतो आवड म्हणून कधीतरी
बाकी इतरही खुपच छान आहेत....

म हा न. ह्यापलिकडे प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत. Happy

खत्तरनाक!! काय सही रांगोळ्या आहेत, एकापेक्षा एक. तांदळापासून, मीठापासून रांगोळ्या काढल्यात लोकांनी, या सर्वांना __/\__

शेवटची, विजेती ठरलेली रांगोळी तर अप्रतिमच.

कालच तुमचा साहेब मला भेटलेला तो सांगत होता वर्ष २०१० मधला आमच्या कंपनीची प्रगती एवढी चांगली न्हवती याचे कारण तुम्हाला समजलंच असेल.

कालच तुमचा साहेब मला भेटलेला तो सांगत होता वर्ष २०१० मधला आमच्या कंपनीची प्रगती एवढी चांगली न्हवती याचे कारण तुम्हाला समजलंच असेल.

साहेबाने सांगितले नाही लोकांना काय प्रकारचे इंक्रिमेंट, किती वर्षांनी मिळतात वगैरे ते?? असे असुनही लोक जमेल तेवढा आनंद स्वतः घेतात आणि इतरांनाही देतात याचे साहेबाला कौतुक वाटत नाही का??? Happy

Pages