"बस" केक

Submitted by लाजो on 27 October, 2010 - 23:19

"बस" केक Happy

माझ्या लेकीच्या डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक" म्हणुन साजरा होतोय. या निमित्ताने बर्‍याच धमाल धमाल अ‍ॅक्टिव्हीटीज, बार्बेक्यु वगैरे ऑर्गनाईज केलेत.

आज लेकीच्या ग्रुपला 'बस वॉश' दाखवायला घेऊन गेले होते. इथल्या लोकल बस ट्रान्सपोर्टच्या बस मधुन मुलांना बस डेपो मधे नेले आणि मग बस ऑटोमॅटीकली ऑपरेटेड बस वॉशिंग बे मधे नेऊन उभी केली. मुलं आत बसलेली आणि बाहेरुन बस वॉश होत्येय.. Happy नुसता कल्ला केला असणार पोरांनी Lol

आता आफ्टरनून टी साठी हा मी केलेला "बस" केक हाणतील Happy

Picture 005.jpg"

Picture 008_0.jpgIMG_1816.jpg

**********

बेसिक बटर केक आणि बेसिक बटर आयसिंग पाकृ: http://www.maayboli.com/node/17973

मागच्या वर्षीच्या "चिल्ड्रन्स वीक" ला मी ही "टोटो" केली होती Happy http://www.maayboli.com/node/12056

गुलमोहर: 

लाजो लेकाला दाखवला तुझा बस केक. विचारतोय कोणी केला? म्हटलं मावशीने. तर म्हणे आपण माझ्या बड्डे ला मावशीला सांगूया का मला असा केक करून देशील का? Happy

धन्यवाद मंडळी Happy

चाकांसाठी: लिकोरीश (licorice) च्या स्ट्रिप्स वापरल्या आहेत Happy

सिग्नल्साठी: गोल कॅडबरी चॉकलेट बट्टन्स वर m & m's लावलेत. आणि लिकोरिश स्ट्रिप चा खांब.

@फुलपाखरु Happy इथे असतिस (किंवा मी तिथे असते) तर नक्की करुन दिला असता Happy

ए भारी हां.
पण रंग अजून भारी वापरायचेस की..

असं टायपता टायपता लाल गाडी डोळ्यासमोर आली Uhoh
पण एशियाडचा रंग छान होता !!

इथे असतिस (किंवा मी तिथे असते) तर नक्की करुन दिला असता >>

धन्स लाजो. मी एकदा प्रयत्न करून बघेन. मला मदत करशील का? तो बस चा शेप तू कापूनच दिला आहेस ना?

तुझ्याइतका मस्त होणार नाही माझा पण जसा होईल तसा सही Happy

Pages