टोटो

Submitted by लाजो on 17 November, 2009 - 00:33

मागच्या आठवड्यात लेकीच्या डेकेअर मधे किड्स वीक होता. त्यात रोज काहीतरी नविन नविन गमती जमती ठेवल्या होत्या. पिकनीक, बार्बेक्यु, कॉस्च्युम पार्टी आणि फॅन्सी हॅट डे Happy
आता फॅन्सी हॅट काय करावी हा माझ्यापुढे पडलेला मोठ्ठा प्रश्न??? तेच ते पिसं लावुन आणि झिरमिळ्या लावुन टोप्या सगळेच करतिल माहित होतं. मग वेगळं काहितरी करावं असं डोक्यात होतं. पण काय?
असा विचार करत सुपर्मार्केटात ब्रेड इ.इ. आणायला गेले होते. तर समोर लॉलीज दिसल्या आणि माझ्या डोक्यात आयडिया सुचली आणि आमची फॅन्सी हॅट रात्री १.३० वाजेपर्यंत जागुन तय्यार झाली.

लेकीची जुनी टोपी, लॉलीज (जेली बीन्स), लोकर, बिस्किटाची पाकिट आणि कापडी फुल लावुन मस्त टोटो (टोपीला लेक टोटो म्हणते) तय्यार Happy

ToTo 1.JPGToTo 2.JPGToTo 3.JPG

गुलमोहर: 

मस्त आहे कल्पना, टोपी आणि टोपीखालची परी !!

बापरे, मुलं अशी शाळेत/देकेअर ला जायला लागली की पणाला लागणारे आहे कल्पनाशक्ती Sad

Pages