डॉक्टरांचे प्रेम, लग्न वगैरे

Submitted by डॉ अशोक on 26 October, 2010 - 06:50

डॉक्टरांचे प्रेम, लग्न वगैरे

कविवर्य मंगेश पाडगावकरांनी म्हटलं आहे: "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, खरंच सांगतो ते तुमचं आमचं सेम असतं" पण कोल्हापूरी चिवडा आणि नासिकचा मकाजीचा चिवडा हा चिवडाच असला तरी वेगळा. किंवा व्हिस्की आणि शाम्पेन यात अल्कोहोलच असलं तरी त्यांची चव वेगळी. तसंच डॉक्टर आणि इतरेजन यांचं प्रेमच असलं तरी ते वेगळं आणि आगळं. म्हणूनच डॉक्टर मंडळी म्हणू शकतात "
प्रेम म्हणजे प्रेम म्ह्णजे प्रेम असतं
ते तुमचं आमचं सेम असलं
तरी खरंच सांगतो
ते आमचं थोडं डिफ्रंट असतं
तर अशा "डिफरंट" पणाच्या खुणा दाखवणारी ही कविता, समस्त Doctor जोडप्यांची क्षमा मागून....

(एक:) ऑपथॅलमॉलॉजीस्ट आणि ई.एन.टी. सर्जन

एक ऑपथॅलमॉलॉजीस्ट
ई.एन.टी. सर्जनच्या मनात भरली
कान पाडून आणि घसा खाकरून
त्यानं तिला मागणी घातली.
ती म्हणाली:
"पण हे कसं शक्य आहे?
डॊळे आणि कान यात
चार बोटं अंतर आहे!"
तो म्हणाला:
"तुझ्या डॊळ्य़ा समोरचा चष्मा
नाकावरच टिकून आहे.
त्याची काडी सुद्धा कानावरच आहे.
सारांश, चष्म्याला नाकाची
काडीला कानाची
तशी तुला माझी गरज आहे!"
ती मनात म्हणाली:
"याच्या दोन काना मधला प्रदेश
भलताच सुपीक आहे.
याला खरंच माझ्या आधाराची गरज आहे"
तो समजायचं ते समजला
आणि पुढे झाला.
कारण, त्याला होतं माहित
की स्त्री बोलत नाही
तेंव्हाच खरं तर खरं खरं बोलते
पण ते डॊळ्यांनी
आणि ती?
ती तर Ophthalmologist होती!

-अशोक

गुलमोहर: 

"याच्या दोन काना मधला प्रदेश
भलताच सुपीक आहे.
याला खरंच माझ्या आधाराची गरज आहे"
.............>>>>>>>>> हा हा हा Lol

छान आहे. << "तुझ्या डॊळ्य़ा समोरचा चष्मा
नाकावरच टिकून आहे.
त्याची काडी सुद्धा कानावरच आहे.
सारांश, चष्म्याला नाकाची
काडीला कानाची
तशी तुला माझी गरज आहे!" >> मस्त लॉजिक :P: