क्लब

Submitted by मामी on 25 October, 2010 - 12:52

आधीच सांगू इच्छिते की, मी ना तळ्यात ना मळ्यात. कुठलीही बाजू न घेऊ शकणार्‍या काही limited edition अभाग्यांपैकी मी आहे. 'मी स्टँड घेतला' याचा अर्थ मी कुंपणावर बसले होते ती उभी राहिले असा होतो.

खालील गझलगुच्छ हा उच्च आहे की तुच्छ आहे हे तुम्ही कुंपणाच्या कोणत्या बाजूकडून पाहता यावर सापेक्षी अवलंबून आहे. माझ्यामते माझ्या प्रतिभाश्वानाचे ते पुच्छ आहे. मला खरंतर कवितेतले जामच काही कळत नाही, पण विडंबन म्हटले की डोक्यात शब्द टणाटण उडायला लागतात. हे सुध्दा कधीकधीच होते. केस अजून अगदिच हाताबाहेर गेली नाहीये. Happy

(सुरेश भटांची क्षमा मागून)

क्लबातल्या क्लबात मी तुझ्यासमीप राहते
तुलाच सांगूनी तुझा क्रमशः भाग वाचते ||

असेच रोज नाहूनी लपेट लेख ते नवे
असेच चिंब भाव तू बिंधास सोड मोकळे
तुझा निबंध मात्र मी इथे हळूच पचवते ||

असाच रोज नेटवरी टायपून टाक तू नवे
असेच सांग हासूनी पंख्यांस गू़ज आपुले
तुझ्या गझला तुझी दळे* इथे टिपून काढते ||

अजून तू अज्ञात माझ्या भाव-भक्तीस जरी
जरा विचार जाणत्या मेंब्रांस** एकदा तरी
दुरून कोण ही तुझी फिकीर रोज करते ||

* दळे - पुष्पदल (याचा या संदर्भात अर्थ लेख असा घ्यावा) या शब्दाचे अनेकवचन- दले = दळे. कृपया कोणीही हा शब्द 'दळण' या अर्थी घेऊ नये.

** 'मेंब्रांस' हा शब्द phonetically जरी 'मेंढ्रांस' याला जवळचा असला तरी तो निव्वळ योगायोग समजावा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कसली प्रतिभा अन कसलं काय!

विडंबन म्हणजे सेकंड हँड मालाचे व्यापारी. पूर्वी चकाचक असलेला टिव्ही नायतर फ्रीज घ्यायचा त्यातली काही बटणं, काही कप्पे असं काय जमेल ते बदलायचं आणि माल खपवायचा.

अप्रतिम!

मामी,

१. पहिला उतारा अतिशय आवडला.

२. आपण म्हंटल्याप्रमाणे आपण कविता करत नसाल त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ बदल सुचले, पण मूळ निर्मीती झकास असल्यामुळे उगाच लिहीत बसलो नाही.

३. भटसाहेबांची ती रचना गझल नाही. कविता आहे.

४. ध्रूपद, पहिले व द्सरे कडवे फारच आवडले.

५. सर्व सूचना आवडल्या.

'क्लबातल्या क्लबात' हे सर्वात आवडले.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

<< खालील गझलगुच्छ हा उच्च आहे की तुच्छ आहे हे तुम्ही कुंपणाच्या कोणत्या बाजूकडून पाहता यावर सापेक्षी अवलंबून आहे. माझ्यामते माझ्या प्रतिभाश्वानाचे ते पुच्छ आहे. >>
Rofl भन्नाट विडंबन !!

ह्.बा..... माझ्या जामाता, मला सा.बा. म्हणण्याआधी आपल्या ओरिजिनल सा.बां.ची परवानगी काढून ये बरं ... >>> मामी, पसंद नसलो तर तसं सरळ सांगा... पहिलं कर्ज नील केल्याशिवाय दुसरं नाही अशा आविर्भावात कर्जाच्या अ‍ॅप्लिकेशनवर घेतात तशा परवानग्या काढत फिरायला सांगू नका.

मामीच्या मैफलीत मला आज गीत गाऊ दे
कधी न ये स्फूर्ती तया आज आर्त होऊ दे.....

अशाच नेट लावूनी विडंबने करीत जा
कवितांचा बाज जरा बदलून टाकीत जा
मुग्धपणे आज मला खळखळून हसून दे.....

येथवरील प्रगती तुवा पुढेच घेऊन जाय
विडंबनकाव्य तुझे जणू दुधावरील साय
अशीच मलई आम्हा सदा मिळत जाऊ दे....

:हाहा::हहगलो:

जरासुद्धा बोचरं नाही, फक्त चिमटे आहेत, ते ही गुदगुल्या केल्यासारखे. पर्फेक्ट विडंबन !!

* दळे - पुष्पदल (याचा या संदर्भात अर्थ लेख असा घ्यावा) या शब्दाचे अनेकवचन- दले = दळे. कृपया कोणीही हा शब्द 'दळण' या अर्थी घेऊ नये.

** 'मेंब्रांस' हा शब्द phonetically जरी 'मेंढ्रांस' याला जवळचा असला तरी तो निव्वळ योगायोग समजावा.

हे मात्र भारी होतं. मी पण निबंध (शब्द) वाचताना घाईत phonetically जवळचा (शब्द) चुकून वाचला.

Pages