सिमला मिरची , हिरवे टॉमेटोची भाजी

Submitted by cutepraju on 22 October, 2010 - 04:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरव्या सिमला मिरच्या ५-६ , हिरवे टॉमेटो २-३ , फोडणीसाठि तेल, मोहोरि, हिग, हळद, कढिपत्ता , गोडा मसाला, गुळ , धने-जिरे पुड , दाण्याचे कुट , ओला नारळ , सजवटीसाठि बारीक चिरलेलि कोथिम्बिर

क्रमवार पाककृती: 

प्रथम सिमला मिरच्या ५-६ मधल्या बिया काढुन चिरुन घ्याव्यात . मध्याम आकरात चिरुन घ्याव्यात. हिरव्या टॉमेटोच्या पण फोडी करुन घ्याव्यात. नन्तर एका पतेलीत तेल तापत ठेवाव. मग त्यात मोहोरि, हिग, हळद, कढिपत्ता , थोडस लाल तिखट घालुन नन्तर चिरलेलि सिमला मिरची घलुन परतुन घ्यावे एक वाफ काढावी आणि मग टॉमेटोच्या फोडी घल्आव्यात. मग भाजी शिजली कि त्याच्यात चवीनुसार मीठ , गोडा मसाला, धने-जिरे पुड , गुळ , दाण्याच कुट घलाव. ऑला नरळ आणि कोथिम्बिर घलुन व्यवस्थित एकत्र करावी.

मस्त चव लागते हिरव्या टॉमेटोमुळे छान चव येते.

वाढणी/प्रमाण: 
साधारण ४ जण
अधिक टिपा: 

सिमला मिरची एक्दम गिच्च शिजवु नये,,,

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users