समीप रंगमंच - प्रयोग - २

Submitted by storvi on 21 October, 2010 - 01:12

ह्ल्ली अनेकदा मला आपण पुण्यात रहात असल्याचा भास होतो. पुणेकर कलेच्या बाबतीत जरा 'elitist' असतात, तसेच बे एरियातही आता आढळुन येतं. निव्व्ळ मनोरंजना पेक्षा विचारंना चालना देणार्‍या कलाकृती इथल्या रसिकांना जास्त प्रीय असतात. 'कला' च्या 'समीप रंगमंच' चा दुसरा प्रयोग त्याच पठडीतला.

समीप रंगमंच म्हणजे 'theater-in-a-room'. कमीतकमी props/नेपथ्य वापरुन नाटके सादर करायची. त्यामुळे यात मोठे सेट्स, मेकप वगैरे फार काही

नसतं. थोड्क्यात, मैफिल का अंदाज आणि नाटकाचा बाज. अशा वातावरणात गेल्या शनिवारी, 'छुनेसे प्यार बढता है' आणि 'स्वामी', समीप रंगमंच च्या उपक्रामात 'कला' ने सादर केल्या.
'छुनेसे प्यार बढता है' ही अमृता हर्डीकर यांनी लेखन व दिग्दर्शन केलेली एकांकिका आणि 'स्वामी' मूळ जी. ऐ. कुलकर्णी, यांच्या कथेचे नाट्यरुपांतर.
'छुनेसे प्यार बढता है' चा प्रयोग माझ्या लेखी फारच सरस आणि प्रभावी झाला. निकित अभ्यंकर यांच्या सहज सुलभ अभिनय आणि अमृता हर्डीकर यांचे उत्तम लेखन यामुळे HIV सारखा विषय असुन देखिल कुठेही अवघडपणा आला नाही. हल्क्या-फुल्क्या पण नेम्क्या संवादातुन विषयाचे मर्म प्रेक्षकांपर्यंत पोचतं.

'स्वामी' ही मूळ जी. ऐंची कथा. त्याचे हेमांगी वाडेकर यांनी नाट्यरुपांतर केले होते, तर मनोज वाडेकर यांनी दिग्दर्शन केले होते. इथे नाट्यरुपांतराबद्दल विशेष उल्लेख करावासा वाटतो. मुळ लेखनाचा रंग न घालवता त्याचे नाट्यरुपांतर करणे सोपे नाही. निवेदन आणि नाट्य यांचा सुरेख मेळ साधला होता. निवेदन , प्रकाशयोजना, संगीत या सर्वांमुळे 'स्वामी' प्रभावी झाला. प्रमुख भुमिकेत मात्र एकसुरीपणा जाणवला. कुतुहला पासुन, प्राणाचे भय, आगतिकता आणि शेवटची शरणागती असा विलक्षण प्रवास अभिनयातुन दिसला असता, तर 'स्वामी' आणखी प्रभावी झाला असता.
आता थोडेसे समीप रंगमंच च्या या प्रयोगाबद्दल.... कल्पना खुप छान असली तरी, एक महत्वाची त्रुटी, दोन्ही एकांकिका पहाताना जाणवली, ती म्हण्जे पहिल्या दोन रांगा वगळता, इतर सगळे पहाण्यासाठी माना वाकड्या करुन आणि दोन 'डोक्यांच्या' मधुन बघण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे, विशेषकरुन 'स्वामी' मध्ये, तो जेंव्हा खाली झोपुन, वाकून अभिनय करतो तो भाग सर्व प्रेक्षकांना नीट दिसला नाही. एवढी एक उणीव वगळता, शनिवारचा प्रयोग यशस्वी झाला.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टो, त्या समीपचे अभिनंदन कारण परत इथे स्टोरवी हे नाव दिसले. नाटकाबद्दल फार कमी लेखन असते इथे. यापेक्षा सविस्तर नाही का लिहिता येणार. ?

दिनेश, त्य दोन्ही एकांकिकान्बद्दल आणखी सविस्तर लिहु असं म्हण्ताय का? अहो, मुळ एकांकिकाच इत्क्या छोट्या होत्या, की आणखी लिहावं कि नाही असा विचार मी करत होते.

भाई, रामराम! हाऊ इस यु? लॉन्ग वेळ नो सी.....

वा! वा! माझी विचारपुस करायला जनता हाजिर झाली म्हणायची Happy

पण लेख वाचला कि नाही? का नुस्तेच स्टो ला बघायला आले? Happy

मेधा, बी केअरफुल व्हॉट यु विश फोर, यु जस्ट माईट गेट इट Happy

स्टो, तपशीलात लिहा बाई...

>>त्या समीपचे अभिनंदन कारण परत इथे स्टोरवी हे नाव दिसले.<<
Rofl
समीप नाव नाहीये हो. Intimate Theatre चं भाषांतर आहे.

आमो (आद्य माबोकर) अवतरल्या आज. बाकी 'स्वामी' चे नाट्यरुपांतर म्हणजे शिवधनुष्यच उचलले होते म्हणायचे. किमान प्रयत्न केल्याबद्दल तरी अभिनंदन!